नेणीव भावला
प्रती,
नीरज
हाय,
काय म्हणतोस कसा आहेस गेली जवळ जवळ १ वर्षे आपली भेट नाही त्यापुर्वी दररोज भेटणारे आपण आपली कॉलेजेस बदलल्याने गेल्या वर्षात भेटलेलो नाही .आपली मैत्री जरी विविध पायावर उभारलेली असली तरी त्याचा पाया म्हणजे दोघाना मनापासुन आवडणारा संदीप खरे आहे हे तु लगेच मान्य करशील ,सांगायची गोष्ट अशी की की कालच अगदी पहिल्या रांगेत बसुन नेणीवेची अक्षरे बघायचा योग आला म्हणजे मी चान्स मारला .आयला त्या संदीप खरेना लेख दील्यानंतर व त्यावर त्यांची प्रतीक्रीया आल्यानंतर मी हवेतच गेलो होतो म्हणले आता पुढचा कार्यक्रम पहिल्या रांगेत बसुनच बघायचा मग अगदी पहिल्या दीवशी अर्धा तास रांगेत उभे राहुन तीकीट मिळवले तेव्हा काय आनंद झाला होता म्हणुन सांगु. आणि तो आनंद या कार्यक्रमाने खरा ठरवला रे भावड्या ,चायला काय कार्यक्रम होता म्हणुन सांगु ...संदीपचे एक वैशिष्ट्य सगळेच मान्य करतील की तो तरुण पीढीला भावणार्या कवीता लिहितो खर्या पण त्या कवीतातुन तो कुठेतरी आत डोकावायला लावतो आणि हेच कालदेखील सिद्ध झाले .काल जवळ जवळ ६० % पब्लीक म्हणजे यंग क्राउड होते पण त्यांच्या कडुन एकाद्या पेपी कवीतेला जेवढ्या शिट्या आल्या तेवढ्याच टाळ्या स्वत:ला पारखा असे सांगणार्या कवितेला पडतात तेव्हा खरा संदीप खरे लोकाना समजुन येतो असे त्यचा एक लेखनवेडा फॅन म्हणून मला वाटते बघ नीर्या .खरेतर तु आणि मी तसे दोघेही कविताप्रेमी आपण आपापल्या शाळेतुन कवितावाचनाच्या स्पर्धेत भागही घेतला आणि खुप कवीता ऐकल्या ,पण ह्या सगळ्या कवितावाचनात एक प्रकारचा तोचतोच पणा आलेला होता ,कवी येणार कवीता वाचणार आणि आपण टाळ्या वाजवणार ,कविता काहीतरी सांगणारी वाटली तर अंतर्मुख होणार वगिअरे वगिअरे !!!पण तुला मला आणि आपल्या सर्वाना ते फार बोअर वाटायचे यापेक्षा वर्गातला मराठीचा तास परवडला असे आपण म्हणायचो पण मी आज खुप खुश आहे की हा समज आपल्या लाडक्या संदीपने मोडुन काढला ,कवीता कशा व्यक्त करायच्या याचे अत्युत्तम उदाहरण मह्णजे कालचा नेणीवेची अक्षरे हा कार्यक्रम ..
अरे या कार्यक्रमाची सुरवातच इतकी तुफान आहे म्हणून सांगु
आपण जाणीवपुर्वक चालतो
जाणीवपुर्वक हसतो,जाणीवपुर्वक बोलतो,जाणीवपुर्वक फीरतो
एकुनात काय तर आपण जाणीवपुर्वक जगतो
पण जीथे जाणीवा संपतत तेथे नेणीवा सुरु होतात ...
आणि त्या नेणीवांची मग होतत अक्षरे त्याच अक्षरांचा प्रवास आज तुमच्याबरोबर
अशी जेव्हा एखाद्या कार्याक्रमाची सुरवात होते तेव्हा हा कार्यक्रम रंगत जाणार हे स्पष्ट होते. ह्या वाक्यानंतर आपल्या केभोनाचा( केशवरव भोसले नाट्यगृह) पडदा वर जातो आणि मंचावर संदीप ,मधुरा वेलणकर आणि अमृता सुभाष अवतरतात आणि एक एक कविता पेश करु लागतात इथे कवीता सादर करणे म्हणजे समोर बसुन कवीता वाचुन सांगणे असे नाही या कार्यक्रमात म्हणली जाणारी प्रत्येक कविता त्या त्या सादरकरत्याला पाठ आहे तो ती कवीता मह्णत नाही तर आपल्या अभिनयातुन ती कविता जीवंत करतो ,त्यातले भाव आपल्या देहबोलीतुन दाखवुन देतो अरे तुला उदाहरण च द्यायचे झाले तर मैत्रीण ही कवीता ऐक .एक उत्तम दोन मैत्रीणीतली नाती सांगणारी ही कवीता आहे पण ही कवीता नुसती वाचली असती तर तु किंवा मी दोघेही अक्षरशः झोपुन गेलो असतो पण याच कवितेला त्याने ठेक्यात बसवले आणि त्या दोन्ही कलाकारानी अक्षरशः दो न मैत्रीणीतले नाते स्टेजवर प्रत्यक्ष दाखवले अगदी त्यानी स्टेजवर फुगडी घातली .विशेष म्हणजे या दोन्ही अभिनेत्री या उत्स्फुर्त अभिनेत्री आहेत त्याच्या चेहर्यावरचे भाव ते क्षणाक्षणाला बदलु शकतात म्हणुनच एकाच कवीतेत असणारा खोडकरपणा,निरागसता आणि सीरीयसनेस सगळेर अगदी तुला मला देखील कळु शकते ,आणि अशाच एकाहुन एका कविता सादरीकरणातुन कार्यक्रम मग फुलत जातो
हृदय फेकेले तुझ्या दीशेने ,झेलाया तु गेलीस पटकन
गफलत झाली परी क्षणांची पडले खाली फुटले खळकन
ही संदीपची अगदी गाजलेली कविता ही कवीता त्याने अशी काही सादर केलेली आहे की आपण आपलेच हृदय काढुन दीले आहे की काय असे वाटावे या कवितेनंतर माझ्या शेजारी बसलेले सत्तर वर्षाचे आजोबाही जेव्हा क्या बात है असे म्हणाले तेव्हा मला काय आनंद झाला म्हणून सांगु.म्हणजे आपण दोघे ज्याचे फॅन म्हणवुन घेतो तो काय चीज आहे हे कळाल्यावर आनंद होणार नाही तर काय होणार.अरे विषेश म्हणजे त्याना सगळ्या कवीता पुर्ण तोंडपाठ आहेत अरे तीन तासाच्या कवीता पाठ करणे म्हणजे काय अवघड गोष्ट.अरे आपल्याला वर्षभरात ५ प्रमेये पाठ होत नाहीत आणि इथे हे बीझी कलाकार पाठ करता आहेत अरे माझे बॅकस्टेजकडे लक्ष होते पण तीथे साधी एकादेखील कवितेची प्रत(रीटन कॉपी) नव्हती पण तरी देखील त्यांची केमीस्ट्री काय उत्तम जमली आहे म्हणून सांगु रे
मला खात्री आहे तीला झोप आली नसेल
सुंदर स्वप्ने पडत असतील्,पण कुशीवर वळेल उसासेल
मला खात्री आहे तीला झोप आली नसेल
या कवीतेवेळी अम्रुता सुभाष ची उत्कृष्ट ऍक्टींग अगदी चेहरा दीसत नसतानाही दाखवलेले हावभाव आणि अगदी शेवटी
एकच लय भिनत असेल्..एकाच क्षणी सम सापडेल असे मह्णताना तीचे चटकन निघुन जाणे आणि जाताना आरामखुर्चीला धक्का देवुन जाणे ह्याबाबतीत दाद देइल तीतके कमी बाकी राधे रंग तुझा गोरा वगैरे फेमस कवीता आणखी खुलवलेल्या आहेतच पण ऍक्टींग म्हणजे काय रे शंभर नंबरी,अवडली बाबा आपल्याला आणि त्यात संदीप तर ...च्यामारी धरुन फटॅक रे आयला हा कवीता करतो कधी कार्यक्रम करतो कधी आणि ऍक्टींगची प्रॅ़क्टीस करतो कधी काय समजतच नाही रे बाबा पण यानंतर संदीप ज्या कवीता पेष करतो त्या मात्र काळजाला जावुन भिडतात ,काही प्रश्न निर्माण करतात
दाढी काढुन पाहीला दाढी वाढवुन पाहीला सारख्या कवीता सरळ सरळ प्रश्न टाकुन निरुत्तर करतात आणी त्याच् अवस्थेत मध्यंतर होतो ,मध्ये आपण एका कार्यक्रमाला गेलेलो बघ तेव्हा मध्यंतर संपुच नये असे वाटत (काय बोगस कार्यक्रम होता रे तो थु) होते आज मात्र मी मध्यंतरात उठलोच नाही अरे साध्या कवीतांचा इतका इफेक्ट कसा सहन करायचा रे.आणी दुसर्या सत्रात पण तेच , काहीतरी वेगळ्याच रचना काढुन लोकाना आत डोकावयला लावायचे आणि त्यात ते नेपथ्य आणि अभिनय काय रे बाबा साला मार दीया ती अमॄता सुभाषची कवीता तर अगायाया फ्कत सावलीदेखील अभिनय करु शकते हे मला काल समजले रे बाबा मान गये भकासपण असे देखील दाखवता येते हे पटायला थोडा वेळ लागला रे बाकी कार्यक्रमाने जोर घेतलाच होता आणि हे सगळे कवीतातुन लोकाना मारत होते ,हसवतदेखील होतेच पण ते हसवाताना सुद्धा लोकांचा स्वाभीमान त्याने दुखवला होता आणि विविध प्रश्नांची उत्तर देउन त्या प्रश्नाना तोपुर्ण विराम पण देत होता आणि खरे म्हणजे इथे त्यांची खरी कसोटी होती ,पण काय पेललाय त्यानी ,आयला ५ मिनिटात सहा भुमिका केल्यावर जेव्हा एको सीस्टीममध्ये तीघांचा
आभाळाला कोणेतरी विचारायला हवे.........
सार बघणार्याला मी ही बघतोय हे सुनवायला हव...
तुझ्या सीस्टीमच्या बेसीकमध्येच घोळ आहे हे कोणीतरी
ठणकवयला हव..
म्हणून आम्ही जन्मा आलो..!
अस जेव्हा तो हणतो तेव्हा शहाण्या मी आणि तु जरी तिथे असतास ना तरी तु स्टँडीग ओबीवेशनच दीले असतेस रे ,एखाद्यच मन एखादा कवी इतके ओळखु शकतो यावर माझा अजुन विश्वास बसलेला नाही ,अरे वेगवेगळ्या ठिकाणी अनेक उत्तमोत्तम कवी लिखाण करतात पण संदीप खरे मला आवडतो कारण तो गोष्ट पटवुन देतो आणी तुझ्या माझ्या सारख्या नेटवर पडीक यंग क्राउडपासुन ते म्हातार्या कोतार्यापर्यंत ..मग काय पोरांच्या शिट्या ,मोठ्यांच्या टाळ्या यातुन ही मैफल रंगत जाते म्हातार्याची भुमीका ,निरगस मन इ व्यक्तीरेखा इतक्या उत्तम जमल्या आहेत ना की बस आणि शेवटी
तेच तेच पाणी आणि तीच तीच हवा
आणि तुला बदलही कशासाठी हवा
जुनेच अजुन आहे रीयाजावाचुन !
गीळलेले सारे आधी पचायाला हवे!! कधीतरी वेड्यागत वागायला आहे!
नको बघु पाठीमागे येइल कळुन
कीतीतरी करायचे गेलेले राहुन!
नको करु त्रागा असा उद्याच्या दारात
स्वतःलाही कधी माफ करायाला हवे !! कधीतरी वेड्यागत वागायला हवे
या कवीतेतुन जेव्हा तो कार्यक्रम संपवतो तेव्हा घडाळ्यात बघितल्यावर रात्रीचे १:३० वाजलेत हे समजत नाही ,जेह्वा मैफील अजुन रंगावीशी वाटते तेव्हाच संपवावी हे त्याचे वाक्य तो नेहेमी प्रूव्ह करतो तसे त्याने कालही केले आणि मग त्याने कार्यक्रम संपवल्यावर मी स्टेजवर जावुन ५- १० मिनिटे त्याला भेटलो लेख प्रसिद्ध झाल्याचे सांगीतले अगदी त्याचा नंबरही घेतला ..एक ट्रान्स असतो ना त्या ट्रान्स मध्येच ते सगळे घडले आणि मी घरी आलो पण हा ट्रान्स काही प्रत्येक वेळॅला येत नाही ,हा ट्रान्स तो निर्माण करतो म्हणुनच अगदी बाहेर उडाणटप्पु म्हणुन प्रसिद्ध असणारी कार्टीदेखील इथे येवुन कवीता ऐकतात ,विचार करतात
अरे खरेतर कवीता ही अनुभवायची गोष्ट .ते मनाल खाद्य असते पण ते खाद्य तो सोपे करुन भरवतो ,या कार्यकरमात ना सुत्रसंचालन आहे ना कोणाचे मनोगत फक्त कवीता आणि कवीता एखादा १० सेकंदाचा पीस फक्त दुसरी कवीता चालु झाली आहे याची जाणीव करुन देतो पण ते म्युझीक आणि विषेष म्हणजे ते नेपथ्य काय जमले आहे म्हणून सांगु अगदी खरे वाटते ते. सगळ्या जागेचा वापर करणे ,सतत फीरत राहणे वगैरे हे नाटकाचे निकष हा कवीतेचा कार्यक्रम देखील पाळतो लाइट सीस्टीम वगैरेतुन तो अख्खा प्रसंग डोळ्यपुढे उभा करतो आणि वर विचार करायला स्वतःचे निश्कर्ष काढायला मोकळी स्पेस देतो .अरे काय म्हणायचे रे याला .दोन्ही दगडवर पाय ठ्वुन उभा राहणे व तेदेखील न पडता ...म्हणुनच त्याचा कार्यक्रम झाला की मी असा ट्रांस मध्ये जातो बाकी दोन तीन दीवसानी हा ट्रान्स ही जाइल नाहीतरी अभ्यास आहेच की पण या ट्रान्स मध्ये पण जगायला मजा आहे रे नीदान तेवढे क्षण तरी मी जगतोय ,बाकी सवीस्तर लिहिनच कधीतरी आत्ता झोपतो बाय
विन्या
असो ,
मित्रानो बाकी नीरज हा माझा खराखुरा मित्र आहे ,आम्ही संदीप खरेचे पंखे आहोत हे आता तुम्हाल माहीत आहेच तेव्हा हा अनुभव मला शेअर करायच होता
मग म्हणले मित्राला जसे सांगतो तसे सांगेतले ..हे माझ्या मनातुन या ट्रान्समध्ये झालेले लिखाण
हा प्रभाव उतरला की मग या लेखाचे प्रयोजनही संपेल
पण मला व्यक्त व्हायचे होते आणि मी झालो आणि होत राहणार मग हजार विडंबने आली तरी बेहत्तर असो.......
नेणीवेची अक्षरे इथे पहा
http://www.youtube.com/watch?v=YG15gntAfB4
http://www.youtube.com/watch?v=dqLBWaZjeHU
http://www.youtube.com/watch?v=yU0JrHwJktM&feature=related
आम्ही चलतो
प्रतिक्रिया
19 Mar 2009 - 12:54 am | प्राजु
यातल्या कविता वाचताना निशःब्द व्हायला होतं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Mar 2009 - 1:02 am | भडकमकर मास्तर
दुवे पाहिले ...
धन्यवाद...
कार्यक्रम छान आहे...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
19 Mar 2009 - 2:14 am | धनंजय
छान कार्यक्रम आहे.
धन्यवाद विनायक.
19 Mar 2009 - 11:19 pm | शितल
हे दुवे मी आधी पाहिले आहेत.
संदिप खरे यांच्या कविता छान असतात. :)
19 Mar 2009 - 1:12 am | संदीप चित्रे
मी कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिला नाहीये अजून पण काही भाग पाहिलेत.
तिघंही खूप जीव ओतून कार्यक्रम करतात.
'नको करू सखे ...' काय सुरेख केलंय ना त्यांनी?
-------
तू 'नेणिवेची अक्षरे' हा संग्रहही वाचला असशीलच.
>> ऐलदेशी शुष्क रानी पंख मिटला मोर मी >>
>> पैलदेशातून थोडे पावसाळे धाड ना >>
आणि >> काय रे देवा !... >>
च्यायला जिथे आपली कल्पनाशक्ती थांबते तिथे संदीपचे शब्द सुरू होतात !!!
19 Mar 2009 - 11:11 am | कालिन्दि मुधोळ्कर
आवडला लेख. धन्यवाद.
19 Mar 2009 - 11:27 am | समीरसूर
तरुणाईच्या कवितांचे सौंदर्य अगदी तरूणाईने भारलेल्या शब्दात मांडले आहे. खूप सुंदर लेख. संदीप खरे हा एकमेवाद्वितीय कवी आहे. केवळ प्रतिभाविष्कार हा निकष न लावता रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे काव्य लिहिणारा कवी असेच संदीपचे वर्णन करावे लागेल. 'एकटे जगू...' आणि 'आयुष्यावर बोलू काही...' या व अशा कित्येक गाण्यांवर मनसोक्त प्रेम करणारे आम्ही शब्दपंढरीचे हळवे वारकरी! (वारकरी म्हटल्यावर थोडेसे घाबरायला होते आजकाल, कुठल्या गोष्टीवर आक्षेप घेतील याचा काही नेम नाही आणि तो किती ताणून धरतील याचाही नेम नाही.) संदीपने हा हळवेपणा कवितांमधून समोर मांडून ठेवला आणि त्याला प्रसंगी धारदारपणाची आणि चिमट्यांची मस्त फोडणी ही दिली. संदीपला अनेकोत्तम शुभेच्छा!! लेख मस्त जमलाय याबद्दल तुमचे ही अभिनंदन!
--समीर
19 Mar 2009 - 12:05 pm | विनायक पाचलग
प्रतीक्रीया दील्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार
बाकी काल गडबडीत टाइप केल्याने आपल्याला शुद्धलेखनाच्या चुकांचा त्रास झाला असण्याची शक्यता आहे
त्याबद्दल माफ करावे
बाकी आज जास्तीत जास्त चुका दुरुस्त करायचा प्रयत्न केला आहे
बाकी माझ्याकडेही नेणीवची अक्षरे आहे
पुस्तक नेहमीप्रमाणे अतीउत्तम आहे
त्या पुस्तकाचे एक पान
(अवांतर- कोणाकडे त्याचा कधी हे कधी ते हा कवितासंग्रह पी डी एफ स्वरुपात असल्यास खरडवहीत संपरक साधावा)
When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES
विनायक पाचलग
19 Mar 2009 - 1:02 pm | विसुनाना
प्रिय विनायक कोल्लापुरीदादा,
रामराम,
अवं, राग नका मानू...
आमच्यापरास वाईच न्हानगं हायसा म्हून लिवतो.
पर, ह्यो संदीप खरे लै फोलपाट कवी हाय हो.
तेला अजून 'जानीव'च न्हाई थितं 'नेनीव' कसली व्हनार हो?
अवो, तुमी आमच्या कोल्लापुरातलं. तुमी तरी ह्ये समजायला पायजेल ह्वतं.
तेच्या काय मागं लागतायसा?
अवं, जरा कुसुमाग्रज,विंदा,मर्ढेकर, बोरकर , केशवसुत, आरती प्रभू, सुरेश भट असल्या लय भारीभारी कवींच्या कविता वाचा.
सोत्ताला गीतकार म्हननार्या ' गदिमां'ची गानी वाचा की जरा.
त्येवढं कशाला? कोल्लापुरात आप्लं जगदीश खेबुडकर हायती. तेंची पिंजरामधली गानी वाचा.तेंच्या बरुबर फोटू काढा.
पघा, 'काटा किर्र' होतुया का नाय!
कशापायी इक्ता गूळ काढतायसा संदीपचा?
त्येलाबी जरा दमानं घिऊ द्या की.
अवो, त्येच्यापरास ब्येस कविता लिवणारी मंडळी हित्तं हायती - नेटावर.
जरा मराठी सायटींवरच्या कविता वाचा तर पयला!
काय म्हंता?
-विसुनाना
19 Mar 2009 - 1:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पहिल्याच शब्दात अडखळले, 'नेणीव' म्हणजे नक्की काय?
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
19 Mar 2009 - 2:36 pm | विनायक पाचलग
जाणीवानंतराचे भावविश्व म्हणजे नेणीव
When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES
विनायक पाचलग
19 Mar 2009 - 11:28 pm | धनंजय
नेणीव शब्दाचा सामान्य अर्थ "जाणिवेचा अभाव, अज्ञान"
सामान्य प्रयोगात "जाणीव, जाणता" या शब्दांचा अर्थ स्तुत्य संदर्भात घेतला जातो. "नेणीव, नेणता" या शब्दांचा अर्थ निंद्य संदर्भात घेतला जातो.
आता कवीने स्वतःच कार्यक्रमापुरता "जाणिवेपेक्षा उत्कट स्थिती" असा अर्थ सांगितला, तर कवितेत तोच अर्थ मानला पाहिजे.
पण विरोधाभासासाठी मुद्दाम "नेणीव" शब्द कवीने वापरला, असे मानूनही कवितेचा अर्थ लागू शकतो.
19 Mar 2009 - 11:07 pm | जृंभणश्वान
आपली जाणीव जेव्हा अपूर्ण आहे असे वाटते तेव्हा एक सणक येवून मन आपल्या हिणकस जाणीवेला उध्वस्त करण्यासाठी ओणवे करते पण तसे करताना नकळत मनच अनवाणी होते - ही उणीव लक्षात आल्यावर मानसगर्भ चिरकाल व्यापणारी संवेदना म्हणजे "नेणीव" होय.
19 Mar 2009 - 11:12 pm | छोटा डॉन
आई आई ग्ग्ग्गं ऽऽऽ
एवढं अवघड आहे काय, आम्हाला तर धडकीच भरली ..!!!
आयेशा टाकियाची शप्पथ सांगतो, असली अवघड "नेणीव" वगैरे होण्याला आम्हाला असे अजुन १० जन्म घ्यायला लागतील, फारच भयंकर प्रकरण म्हणावे हे.
आमचं आपलं शिंपल असतं बॉ ...
"प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं"
बाकी विनायका, तुनळीवरच्या क्लिप्स पाहिल्या.
छान आहे हो कार्यक्रम, तुझा अनुभवही तु छान मांडलास ...
लेख आवडला ...
------
( शिंपल ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
20 Mar 2009 - 12:46 am | श्रावण मोडक
"प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं"
बरंबरं... कळलं!!! ;)
19 Mar 2009 - 10:39 pm | क्रान्ति
छान कार्यक्रम आहे. सन्दीप खरेच्या कविता खरच छानच आहेत.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}