लेख

माई री मैं कासे कहूँ पीर अपने जिया की....

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
11 Mar 2018 - 2:04 pm

मैना, तू तो गां, मेरा नाही तो कमसे कम अपना ही दिल बहलाँ ….

प्राक्तनाच्या अदृष्य पिंजर्‍यात अडकलेली सलमा अतिशय आर्त स्वरात पौलादी पिंजर्‍यात बंदी असलेल्या मैनेला कळकळीने सांगते. आपण सुन्न झालेले असतो आणि त्यात वेदनेची परमावधी साधत लताबाईंचे प्रभावी सूर काळीज चिरत कानावर येतात.

न तड़पने की इजाजत है न फरियाद की है,
घुट के मर जाऊँ, ये मर्जी मेरे सैय्याद की है !

संगीतसाहित्यिकलेखविरंगुळा

कोल्हापूरचे छत्रपति राजाराम ह्यांचे फ्लॉरेन्स, इटली येथील स्मारक.

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in जनातलं, मनातलं
11 Mar 2018 - 5:42 am

कोल्हापूरचे छत्रपति राजाराम

इतिहासलेख

हा क्षण भाग ३

vishalingle25793's picture
vishalingle25793 in जनातलं, मनातलं
7 Mar 2018 - 10:05 pm

रूम मधून ओमिका आणि तिच्या मैत्रिणींचा हसण्याचा आवाज येत होता. .. तन्मयीने दार ठोठावलं. .. आदित्यची अस्वस्थता आता वाढत होती. .. तन्मयीची ही तीच गत. .. कुणीतरी दार उघडलं. .. इतक्या लग्नाच्या गोंधळात ही त्यांना आतून कड़ी काढल्याचा आवाज स्पष्ट ऐकू आला. .. तन्मयीने आत पाऊल टाकलं. .. तिच्या पाठोपाठ आदित्य ने ही रुममध्ये प्रवेश केला. .. समोर ओमिका. .. तिच्या मैत्रिणी तिच्या हातांवर मेहंदी रंगवत होत्या. .. आदित्य आणि तन्मयी ला समोर बघुन ओमिकाने मैत्रिणींना थांबायला सांगितलं आणि स्वतः त्यांची विचारपुस करायला सुरुवात केली. .. ओमिका च्या मैत्रिणी आधीपासूनच तन्मयी आणि आदित्याला ओळखत असाव्यात. ..

कथालेख

हा क्षण भाग २

vishalingle25793's picture
vishalingle25793 in जनातलं, मनातलं
7 Mar 2018 - 10:03 pm

मुंबई-पुणे हाईवे. .. कार ची स्पीड, ताशी ८० किमी. .. आदित्यच्या हातात स्टेरिंग. .. डाव्या बाजूला तन्मयी. .. हातात पार्सल. .. अचानक आदित्य ने ब्रेक मारला. .. समोरून येणारी एक दूसरी फोर व्हीलर अगदी जवळून निघुन गेली. .. आदित्य ने ब्रेक मारण्यास अगदी एका क्षणाचा ही विलंब केला असता तर मोठा अपघात झाला असता. .. दूसरी फोर व्हीलर तशीच समोर निघुन गेली. .. आदित्य आणि तन्मयीने एक वेळ त्या फोर व्हीलर कडे बघितलं. .. ती दूसरी फोर व्हीलर नजरेआड़ झाली आणि आदित्यने स्टेरिंग वर डोकं ठेवलं. .. डोळे घट्ट मिटले. ..

कथालेख

हा क्षण

vishalingle25793's picture
vishalingle25793 in जनातलं, मनातलं
7 Mar 2018 - 9:58 pm

सकाळी ५:०० चा अलार्म आज सुद्धा न चुकता वाजला. .. आदित्य ला उठायचा कंटाळा आला होता, तरी ही तो उठला. .. ऑफिस मध्ये लेट पोहोचणे आदित्य ओफोर्ड करू शकत नव्हता. .. तशी नोकरी त्याला हवी तशीच आणि इन-फैक्ट हव्या त्या कंपनीतच मिळाली होती. .. पण २४ तासांपैकी १२ तास सतत नॉन-स्टॉप काम करणं यामुळे त्याला स्वतःसाठी जगायला पण वेळ मिळत नव्हता. .. तन्मयी सोबत प्रत्यक्ष भेटीला आज जवळजवळ महीना झाला असेल. .. दोन वर्षाआधी आदित्यने "रेफ्लेक्शन्स" सॉफ्टवेयर कंपनी जॉइन केली आणि तेव्हापासून हे असंच चालतंय. .. तसं मगच्याच आठवड्यात आदित्यने तन्मयी ला त्याच्या अपार्टमेंट मध्येच शिफ्ट होण्यासाठी म्हंटलं होतं. ..

कथालेख

गावाचे नाव "सानपाडा" नव्हे "सॅन पाडा" होय

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
6 Mar 2018 - 11:27 am

(श्री. केदार यांनी चालवलेल्या "मिसळून मिसळ" या कायआप्पा गृपवर एक फोटो आला होता. त्यात सॅन San Francisco, San Diego त्याच प्रमाणे सान पाडा हे गाव देखील सॅन पाडा असू शकते या अर्थाचा मेसेज आला होता. त्यावर आम्ही अभ्यास करून एक लेख लिहीला तो येथे प्रसिद्ध करत आहोत.)

साधारणतः १६ व्या शतकात(१) आताची ठाणे खाडी परिसर, नवी मुंंबई आदी परिसर समुद्राच्या पाण्याने पुर्ण व्यापलेला होता. घनदाट खारपुटीचे, नारळी-फोफळीचे झाडे, जंगली श्वापदे तेथे होती. आताचा संजय गांधी नॅशनल फॉरेस्टचा परिसर लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला कल्पना येईल.

समाजजीवनमानप्रवासभूगोलराहती जागालेखमाहितीसंदर्भ

सरसगडची सुरस सहल

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
6 Mar 2018 - 10:24 am

सरसगडाच्या ९६ पायरी जिन्याच्या पायथ्याशी आम्ही अडलो होतो. छे! हा तर अवघड रॉक पॅच होता. हा काही आपल्याला जमणार नाही. चला परत. कारण पालीत राहणार्‍या एका अनुभवी माणसाने आम्हाला सांगितलेलेच होते की साठीच्या वरील लोकांसाठी सरसगड काही सोपा नाही. त्यांनी तर जाऊच नये तिथे.

जीवनमानप्रवासप्रकटनलेखअनुभव

लोकशाही झिंदाबाद

परशुराम सोंडगे's picture
परशुराम सोंडगे in जनातलं, मनातलं
6 Mar 2018 - 5:18 am

आता आताचं ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या.गाव गावचं पुढारी निवडण्यात अालं.या गाव पातळीवरच्या निवडणूकात भी भारी रंगत अाली.नात्या गोत्यात,पावण्या रावळयातचं फाईटी लागल्या.सख्या सासू सुना आमने सामने अाल्या.भावा भावातल्या दुश्मन्या टोकाला गेल्या.

कथालेख

*‘तो’ परत येईल...*

महामाया's picture
महामाया in जनातलं, मनातलं
5 Mar 2018 - 7:14 pm

हॉलीवुडच्या नायिकेचा आशावाद

नवरा कसाहि असला तरी त्याच्याच सोबत आपलं संपूर्ण आयुष्य काढण्याची भाषा करणारी बायको, फक्त भारतीय चित्रपटांमधेच नव्हे, तर हॉलीवुडच्या चित्रपटांमधे सुद्धा नायिकांनी रंगवली आहे. नवरा बाहेरच्या बाईच्या नादी लागला तरी त्याची सेवा करून त्याला वठणीवर आणण्याची भाषा देखील प्रसंगी नायिका करतांना दिसतात. नवरा किती ही वाईट असला तरी आपल्या चित्रपटांचा शेवट मात्र गोड होतो. हॉलीवुडचं वेगळेपण इथेच ठळकपणे नजरेत भरतं.

वावरलेख