महिला दिन शुभेच्छा

.

काश्मिर भारताला लाभदायक आहे की तापदायक

Primary tabs

तमराज किल्विष's picture
तमराज किल्विष in जनातलं, मनातलं
9 Aug 2019 - 4:14 am

आजकाल चाललेल्या घडामोडी पाहता काश्मीर चे विभाजन करून केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करणे व उर्वरित भारताचा कायदा प्रस्थापित करण्यासाठी हालचाली झाल्या. यासाठी मुळ हेतू काश्मिरचे भले व्हावे, सैनिकांची हानी थांबून खोऱ्यात शांतता प्रस्थापित व्हावी हा आहे. पर्यायाने पाकिस्तान ची नांगी ठेचली जाईल व पुढेमागे पाकव्याप्त काश्मीर परत घेता येईल.
पण माझ्या बुध्दीच्या आकलनाप्रमाणे माझी मतं मांडत आहे. सहमत असण्याची अपेक्षा नाही. फक्त मला काय वाटतं ते सांगतो.
काश्मिर मध्ये जाऊन उद्योग धंदे उभारण्याचे स्वप्न पाहणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. काश्मिर हे अफगाणिस्तान, पाकिस्तान यांचीच आवृत्ती आहे. त्यांना कितीही मदत केली तरी पायावर उभे राहणार नाही. दहशतवादाचे व्यसन लागले की त्या दुष्टचक्रातून सुटका नसते. बुमरॅंग सारखे त्यांच्यावर उलटते. आजपर्यंत काश्मिरींच्या नरड्यात फार पैसा ओतला आहे. अनंत काळ काश्मीर भारताला धरलं तर चावतंय नि सोडलं तर पळतंय हे आठवायला लावेल हे नक्की. काश्मीर वरचा हक्क सोडायला हवा होता हे भारताला कळायला पन्नास वर्षे लागू शकतील. लाखो हिंदूंना हुसकावून लावणाऱ्या काश्मिरींविषयी सहानुभूती बाळगणे मुर्खपणाचे आहे. अमेरिकेने व्हिएतनाम मध्ये जशी माती खाल्ली तीच गत भारताची काश्मिरमध्ये होईल
काश्मिर च्या तेव्हाच्या नेतृत्त्वाने ( राजाने) केवळ काश्मिर पाकिस्तान च्या घशात जावू नये या हतबलतेतून भारतात सामील होण्यासाठी संमती दिली होती. पण त्याबरोबरच काश्मीर हे बऱ्याच बाबतीत विशेष अधिकार राखून भारतात आले. भारतानं काश्मिर चा भूभाग कितीही ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही लोकमानस भारताच्या बाजूला आहेच याची खात्री देता येत नाही. भारत नेहमीच म्हणत आलाय की आम्ही कुणावर आक्रमण केले नाही. तर जम्मू, श्रीनगर व लडाख या भागात जनमताचा कौल संविधानिक मार्गाने घेऊन जनतेच्या इच्छेचा आदर करायला हवा होता.
इकडचे तिकडचे उपटसुंभ काश्मिर भारताचे अभिन्न अंग आहे, दुध मांगो खीर देंगे...... कितीही सांगत असले तरी माझे अतिशय मौल्यवान सैनिक तिथे रोज मरण पत्करताहेत. अगोदर माझ्या सैनिकांना दूर करा मग काय करायचे ते करा. जाणूनबुजून मृत्यूच्या दारात सैनिकांना कशाला ढकलायचे. सिव्हिलीयन्सना पाठवा तिकडे. सैनिकांच्या बलिदानावर काश्मिर भारतात ठेवून काहीच फायदा नाही.

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

9 Aug 2019 - 6:51 am | सोत्रि

सहमती!

पण असे विचार करणही ठीकच आहे, त्यात काही चूक नाही.

- (विचार करणारा) सोकाजी

जॉनविक्क's picture

9 Aug 2019 - 11:02 am | जॉनविक्क

परंतू वरील विचार गांभीर्याने कोणी करत असेल / घेत असेल तर काय परिस्थिती असेल याबाबत माझे वैयक्तिक निवेदन आहे.

वेगवेगळ्या दिशांनी विचार करून बघणे आणि विचारात तार्कीक उणीवा आणि असमतोल जोपासणे ह्या दोन भिन्न बाबी आहेत. कोणत्याही युक्तीवादाचे परखड समिक्षण होणे गरजेचे असते तसे ह्या विचार मांडणीचेही केले जाणे आवश्यक असावे. शेवटी तुकडे तुकडे गँगच्या भूलथापांना किती बळी पडायचे त्याचा प्रत्येक देशप्रेमी व्यक्तीने विचार करणे गरजेचे असावे.

सैनिकांच्या बलिदानावर काश्मिर भारतात ठेवून काहीच फायदा नाही.

हेच वाक्य काश्मिर च्या जागी अ ते ज्ञ सर्व प्रदेशांची नावे एकेक करुन ठेऊन वाचून पहा आणि सगळ्यात शेवटी

" सैनिकांच्या बलिदानावर भारत अस्तित्वात ठेवून काहीच फायदा नाही " हे वाचून पहा आणि आपण तुकडे तुकडे गँगच्या देशविरोधी नरेटीव्हचे सदस्य झालो नाही ना याचा विचार करावा.

मृत्यूच्या दारात सैनिकांना कशाला ढकलायचे. सिव्हिलीयन्सना पाठवा तिकडे.

देशाच्या एकसंघतेच्या रक्षणाची जबाबदारी शेवटी प्रत्येक नागरीकाची असते . इज्राएल चीन आणि आमेरीकेप्रमाणे प्रत्येक नागरीकाला सैन्यात काम करण्याचे सक्ती असेल तर वरील वाक्यातील भंपकपणा सहज लक्षात यावा.

ज्या देशात सैनिक होऊन बलिदान देण्यास नकार दिला जाईल तिथे सिव्हीलयनचे बळी जाण्यास वेळ लागत नाही. मौल्यवान सैनिक तिथे रोज बलीदान पत्करतात. म्हणून सैनिकांना दूर करा हे सैनिकांबद्दलचे प्रेम नाही देशाच्या शत्रुंना दिलेली सवलत आहे, आणि देशाच्या शत्रुंना सवलत देण्यास परखड भाषेत देशद्रोहच म्हणतात.

दुध मांगो खीर देंगे

अजून एक लांगुलचालक भंपकपणा , दुध मांगो खीर देंगे या वृत्तीनेच लोक डोईजड होत असतात सर्वांना दूध द्यावे शक्य असल्यास सर्वांना खिरही द्यावी पण दुसर्‍यांना सोडून मला एकट्याला खीरच पाहीजे असे म्हणनार्‍या आणि काश्मिर भारताचे अभिन्न अंग असल्याशि तडजोड करणार्‍या देशभक्तांना उपटसुंभ संबोधणार्‍या देशद्रोह्यांना माऊंट वरून मिसाईलला बांधून अरबी समुद्रात डुबवले पाहीजे (परखडतेबद्दल क्षमस्व)

भारत नेहमीच म्हणत आलाय की आम्ही कुणावर आक्रमण केले नाही. तर जम्मू, श्रीनगर व लडाख या भागात जनमताचा कौल संविधानिक मार्गाने घेऊन जनतेच्या इच्छेचा आदर करायला हवा होता.

याचे स्पष्ट उत्तर असे की भारत भारताच्या हिमालय पल्याडच्या देशांवर आक्रमण करण्याचे भारतीय परंपरेत नाही . पण आसेतू हिमालय भारताची एकसंघता जोपासण्यासाठी अंतर्गत बंडाळ्यांना आवश्यकते नुसार बलप्रयोगानेही वेळोवेळी मोडीत काढले जाते. देशांतर्गत बंडाळी मोडणर्‍या सुरक्षेसाठी केलेल्या कारवाईस आक्रमण संबोधत नाहीत. मुदलात तथकथित पाकीस्तान सहीत कोणत्याही प्रदेशास जनमताचे कौल काहीही असोत फुटून बाहेर पडण्याचे किंवा एक्स्ट्रॉची खीर वाट्यात पाडून घेण्याचे अधिकार नैतीक ठरू शकत नाहीत पाकिस्तान बांग्लादेशचे अस्तीत्व नाईलाजाचे आहे ते नैतीकतेचे अथवा स्विकार्यतेचे नाही हे न समजणार्‍यांच्या पंचेंड्रीयात शिस्याचा गरम रस ओतल्यानंतर काश्मिर किंवा इतरकुठलीही फुटीरतेची आणि त्याचे समर्थन करणारी मानसिकता स्विकार्य असणार नाही हे ठणकावून सांगता येते .

उत्तराचा काही भाग माझ्या दुसर्‍या धागा प्रतिसादात येतो त्याचा काही अंश खाली देतो

"..तरीही जी दुषित हितसंबंध जपू इच्छिणारी मंडळी दक्षिण आशियातल्या उपराष्ट्रवादाला highlight करू इच्छितात त्यांना दक्षिण आशियायी राजकीय एकात्मतेचे बारकावे लक्षात आणून देणे गरजचे असावे. दक्षिण आशियाच्या नैसर्गिक सिमांच्या मर्यादेत ज्यांनी दिल्लीवर आक्रमणे केली किंवा जिथे दिल्लीने आक्रमणे केली किंवा या प्रदेशात जिथे परस्परांवर आक्रमणे केली त्या आक्रमणांच्या कारणाने दक्षिण आशियास राजकीय एकात्मता उद्भवते. - राजकीय भौगोलीक एकात्मतेची चिनी व्याख्या खंडणी उर्फ टॅक्स कलेक्शनच्या इतिहासाच्या अर्थाने येते त्या अर्थानेही दक्षिण आशियाची राजकीय भौगोलीक एकात्मता स्विकारावी लागते.
ऐकण्यास अपरिष्कृत वाटेल पण दक्षिण आशियाची हि राजकीय एकात्मता डोईजड होणार्‍या उपराष्ट्रवादांना स्थानिक दुषित हितसंबंध डावलून काळाच्या ओघात साम दाम दंड भेद सर्व मार्गांनी कह्यात करत रहाते. …"

काश्मीर वरचा हक्क सोडायला हवा होता हे भारताला कळायला पन्नास वर्षे लागू शकतील. लाखो हिंदूंना हुसकावून लावणाऱ्या काश्मिरींविषयी सहानुभूती बाळगणे मुर्खपणाचे आहे.

एकीकडे सहानुभूती बाळगूनका म्हणता दुसरीकडे हुसकावून लावणार्‍यांना हुसकावण्यापेक्षा हुसकावून लावणार्‍यांचीच तळी उचलणारे तुकडे तुकडे तत्वज्ञानातील विरोधाभास माझ्या समजण्या पलिकडचा आहे. एवढा विरोधाभास कुणि आपल्या विचारत कसे काय बाळगू शकते ?

काश्मिर हे अफगाणिस्तान, पाकिस्तान यांचीच आवृत्ती आहे.

शांतता धर्मियांच्या चुकीच्या कृती आणि तत्वज्ञानातील उणीवांवर बोट ठेवण्याएवजी त्यांची भिती निर्माण करून घेतली की असले शेखचिल्ली तत्वज्ञान निपजते

एकतर महाराष्ट्रातीलच (वारीस पठाण सारखे अपवाद वगळता) बहुतांश पठाण मंडळी -युम पठाणांकडे पहा - मराठी आणि भारतीयतेशी अगदी सुधारणावादासहीत एकरूप झालेली आढळतील. सरहद गांधीच्या काळातील पख्तुन प्रदेशास भारतात रहाण्यात रस होता काश्मिरात मुस्लिम लीगला थारा नव्हता. अफगणींचे स्वदेशप्रेम कौतुकास पात्र आहे पण त्यांच्यावर कधीकाळी ग्रीकांनी बिनबोभाट राज्य केल आनि कधीकाळी ते पारसी/बौद्ध/हिंदू धर्मीय होते. रशिया मुस्लिम नसूनही अख्य्ख्या मध्य आशियावर राज्य करू शकते. काश्मिरात पंजाबच्या रणजितसिंगासहीत डोग्रांनी राज्य केले .

पाकिस्तान फितवू शकते म्हणून आज काश्मिर सोडायचे उद्या उर्वरीत भारतातिल वेअवेगळ्या लोकांना कुणी ना कुणी फितवत राहील तेवढे देशाचे तुकडे होऊ द्यायचे ? देशाचे तुकडे तुकडे झाल्यानंतर तुम्ही आणि तुमच्या येणार्‍या पिढ्या अधिक सुरक्षीत असतील की तुकडे तुकडे तत्वज्ञानाच्या विरुद्ध बलीदान देऊन अधिक सुरक्षीत असतील ?

पुन्हा एकदा कॉमन सेन्स कॉमन नसतो..ल किंवा शत्रुम्कडून फितवले जाऊन देशद्रोहात सामिल होतात किंवा दुषित हितसंबंध जोपासण्यासाठी देशविरोधी तत्वज्ञानात फुटीर मानसिकतेचे लोक सामिल होताना दिसतात.. या मंडळींना अजून कोणत्या वेगळ्या शब्दात समज देता येऊ शकेल की देश विरोधी तुकडे तुकडे तत्वज्ञान पसरवण्या विरुद्ध कायद्याची गरज असेल ?

सोत्रि's picture

9 Aug 2019 - 6:49 am | सोत्रि

माझी मतं मांडत आहे

हम्म्म...

ह्या विषयावरची राज्यसभेतली आणि लोकसभेतली चर्चा ऐका. कालचे पंतप्रधानांचे भाषणही ऐका. आणि परत दुसरा लेख लिहून मत मांडा :)

- (काश्मिरबद्दल प्रचंड आशावादी) सोकाजी

संग्राम's picture

9 Aug 2019 - 12:46 pm | संग्राम

नाना,
या विषयावर एक "चावडी पे चर्चा" होउन जाऊ दे ... कदाचित नवीन पात्रं आणा ... बरेच दिवस चावडी बंद आहे

तमराज किल्विष's picture

9 Aug 2019 - 12:51 pm | तमराज किल्विष

माहितगार साहेब सविस्तर व मुद्देनिहाय प्रतिसाद आवडला. जगातील मोठी लोकशाही म्हणताना. जर काश्मिर भारतात आले फक्त काही अटी ठेवून आले तर त्या अटी तत्कालीन व नंतरच्या सरकारांनी तशाच चालू ठेवल्या होत्या तर तेथील लोकांना विश्वासात घेऊन आताच्या सरकारने हटवायला पाहिजे होत्या. भारत सरकार जसे आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासी लोकांना विकत घेऊ देत नाही. तसाच काश्मिर मध्ये बाहेरील लोकांना जमीन विकत घेता येत नाही. हे एक प्रकारचे संरक्षण काश्मिर ला होते. जसं तुम्ही दक्षिणी राज्यांना हिंदी भाषा सक्ती करु शकत नाहीत तसेच काही विशेष अधिकार काश्मिर ला होते हे लक्षात घेतले पाहिजे. उद्या तुम्ही तामिळनाडू वगैरे राज्यांवर हिंदी सक्ती करा बरं मग काय प्रतिक्रिया येईल.
भारत हा तीनशेहून अधिक संस्थानांमध्ये विभागला होता. इंग्रजांची जुलमी राजवट येऊन गेली म्हणून एका लोकशाही देशात रूपांतरित झाला.
हैदराबाद मध्ये प्रजा बहुसंख्य हिंदू होती व ती निजामाला वीटली होती म्हणून बळाचा वापर करून हैदराबाद भारतात सामील करता आले. उलट काश्मिर मध्ये बहुतांश प्रजा मुसलमान होती व तेथील राजा हा केवळ नावाला राजा होता.

उलट काश्मिर मध्ये बहुतांश प्रजा मुसलमान होती ...

आपण आजूनही तुकडे तत्वज्ञानात रमला आहात याने अचंबित होण्यास होते. राजांच्या कथा संपुन जमाना झाला. आता ज्या ज्या गल्ल्यांमध्ये मुसलमान बहुसंख्य आहेत त्या त्या गल्ल्याम्मध्ये पाकीस्तान, तमीळ गल्यात तमीळस्तान, जाट गल्लीत जाटस्थान, कुंभारगल्लीत कुंभारस्थान, न्हावी गल्ली न्हावी स्थान ब्राह्मणगल्लीत ब्राह्मणस्थान धनगरगल्लीत धनगरस्थान रेड्डीगल्लीत रेड्डीस्थान, तंबोळी गल्लीत तांबोळीस्थान, लिंगायत गल्लीत लिंगायतस्थान , नायर गल्लीत नायरस्थान काढून देणार का काय ? बरय राव तुकड्यांचे तत्वज्ञान

१९४७ मध्येच एकदाचे सिव्हीलवॉर होऊन जाऊ दिले असतेगल्लीग्ल्लीत एकदा रक्तपात अनुभवून घेतला असता तर तुकडे तत्वज्ञानाने आज डोके वर काढले नसते.

उद्या तुम्ही तामिळनाडू वगैरे राज्यांवर हिंदी सक्ती करा बरं मग काय प्रतिक्रिया येईल.

बेसिकली राष्ट्रविरोधी नॅरेतीव्हजना संधी दिली की अशी व्हॉट अबाऊटगिरी होऊन प्रत्येक गल्ली स्वातंत्र्य मागत सुटते. त्यांच्यावर हिंदीची सक्ती केलि की ते काश्मिरला ३७० कसे मिळते म्हणून विचारणार ह्याच कारणाने सगळ्यांचे उंट एकएक करून दावणीला बांधून तुम्हा सगळ्यांना एकच न्याय मिळेल हे ठणकावून सांगितले पाहीजे.

मास एमिग्रेशनचा मीही पक्षधर नाही पण स्लो इमिग्रेशनवर कोणतीही बंधने असू नयेत, स्थलांतरीतांना पाचएकवर्षात स्थानिक भाषा आणि संस्कृती शिकण्याची सक्त असण्यास हरकत नसावी. त्रि भाषा सुत्रीत काय वावगे आहे. तेलगु कन्नड मल्याळम भाषा हिंदी शिकुन बंद पडलेल्या नाहीत हे तामीळ लोकांना समजावून देण्या एवजी तुकडे तुकडे गँग तुला तुकडा मला का नाही म्हणून तुकड्यांचे समर्थन करते हे थांबवले पाहीजे.

ज्यांना शांततेच्या धर्माची भाषा समजते त्यांना प्रार्थना करताना जसे सगळे समान असतात तसे राज्यघटनेसमोर सर्व समान असतात हे ठणकावले पाहीजे.

राज्य्घटनेत समानता न बाळगणार्‍या अटी चालू टेवण्यासाठी उर्वरीत भारताला विश्वसात घेतले पाहीजे न की अटी काढण्यासाठी उर्वरीत भारताने तुमची मनधरणि केली पाहीजे. मनधरण्या केल्या तर एक अट काढण्यासाठी लोक अजून चार अटी किंवा पैसाकाढून मोकळे होतात त्यामुळे डोईजड होण्याचा प्रयत्न कोण करते हे लक्षात घेऊन त्या प्रत्येकाला काळाच्या ओघात सरळ केले पाहीजे

राघव's picture

9 Aug 2019 - 4:26 pm | राघव

हे नक्की का?

जर काश्मिर भारतात आले फक्त काही अटी ठेवून आले तर

माझ्या माहितीप्रमाणे या "काही अटी" वगैरे सगळ्या नंतर आल्यात. हरिसिंहांनी मदत मागीतल्यावर पटेलांची भूमिका कठोर होती हे खरे. पण त्यावेळेच्या भारताच्या परिस्थितीनुसार, दुसर्‍यांची लढाई उगाच कोणत्याही ठोस कारणाशिवाय स्वतःवर घ्यायची नाही हा त्यांचा निर्णय गृहमंत्री म्हणून अतिशय योग्य आणि व्यवहारी होता. असा कठोरपणा त्यांच्याजवळ होता म्हणूनच त्यावेळी देशाची आणखी शकलं झाली नाहीत. एवढेच होते तर हरिसिंहांनी तेव्हा घुसखोरांना स्वबळावर हुसकावून लावायला हवे होते. भारताने तर त्यांच्यावर बळजबरी केली नव्हती. आपली स्वतःची ताकद पाहून, आक्रमकांपुढे झुकण्याऐवजी ते वाचवणार्‍यापुढे झुकले.

झालेले अपरिमीत नुकसान हे खरेच. पण त्यासाठी आपला योग्य दावा सोडणे मला पटत नाही. उद्या त्याच न्यायाने कुणी आणिक एखाद्या जागेवर कब्जा करेल तर आपण नुकसान टाळायचे म्हणून दावा सोडून द्यायचा काय? अशाने तर सरळ तुकडे पडतील.

मुख्य म्हणजे एवढी वर्षे सत्ताधार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे इतके नुकसान झालेले आहे. आत्ता कुठे जरा काही सत्ताधार्‍यांचा कर्तेपणा दिसू लागला आहे. नाकर्तेपणासाठी इतका वेळ आपण सहन करू शकतो तर आणिक काही काळ कर्तेपणासाठी वाट बघुयात. कसं?

प्रकाश घाटपांडे's picture

9 Aug 2019 - 12:54 pm | प्रकाश घाटपांडे

सहमत आहे

प्रकाश घाटपांडे's picture

9 Aug 2019 - 12:56 pm | प्रकाश घाटपांडे

व्यकितगत मला त्यांनी भारतातच राहणे हिताचे वाटते. त्यातच त्यांचा विकास आहे असे वाटते.

तमराज किल्विष's picture

9 Aug 2019 - 1:25 pm | तमराज किल्विष

प्रकाशजी त्यांनी भारतातच रहावे त्यातच त्यांचे कल्याण आहे हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान समोर दिसत आहे अनागोंदी. फक्त त्यांना समजावून घेऊन हे घडायला हवं होतं. भारताने/ भाजपाने बहुमताच्या जोरावर कलमं हटवली असा संदेश गेला आहे.

माहितगार's picture

9 Aug 2019 - 1:56 pm | माहितगार

लोक्शाही बहुमताच्याच जोरावर चालते त्यात लाज वाटण्याचे काय कारण ?

ईतके दिवस ७० वर्षे बहुमताच्याच जोरावर अनेक भानगडीकेल्या तेंव्हा लोकांना वाटले नाही. मग आता का वाटते ?
लोकसभेत ४१५ खासदार असूनही ईतके दिवस जे होऊ शकले नाही ते आता झाले.

थोड्या दिवसातच काश्मीर ठीक ठाक होइल. जरा पाकिस्तानवर करडी नजर ठेवावी लागेल. पण काही खास अवघड नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Aug 2019 - 1:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. "३७०च्या बळावर मलाई खाऊन जनतेला गरीबीत ठेवणारे नेते म्हणजेच सर्वसामान्य काशिरी जनता" या चुकीच्या गृहितावर हा लेख आधारलेला आहे, असेच म्हणावेसे वाटले. वरवरच्या अंदाजपंचे विचाराने लेख न लिहिता, "३७०/३५अ या कलमांमुळे कोणाला (उदा : ठराविक राजकीय घराणी, फुटीरतावादी) व कसा फायदा होत होता आणि कोणावर (सर्वसामान्य जम्मू-काश्मिर-लडाखची जनता) आणि कसा जुलुम होत होता, याचा थोडासा अभ्यास करून लेख लिहिला असता, तर त्यातला मजकूर फार वेगळा असता.

त्याचबरोबर, "काश्मीर भूभागाचे भारताच्या सामरिक, सुरक्षा, अर्थ, जल व आंतरराष्ट्रिय राजकारणामधील अनन्य महत्वाचे मोक्याचे (स्ट्रॅटेजिक) स्थान" या विषयाचा थोडासा जरी अभ्यास केल्यास अधिक काही सांगावे लागणार नाही.

निदान, काश्मिरचा प्रश्न, "द्याना तो ७/१२ त्याच्या नावावर करून आणि संपवा ती कटकट" इतका सोपा नाही, इतके नक्की, हे लक्षात आले असते. ;)

२. भारताने/ भाजपाने बहुमताच्या जोरावर कलमं हटवली असा संदेश गेला आहे. लोकशाहीत सर्वच निर्णय असेच घ्यावे असा संकेत आहे... असेच घेतले जातात. हेच सर्व भारतासह लोकशाही देशांत केले जाते !

तसे केले नाही तर मात्र समस्या असते... यासंबंधात, ३७० आणि ३५अ कलमांच्या बाबतीत काय इतिहास आहे याचा थोडासा अभ्यास करावा.

तमराज किल्विष's picture

9 Aug 2019 - 2:56 pm | तमराज किल्विष

मला तरी असं वाटतं की काश्मिरला स्वायत्तता काही अटींवर द्यायला हवी व पाकिस्तान आणि भारत यामध्ये बफर स्टेट म्हणून ठेवावे. सरकार फार मोठा खर्च काश्मिरवर करत आहे. अमेरिकेने पाकिस्तानला आजवर इतकी मदत केली पण लादेनला पाकिस्तान नेच आश्रय दिला होता. काश्मिरी सुध्दा भारताचे खाऊन भारतावर उलटतील. शेवटी कायदा काय दिल्ली सरकार तिकडे राबवणार नाही. जास्त लिहिण्यापेक्षा काही काळ वाट बघून बोलले तर माझं मत कळून येईल.

आणि तोच दहशतवाद पसरवणारा बोगदा बनला... आता काश्मीर सोपवायचं म्हणजे.... भौगोलीक परिस्थितीमुळे इथे अफगाणिस्तान संभाळता अमेरिका/रशिया दमली तेथे असंच काश्मीर त्यांचा अड्डा बनवायला आंदण द्यायचं म्हणता ?

धाग्याचे काश्मीर करु राहिले भाउ तुमी

तमराज किल्विष's picture

10 Aug 2019 - 6:02 am | तमराज किल्विष

अमेरिकेला जगावर अधिराज्य गाजवायचे आहे, तर रशियाला ते होऊ द्यायचं नाही. या दोन बलाढ्य महत्त्वाकांक्षी हरामखोरांनी अफगाणिस्तान ची वाट लावली आहे. पाकिस्तान मधील दहशतवाद, तालिबान हे अमेरिकेची देन आहे.

भंकस बाबा's picture

10 Aug 2019 - 4:05 pm | भंकस बाबा

तुम्ही पक्की पाकिस्तानची भाषा बोलत आहात.
पाकिस्तान लोकशाही म्हणून कितीही बोम्बलत फिरला तरी त्यांच्याकडे लष्कर सत्ता हाताळते. पकिस्तानच्या जनतेला हिन्दुस्तानचे भय दाखवले की ते बाकीचे हाल विसरून हिन्दुस्तानला नेस्तनाबूद करण्याचे मांडे खातात. पाकिस्तान नेहमीच हे रडगाणे गात आला आहे की आम्ही पण दहशतवादामुळे त्रस्त आहोत, त्याचवेळी ते हाफिज सईद , मसूद अजहर , दाऊद इब्राहिम यांस राजाश्रय देतात.
तेव्हा कृपा करून पाकिस्तानचे समर्थन बंद करा.
तुम्ही एनडीटीवीची बातम्या प्रसारणाची फ्रेंचाइजी घेतली आहे का?

सामान्यनागरिक's picture

19 Aug 2019 - 5:08 pm | सामान्यनागरिक

काश्मीर्वर केंद्र सरकार थेट नियंत्रण ठेवणार आहे. मधे काश्मीरी नेते/ पोलीस ई. येणार नाहीत .
सर्वात महत्वाचे म्हणजे काश्मीर बाबत काहीतरी सकारात्मक करण्याची इच्छा असलेले सरकार सत्तेत आहे.
हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे.

तमराज किल्विष's picture

9 Aug 2019 - 3:06 pm | तमराज किल्विष

"काश्मीर भूभागाचे भारताच्या सामरिक, सुरक्षा, अर्थ, जल व आंतरराष्ट्रिय राजकारणामधील अनन्य महत्वाचे मोक्याचे (स्ट्रॅटेजिक) स्थान" या विषयाचा थोडासा जरी अभ्यास केल्यास अधिक काही सांगावे लागणार नाही.
>> डॉक्टर साहेब समजा काश्मिर भारतात सामील होण्याऐवजी तेव्हाच पाकिस्तान मध्ये सामील झाले असते तर काय केले असते. पाकव्याप्त काश्मीरचे स्थान भारताच्या सामरिक, सुरक्षा वगैरे दृष्टीने मोक्याचे नाही काय. भारताने पाकिस्तानचं काय उखडले आहे. युनोमध्ये भिजत घोंगडे पडले असे म्हणतात. बांगलादेश तेथील लोकांच्या स्वतंत्र होण्याच्या इच्छेमुळे भारताच्या मदतीने स्वतंत्र झाला. हेच काश्मिरी लोकांना स्वतंत्र रहायचे असेल तर मनाई का.

हेच काश्मिरी लोकांना स्वतंत्र रहायचे असेल तर मनाई का.

सर्व महाराट्रीय मुसलमान असते तर आपण असाच प्रश्न विचारला असता ? किंवा सर्व महाराष्ट्रीय हिंदू असूनही भारतापासून फुटून वेगळे होऊ म्हणतील तर त्यास आपले समर्थन असेल ? आपल्यासारख्या राष्ट्रविरोधी विचार प्रसवण्या विरुद्ध राष्ट्रद्रोहाचा खटला चालवता येईल असा कायदा का असू नये?

आधी एकदा बोटचेपे पणातून पाकीस्तानला स्वातंत्र्य दिले म्हणून त्याला तोडून बांग्लादेशचे वेगळे बनवावे लागले - पण खरी स्पष्ट गोष्ट अगदी सिव्हील वॉरच्या किमतीवर पाकीस्तान नाकारला की आपण जे प्रश्न विचारून तुकडे तुकडे वादाचे समर्थन वारंवार करतात असे समर्थन शक्य झाले नसते. पाकीस्तान अथवा बांग्लादेशचे स्वतंत्र अस्तीत्व तुर्तास तरी नाईलाज आहे, हे नाईलाज कोणकोणत्या प्रदेशात सहन करत जायचे याची नेमकी लिमीट कुठे? याचे उत्तर एकही राष्ट्रद्रोही तुकडेवादी देत नाही. जसे काश्मिरचे ३७० रद्द केले तसेच एक दिवस पाकीस्तानी पंजाबला अंगिकृत करून घ्यावे लागेल आणि मग ट्प्प्या टप्प्याने पाकीस्तान आणि बांग्लादेश हे उर्वरीत भाग भारतात आणावे लागतील कदाचित हे उर्वरीत भाग भारतात आधीही आणता येतील पण तसे म्हटले की पाकीस्तानी पंजाब वरूनपुन्हा व्हॉट अबाऊटगिरी होईल म्हणून पाकिस्तानी पंजाबच भारतात कसा विलीन करून घेता येईल याचाही विचार होणे गरजेचे असावे. विचार केला तर गोष्टी एक दिवस शक्य होतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Aug 2019 - 7:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

समजा काश्मिर भारतात सामील होण्याऐवजी तेव्हाच पाकिस्तान मध्ये सामील झाले असते तर काय केले असते.

हा जर तर चा प्रश्न नाही. आता काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे म्हटल्यावर त्यावर पाणी सोडून चीन-पाकिस्तानचा कायमचा वरचष्मा डोक्यावर घेण्यासारखा मूर्खपणा दुसरा नसेल, हे समजण्याइतकी बुद्धी असली तरी पुरे.

पाकव्याप्त काश्मीरचे स्थान भारताच्या सामरिक, सुरक्षा वगैरे दृष्टीने मोक्याचे नाही काय.

पूर्वी एखाद्या नेत्याने मूर्खपणा केला म्हणून आताही तोच चालू ठेवावा, असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? उलट, "भारताने पाकव्याप्त काश्मीरवरचा हक्क सोडलेला नाही" हाच निर्णय योग्य आहे आणि आता आपल्या हातातील काश्मीर सुस्थिर करण्याचा जसा निर्णय घेतला आहे, तसाच, पाकिस्तानवर सतत दबाव ठेवून, वेळ साधून पाकव्याप्त काश्मीरही आपल्या ताब्यात घेणे शहाणपणाचे होईल.

"पाकव्याप्त काश्मीर आता हातात नाही, म्हणुन हातातल्या काश्मीर भूभागावर हक्क सोडून द्यावा" असे म्हणणे किती वेडगळपणाचे होईल, हे सांगायलाच हवे का?

भारताने पाकिस्तानचं काय उखडले आहे.

गेल्या काही वर्षांत झालेल्या बदलांबद्दल आणि पाकिस्तानच्या चाललेल्या नाकेबंदीबद्दल, अज्ञान आहे किंवा तिकडे हेतूपुर्रसर दुर्लक्ष आहे... तुमच्या सोईचा पर्याय निवडा.

युनोमध्ये भिजत घोंगडे पडले असे म्हणतात.

अभ्यास वाढवा. नुकतेच याबद्दल युनोने केलेले विधान तुम्ही वाचलेले दिसत नाही... किंवा वाचलेले असावे म्हणून, 'असे म्हणतात', असा सावधगिरीचा शब्दप्रयोग झालेला दिसतोय.

हेच काश्मिरी लोकांना स्वतंत्र रहायचे असेल तर मनाई का.

हा शोध कोणत्या पुराव्यांवर लावला आहे? सर्वसामान्य काश्मिरी लोकांना ३७०च्या आडून लुटत असलेल्या दोन-तीन घराण्यांच्या बोलण्याने फसगत होईल, तुम्ही इतके 'हे' असाल असे वाटले नव्हते ! (त्या भूलथापांवर विश्वास ठेवणे ही अगतिकता असेल तर गोष्ट वेगळी) =))

एकूण, "अभ्यास वाढवा" हा जगप्रसिद्ध मिपा-शब्दप्रयोग वरच्या सर्व प्रतिसादाला चपखल बसतो आहे, हे नक्की. ;) =))

अजून एक...

आज काश्मिरी म्हणतात म्हणून त्याना वेगळे होऊ द्या. उद्या, उत्तर-पुर्वेतला कोण्या राज्यातले कोणीतरी म्हणते म्हणून त्यांना वेगळे होऊ द्या. शिवाय, काही तमीळ तर केव्हापासून वेगळे राष्ट्र पाहिजे म्हणतात त्यांना कसे विसरलात बुवा तुम्ही? याच मानसिकतेने जनेविमध्ये भारताचे अनेक तुकडे करण्याच्या घोषणा दिल्या गेल्या होत्या, त्यांचे म्हणणे तुम्हाला पटत आहे की काय ?!

असो. (लबाड लांडगं... हे गाणं आठवलं, पण संशयाचा फायदा देऊन, ते इथे लिहिण्याचा मोह आवरून वरचा प्रतिसाद गंभीरपणे लिहिला आहे. ;) )

तमराज किल्विष's picture

9 Aug 2019 - 3:09 pm | तमराज किल्विष

बांगलादेश च्या न्यायाने उद्या चीन जर काश्मिरी लोकांना स्वतंत्र करण्यासाठी युध्दात उतरला तर मग चीन चुकीचा कसा ठरेल?

जॉनविक्क's picture

9 Aug 2019 - 4:01 pm | जॉनविक्क

तसे झाले तर आम्हालाही तिबेट आणि आणि दक्षिण चिनी समुद्र बंगलादेशच्या धरतीवर स्वतंत्र करावा लागेल.

दक्षिण आशियायी ऐतिहासिक राजकीय एकात्मतेचे बारकावे लक्षात आणून घेणे गरजचे असावे. दक्षिण आशियाच्या नैसर्गिक सिमांच्या मर्यादेत ज्यांनी दिल्लीवर आक्रमणे केली किंवा जिथे दिल्लीने आक्रमणे केली किंवा या प्रदेशात जिथे परस्परांवर आक्रमणे केली त्या आक्रमणांच्या कारणाने दक्षिण आशियास राजकीय एकात्मता उद्भवते. - राजकीय भौगोलीक एकात्मतेची चिनी व्याख्या खंडणी उर्फ टॅक्स कलेक्शनच्या इतिहासाच्या अर्थाने येते त्या अर्थानेही दक्षिण आशियाची राजकीय भौगोलीक एकात्मता स्विकारावी लागते.

महेश हतोळकर's picture

9 Aug 2019 - 3:43 pm | महेश हतोळकर

हा आय् डी व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली टोकाची निर्बुद्ध विधाने करतोय. मिपाचे मालक स्वतः प्रशासकीय सेवेत आहेत, त्यांना या विधानांचा अर्थ आणि परीणाम नक्कीच कळत असेल. कृपया या महाशयांना समज द्यावी.

झेन's picture

9 Aug 2019 - 7:04 pm | झेन

हा आय् डी व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली टोकाची निर्बुद्ध विधाने करतोय. मलातरी वाटतय की आपण काय लिहीत आहोत याचं त्यांना गांभीर्य नाही, फक्त सहमत होण्याची तूमच्या वर सक्ती नाही म्हणून जबाबदारी झटकत आहेत.

पाकव्याप्त काश्मीरचे स्थान भारताच्या सामरिक, सुरक्षा वगैरे दृष्टीने मोक्याचे नाही काय.

जर त्यातले तीनही भाग आपन घेत्ले तर

१) पकिस्तन चा विज पुरवद्था गेला
२) सिल्क रोउट गेला ,चिन चि पन वात

मीरपूर शहर –
मीरपूर पाकिस्तानसाठी खास आहे. येथे झेलम नदीवर मंगला धरण बांधण्यात आला आहे. या धरणाद्वारे पाकिस्तानला पाणी आणि वीज मिळते. येथून रावळपिंडी केवळ 100 किलोमीटर लांब आहे.

पाक व्याप्त काश्मीरचा दुसरा महत्त्वाचा भाग गिलगित
पाककडून हा भाग ताब्यात घेतल्यामुळे भारताचे अफगाणिस्तानबरोबरील जमीनीद्वारे होणार संपर्क देखील तुटला आहे.

तमराज किल्विष's picture

9 Aug 2019 - 3:58 pm | तमराज किल्विष

महेश मी माझ्या मताशी सहमती असण्याची सक्ती केली नाही हे लक्षात ठेव.

देशविरोधी काडी टाकून आग लावण्याचा प्रयत्न करावयाच्या प्रयत्नाकडे बोट दाखवले तर आग लावण्यात सहभागाची सक्ती केली नाही असे म्हणल्याने देशाला आगलावण्याचा प्रयत्न झाकला जात नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Aug 2019 - 7:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

मी माझ्या मताशी सहमती असण्याची सक्ती केली नाही...

असे म्हणून, विपर्यस्त विधाने करून मिपावरील वातावरण बिघडविण्याच्या प्रयत्न केल्याबद्दलची जबाबदारी झटकून टाकता येणार नाही. सामाजिक संस्थळावर लिहिलेल्या प्रत्येक विधानांची जबाबदारी त्याच्या लेखकाला घ्यावीच लागते... आणि विशेषतः, ती विधाने देशाच्या सार्वभौमत्वाबद्दल आणि सुरक्षाव्यवस्थेबद्दल असतील तर जास्तच विवेक आवश्यक आहे.

तमराज किल्विष's picture

9 Aug 2019 - 4:00 pm | तमराज किल्विष

मागाजी मी कोणत्याही तुकडे तुकडे गॅंग मधे नाही.

जॉनविक्क's picture

9 Aug 2019 - 4:03 pm | जॉनविक्क

येट द ऍक्ट इज एंटायरली आयडेंटिकल टू द गँग

तमराज किल्विष,

तुम्ही काश्मीराबाबत फारंच निराशावादी सूर आळवला आहे. तुम्ही ज्याला काश्मिरी दहशतवाद म्हणता तो फक्त खोऱ्यातल्या ३ जिल्ह्यांत आहे. बाकी लडाख व जम्मू येथील जनता पूर्णपणे भारताच्या बाजूने आहे. यात लडाखी शिया मुस्लिम देखील समाविष्ट आहेत. पाकव्याप्त काश्मिरातल्या मुस्लिमांना भारत जवळचा वाटतो. त्यांना भारतात सामील व्हायचंय. गिलगिती लोकं स्वत:स भारतीय समजतात. बलुची लोकं पाकिस्तानास नाकारतात व भारताने आपणांस बांगलादेशाप्रमाणे स्वतंत्र करावे अशी मनीषा बाळगतात. पख्तूनांना भारताविषयी आदर आहे व ते पाकिस्तानला शत्रू मानतात.

या सर्व पार्श्वभूमीवर अवघ्या ३ जिल्ह्यांतला दहशतवाद आटोक्यात आणणं कितीसं कठीण आहे? याहून प्रचंड फोफावलेला पंजाबी दहशतवाद मोडून काढला गेलाच ना?

असो.

भारताने बांगलादेश वेगळा काढला म्हणून पाकिस्तान चवताळला. त्याते काश्मीर वेगळा काढायचं निश्चय केला. म्हणून दहशतवादास खतपाणी घालायला सुरुवात केली. या दहशतवादाचं मूळ द्विराष्ट्र सिद्धांतात आहे. मुस्लिमबहुल असूनही काश्मीर भारतात कसं राहू शकतं, असा प्रश्न उपस्थित होतो. काश्मीरचं भारतातलं विलीनीकरण हे द्विराष्टवादाची खिल्ली उडवणं आहे. जर द्विराष्ट्रवादंच कोलमडून पडला तर पाकिस्तानचं वेगळं प्रयोजन उरंत नाही. म्हणजे काश्मीरचा प्रश्न एके प्रकारे पाकिस्तानच्या अस्तित्वाशी निगडीत आहे.

कलम ३७० व ३५ अ रद्द करून मोदींनी नेमकं पाकिस्तानच्या अस्तित्वालाच आव्हान दिलं आहे. त्यामुळे भविष्यात काश्मिरी दहशतवाद मुळातनं निरर्थक ठरेल.

आ.न.,
-गा.पै.

तमराज किल्विष's picture

9 Aug 2019 - 7:15 pm | तमराज किल्विष

माझा विरोध सैनिकांना मृत्यू च्या खाईत लोटण्यास आहे. देशाला एवढी मोठी सीमा लाभली आहे. काश्मिर सोडून इतरत्र सैनिक कुठेही एवढ्या मोठ्या संख्येनं मरणाला सामोरे गेले नाहीत. तुम्हाला बोलायला काय जातंय. लोकशाही बहुमतावर चालते तर एवढं लष्कर तिथे तैनात का केलं आहे हे समजावून सांगा. तुम्हाला लढायला पाठवले मग कळेल जीवाचे महत्त्व.

माहितगार's picture

9 Aug 2019 - 10:21 pm | माहितगार

महाशय, खाली डॉ. सुबोध यांनी आपणास यावर चपखल उत्तर दिलेच आहे. तेवढ्यावर आपले समाधान झाले नाहीतर मी खाली दिलेले प्रयोग करून पहा

१) दोन वेगवेगळ्या जैन मुनींना भेटून त्यांच्या गृहस्थ म्हणजे कुटूंब असलेल्या शिष्य संप्रदायाकडून (किमान हजारतरी) त्यांच्या घरी आतंकवादी किंवा पाकिस्तानी सैनीक आले तरी संरक्षणाची गरज नाही त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांसाठी स्त्रीयांसाठी - कोणाही सुरक्षारक्षकाने, पोलीसाने, फायर ब्रिगेड कर्मचार्‍याने, सैनिकाने जीवपणाला लावू नयेत हे जरा लिहून बाँडपेपरवर लिहून मॅजीस्ट्रेट समोर साक्ष घेऊन लिहून आणा. मलाही अभ्यासायला आवडेल की किती जैन मुनी असे शिष्य संप्रदायाकडुण लिहून घेण्यास अनुमती देतात आणि किती शिष्य संप्रदाय तुम्हाला असे लिहून देण्यास तयार होतो आणि तुमच्या संवादांना ते नेमकी काय उत्तरे देतात. - (उद्देश्य जैन मंडळींना छळण्याचा नाही सैनिकांनी जीव डावावर लावण्याबद्दल खोटी हळहळ व्यक्त करून शत्रुपक्षाला मदत करू इच्छिणार्‍यांना उघडे पाडण्याचा उद्देश्य आहे.)

२) त्यानंतर असेच आपल्या स्वतःच्या शाळा महाविद्यालयात आपणास शिक्षण दिलेल्या गुरुजनांकडून आपल्या वर्गमित्रांकडून, शेजारी, आप्तस्वकीय आपले आईवडील आपली मुले भावंडे आपले सहकर्मी, आपण मिडीयात जात असाल तर शंभर पत्रकार - वृत्तसंस्थातील इतर कर्मचारी, वृत्तसंस्थांचे मालक, त्यांच्या फॅमिली, आजकाल सिव्हील सोसायटी म्हणून फॅड आले आहे त्यांचे आप्तस्वकिय यांच्याकडूनही त्यांच्या घरी त्याम्च्या मुलांवर स्त्रीयांवर त्यांच्या स्वतःवर आतंकवादी किंवा गुन्हेगार आल्यस कोणत्याही सुरक्षारक्षकाने, पोलीसाने, सैनिकाने , फायर ब्रिगेड वाल्याने जीवपणाला लावू नयेत असे लिहून आणा.

३) असे लिहून देणारे कुणि भेटलेच तर आपण स्वतः आणि ते मिलून काश्मिर अफगाणीस्तानसारख्या कोणत्याही आतंकवाद पिडीत भागात आतंकवाद्यांना आमची फॅमिली मुलेबाळे स्त्रीया फॅमिली आणून आपल्या हवालीकरतो पण आतंकवाद बंद कराअसा संदेश डावावर लावण्याच्या आपल्या स्वतःच्या फॅमिलीसहीत नेऊन द्या. त्यांनी तुमचे ऐकले नाही तर त्यांच्या समोर गांधीवादी मार्गाने अहिसक धरणे देऊन अहिंसक बलिदान देऊन सशस्त्र सैनिकांचे ज्यांची आपणास एवढी काळजी आहे त्यांचे प्राण वाचवा.

हिंसा सोडायचीच असेल तर पहिला उपदेश कायदा हातात घेणार्‍या अतीरेक्यास करावयास हवा एवढे आपणासही समजत असेलच. बाकी महात्मा गांधिंनी आणि बुद्ध आणि जैन धर्मानेही सुद्धा कोणत्याही सरकारला पोलीस दले आणि सैन्यदळ गुंडाळून ठेवण्यास सांगितल्याचे माझ्या ऐकण्यात नाही पण तुम्ही स्वतः त्यांच्यापेक्षा अधिक मोठे अहींसक बलीदान देऊन पहाण्यास कुणाची ना नसण्याचे कारण नसावे.

तमराज किल्विष's picture

10 Aug 2019 - 6:10 am | तमराज किल्विष

मागाजी भारतीय सैन्य तिथं काश्मिर मध्ये ( सीमेवरील नाही म्हणत) हे दात व नखे काढलेल्या सिंहाप्रमाणे उभे आहे. दगडफेक करणारांना थांबवण्यासाठी साधी पॅलेट गनसुध्दा वापरायची मुभा नाही. मागे ते मतदान साहित्य नेताना सशस्त्र जवानाला काश्मिरी लोक लाथा मारत असल्याचा व्हिडिओ पहा जरा. स्वसंरक्षणासाठीही गोळीबार करू शकत नाही असे बुजगावणे सारखे सैनिक उभे करून खरंच तिथं शांतता नांदणार आहे काय हे सांगा.

माहितगार's picture

10 Aug 2019 - 10:14 am | माहितगार

महोदय, दहशतवादासमोर गर्भगळीत होणे आणि त्यांना रान मोकळे करून देणे हा दहशतवादवरचा उपाय असू शकत नाही त्यामुळे त्यांना आणखी प्रोत्साहन मिळते. रान मोकळे करून दिले की मुंबईत हल्ले होतात मुंबईचे रान मोकळे करून दिले की उद्द्या तुमच्या घरी हल्ले करण्यासाठी किती वेळ लागेल ? -पाकिस्तान प्रणित द्विराष्ट्रवाद केवळ काश्मिरचा लचका तोडून थांबेल हे समजणे भाबडेपणाचे आहे- अजमल कसाबच्या मशिनगनला शेकड्याने माणसे मेली आणि हातात मशिनगन नसलेल्या एकट्या माणसाने जीववर उदार होऊन अजमल कसाबला पकडले. शेवटी इच्छाशक्ती नावची गोष्ट असते, शीस्त, टिमवर्क आणि इच्छाशक्तीसाठीची जाग येण्यात भारतीय उशीर करतात हे खरे असावे पण देर आये दुरुस्त आये ही भारतीय गती प्रत्येक बंडाळीला काळाच्या ओघात सरळ करते -पंजाब आसाम सारखी बंडाळ्या सरळ केल्या गेल्याचा अनुभव भारताच्या पाठीशी आहे- ३७० मुळे जी अडचण येत होती ती आता येणार नाही आणि काश्मिर मधील बंडाळीही सरळ केली जाईल.

मुख्य म्हणजे तसा आत्मविश्वास हवा आत्मविश्वास ही इच्छाशक्तीची अमलात आणण्यासाठीची पहिली अट असते. आत्मविश्वास नॅरेटीव्हला तुमच्या बाजूने मांडण्यात साहाय्य करत असतो. तुमचा आत्मविश्वस घालवण्यासाठी पाकीस्तानसारखे शत्रुपक्ष नेहमीच कार्यररत असतात तुमच्या अनतेचा आत्मविश्वास जाईल अशी माहिती प्रसारीत करण्यात तसे करण्यासाठी दुषित हितसंबंधीयांना वापरून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल त्यांच्या दुषित नरेटीव्हजना किती भीक घालणार याचे तारतम्य हवे.

आंजावर सर्वच बाजूने कितितरी खोटी आणि फसवी माहिती प्रसृत केली जाते , पहिले तर कोणतीही माहिती फॅक्च्युअल आहे का ? आणि माहिती प्रसृत करण्यामागे काही अजेंडा नाही हे पडताळण्याची सवय बाणवली पाहीजे . शत्रुपक्षाने मांडलेल्या नॅरेटीव्ह मधील उणीवा शोधून त्यांना तेथेच खोडले पाहीजे न की त्यांच्या चुकीच्या नॅरेटीव्ह्स समोर नांगी टाकली पाहीजे.

आजच्या माहिती युगात प्रत्येक व्यक्तीने माहिती सैनिक होण्याची गरज आहे तिथे आपण गर्भ गळित होऊन नांग्या टाकतो हे भुषणावह नाहीच पण दीर्घ काळापासून भारतीयांचे नुकसान त्यामुळे होत राहीले आहे. तुमच्या समोर एक सैनिक उपद्रवी लोकांकडून मार खात असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयातून समोर आल्यास एकाने व्हिडीओच्या खरेपणा बद्दल शंका व्यक्त करणे, दुसर्‍याने आमच्या सैन्याची शिस्तच तशी आहे आदेश येई पर्यंत संयम पाळतात आणि आमचे सैनिक मानवाधिकारांचे उल्लंघन करतात हे दावे खोटे आहेत हे यावरून सिद्ध होते, तिसर्‍याने या व्हिडीओतून तुमचा धर्म शांततेचा नसल्याचे सिद्ध होते चौथ्याने वेळ पडल्यास दगडफेक करणार्‍या उपद्रवीस वाहनाला बांधून दगडफेक करणार्‍यांच्या समोर उभे करून काट्याने काटा काढण्याच्या इच्छाशक्तिचे प्रदर्शनही करू शकतात , आणि आता पर्यंत किती अतीरेक्यांचा फडशा पाडला , एकाने धार्मिक आधारावरील राष्ट्र निर्मिती कशी चुकीची आहे काहींनी अब्जावधी वर्षांपासून भौगोलीक आणि सांस्क्रुतिक रित्या काश्मिर भारताचेच कसे आहे असे एका नंतर एक आपल्यासाठी सकारात्मक नॅरेटीव्ह मांडले पाहीजेत न कि शत्रुपक्षाचे नॅरेटीव्ह स्विकारून स्वपक्षीयांचाच बुद्धीभेद करावा - हि काही आदर्श स्थिती नव्हे..

जसे पश्चिम बंगाल मधील नक्षलवाद संपवता आला पंजाब आणि आसाम मधल्या बंडाळ्या मोडीत काढता आल्या तसेच काश्मिरलाही सरळ केले जाइल हा आत्म विश्वास बाळगायला हवा. आपल्या सुरक्षा दलांची पाठराखण आपण स्वतः नाही तर कोण करणार ?

तमराज किल्विष's picture

10 Aug 2019 - 10:31 am | तमराज किल्विष

असे घडले तर मला आनंदच आहे. पण शांतता वादी लोकांचा भरवसा देता येत नाही. टाईम बॉम्ब सारखे कधी फुटतील हे बॉम्ब ठेवणारालाच माहिती असते. समाधानाची बाब म्हणजे लडाख वेगळे केले आहे. धन्यवाद.

प्रकाश घाटपांडे's picture

10 Aug 2019 - 10:35 am | प्रकाश घाटपांडे

समाधानाची बाब म्हणजे लडाख वेगळे केले आहे. >>>>> अगदी सहमत

उन्मेष दिक्षीत's picture

9 Aug 2019 - 10:23 pm | उन्मेष दिक्षीत

दहशतवादी हल्ल्यांमधे उगाचच मरू नयेत (अशीच बाकीचीही कारणे आहेत) म्हणूनच हे केलंय हो. तिथं आता बर्‍यापैकी कंट्रोल राहील. पाकिस्तानची एवढी जळती आहे म्हणजे काश्मीर मध्ये त्यांचा 'हितसंबंध' होता. नाहीतर आपल्या देशात आपण काय करतोय याच्याशी त्यांना काय देणं घेणं होतं ? जो प्रश्न भिजत पडला होता, त्याचा सोक्षमोक्ष लागला.
वरती तुम्ही त्याचा संबंध बाकीच्या राज्यांच्या विशेषाधिकारांशी (भाषा सक्ती, आदिवासी जमिनी वगैरे) लावला होता.
काश्मीर प्रश्नच वेगळा आहे. तो इंटरनॅशनल प्रश्न केला गेलाय काहीही गरज नसताना. बाकिच्या देशांना काही पडली नाही आहे. बसा भांडत काश्मीरवरुन आणि ते मजा बघत बसलेत. आणि तिथल्या 'फुटीरतावादी' लोकांना पाकिस्तानचा सपोर्ट आहे. नाहीतर, काश्मीरची 'स्वायत्तता' काढून घेतल्यामुळे त्यांचा एवढा जळफळाट झालाच नसता. PoK कुणाचं आहे मग ओरिजिनली ?
आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा प्रश्न इतक्या जलद आणखी कोणत्या पद्धतीने सोडवला गेला असता ? तुम्हाला असं वाटतंय की काश्मिरींना विश्वासात घेऊन करायला हवा होता. तर त्यांनी 'स्वायत्त' राहायलाच प्राधान्य दिलं असतं आणि हा प्रश्न आहे तसाच राहिला असता. काश्मीर मध्ये दहशतवाद/ फ्रिडम मुवमेंट एक्सॅक्टली का आहे असं तुम्हाला वाटतं ?

इम्रान खान चे ट्विट बघा

Does the BJP govt think by using greater military force against Kashmiris in IOK, it will stop the freedom movement? Chances are it will gain momentum.

आपण ज्याला दहशतवाद म्हणतो, त्यालाच ते 'फ्रिडम' मुवमेंट म्हणतायत.
काश्मीर जर स्वायत्त आहे(होतं) तर हि freedom movement कसली ? कुणापासून ? आणि काश्मीर हे भारताचे(च) राज्य आहे ना ? मग त्याच्या अधिकारांचं काय करायचं हे आम्ही बघून घेऊ.
लोकशाही या शब्दाचा सोयिस्कर वापर होत आलाय काश्मीर मध्ये. आणि तसंही, काश्मीरची स्वायत्तता ही तात्पुरती होती असं त्या करारात लिहिलं होतं. अमित शहा म्हणाले तसं, 'तात्पुरती' म्हणजे काय ७० वर्षं का ?

Chess मध्ये एक "Poisoned Pawn Variation" असते. ते प्यादं घ्यावं कि नाही हे घेतल्यानंतरच कळतं. तुमचा लेख थोडा तसा वाटतो. काश्मीर हे ते "Pawn" आहे, आणि भारताने ते घेतलंय. बघू आता पुढे.

तमराज किल्विष's picture

10 Aug 2019 - 10:26 am | तमराज किल्विष

धन्यवाद संयत प्रतिसादाबद्दल. मला हेच सांगायचे आहे शांतता वादी लोकांचा ओढा पाकिस्तान कडे आहे व पाकिस्तान दहशतवादाचे शस्र उगारतच राहणार आहे. सैनिक घातपाती कारवायांना बळी पडतच राहतील. कुत्र्याची शेपूट सरळ होणार नाही. शांतता वादी लोक दुटप्पी असतात. भ्रष्टाचार करून विकास होऊ देणार नाहीत. पाकिस्तान चे उदाहरण समोर आहे.
समाधानाची बाब म्हणजे लडाख वेगळे केले.

सुबोध खरे's picture

9 Aug 2019 - 7:22 pm | सुबोध खरे

तुम्हाला लढायला पाठवले मग कळेल जीवाचे महत्त्व.

आपण एकदा तरी लष्करी सैनिकांना विचारून पाहिले आहे का?

कि काश्मीरसाठी त्यांची लढायची किंवा मरायची तयारी आहे का?

आपण कधी काश्मीर मध्ये राहिला आहात का?

सैनिक कशासाठी काम करतात? याबद्दल आपल्याला माहिती आहे का?
या प्रश्नांची उत्तरे द्या.

बाकी केंद्रीय पोलीस जवान नक्षलवाद्यांशी/ माओवाद्यांशी लढाई करायला का तयार असतात?

किंवा दहशतवाद विरोधी पथके ( ATS) जीवावर का उदार असतात?

याही प्रश्नांची उत्तरे द्या

तेही जमत असेल तर अग्निशमन दलाचे जवान आगीत जिवाशी खेळून लोकांचे प्राण का वाचवण्याचा प्रयत्न करतात?

हेही समजत नसेल तर कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन याचा अर्थ समजावून घ्या.

तमराज किल्विष's picture

9 Aug 2019 - 7:46 pm | तमराज किल्विष

सुबोध खरे भाऊ तुमचा कोणी नातेवाईक सैन्यात आहे का. तुमचा मुलगा तिथं सैनिक म्हणून गेल्यावर कळेल. सैनिक मरण येईल हे गृहीत धरून सैन्यात भरती होतो. पण त्याला लढायला लावणारांना त्याची झळ कधीच बसत नाही.

धर्मराजमुटके's picture

9 Aug 2019 - 7:48 pm | धर्मराजमुटके

फुल टॉस बॉल :) :) :)

भंकस बाबा's picture

9 Aug 2019 - 8:26 pm | भंकस बाबा

दिले पाहिजे.

योगी९००'s picture

9 Aug 2019 - 8:34 pm | योगी९००

काय प्रश्न हा? कोणाला विचारत आहात?

खरे साहेब हे सैन्यात डॉ. म्हणून बरीच वर्षे होते. त्यांच्या इतके सैनिकांविषयी येथे कोणीच सांगू शकणार नाहीत.
आणि हो... सैन्यात डॉक्टर म्हणून नोकरी असणे हे जवळ जवळ सैनिक असल्या सारखेच आहे. जरी बंदूक घेऊन सिमेवर जावे लागत नसले तरी बर्‍यापैकी त्याच्या जवळपास काम असते. सैनिकासारखे सगळे ट्रेनिंग घ्यावे लागते. (हे ही सांगतो नाहीतर ह्यावर पण काही लिहाल)

प्रकाश घाटपांडे's picture

10 Aug 2019 - 10:40 am | प्रकाश घाटपांडे

सुबोध खरे भाऊ तुमचा कोणी नातेवाईक सैन्यात आहे का>>>> अहो ते स्वतःच सैन्यात होते. वैद्यकीय अधिकारी

तमराज किल्विष's picture

9 Aug 2019 - 8:13 pm | तमराज किल्विष

आता नेहरू आणि काश्मीर
एका इंग्रजी वर्तमानपत्राने काश्मीर प्रश्नी संवाद करायला चर्चक म्हणून निमंत्रित केलं.
ब्रिगेडीयर रैना, राजन खन्ना, शक्ती मुन्शी, डॉ. गौरव गाडगीळ (इतिहास तज्ज्ञ), जतीन देसाई पत्रकार आणि पाकिस्तान-भारत फोरम फॉर पीस अँण्ड डेमॉक्रसीचा एक संस्थापक.
त्यांच्यासोबत अस्मादिक.
यापैकी ब्रिगेडीयर रैना, राजन खन्ना आणि शक्ती मुन्शी हे काश्मीरी.
सदर चर्चेत मी मांडलेले मुद्देः
१. इंडियन इंडिपेन्डन्स एक्ट १९४७ नुसार भारत आणि पाकिस्तान हे दोन देश स्वतंत्र झाले.
२. सदर कायद्यानुसार ब्रिटीश इंडियाची विभागणी धार्मिक आधारावर झाली. मुस्लिम बहुल प्रांत-- पंजाब आणि बंगाल यांची फाळणी झाली. अर्धा पंजाब आणि अर्धा बंगाल पाकिस्तानात गेला.
३. पाचशेहून अधिक संस्थानं होती. त्यांच्यापुढे तीन पर्याय होते. भारत, पाकिस्तान आणि स्वतंत्र राहण्याचा. पुढे लॉर्ड माऊंटबॅटनने काढलेल्या आदेशानुसार दोनच पर्याय होते. भारत वा पाकिस्तान.
४. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जम्मू-काश्मीर हे राज्य ना पाकिस्तानात होतं ना भारतात.
५. त्याच्या आगेमागे केरळमधील त्रावणकोस संस्थानाने स्वातंत्र्य घोषित केलं होतं. हे संस्थान हिंदू राजाचं होतं. त्याला पाठिंबा दिला मोहंम्मद अली जिना आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी.
६. जुनागढ संस्थानाचा नबाब मुसलमान होता. त्याने आपलं संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याचा निर्णय घेतला. हे संस्थान भारत-पाक सीमारेषेवर होतं. नबाब मुसलमान असला तरी बहुसंख्य प्रजा हिंदू होती. त्यामुळे तिथे आंदोलन उभं राह्यलं. नबाब पाकिस्तानात पळून गेला. संस्थान भारतात राह्यलं. कारण लोकेच्छा प्रमाण मानण्याचं सूत्र स्वीकारण्यात आलं.
७. जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती उलट होती. राजा हिंदू होता आणि बहुसंख्य प्रजा मुसलमान होती. आणि राजाने स्वतंत्र राहाण्याचा निर्णय घेतला.
८. भारत आणि पाकिस्तान या दोघांवरही व्हॉईसरॉयचा अंमल होता. दोन्ही देशांच्या सैन्यांचे सेनापती ब्रिटीश होते.
९. पाकिस्तानने टोळीवाले काश्मीरमध्ये घुसवले. त्यानंतर राजा हरिसिंगाने सामीलनाम्यावर सही केली.
१०. या सर्व घटनाक्रमाला शीत युद्धाचाही संदर्भ आहे. कम्युनिस्ट सोवियेत रशियाला रोखणं हा विषय अमेरिका आणि ब्रिटन यांच्या विषयपत्रिकेवर अग्रस्थानी होती.
त्यासाठी जम्मू-काश्मीर हे भूराजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचं राज्य होतं. पाकिस्तान रशियाच्या कह्यात जाईल की नाही ह्याचा केवळ अंदाज बांधता येत होता. भारत अर्थातच अमेरिका आणि ब्रिटन यांच्या पंखाखाली येणार नाही हे स्पष्ट होतं. कारण नेहरू आदर्शवादी होते आणि समाजवादीही होते.
अशा परिस्थितीत जम्मू-काश्मीरवर अमेरिका आणि ब्रिटन यांची मदार होती.
राजा हरिसिंग असो की शेख अब्दुल्ला यांच्या स्वतंत्र काश्मीरच्या आकांक्षांना हा पदर होता.
११. नेहरूंनी हे जाणलं होतं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनला पाहिजे यावर नेहरू आणि पटेल यांच्यामध्ये एकमत होतं.
१२. त्यामुळे ३७० कलमाचा समावेश भारतीय राज्यघटनेत झाला. मात्र हे कलम अधिकाधिक निष्प्रभ व्हावं यासाठी नेहरू-पटेल प्रयत्नशील होते. मात्र त्यासाठी त्यांनी शेख अब्दुल्ला यांच्या महत्वाकांक्षेला खतपाणी घातलं.
१३. पंडित नेहरूंनी काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेला हे खरं आहे. परंतु तिथे नेहरूंनी कारण असं दिलं की, स्वतंत्र भारतावर आक्रमण होतं आहे. या आक्रमणाला थोपवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढाकार घ्यावा.
या प्रश्नावर अमेरिका, इंग्लड, चीन आणि रशिया यांचा पाठिंबा पाकिस्तानला होता. कारण भारताची फाळणी धर्माच्या आधारावर झाली असल्याने काश्मीरवर पाकिस्तानचा हक्क आहे अशी त्यांची भूमिका होती. त्यावेळी शेख अब्दुल्ला यांना संयुक्त राष्ट्रसंघात धाडण्यात आलं. त्यांनी अशी भूमिका मांडली की उद्या प्रेषित मोहंम्मद जरी स्वर्गातून पृथ्वीवर आले आणि त्यांनी मला सांगितलं की काश्मीरचं पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करा तरी मी त्यांना विनम्रपणे नकार देईन.
१४. जम्मू-काश्मीरच्या घटनेत असं नमूद करण्यात आलं आहे की जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे.
१५. मात्र शेख अब्दुल्ला जेव्हा ३७० कलमाचा फायदा घेऊन स्वातंत्र्याच्या मागणीकडे वाटचाल करू लागले त्यावेळी नेहरूंनी त्यांना अटक केली.
१६. ३७० कलम निष्प्रभ करताना नेहरू आणि त्यानंतरच्या भारतीय पंतप्रधानांनी, या संबंधातल्या प्रत्येक निर्णयाला जम्मू-काश्मीरच्या विधानसभेची मान्यता घेतली.
वरीलपैकी मुद्दा क्रमांक ११ सोडता सर्व मुद्दे पॅनेलिस्टनी मान्य केले.
जम्मू-काश्मीर स्वतंत्र होऊ नये, अमेरिकेचा तळ होऊ नये यासाठी जवाहरलाल नेहरू यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. हे तात्पर्य माझ्या मांडणीतून हाती लागतं.
दुर्दैवाने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी अशी मांडणी संसदेत केली नाही. काश्मीर प्रश्नी नेहरूंना व्हिलन ठरवण्याची शहा-मोदी यांची व्यूहरचना यशस्वी झाली.
अर्थात हे दुर्दैव काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे. नेहरूंचं नाही.

माहितगार's picture

11 Aug 2019 - 6:52 pm | माहितगार

तशी या धागा चर्चेचा पुर्ण विराम झाला आहे, पण वरची एक पोस्ट बाकी आहे भविष्यातल्या चुकूनमाकुन भटकलेल्या वाचकांना यास कुणि उत्तर दिले नाही म्हणजे यात सर्व आलबेल आहे असे वाटावयास नको.

... नेहरूंना व्हिलन….

मी नेहरुंच्या डिस्कव्हरी ऑफ ईंडिया ची अनेक पारायणे केली आहेत - माझे नेहरवायण नावाची मिपावर माझी धागा मालिकापण आहे. विरोधकांकडून नेहरु व्हिलन ठरवले जाण्यात नेहरु अंशतः स्वतः जबाबदार आहेत.

१) ते व्हिलन नव्हते पण कमालीचे बोटचेपे होते त्यामुळे महत्वाच्या प्रसंगी देशाचे नुकसान झाले का तर याचे उत्तर होकारार्थी येते. आणि ज्याच्या मुळे देशाचे नुकसान झाले त्या बद्दल प्रश्न उपस्थित होणे सहाजिक असते. त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडीयातील बोटचेपेपणाचा दाखला देण्य जोगे उदाहरण आहे पुन्हा सापडले की खाली वेगळ्या प्रतिसादातून देईन.

२) नेहरुनी स्वतः स्वपरिवाराच्या नेपोटीझमची साथ दिली
आणि आज त्यांच्या पुढच्या पिढ्याही नेपोटीझम आणि सत्तेची हाव सोडत नाहीत आणि लांगुलचानवादास मतपेटीच्या राजकारणास साथ देतात म्हटल्यावर जनरोष असणे आणि नेहरुंबद्दलच प्रश्न केले जाणे सहाजिक आहे आणि या कारणांने नेहरुंचे व्हिलनीकरण त्यांच्या पुढील पिढ्यांनी सत्तेची हाव सोडेपर्यंत आणि त्यांच्या बद्दलची सायकोफन्सी संपेपर्यंत नेहरुंचे व्हिलनी करण थांबण्याची कोणतीच शक्यता नाही. व्हिलन सारखे वागल्यावर लोक व्हीलनच म्हणणार की अजुन काही म्हणणार ?

३)

१०. या सर्व घटनाक्रमाला शीत युद्धाचाही संदर्भ आहे. कम्युनिस्ट सोवियेत रशियाला रोखणं हा विषय अमेरिका आणि ब्रिटन यांच्या विषयपत्रिकेवर अग्रस्थानी होती. त्यासाठी जम्मू-काश्मीर हे भूराजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचं राज्य होतं. पाकिस्तान रशियाच्या कह्यात जाईल की नाही ह्याचा केवळ अंदाज बांधता येत होता. भारत अर्थातच अमेरिका आणि ब्रिटन यांच्या पंखाखाली येणार नाही हे स्पष्ट होतं. कारण नेहरू आदर्शवादी होते आणि समाजवादीही होते. अशा परिस्थितीत जम्मू-काश्मीरवर अमेरिका आणि ब्रिटन यांची मदार होती.

भारत अर्थातच अमेरिका आणि ब्रिटन किंवा इतर देशांच्या पंखाखाली येणार नाही हे स्पष्ट होतं. -कारण एकदा स्वातंत्र्य मिळाल्या नंतर पुन्हा कुठल्याही महासत्तेच्या पारतंत्र्यात जायचे नाही असे सर्वच भारतियांना वाटणे स्वाभाविक होते म्हणून इतपत वाक्य ठिकच आहे पण "कारण नेहरू आदर्शवादी होते आणि समाजवादीही होते." प्रत्येक गोष्तीचे क्रेडीट एकट्या नेहरुंना देण्यास भारत काय एकट्या नेहरुंच्या बापाचा होता ?- हि सायकोफन्सी आहे जी विचारी माणसांना चिड आणणारी आहे.

मध्य आशियातून रशिया अफगाणिस्तान पर्यंत येईल का याची भांडवली युरोमेरीकेस सतत्याची भिती होती भारताने साथ दिली नाही तर पाकीस्तान मार्गे अफगाणीस्तानपर्यंत पोहोचता येणे शितयुद्धाच्या दृष्टीने महत्वाचे होते म्हणून युरोमेरीकेस पाकिस्तान महत्वाचा पण युरोमेरीकेस काश्मिर भौगोलीक दृष्ट्या स्वतंत्र पणे महत्वाचे होते आहे असे म्हणणे शुद्ध अतार्कीक भंपकपणा आहे , कास्मिरवाचून युरोमेरीकेचे अफगाणीस्तानला कोणते दळणवळण बंद होते? कोणतेच नाही. काश्मिर भौगोलिक दृष्ट्या भारतास पाकीस्तानला चीनपासून दुर ठेवण्यास महत्वाचा असु शकतो पण काश्मिरचे तसे महत्व नसते तरीही म्हणजे चिन अस्तित्वात नसता तरीही काश्मिर सांस्कृतिक आणि भौगोलीक दृष्ट्या अब्जावधीवर्षापासून भारताचे अभिन्न अंग आहे आणि राहील.

डिस्कव्हरी ऑफ इंडिया नीट वाचावे कोणत्याही प्रिन्सली स्टेटला डोक्यावर बस्वून घेणे अथवा एका राज्याला दुसर्‍या राज्यापेक्षा अधिक देणे स्वातंत्र्य चलवळ कालीन काँग्रेसच्या हिशेबात कधीही नव्हते.

सुबोध खरे's picture

9 Aug 2019 - 8:13 pm | सुबोध खरे

आपल्या माहितीसाठी सांगतोय.

मी साडे अठरा वर्षे लष्करात डॉक्टर म्हणून सेवा करून निवृत्त झालो आहे.

त्यात काही काळ ( TEMPORARY DUTY) म्हणून श्रीनगर येथे हि होतो.

आज या घडीला माझे पाच वर्ग मित्र प्रत्यक्ष काश्मीर मध्ये तैनात आहेत. आणि माझे ४५ वर्गमित्र अजूनही लष्करात सेवा करीत आहेत. याशिवाय माझे विद्यार्थी आणि इतर अनेक मित्र सुद्धा लष्करात आहेत

तमराज किल्विष's picture

9 Aug 2019 - 9:19 pm | तमराज किल्विष
तमराज किल्विष's picture

9 Aug 2019 - 8:26 pm | तमराज किल्विष

फेसबुक वरून घेतले आहे.

माहितगार's picture

9 Aug 2019 - 8:51 pm | माहितगार

काय फेसबुकवरुन घेतले आहे ?

तमराज किल्विष's picture

9 Aug 2019 - 9:03 pm | तमराज किल्विष

आता नेहरू आणि काश्मीर
एका इंग्रजी वर्तमानपत्राने काश्मीर प्रश्नी संवाद करायला चर्चक म्हणून निमंत्रित केलं. .... ही माहिती फेसबुक वरून घेतली आहे.

नाही अजून पुरेसे क्लिअर नाही, वर्तमानपत्रीय चर्चेस गेलेले चर्चक आपण स्वतः आहात की इतर कुणी ?

कारण आपल्या स्वतःच्या आधीच्या मुद्यांचा आणि उपरोक्त कॉपीपेस्ट चर्चेचा नेमका सहसंबंध कसा जोडायचा ते समजेल . आणि देश विरोधी विधानांबद्दल कारवाई करावयाची झाल्यास नेमकी कुणा विरुद्ध हे ही स्पष्ट होण्यास मदत होईल.

लोकांना देशाविषयी प्रेम वाटलं पाहिजे .
अभिमान वाटला पाहिजे पण हे कधी घडेल .
छत्रपतींचा राज्यकारभार जसा जनतेला सर्वोच्च स्थानी मानणारा होता तसा राज्यकारभार असला पाहिजे .
संभाजी राजे गेल्यानंतर सुद्धा मराठे जीव पणाला लावून लढले ते स्वराज्य वर जिवापाठ प्रेम होते म्हणून.
किती तरी लोकांनी स्वतः हुं जीवाची बाजी लावली स्वराज्य टिकवयला हवे म्हणून .
फक्त लष्करी ताकत देश वाचवू शकत नाही .
आपला देश तर विविधितेने नटलेला आहे .
विविध प्रकारच्या अस्मिता देशात आहेत .
त्या मुळे खूप काळजीपूर्वक सरकारी निर्णय होणे गरजेच आहे .
प्रश्न निर्माण करून सोडवत बसण्या पेक्षा प्रश्नच निर्माण होवू नयेत म्हणून सक्षम आणि संवेदनशील सरकार आणि प्रसार माध्यम असणे खूप गरजेचं आहे .
अनियंत्रित स्थलांतर मुळे
अनेक प्रश्न भविष्यात निर्माण होवून काही राज्य अस्वस्थ होवू शकतील तेव्हा आताच त्यावर योग्य उपाय योजना निर्माण केल्या पाहिजेत .
प्रत्येकाचे भाषिक स्वतंत्र ,धर्म स्वतंत्र जपणे खूप गरजेचं आहे .
कोणालाच आपला धर्म धोक्यात आहे ,भाषा धोक्यात आहे अशी भावना निर्माण
झालीनाही पाहिजे .
चुकीचे निर्णय सरकार घेत राहील आणि काही गट अस्वस्थ होतील आणि देशाविरुद्ध बंड करतील ह्याला जनता जबाबदार नसेल त्याला राज्यकर्ते jabadar असतील .
अन्याय विरूद्ध कोण्ही बंड केले तर त्याला देशद्रोह म्हणता येणार नाही तर राज्यकर्त्यांची चूक म्हणावी लागेल .
मग देश एकसंघ रहावा,देशातील नागरिक मध्ये देशप्रेम निर्माण व्हावे,आणि मुळात हा देश माझा आहे ही भावना निर्माण करणे तसे वातावरण निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे .
अस्वस्थ समाज मजबुत देश निर्माण करू शकत नाही

तमराज किल्विष's picture

9 Aug 2019 - 9:08 pm | तमराज किल्विष

मी माझ्या मताशी सहमती असण्याची सक्ती केली नाही...

असे म्हणून, विपर्यस्त विधाने करून मिपावरील वातावरण बिघडविण्याच्या प्रयत्न केल्याबद्दलची जबाबदारी झटकून टाकता येणार नाही. सामाजिक संस्थळावर लिहिलेल्या प्रत्येक विधानांची जबाबदारी त्याच्या लेखकाला घ्यावीच लागते... आणि विशेषतः, ती विधाने देशाच्या सार्वभौमत्वाबद्दल आणि सुरक्षाव्यवस्थेबद्दल असतील तर जास्तच विवेक आवश्यक आहे.
>>माझ्या लेखाने मिपावरील वातावरण बिघडत असेल तर मी हा लेख मागे घेतो. मी केलेल्या प्रत्येक विधानाची जबाबदारी घेतली आहे व माझ्या मताशी सहमत असलेच पाहिजे असा माझा मुळीच आग्रह नाही. धन्यवाद.

महाशय, मिपावर चर्चेस आल्यास वैचारीक युद्धात आपल्या सारख्या शंभरांना तरी पुरुन उरण्याची कुवत काही मिपाकरात तरी आहे हे ही धागा चर्चा समजे पर्यंत आपणास उमगेल याचा अति आत्मविश्वास नव्हे सार्थ स्व-अभिमान माहितगारला नक्कीच दाखवून देईल . त्यामुळे मिपावरील वातावरण बिघडण्याची तेवढी काळजी नाही, उलटपक्षी आपल्यासारखी दुषित हितसंबंधातून प्रसारीत होणारी विचारसरणी इतर भारतीयांचा बुद्धीभेद करत भ्रमीत करत फिरत राहील का याची काळजी अधिक आहे.

जेव्हा देशहीताचा प्रश्न येतो, जे दुषित हितसंबंधानी बाधीत नसतात त्यांना देशप्रेमाचे तर्क पटतात पण दुषित हितसंबंधानी बाधीत नाही ना याची चौकशी करून घेणे बरे पडते कारण दुषित हितसंबंधानी बाधीत कोणतेही तर्क स्विकारत नाहीत त्यांच्यासाठी कायद्याचा बडगाच अधिक रास्त ठरतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2019 - 6:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

माझ्या लेखाने मिपावरील वातावरण बिघडत असेल तर मी हा लेख मागे घेतो.

हे म्हणजे, "सिद्धूने राजिनाम्याचे पत्र मुख्यमंत्र्याऐवजी पक्षाध्यक्षाकडे पाठवला आणि मी राजिनामा दिला" असे म्हटल्यासारखे झाले.

नुसते हवेतले विधान केले नसेल आणि प्रामाणिकपणे लेख मागे घ्यायचा असेल तर ती विनंती; नीलकांत अथवा प्रशांत यापैकी कोणत्याही एका आयडीकडे करावी.

तमराज किल्विष's picture

10 Aug 2019 - 8:10 pm | तमराज किल्विष

आता तूम्ही सारे तुटून पडल्या वर काय करणार? पुढे मी माझ्या विधानांची जबाबदारी सर्वस्वी स्विकारतो हे पण म्हटलं आहे. सैनिक दगड खात आहेत, त्यांना काश्मिरी लाथा मारत आहेत व त्यांना पॅलेट गन सुध्दा वापरू देत नाही हे मला पटत नाही. किती काळ सैन्याची अग्नीपरिक्षा पहायची हा माझा लेखामागे उद्देश होता. पण काही मंडळी मला देशद्रोही ठरवू लागली. मिपावर न येणे योग्य राहील असे मला वाटते. धन्यवादम्!

सैनिकांच्या आड देशविरोधी भाषाच बोलत आहात तुम्ही. बाकी लोकांनी तुमची विधाने व्यवस्थित खोडली आहेत तरी तुम्ही मान्य करत नाही आहात.

तमराज किल्विष's picture

10 Aug 2019 - 6:11 am | तमराज किल्विष

मागाजी भारतीय सैन्य तिथं काश्मिर मध्ये ( सीमेवरील नाही म्हणत) हे दात व नखे काढलेल्या सिंहाप्रमाणे उभे आहे. दगडफेक करणारांना थांबवण्यासाठी साधी पॅलेट गनसुध्दा वापरायची मुभा नाही. मागे ते मतदान साहित्य नेताना सशस्त्र जवानाला काश्मिरी लोक लाथा मारत असल्याचा व्हिडिओ पहा जरा. स्वसंरक्षणासाठीही गोळीबार करू शकत नाही असे बुजगावणे सारखे सैनिक उभे करून खरंच तिथं शांतता नांदणार आहे काय हे सांगा.

सुबोध खरे's picture

10 Aug 2019 - 10:52 am | सुबोध खरे

भारतीय सैन्य तिथं काश्मिर मध्ये ( सीमेवरील नाही म्हणत) हे दात व नखे काढलेल्या सिंहाप्रमाणे उभे आहे. दगडफेक करणारांना थांबवण्यासाठी साधी पॅलेट गनसुध्दा वापरायची मुभा नाही. मागे ते मतदान साहित्य नेताना सशस्त्र जवानाला काश्मिरी लोक लाथा मारत असल्याचा व्हिडिओ पहा जरा. स्वसंरक्षणासाठीही गोळीबार करू शकत नाही असे बुजगावणे सारखे सैनिक उभे करून खरंच तिथं शांतता नांदणार आहे काय हे सांगा.

आपल्या एकंदर लेखनावरून आपण प्रभादेवी किंवा नरिमन पॉईंट सारख्या ठिकाणी वातानुकूलित कार्यालयात बसणारे आरामखुर्चीतील विचारवंत दिसताय.

सैनिकांना काश्मिरी लोक "आपले" आहेत आणि त्यांना प्रेमाने वागवा असे प्रशिक्षण दिले जाते यामुळे दगडफेक करणाऱ्या भरकटलेल्या तरुणांवर शक्यतो गोळीबार करू नका असेच आदेश सैनिकांना दिलेले आहेत.

पॅलेट बंदुकांमुळे होणाऱ्या इजेबद्दल डाव्या आणि पुरोगामी हलकटानी फार मोठ्या प्रमाणावर अपप्रचार केला आहे परंतु पॅलेट बंदुकांमुळे इजा होत असली तरी मुत्यू होत नाही यास्तव त्या वापरल्या जात होत्या.

बाकी एखाद्या सैनिकाला तेथील फुटीरता वादी लोकांनी मारहाण केली तर त्याला फार मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी हि पाकिस्तान, पाक धार्जिण्या वृत्तपत्रांनी आणि आपल्याच असंख्य फुटीरता वादी लोकांनीच जास्त दिली आहे काश्मिरातील सामान्य लोक कसे पाकिस्तान वादी आहेत आणि भारताचा किती द्वेष करतात हे दाखवण्यासाठी

परंतु दहशतवाद्यांना शक्यतो पकडूच नका सरळ कायमचे जायबंदी करा किंवा गोळ्याच घाला असे "अलिखित आदेश" लष्कराला दिलेले आहेत. बहुसंख्य पाकिस्तानातून जिहादचे प्रशिक्षण घेऊन आलेले दहशतवादी हे हृदयपरिवर्तनाच्या पलीकडेच गेलेले असतात. तेंव्हा अशाना दयामाया दाखवू नका.

आपलॆ माहिती त्रोटक अपुरी चुकीची किंवा काही विशिष्ट विचारसरणीने भारीत आहे आणि आपल्याला वस्तुस्थितीचीच अजिबात माहिती नाही एवढेच मी म्हणेन

तमराज किल्विष's picture

10 Aug 2019 - 11:24 am | तमराज किल्विष

आपण प्रभादेवी किंवा नरिमन पॉईंट सारख्या ठिकाणी वातानुकूलित कार्यालयात बसणारे आरामखुर्चीतील विचारवंत दिसताय.
>> एवढा नशीबवान नाही वो मी.
बुरहान वाणी असो की इतर दहशतवादी. यांच्या अंत्ययात्रेत सामील होणाऱ्या लोकांची संख्या पाहून ही शांतता प्रेमी लोक सुधारतील असे वाटत असेल तर ते दिवास्वप्न च आहे. सैनिकी हानी मला पटत नाही एवढेच माझे म्हणणे आहे. मला स्वतंत्र विचार करता येतो, मी कोणत्याही विचारसरणीने भारीत नाही.
तुम्हाला आठवते का बांगलादेश ने आपले बारा सैनिक उकळते पाणी टाकून हाल हाल करून मारले होते तेव्हा नेतृत्व म्हणाले होते " राई सी बात का पहाड बना दिया." सैनिकांबद्दल राजकारण्यांना किती प्रेम असते. वन रॅंक वन पेन्शन मिळायला आंदोलन करायला लागले.

विजुभाऊ's picture

10 Aug 2019 - 6:32 am | विजुभाऊ

ज्या वेळेस काश्मीर हिंदू+ बौद्ध + शीख + ख्रिश्चन बहुल होईल त्या वेळेस एकात्मिकता वाढेल आणि बरेच प्रश्न सुटतील. अर्थात हे येत्या दहा एक वर्षात होऊ शकेल. चीन ने हे तिबेट मधे केले आहे. त्यांनी तिबेटमधे चिनी लोकांचे स्थलांतर घडवून आणले आणि मुळ रहिवाशांना अल्पसंख्यांक केले.

विजुभाऊ. अगदी थोड्या तुम्ही काश्मीर समस्येचे मूळ सांगितले.
जिथे जिथे शांततावादी धर्माचे लोक वाढतात तिथे इतर धर्मीय लोक व्यवस्थित राहू शकत नाहीत. या वाक्याची सत्यता पटत नसेल तर पूर्ण जगातील मुस्लिम देशांचा अभ्यास करू शकता.
ते लोक अगदी पद्धतशीर पणे आपली लोकसंख्या वाढवत नेतात आणि नंतर अन्याय होतो अशी बोंब मारून वेगळा भूभाग आणि स्पेशल सवलतींची मागणी करतात.
त्यांना सपोर्ट करायला मग " मुस्लिम ब्रदरहूड " च्या नात्याने मुस्लिम देश पुढे येतात. त्यांना विरोध झाला कि मग जिहाद, बदला, आतंकवाद, खतरे मे है असे वातावरण केले जाते.
होणाऱ्या आतंकवादी हल्ल्याचे समर्थन सुद्धा तिथले लोकल लोक करू लागतात.. उदा. काश्मिरी मुस्लिम लोक आतंकवादी आणि फुटीरतावादी लोकांना सपोर्ट करतात. कित्येक मुस्लिम हाफिज सईद ला आतंकवादी समजत सुद्धा नाहीत. त्यांच्या दृष्टीने तो "मौलाना" आहे. लोक लादेन चा निषेध करतात पण नंतर त्याच्यावर अन्याय झाला म्हणून त्याने ते कृत्य केले असे जस्टिफिकेशन पण देतात. मंदिरांची लूट करणारे ( उदा. गझनी, मोहम्मद बिन कासीम ) हे त्यांचे हिरो असतात. हि सर्व मानसिकता तेव्हाच वाढीस लागते जेव्हा समाजात "त्यांची " लोकसंख्या लक्षणीय असते आणि पुढे आणखी वाढण्यासाठी पोषक वातावरण असते

काश्मिर ची नेमकी हीच समस्या होती. मूठभर शांतता धर्मी लोक पूर्ण जम्मू आणि काश्मिर आणि लद्दाख भूभागावर आपला कब्जा बनवू पाहत होते. आणि त्याचसाठी ते कलम 370 चा पुरेपूर वापर करत होते. पण मोदी सरकार ने मुळावर घाव घातल्याने आता बरेचसे प्रश्न भविष्यात तरी सुटतील अशी आशा वाटते.

सुधीर कांदळकर's picture

11 Aug 2019 - 1:22 pm | सुधीर कांदळकर

नावाच्या एका अमेरिकन वार्ताहराने मध्यपूर्वेतील मूलत्त्ववाद आणि धार्मिक अतिरेकी या विषयावर एक ४०० ५०० वा जास्त पानांचे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. त्यात छान विवेचन आहे. पण किचकट असल्यामुळे वाचायला वेळ लागतो. दहाबारावर्षापूर्वी वाचले होते. आता नाव आठवत नाही. पण लेखक सूचीत मिळेल.

निळू दामले यांचे एक मराठी पुस्तक आहे. याचेही नाव विसरलो. इझरायलमध्ये जाऊन ते बरेच फिरले होते. तेव्हा इझरायलने जे गाझा पट्टीत आणि पश्चिम तीर या विभागात केले ते आपण का करीत नाही हा प्रश्न मनात आला होता.

आता विकासाची फळे चाखायला मिळाली की कश्मिरी लोक नक्कीच सुखी होतील. हे विधान भाबडे वाटले तरी हेच सत्य आहे. मग अतिरेक्यांना कोणी थारा देणार नाही. विकास रोखणे हेच अतिरेक्यांचे पहिले पाऊल असते. कश्मिरी नेत्यांनी याला अप्रत्यक्ष रीत्या हातभार लावला आहे. गडचिरोलीत अतिरेकी वेगळे असले तरी त्यांचा उद्देश तोच आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Aug 2019 - 4:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

तेव्हा इझरायलने जे गाझा पट्टीत आणि पश्चिम तीर या विभागात केले ते आपण का करीत नाही हा प्रश्न मनात आला होता.

"लांगुलचालन (अपिजमेंट) करणे व त्यामार्गे स्वतःची तुंबडी भरून घेणे, आणि तसे करताना देशाच्या हितसंबंधांना धोका झाला तरी बेहत्तर", ही नीती इझ्राईलमध्ये नव्हती/नाही आणि भारतामध्ये होती, हे सर्वात महत्वाचे कारण यामागे आहे.

यशोधरा's picture

14 Aug 2019 - 8:12 pm | यशोधरा

निळू दामले यांचे एक मराठी पुस्तक आहे. >> जेरुसलेम?

खटपट्या's picture

17 Aug 2019 - 12:30 pm | खटपट्या

सहमत.
ज्यानी विकासाची चवच चाखली नाही त्यांना काय माहीत विकास काय असतो. आता जे तरुण तावातावाने भांडत आहेत त्यांना रोजगार मिळाला की गप्प बसतील. तिथे मेडीकल आणि अभियांत्रिकि महाविद्यालये चालू झाली की तेथील तरुणांना खरे ज्ञान काय आहे हे कळेल. मोठाली पंचतारांकित हॉटेल चालु झाली की तिथले तरुण व्यस्त होतील.
ज्यांनी लाडू खाललाच नाही ते लाडवाला कडू म्हणतायत.
दुसरी गोष्ट तिकडे लडाख वाले केंद्रशासित झाले म्हणून आनंदाने नाचताहेत. हे काश्मिरी फक्त मुसलमान आहेत म्हणून आणि फालतु नेत्यांनी ब्रेनवॉशिंग केल्यामुळे बरळत आहेत.
एका बाजुने उद्धपातळीवर विकास आणि त्याबरोबर संथगतीने सैन्य काढून घेणे हाच उपाय सद्या तरी दिसतोय.

सुधीर कांदळकर's picture

14 Aug 2019 - 8:22 am | सुधीर कांदळकर

प्रश्नांना हेकट उत्तरे ही मालिका थांबली हे पाहून बरे वाटले.

तमराज किल्विष's picture

14 Aug 2019 - 9:21 am | तमराज किल्विष

हेकट वाचकांच्या प्रश्नांना माझी वैयक्तिक मते अतार्किक वाटतात हे पाहून थांबलो होतो. चालू द्या.

मध्यंतरात पाकीस्तानी लोकांना सेक्युलर बनवण्यावर जरासे कष्ट घेऊन दाखवावेत

- पाकीस्तानी माणूस (किंवा बया ) दिसली कि त्यांना मी माझे काही मित्र तुम्ही सेक्युलर का नाही असा प्रश्न विचारत असतो. तुम्ही पण सामिल व्हा पाकिस्तान (खर्‍या अर्थाने) सेक्युलर झाले की प्रश्न आपोआपच मिटेल. :)

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे .
आणि पाकिस्तान त्या वर जबरदस्तीने कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे .
त्याचा विरोध करायचा सोडून काश्मीर पाकिस्तान ला देवून टाका असे मत व्यक्त करणे म्हणजे भारताची आत्महत्या च ठरेल .
समजा भारताने काश्मीर पाकिस्तान ला दिला तर तो भारतात हिंसाचार करणार नाही किंवा कुरापती काढणार नाही ह्याची बिलकुल खात्री देता येणार नाही .
उलट असे घडलेच तर चीन आसाम,ओरिसा,मणिपूर,ह्या राज्यांवर आक्रकपणे हक्क सांगायला सुरवात करेल मग चीनला सुद्धा ती राज्य द्यायची का?.
एकदा भारत सरकार कमजोर आहे हा संदेश गेला की देशातील बरीच राज्य उठाव करतील आणि वेगळे देश मागतील गंभीर स्थिती निर्माण होईल .
सीमेवर असलेल्या सैनिकांच्या जिवाच्या रक्षणासाठी आत्यधूनिक हत्यारे त्यांना पुरवणे ,अत्यंत उच्य दर्जाची बुलेट प्रूफ जॅकेट , बॉम्ब विरोधक वाहने पुरवणे,सैनिकांची जास्त संख्या ठेवणे असे उपाय करता येतील पण माघार नाही .
ती आत्महत्या ठरेल

सुधीर कांदळकर's picture

14 Aug 2019 - 7:46 pm | सुधीर कांदळकर

गेल्या ६० वर्षांहून जास्त काळ अस्तित्त्वात आहे. तरीही भारतीय सैनिकांचे, निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत, यापुढेही जात राहिले असते. अपयशाचा हा फॉर्म्युला आणखी काळ चालू न ठेवल्याबद्दल सरकारचे अभिनंदन.

नव्या धोरणाच्या यशस्वितेसाठी सरकारला शुभेच्छा.

परकीय गुंतवणूक इथे होणार अशा बातम्या आहेत. गुंतवणूकदार राष्ट्रे त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी भारतालाच पाठिंबा देणार हे उघड आहे. स्थानिकांची बेरोजगारी अर्थातच कमी होणार. मार्गच्युत होऊन दहशतवादाकडे वळणार्‍या तरुणांची संख्या कमी होण्याची शक्यता नक्कीच वाढणार. ब्राव्हो भारत सरकार.

यावर विश्वास ठेवणं अशक्य आहे. बराचसा डोंगराळ भाग, वाहतुकीच्या सोयीची वानवा, वीज आणि कौशल्याचा अभाव या काश्मीरच्या दृष्टीने प्रतिकूल गोष्टी आहेत. तशात जेथे अगोदरच उद्योग आहेत तेथे उत्पादन आणि रोजगार कपातीचे संकट असताना काश्मीरमध्ये गुंतवणूक होईल अशी शक्यता नाही.

काश्मीरचा भूगोल आहे तसा मानवी हस्तक्षेपापासून दूर राहणे हे इतर देशवासियांसाठी देखील आवश्यक आहे. आणि मानवी हस्तक्षेपामध्ये लष्कराचे तेथील वास्तव्य पण येते. माणूस निसर्गामध्ये त्याच्या सुखसोयींनसकट राहतो. या मध्ये इंधन जाळणे, प्रदूषण करणे अशा गोष्टी येतात. सर्वसाधारणपणे काश्मीर आणि पाकिस्तानच्या बाबतीत सबुरीचे आणि समजुतीचे धोरण असावे असा दृष्टिकोन बाळगणारी मंडळी हा असा सर्वंकष विचार करतात. तशा विचारांनाच आता तिलांजली मिळत असल्यामुळे जे काही होणार आहे ते पाहावे एवढेच हाती राहते. बाकी सध्याचे सरकार प्रमुख जे काही करतात त्यात प्रतिकात्मकाच जास्त दिसते असे निरीक्षण आहे. मग ती नोटबंदी असो, तिहेरी तलाक असो अथवा ३७० कलम रद्द करणे असो.

-- स्वतःचा निसटणार सोगा सांभाळीत दुसऱ्यांच्या निसटत्या बाजू दाखविणाऱ्यांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत

सुबोध खरे's picture

16 Aug 2019 - 12:18 pm | सुबोध खरे

नोटबंदी असो, तिहेरी तलाक असो अथवा ३७० कलम रद्द करणे प्रतिकात्मकाच जास्त दिसते

नोटबंदी मध्ये प्रतीकात्मकता दिसते हा मुद्दा वादाचा असू शकतो

पण तीन तलाक किंवा ३७० यात तुम्हाला प्रतिकात्मकताच दिसत असेल तर

तुम्हाला भाजप/ मोदी द्वेषाची कावीळ झाली आहे असा स्पष्ट आरोप मी करीत आहे.

बाकी चालू द्या

माहितगार's picture

16 Aug 2019 - 12:33 pm | माहितगार

-- स्वतःचा निसटणार सोगा सांभाळीत
:)

काश्मीरचा भूगोल आहे तसा मानवी हस्तक्षेपापासून दूर राहणे हे इतर देशवासियांसाठी देखील आवश्यक आहे. आणि मानवी हस्तक्षेपामध्ये लष्कराचे तेथील वास्तव्य पण येते. माणूस निसर्गामध्ये त्याच्या सुखसोयींनसकट राहतो. या मध्ये इंधन जाळणे, प्रदूषण करणे अशा गोष्टी येतात. सर्वसाधारणपणे काश्मीर आणि पाकिस्तानच्या बाबतीत सबुरीचे आणि समजुतीचे धोरण असावे असा दृष्टिकोन बाळगणारी मंडळी हा असा सर्वंकष विचार करतात.

आपल्या घरचा भूगोल आहे तसा मानवी हस्तक्षेपापासून दूर राहणे हे इतर देशवासियांसाठी देखील आवश्यक आहे. आणि मानवी हस्तक्षेपामध्ये सुरक्षा रक्षक , पोलीस आणि लष्कराचे वास्तव्य पण येते. माणूस निसर्गामध्ये त्याच्या सुखसोयींनसकट राहतो. या मध्ये इंधन जाळणे, प्रदूषण करणे अशा गोष्टी येतात. यासाठी सर्वसाधारणपणे काश्मीर आणि पाकिस्तानच्या बाबतीत सबुरीचे आणि समजुतीचे धोरण असावे हा असा सर्वंकष विचार करतात असा दृष्टिकोन बाळगणारी मंडळी;

१) दोन वेगवेगळ्या जैन मुनींना भेटून त्यांच्या गृहस्थ म्हणजे कुटूंब असलेल्या शिष्य संप्रदायाकडून (किमान हजारतरी) त्यांच्या घरी आतंकवादी किंवा पाकिस्तानी सैनीक आले तरी संरक्षणाची गरज नाही त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांसाठी स्त्रीयांसाठी - कोणाही सुरक्षारक्षकाने, पोलीसाने, फायर ब्रिगेड कर्मचार्‍याने, सैनिकाने जीवपणाला लावू नयेत हे जरा लिहून बाँडपेपरवर लिहून मॅजीस्ट्रेट समोर साक्ष घेऊन लिहून आणा. मलाही अभ्यासायला आवडेल की किती जैन मुनी असे शिष्य संप्रदायाकडुण लिहून घेण्यास अनुमती देतात आणि किती शिष्य संप्रदाय तुम्हाला असे लिहून देण्यास तयार होतो आणि तुमच्या संवादांना ते नेमकी काय उत्तरे देतात. - (उद्देश्य जैन मंडळींना छळण्याचा नाही सैनिकांनी जीव डावावर लावण्याबद्दल खोटी हळहळ व्यक्त करून शत्रुपक्षाला मदत करू इच्छिणार्‍यांना उघडे पाडण्याचा उद्देश्य आहे.)
२) त्यानंतर असेच आपल्या स्वतःच्या शाळा महाविद्यालयात आपणास शिक्षण दिलेल्या गुरुजनांकडून आपल्या वर्गमित्रांकडून, शेजारी, आप्तस्वकीय आपले आईवडील आपली मुले भावंडे आपले सहकर्मी, आपण मिडीयात जात असाल तर शंभर पत्रकार - वृत्तसंस्थातील इतर कर्मचारी, वृत्तसंस्थांचे मालक, त्यांच्या फॅमिली, आजकाल सिव्हील सोसायटी म्हणून फॅड आले आहे त्यांचे आप्तस्वकिय यांच्याकडूनही त्यांच्या घरी त्याम्च्या मुलांवर स्त्रीयांवर त्यांच्या स्वतःवर आतंकवादी किंवा गुन्हेगार आल्यस कोणत्याही सुरक्षारक्षकाने, पोलीसाने, सैनिकाने , फायर ब्रिगेड वाल्याने जीवपणाला लावू नयेत असे लिहून आणा.
३) असे लिहून देणारे कुणि भेटलेच तर आपण स्वतः आणि ते मिलून काश्मिर अफगाणीस्तानसारख्या कोणत्याही आतंकवाद पिडीत भागात आतंकवाद्यांना आमची फॅमिली मुलेबाळे स्त्रीया फॅमिली आणून आपल्या हवालीकरतो पण आतंकवाद बंद कराअसा संदेश डावावर लावण्याच्या आपल्या स्वतःच्या फॅमिलीसहीत नेऊन द्या. त्यांनी तुमचे ऐकले नाही तर त्यांच्या समोर गांधीवादी मार्गाने अहिसक धरणे देऊन अहिंसक बलिदान देऊन सशस्त्र सैनिकांचे ज्यांची आपणास एवढी काळजी आहे त्यांचे प्राण वाचवा.
हिंसा सोडायचीच असेल तर पहिला उपदेश कायदा हातात घेणार्‍या अतीरेक्यास करावयास हवा एवढे आपणासही समजत असेलच. बाकी महात्मा गांधिंनी आणि बुद्ध आणि जैन धर्मानेही सुद्धा कोणत्याही सरकारला पोलीस दले आणि सैन्यदळ गुंडाळून ठेवण्यास सांगितल्याचे माझ्या ऐकण्यात नाही पण तुम्ही स्वतः त्यांच्यापेक्षा अधिक मोठे अहींसक बलीदान देऊन पहाण्यास कुणाची ना नसण्याचे कारण नसावे.

मदनबाण's picture

14 Aug 2019 - 11:04 pm | मदनबाण

काश्मिर मधील शांतता प्रिय देशद्रोही जनतेला पाहुन एक शेर आठवला तो इथे देतो :-
ताउम्र जन्नत में रहकर भी
उसे उजाड़ने में गुज़ार दी
जिहाद सिर्फ इस बात का था
कि मरने के बाद जन्नत मिले

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ये दुनिया उट पटांगा, किथ हात ते किथ्थे टांगा, रात कुकडी देन्दी बांगा, ऐ दे चकदे फट्टे... :- Khosla Ka Ghosla

प्रकाश घाटपांडे's picture

15 Aug 2019 - 11:42 am | प्रकाश घाटपांडे

इथे एक वाचल

माहितगार's picture

15 Aug 2019 - 12:56 pm | माहितगार

शेषराव मोरेंच्या फेसबुक गोषवार्‍याच्या दुव्यबद्दल आभार व्यक्त करताना त्यातील केवळ दृष्टीकोनांशी केवळ असहमतच नव्हे तर मी त्यावर कडाडून टिका करेन लोकंनी भाषणाला गर्दी केली, उपाय योजना सुचवण्याचे सोडून स्वतःचा अत्म विश्वास गळालेल्या शेषराव मोर्‍यांनी श्रोत्यांचे अवसान गळवण्याचे काम केलेले नाही ना अशी शंका वाटते. त्यासाठी कुरुंदकरांच्या नावाच्या व्यासपिठाचा उपयोग होणे हि जीनयुने केलेल्या नामुष्कीसारखे झाले. भारताचे आणि भारतींच्यांचे वेळोवेळी अधिक नुकसान कशाने झाले असेल तर अवसान घातकीपणामुळे झालेले असावे.

पण गोषवारा देणारृया व्यक्तिकडून गोषवार्‍यात त्रुटी आलेल्या असू शकतात. त्यांचा युट्यूब उपलब्ध होण्याची पुढचे दोन दिवस वाट पाहून मग टिका करेन. युट्यूब दुवा उपलब्ध झाल्यास उपलब्ध करुन द्यावा ही नम्र विनंती

शेषराव मोरेंचे व्याख्यान युट्यूबवर लिळते का पाहीले पण उपलब्ध झाले नाही. पण त्यांच्या नांदेड येथिल व्याखानाचे दैनिक सामनाने केलेले वृत्तांकन आले आहे जे फेसबुक पोस्टपेक्षा मुद्दे अधिक बरे कव्हर करत असावे असे वाटते.

हिंदुस्थान हा एकसंघ देश आहे आणि या देशातून कोणी फुटून जात असेल तर देश आक्रमक होऊन योग्य ती कारवाई करू शकतो हे सध्याच्या केंद्रशासनाने घटनेतील 370 कलम रद्द करून सिध्द केलंय, अशा शब्दात कश्मीर प्रशनाचे गाढे अभ्यासक, विचारवंत शेषराव मोरे यांनी सरकारची प्रशंसा केली.

या धागा लेखकाच्या काही चुका आहेत तशाच स्वरुपाच्या काही चुका शेषराव मोरेंकडून होत असाव्यात. दैनिक सामनानेही वृत्ताचे शिर्षक "हिंदुस्थान आक्रमक होऊ शकतो.." असे सुरु केले आहे. एकदा काही स्वकीयांचा (या परिपेक्षात काँग्रेसचा असे वाचा) बोटचेपा भेकडपणा अनुभवल्या नंतर जश्यास तश्याने प्रत्युत्तर देता येण्याचे समाधान दबलेल्या मनांना स्फुरण येऊन वाटणे सहाजिक तसे हिंदुत्व वाद्यांना अशावेळी वाटणे सहाजिक असावे. पण मी जसे नेहमी म्हणतो हिंदुत्ववादी डिप्लोमॅटीक मांडणीत कमी पडतात. त्यामुळेच वर धागा लेखकास प्रश्न पडला होता एकीकडे आम्ही कुणावर आक्रमण करत नाही म्हणायचे आणि दुसरीकडे आक्रमक व्हायचे असे कसे ? हा प्रश्न फक्त धागा लेखकास पडत नाही- हा पाकीस्तानी आणि चिनी अपप्रचाराचा भाग बनतो -परदेशस्थ भारतीयांना अपप्रचार बरोबर नाही हे माहित असते पण उत्तर कसे द्यायचे हे माहित नसते अशी स्थिती होऊन जाते. मी वर दिलेले उत्तर पुर्नौल्लेख करीत देत आहे.

"देशांतर्गत बंडाळी मोडणर्‍या सुरक्षेसाठी केलेल्या कारवाईस आक्रमण संबोधत नाहीत." भारत भारताच्या हिमालय पल्याडच्या देशांवर आक्रमण करण्याचे भारतीय परंपरेत नाही . पण आसेतू हिमालय भारताची एकसंघता जोपासण्यासाठी अंतर्गत बंडाळ्यांना आवश्यकते नुसार बलप्रयोगानेही वेळोवेळी मोडीत काढले जाते. असे डिप्लोमॅटीक उत्तर देण्याची जबाबदारी केवळ राजदूतांची नसते तर देशाची भूमिका नेमकेपणाने प्रत्येक मंचावर मांडणे जसे की सोशल मिडीया देशाच्या प्रत्येक नागरीकाची असते.

काश्मिरींच्या सार्वमताचा नसलेला प्रश्न

शेषराव मोरे भाषणात नेमके काय बोलले हे पहावयास हवे वृत्तांकन जुळत नसण्याची शक्यता असू शकते की मोरे खरोखरच तथ्यांच्या चुका किंवा विपर्यास करत आहेत ? कारण एकदा शेषराव मोरे एकसंघ भारताची बाजू घेतात बंडाळी आवश्यकता पडल्यास बलप्रयोगाने मोडण्याचे समर्थन करतात म्हटल्यावर ते सार्वमताच्या बाजूने अंशतःही बोलतील ही शक्यता कमी वाटते.

नेहरूंनीही प्रश्न सार्वमत घेतले जावे या अपेक्षेने युनोत नेला नव्हता तर केवळ पाकीस्तानला माघार घेण्यास सांगितले जाईल या आपेक्षेने ते गेले. भारताच्या एकसंघतेची भूमिका धार्मिक आधारावरील देशांना सोईनुसार मान्यता देणारी राष्ट्रे लक्षात घेऊ शकणार नाहीत हे नेहरुंनी लक्षात घेतले नाही. सार्वमताचा प्रकार इतरांनी चिटकवण्याचा प्रयत्न केला जो भारताने नाकारला -कारण धार्मिक भाषिक प्रादेशिक अशा वेगवेगळ्या आधारावरची तुकडे तुकडे तत्वज्ञान भारतासाठी मान्य करण्यासारखे नव्हते आणि नसेल.

अगदीच फाळणी होताना मुस्लिम लीगने काश्मिरचा विषय चर्चेत घेऊन काश्मिरचा मुस्लिम बहुल भाग वेगळा काढून मागितला असता आणि महात्मा गांधींच्या जागी सावरकरांसारखे नेतृत्व असते तर त्याचा विचार त्यांना त्यांच्या भारतातील सर्वच मुस्लिमांना घेऊन जा या तडजोड विना दृष्टीकोणात करता आला असता, कदाचित वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्रबोसां निर्णयात असते तर ते फाळणी बिळणी काही नाही काय यादवी व्हायची ती होऊन जाऊद्यात म्हणाले असते, नेहरू- गांधींच्या बोटचेपेपणा मुळे वेगळाच घोळ झाला ज्यात त्यांनाही एकसंघ भारत हवा होता सार्वमत या संकल्पनेस मनोमन सामावून घेणे शक्य नव्हते त्यामुळे भारतात कुणाचेही नेतृत्व असले असते तरी सार्वमताची संकल्पना स्विकृत कदापी झाली नसती हे लक्षात घेतले पाहीजे.

आंतरराष्ट्रीय चर्चात जगातले असंख्य प्रदेश त्या त्या देशाचे भाग म्हणून कोणत्याही सार्वमता शिवाय आहेत आणि भौगोलीक एकसंघ देशातून वेगळे होणे ही सहज साध्य बाब नसते हे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मनावर ठसवण्यत प्रत्येक भारतीयाने सहभागी होण्याची गरज असावी.

...370 कलम रद्द करून आणि कश्मीरला केंद्रशासित करून केंद्रशासनाने जम्मू आणि लडाखचा प्रश्न सोडविला आहे. पण मुस्लीमांचे प्राबल्य असलेल्या कश्मीर घाटीचा प्रश्न मिटेल की नाही, याची मला शंका वाटते, असे मतही शेषराव मोरे यांनी व्यक्त केले...

हे पुन्हा एकदा हिंदुत्ववाद्यांच्या टोकाच्या पुर्वग्रहदुषित आत्मविश्वास रहीत दृश्टीकोणातून येते. आजही जगभरच्या काही मुस्लीम बहुल देशांचे भारत समर्थन मिळवत असतो, भारतात तुम्हाला सहज आठवणारही नाही असे मुस्लीम बहुल भाग अत्यंत शांत राहीलेली उदाहरणे आहेत. काश्मिरवरही रणजीत संग आणि त्यानंतर डोगरांनी राज्य केलेले आहे.. मध्य आशियात रशियनांनी आपले प्रभाव गाजवून दाखवले आहेत. भारताने नॉर्थईस्ट, बंगाली नक्षल , पंजाब आणि आसामातील बंडाळ्या मोडून देशाच्या मुख्यधारेत वापस आणून सोडले आहे.

जखम बरी होई पर्यंत ठसठसत असते. सर्वोच्च न्यायालयानेही सुरळीत होण्यासाठी वेळ दिला पाहीजे म्हटले आहे. सगळ्यात महत्वाचे आत्म विश्वास आणि विश्वास या दोन गोष्ती बाळगल्यास कास्मिरला काळाच्या ओघात मुख्यधारेत सामील करून घेण्यात असाध्य कही नसावे…

सर्व बाजू भारताच्या मजबुत आहेत .
सैन्य मजबुत आहे ,आर्थिक स्थिती पाकिस्तान पेक्षा किती तरी पटींनी मजबुत आहे .
पाकिस्तान का kshatru समजणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे (निवडणूक हारू शकत नाही ).
कसलाही मागचा पुढचा विचार न करता वेड्या सारख तुटून पडले तर हा प्रश्न. चुटकी सारखा सुटेल

mayu4u's picture

19 Aug 2019 - 12:45 pm | mayu4u

https://www.maayboli.com/node/71069

इथे पुढील प्रतिक्रिया वाचली:

अक्कु सारखी पाठराखण करणं यातून चूकीचा संदेश जातो. मधुरा जी समर्थ आहेत.
मधुरा जी मिपावर जॉन विक्क आणि माहितगार, डॉ. मंडळींनी मला चांगलेच झाडले तिकडे काश्मिर विषयीच्या माझ्या लेखावर. डेंजर कंपूगिरी आहे तिकडं.
कृपया अक्कू ला सांगा यातून कंपुगिरी करत असल्याचा संदेश जातो.

नवीन Submitted by अमर ९९ on 16 August, 2019 - 19:19

मुद्देसूद प्रतिवादाला कम्पूबाजी म्हणतात ही नवी मिळाली.

यशोधरा's picture

19 Aug 2019 - 1:02 pm | यशोधरा

LOL! शरद ह्यांच्यासारख्या अभ्यासू लेखन करणाऱ्या व्यक्तीच्या लेखनाला मृत्युंजय आणि राधेय ह्या कादंबऱ्यांंवर विसंबून लेखन करणाऱ्या लोकांनी नावे ठेवावीत? कलियुग रे देवा, कलियुग! =))

तमराज किल्विष's picture

19 Aug 2019 - 9:48 pm | तमराज किल्विष

मिपावर असलेल्या राजकारणाचा राग येतो इतकेच. माझे लेख तिथेही लोक वाचतात आणि इतर ठिकाणी वैयक्तिक संपर्क साधून आवडले हे कळवतात देखील.
पण तिथे देव न मानण्याकडे सर्वांचा जास्त कल आहे असे मला दिसते. काही जण जी आधी आवडले म्हणून स्वतःच्या मर्जीने प्रतिसाद देत होती त्यांनाही चिडवून एका जॉन विक नावाच्या id ने गप्प केले. मुक्त विहारीजींनी मला msg करून विनंती केली की तिथे लेखमाला टाकत रहा. अनेकजण वाचतात. नेत्रेशचाही असाच मेसेज होता. नाहीतर अश्या लोकांच्या समूहात काही लिहिणे मलाही योग्य वाटत नव्हते.

मात्र ज्यांना त्यावर बोलावेसे वाटते त्यांचा अपमान करून त्यांना गप्प करण्याचे काम काही id करत असतात. मला कळत नाही का ते!!

Submitted by मधुरा कुलकर्णी on 16 August, 2019 - 08:1

जॉनविक्क's picture

19 Aug 2019 - 10:11 pm | जॉनविक्क


काही जण जी आधी आवडले म्हणून स्वतःच्या मर्जीने प्रतिसाद देत होती त्यांनाही चिडवून एका जॉन विक नावाच्या id ने गप्प केले.

आणि असे अटेमट टू डीफेम करण्यापेक्षा. हे जावइशोध अनुमान आपण नेमके कसे काढले ते स्पष्ट करावे मधुराजी _/\_

तुमच्या समक्ष येवून आपली माफी मागतानाचा व्हिडीओ इथे आणि तिथे ही शेअर क्रेन म्हणतो.

आधिहि व आजुनही काही जन तुमचे लिकान चांगले आहे ऐसे प्रतिसादत आहेतच की, ते कसे काय ? कोना कोना ला मी गप्प केले याचा विदा जर्रा शेर करता का ?

मिपाच्या ध्येय धोरनात बसत असते तर इथेच आपणास कठोरातील कठोर म्हणता येईल अशी कडक समज देण्यात यावी म्हणून आंदोलनही केले असते. पण, अंजावरच्या सीमेपलीकडील दहशतवादावर मिपाची संहिता अप्रस्तुत ठरते आणि अलिखित कलम 370 व 35 अ,ब आणि क समोर मान टुकवने भाग पड़ते म्हणूनच हा बालिशपणा खपवून घेणे माका क्रमप्रात्य असा :(