बोटावर शाईचा अजून रंग ओला

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
17 Nov 2019 - 11:11 am

बोटावर शाईचा अजून रंग ओला
माझ्या पाठी त्याच आधी खंजीर तू खूपसला

दाविलेस डोळ्यांना स्वप्न एक भगवे
दारोदारी फिरशी आता लाज सोडून नागवे
नकळत तव द्वेष गाड्या जागृत मम झाला

विश्वासून तुझीयावर मते तूला दिली
राम भरत जोडी ही क्षणार्धात तुटली
कालियूगीन भरत कसा सत्तातूर झाला

आई भवानी रडली अन, शिवराय व्यथित झाले
नाव त्यांचे आज पार धुळीला मिळाले
आज तुझ्या कृत्याने जीव धन्य झाला

पैजारबुवा,

आरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचाटूगिरीबिभत्सइतिहासकविताइंदुरीऔषधोपचारकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

17 Nov 2019 - 1:04 pm | जॉनविक्क

बहोत खूब.

मदनबाण's picture

17 Nov 2019 - 4:21 pm | मदनबाण

सुरेख...
झेंडा मधले गाणं आठवल !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Imagine Dragons – Believer (8D AUDIO) [ Use Headphones To Feel The Experience ]

पाषाणभेद's picture

18 Nov 2019 - 9:25 am | पाषाणभेद

शिवरायांचा वारसा म्हणवणारे अशा स्थितीत आहेत हे पाहून विषाद वाटला. शरम वाटते आहे त्यांची.
अन हे कसले मराठीचे वाली? हे तर मराठी माणसांचे खूनी!

समयोचित काव्य पैजारबुवा!

यशोधरा's picture

18 Nov 2019 - 11:35 am | यशोधरा

अगदी, अगदी.

नाखु's picture

20 Nov 2019 - 9:23 am | नाखु

आणि समयोचित.

हटवादी पणा आणि शंभर टक्के मूळच्या पिंडाशी फारकत यानेच ना घरका ना घाटका अशी अवस्था करुन घेतली आहे.

तुका म्हणे उगा रहावे, जे जे होईल ते पहात जावे पंथातला
शिक्कामोर्तब झालेला नाखु

पैंबू काका , व्यक्त छान झाला आहात पण अजून व्यक्त व्हायला हवं होत असं राहून राहून वाटतंय .

सुमो's picture

20 Nov 2019 - 5:13 pm | सुमो

दाविलेस मम नेत्रांना एक स्वप्न भगवे
गुंडाळीलेस डोईवरी कमरेचे शेवटचे

वदला काका मग देईन तुज पितांबर ल्यावयाला
म्याडम देखिति न म्हणती हा असाच चांगला

--- हे आपलं र ला र अन ट ला ट हो पैजार बुवा
मूळ कविता छानच हे वै सां न.

पद्मश्री चित्रे's picture

24 Nov 2019 - 9:43 pm | पद्मश्री चित्रे

मस्त आणि योग्य..

जालिम लोशन's picture

24 Nov 2019 - 10:33 pm | जालिम लोशन

मस्त

Naval's picture

25 Nov 2019 - 1:50 pm | Naval

शीर्षक खुप भारी !!!

मुक्त विहारि's picture

26 Nov 2019 - 4:19 pm | मुक्त विहारि

आवडली

आता अजून एक कविता पाडा...

मी परत येणार.
मी परत आलो.
मी लगेच चाललो.
गलगले निघाले.........

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Nov 2019 - 11:20 am | ज्ञानोबाचे पैजार

पळतच आलो येताना,पण पोपट झाला जाताना,

अंगावरती कातडे सिंहाचे, आत लपलेला लबाड लांडगा ,
अलगद शिकार झालो त्याची, सत्ते मागे पळताना

गाफिल राहून पडलो एकटा, काळोखी बघ रात्र उगवली ,
डोळे उघडले तेव्हा नव्हती , दिसली खुर्ची जाताना

चाणाक्य नीती व्यर्थ जहाली ,वारही केले फुकटची गेले
पुन्हा येण्याचा अर्थ आकळे, त्वरीत परतूनी जाताना

गुडघ्याला मी बांधून बाशींग, माळ घातली शंढाला,
पार्टी विथ डिफरन्स कसे म्हणू मी, जनतेला मते मागताना,

पैजारबुवा,

संजय पाटिल's picture

27 Nov 2019 - 4:22 pm | संजय पाटिल

दोन्ही पण जबराट.......

गेल्या हजार वर्षात, असे शीघ्र व समयोचित विडंबन प्रतिक्रियेत आले नाही...
अभी हम बोले तो बोलें क्या, करे तो करे क्या...
वाह पैबुजी वाह...

जॉनविक्क's picture

27 Nov 2019 - 10:50 pm | जॉनविक्क

हे वास्तववादी आहे

नाखु's picture

28 Nov 2019 - 9:50 pm | नाखु

सारेच अनाकलनीय आणि अनावश्यक आत्मघातकी साहस.

शिक्कामोर्तब झालेला नाखु

नवीन सरकारला शुभेच्छा

गणेशा's picture

3 Dec 2019 - 10:41 am | गणेशा

भारी