✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"नेणीव" आवडला

व
विनायक पाचलग यांनी
Wed, 03/18/2009 - 23:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4607 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

हा संग्रह आहे माझ्याकडे

प्राजु
गुरुवार, 03/19/2009 - 00:54 नवीन
यातल्या कविता वाचताना निशःब्द व्हायला होतं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

दुवे

भडकमकर मास्तर
गुरुवार, 03/19/2009 - 01:02 नवीन
दुवे पाहिले ... धन्यवाद... कार्यक्रम छान आहे... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

दुवे पाहिले

धनंजय
गुरुवार, 03/19/2009 - 02:14 नवीन
छान कार्यक्रम आहे. धन्यवाद विनायक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

सहमत.

शितल
गुरुवार, 03/19/2009 - 23:19 नवीन
हे दुवे मी आधी पाहिले आहेत. संदिप खरे यांच्या कविता छान असतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

अरे मस्तच आहे तो प्रकार

संदीप चित्रे
गुरुवार, 03/19/2009 - 01:12 नवीन
मी कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिला नाहीये अजून पण काही भाग पाहिलेत. तिघंही खूप जीव ओतून कार्यक्रम करतात. 'नको करू सखे ...' काय सुरेख केलंय ना त्यांनी? ------- तू 'नेणिवेची अक्षरे' हा संग्रहही वाचला असशीलच. >> ऐलदेशी शुष्क रानी पंख मिटला मोर मी >> >> पैलदेशातून थोडे पावसाळे धाड ना >> आणि >> काय रे देवा !... >> च्यायला जिथे आपली कल्पनाशक्ती थांबते तिथे संदीपचे शब्द सुरू होतात !!!
  • Log in or register to post comments

आवडला लेख.

कालिन्दि मुधोळ्कर
गुरुवार, 03/19/2009 - 11:11 नवीन
आवडला लेख. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख!

समीरसूर
गुरुवार, 03/19/2009 - 11:27 नवीन
तरुणाईच्या कवितांचे सौंदर्य अगदी तरूणाईने भारलेल्या शब्दात मांडले आहे. खूप सुंदर लेख. संदीप खरे हा एकमेवाद्वितीय कवी आहे. केवळ प्रतिभाविष्कार हा निकष न लावता रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे काव्य लिहिणारा कवी असेच संदीपचे वर्णन करावे लागेल. 'एकटे जगू...' आणि 'आयुष्यावर बोलू काही...' या व अशा कित्येक गाण्यांवर मनसोक्त प्रेम करणारे आम्ही शब्दपंढरीचे हळवे वारकरी! (वारकरी म्हटल्यावर थोडेसे घाबरायला होते आजकाल, कुठल्या गोष्टीवर आक्षेप घेतील याचा काही नेम नाही आणि तो किती ताणून धरतील याचाही नेम नाही.) संदीपने हा हळवेपणा कवितांमधून समोर मांडून ठेवला आणि त्याला प्रसंगी धारदारपणाची आणि चिमट्यांची मस्त फोडणी ही दिली. संदीपला अनेकोत्तम शुभेच्छा!! लेख मस्त जमलाय याबद्दल तुमचे ही अभिनंदन! --समीर
  • Log in or register to post comments

आभार

विनायक पाचलग
गुरुवार, 03/19/2009 - 12:05 नवीन
प्रतीक्रीया दील्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार बाकी काल गडबडीत टाइप केल्याने आपल्याला शुद्धलेखनाच्या चुकांचा त्रास झाला असण्याची शक्यता आहे त्याबद्दल माफ करावे बाकी आज जास्तीत जास्त चुका दुरुस्त करायचा प्रयत्न केला आहे बाकी माझ्याकडेही नेणीवची अक्षरे आहे पुस्तक नेहमीप्रमाणे अतीउत्तम आहे त्या पुस्तकाचे एक पान Image removed. (अवांतर- कोणाकडे त्याचा कधी हे कधी ते हा कवितासंग्रह पी डी एफ स्वरुपात असल्यास खरडवहीत संपरक साधावा) When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES विनायक पाचलग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

राग नका मानू...

विसुनाना
गुरुवार, 03/19/2009 - 13:02 नवीन
प्रिय विनायक कोल्लापुरीदादा, रामराम, अवं, राग नका मानू... आमच्यापरास वाईच न्हानगं हायसा म्हून लिवतो. पर, ह्यो संदीप खरे लै फोलपाट कवी हाय हो. तेला अजून 'जानीव'च न्हाई थितं 'नेनीव' कसली व्हनार हो? अवो, तुमी आमच्या कोल्लापुरातलं. तुमी तरी ह्ये समजायला पायजेल ह्वतं. तेच्या काय मागं लागतायसा? अवं, जरा कुसुमाग्रज,विंदा,मर्ढेकर, बोरकर , केशवसुत, आरती प्रभू, सुरेश भट असल्या लय भारीभारी कवींच्या कविता वाचा. सोत्ताला गीतकार म्हननार्‍या ' गदिमां'ची गानी वाचा की जरा. त्येवढं कशाला? कोल्लापुरात आप्लं जगदीश खेबुडकर हायती. तेंची पिंजरामधली गानी वाचा.तेंच्या बरुबर फोटू काढा. पघा, 'काटा किर्र' होतुया का नाय! कशापायी इक्ता गूळ काढतायसा संदीपचा? त्येलाबी जरा दमानं घिऊ द्या की. अवो, त्येच्यापरास ब्येस कविता लिवणारी मंडळी हित्तं हायती - नेटावर. जरा मराठी सायटींवरच्या कविता वाचा तर पयला! काय म्हंता? -विसुनाना
  • Log in or register to post comments

पहिल्याच

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 03/19/2009 - 13:47 नवीन
पहिल्याच शब्दात अडखळले, 'नेणीव' म्हणजे नक्की काय? अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

कवीच्या मते

विनायक पाचलग
गुरुवार, 03/19/2009 - 14:36 नवीन
जाणीवानंतराचे भावविश्व म्हणजे नेणीव When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES विनायक पाचलग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सामान्य अर्थ

धनंजय
गुरुवार, 03/19/2009 - 23:28 नवीन
नेणीव शब्दाचा सामान्य अर्थ "जाणिवेचा अभाव, अज्ञान" सामान्य प्रयोगात "जाणीव, जाणता" या शब्दांचा अर्थ स्तुत्य संदर्भात घेतला जातो. "नेणीव, नेणता" या शब्दांचा अर्थ निंद्य संदर्भात घेतला जातो. आता कवीने स्वतःच कार्यक्रमापुरता "जाणिवेपेक्षा उत्कट स्थिती" असा अर्थ सांगितला, तर कवितेत तोच अर्थ मानला पाहिजे. पण विरोधाभासासाठी मुद्दाम "नेणीव" शब्द कवीने वापरला, असे मानूनही कवितेचा अर्थ लागू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग

मी सांगतो :)

जृंभणश्वान
गुरुवार, 03/19/2009 - 23:07 नवीन
आपली जाणीव जेव्हा अपूर्ण आहे असे वाटते तेव्हा एक सणक येवून मन आपल्या हिणकस जाणीवेला उध्वस्त करण्यासाठी ओणवे करते पण तसे करताना नकळत मनच अनवाणी होते - ही उणीव लक्षात आल्यावर मानसगर्भ चिरकाल व्यापणारी संवेदना म्हणजे "नेणीव" होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे बापरे ...

छोटा डॉन
गुरुवार, 03/19/2009 - 23:12 नवीन
आई आई ग्ग्ग्गं ऽऽऽ एवढं अवघड आहे काय, आम्हाला तर धडकीच भरली ..!!! आयेशा टाकियाची शप्पथ सांगतो, असली अवघड "नेणीव" वगैरे होण्याला आम्हाला असे अजुन १० जन्म घ्यायला लागतील, फारच भयंकर प्रकरण म्हणावे हे. आमचं आपलं शिंपल असतं बॉ ... "प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं" बाकी विनायका, तुनळीवरच्या क्लिप्स पाहिल्या. छान आहे हो कार्यक्रम, तुझा अनुभवही तु छान मांडलास ... लेख आवडला ... ------ ( शिंपल ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जृंभणश्वान

अच्छा...

श्रावण मोडक
Fri, 03/20/2009 - 00:46 नवीन
"प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं" बरंबरं... कळलं!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

छान

क्रान्ति
गुरुवार, 03/19/2009 - 22:39 नवीन
छान कार्यक्रम आहे. सन्दीप खरेच्या कविता खरच छानच आहेत. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा