भयकाल

Primary tabs

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
11 May 2019 - 10:20 pm

हळू हळू एकेक करत
हरवत चालले आहे...

ज्याच्याकडे पहात पहात
आम्ही आमचे मार्ग शोधायचो
तो ताराच आकाशातून
नाहीसा झाला आहे
आणि तो एकुलता एक चंद्रही...
ज्याची स्वप्नं बघत बघत
आम्ही निश्चिंत झोपी जायचो...

नाहीशा होणाऱ्या प्रत्येकाला मी
खिडकीतून पहात राहतो
आणि मनातल्या मनात चरकतो
उद्या मी ही असाच नाहीसा झालो तर!

आज सकाळी डोळे उघडले
तर ते समोरचे हिरवेकंच झाड
कुठेच दिसत नव्हते
ना ही कुठला पक्षी

या पृथ्वीवरून
हळूहळू एकेक गोष्टी
हरवत चालल्याचे दिसत आहे

जो मुलगा मोकळ्या मैदानात खेळायचा
तो ही आज कुठे दिसत नाहीये,
की त्या मुलाबरोबरच ते खुले मैदानही
गायब झाले असेल....

गोष्टी नाहीशा होणे
ही सरत्या काळातील
जणू नित्याची गोष्ट झालीय...

नाहीसे होण्याचा कालखंड
आता आपल्याकडे सरकत आहे,
बाहेरचे शिल्लक राहिलेले जग
आपण ज्या खिडकीतून बघतो,
आज रात्री कदाचित
त्या खिडकीलाही गिळंकृत करेल
हा भयकाल...

मला भय वाटते
असे तर होणार नाही ना ,
की या पृथ्वीवरून उद्या
मी ही नाहीसा होईन...

(दिनकर मनवर यांची पूर्वपरवानगी घेऊन 'भय का दौर' या त्यांच्या कवितेचा मराठी अनुवाद करण्यात आला आहे.
तसेच तो अनुवाद इथे देण्यास त्यांनी परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार.)

मूळ हिंदी कविता - दिनकर मनवर
मराठी अनुवाद - शिवकन्या

मुक्त कवितामांडणीवावरवाङ्मयमुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमान

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 May 2019 - 9:29 am | ज्ञानोबाचे पैजार

ही कविता आवडली, मुळ कविताही वाचायला मिळाली असती तर अजून मजा आली असती.
पैजारबुवा,

यशोधरा's picture

12 May 2019 - 9:54 am | यशोधरा

आवडली. मूळ कविताही द्यावी किंवा लिंक द्यावी, अशी विनंती.

जालिम लोशन's picture

12 May 2019 - 10:36 am | जालिम लोशन

गीता वाचणे. भय निघुन जाईल.. बदल निसर्ग नियम आहे