प्रकटन

गुंतागुंत

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
6 Nov 2020 - 7:09 pm

"नमस्कार सर, गोखले बोलतोय."
बोला गोखले साहेब
"मला वाटले तुम्ही फोन कट करताय की काय"
ते का बरे?
"अहो माझ्या मुलाने तुमचा पाणउतारा केला होता म्हणून"
अहो कसला पाणउतारा ? त्याला माझे म्हणणे नाही पटले, चालतंय की, त्यात चूक काय? आणि मला कोब्रा दंशाची सवय आहे.
"त्याचे परिणाम भोगतो आहे की"
का? काय झाले?
"जेईई ला ११० मार्क"
चांगले आहेत की
"सर मस्करी करताय."
नाही हो, अजिबात नाही. मी तुम्हाला एक नंबर देतो. त्या वर मुलाला फोन करायला सांगा. माझा एक विद्यार्थी आहे अभय शाह. अमेरिकेत मास्टर्स करतोय. त्याला पण १०५ मार्क होते j

धोरणप्रकटन

मावळतीचा?

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
5 Nov 2020 - 6:31 pm

मावळतीचा सूर्य "ड"जीवनसत्व देतो का?
माहीत नाही.
............
तपासणीचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर सर्जन म्हणाले,
"तुमची anaesthetist ओळख कशी काय? चांगल्याच गप्पा मारत होता तुम्ही सर्जरी चालू असताना"
त्याचे असे आहे, त्यांची मुलगी माझी विद्यार्थिनी, दुसरे म्हणजे तुमच्या तोडफोड च्या आवाजाकडे लक्ष देऊन ब्लड प्रेशर वाढवून घेण्यात अर्थ नव्हता.
"ठीक. तो व्हेक्टर ताब्यात राहिल्याने सर्जरी सोपी झाली. तुमचे फेमर फ्रॅक्चर वाईट्ट होते. आता सर्व काम १ वर्षे बंद. एक वर्षानंतर फक्त कॉम्प्लेक्स मध्ये फिरायला हरकत नाही."

धोरणप्रकटन

चमन के फुल

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
31 Oct 2020 - 10:08 am

अति मधुर मधुर..

   -गाणी ऐकायची सवय  फार जुनी ।
एकोणीसशेसाठ ते सत्तर,चे दशकाच्या आसपासचा,पन्नास।साठ वर्षापूर्वी चा काळ । ।हा काळ ,हिंदी चित्रपटांचा
सांगितिक सुवर्णयुग मानले जाते।
त्या काळातअनेकसंगीतकार ,गायक,
गायिका  ,गीतकार यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने , गीत संगीताचे जे  अक्षर,अतुट.अतुलनीय,रेशमी ,मधुर ,मायाजाल विणले आहे,
त्याच्या बंधनामध्ये अजुनहीसंगीत प्रेमी गुंतलेले ,आहेत।बाहेर यायला तयार नाहीत।
  आपल्या आयुष्यातले अनेक  क्षण ,
त्या  अविस्मरणीय गाण्यांनी भारुन टाकलेे सुख दु:खाच्या प्रसंगात
सोबत केली ।

संगीतप्रकटन

अरविंद बाळ यांची अंनिसवरील अप्रकाशित प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
28 Oct 2020 - 6:24 pm

प्रास्ताविक - आमचे ज्येष्ठ मित्र श्री अरविंद बाळ यांचे दि.27 ऑक्टोबर 2020 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.आंतरजालावरील उपक्रम या संकेतस्थळाविषयी मी जेव्हा जालाबाहेरील लोकांशी चर्चा करत असतो त्यावेळी त्यांना मराठी संकेतस्थळाविषयी उत्सुकता तर असतेच पण येथील चर्चांविषयी एक आकर्षणही असत. श्री अरविंद बाळ यांचे लेखन हे जालाबाहेरील वर्तुळात असते. गप्पांमधुन ते भरभरुन बोलतात पण लिखाणाबाबत जरा उदासीनच. अरविंद बाळ हे B.E. (Civil) व्यवसायाने सिव्हिल इंजीनिअर . या क्षेत्रातील कंपन्यातून नोकरी व नोकरीनिमित्त भारतभर प्रवास. तीन वर्षे इराकमधे वास्तव्य. निवृत्ती सन 2000 घेतल्यावर पुण्यात कर्वेनगरला स्थायिक.

समाजप्रकटनविचारप्रतिसाद

रोमान्स विथ मुझिक

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
25 Oct 2020 - 11:05 pm

गाणं हा शांतता आणि ध्वनी यातला प्रणय आहे. शांतता ही स्त्री प्रकृती आहे आणि ध्वनी पुरुष आहे. तुम्ही जीवनात गाणं आणलंत तर हा रोमान्स अविरत चालू शकतो. आशा भोसले म्हणते की गाणं ही फक्त शब्दाचा ध्वनी करण्याची कला आहे. जनमानसात एक दृढ गैरसमज आहे की गाणं ही अवघड कला आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या आवजात गोडवा नाही. या लेखाचं प्रयोजन असं की कोणतंही शास्त्रीय संगीत किंवा गाण्याचं फॉर्मल ट्रेनिंग न घेता, तुम्ही सुद्धा सुरेख गाऊ शकता. तुमच्याकडे एकमेव गोष्ट हवी ती म्हणजे रोमँटीक मूड ! हा रोमँटीक मूड तुमच्या जीवनाचा सगळा रंगच बदलून टाकतो.

संगीतप्रकटन

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून (अंतिम भाग )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in जनातलं, मनातलं
25 Oct 2020 - 11:43 am
इतिहासप्रकटनलेखमाहितीसंदर्भ

प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
24 Oct 2020 - 10:54 am

प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका

आजच्या ऑनलाईन वर्तमानपत्रांत "नेमाडे-पठारेंसह 2 हजार मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले समर्थनाचे पत्र, (मंदीरे उघडण्याबाबतीत) श्रद्धांशी खेळणाऱ्या राजकारणावर घेतला आक्षेप" अशा अर्थाच्या बातम्या आलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे:

साहित्यिकसमाजजीवनमानराजकारणप्रकटनप्रतिसादप्रतिक्रियालेखबातमी

एक तरी गज़ल अनुभवावी # ०२

अमर विश्वास's picture
अमर विश्वास in जनातलं, मनातलं
22 Oct 2020 - 2:36 pm

गालिब - गुलज़ार - जगजितसिंग
या आधीचे भाग
एक तरी गज़ल अनुभवावी - प्रस्तावना
एक तरी गज़ल अनुभवावी # ०१

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
होगा कोई ऐसा भी कि 'ग़ालिब' को न जाने
शाइर तो वो अच्छा है पर बदनाम बहुत है

कविताप्रकटन

एक तरी गज़ल अनुभवावी # ०१

अमर विश्वास's picture
अमर विश्वास in जनातलं, मनातलं
21 Oct 2020 - 12:46 pm

या आधीचे भाग
एक तरी गज़ल अनुभवावी - प्रस्तावना
___________________________________________________________________________________________________________________________

हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन
दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है

इश्क़ ने 'ग़ालिब' निकम्मा कर दिया
वर्ना हम भी आदमी थे काम के

इश्क़ पर ज़ोर नहीं है ये वो आतिश 'ग़ालिब'
कि लगाए न लगे और बुझाए न बने

संगीतप्रकटन

Work with बाळ

शेर भाई's picture
शेर भाई in जनातलं, मनातलं
20 Oct 2020 - 6:29 pm

आजकाल बहुतेकजणांच Work from Home जोरात आहे. त्या वर गाजलेला कुकर शिट्टीचा विनोद आपल्या सगळ्यांना माहित आहेच. तुमच्या घरात जर बालमंडळी असतील तर बघायलाच नको. हि बालमंडळी आपल Work कधी, कुठे आणि कस वाढवून ठेवतील ते सांगायलाच नको. वानगी दाखल आमच्या बालाचे काही किस्से इथे नमूद करत आहे.

कथाप्रकटन