एक गंमतीशीर भयानक अनुभव
नमस्कार मंडळी!!
शीर्षक वाचुन गोंधळला असाल ना? मी ही तसाच गोंधळलो होतो म्हणुन आलेला अनुभव जसाच्या तसा मांडतोय.
नमस्कार मंडळी!!
शीर्षक वाचुन गोंधळला असाल ना? मी ही तसाच गोंधळलो होतो म्हणुन आलेला अनुभव जसाच्या तसा मांडतोय.
खूप दिवसांनी का असेना पण मी शेवटी ‘मी वसंतराव’ हा चित्रपट बघितला. थियटेरमधे बघणे झाले नाही पण Jio Cinema वर बघायला सुद्धा उशीरच झाला. उशीरा सिनेमा बघून त्यावर काही लिहिण्यात हा फायदा असतो की बऱ्याच मंडळींनी सिनेमा बघितला असतो त्यामुळे कथानक माहिती असते. अशा वेळेला काही लिहिणे म्हणजे चित्रपट बघितल्यानंतर दोन व्यक्तीनी केलेल्या गप्पा असतात तेंव्हा गप्पाच मारु या. चित्रपट तसाही चरित्रपट आहे त्यामुळे शेवटी काय होणार आहे हे माहिती असतेच फक्त हा प्रवास कसा उलगडत जातो तेच बघण्यात खरी मजा आहे. ती मजा चित्रपट बघितल्यानंतरच कळते, तेंव्हा चित्रपट नक्की बघा आता टिव्हीवर देखील येतोय.
यापुढे ओपनहायमर -नोलन हे नाव पुरे आहे सिनेमांच्या पुस्तकात सुवर्ण अक्षरांनी कोरण्यासाठी.
अमेरिकन प्रोमिथियस: द ट्रायम्फ अँड ट्रॅजेडी ऑफ जे. रॉबर्ट ओपेनहायमर हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचे चरित्र आहे.या पुस्तकावरून प्रेरणा घेत नोलनने एक जबरदस्त बायोपिक बनवला आहे.
स्वप्नं सगळ्यांनाच पडतात. भली,बुरी. मलाही पडतात. पण कशी? कर्मदशा! मला नेहमी स्वप्नं पडतात ती बस,ट्रेन चुकल्याची,गणित, इंग्रजी ते नापास झाल्याची (हो.
काल सैंधव मीठ विकणारा एक ट्रक पाहिला.त्यात गुलाबी रंगाचे मोठमोठाले खडक होते,हे मी पहिल्यांदाच पाहत होते.
सैंधव मीठ ज्याला
हिमालयीन मीठ-हिमालयाच्या पायथ्याशी सापडतं
सैंधा /सैंधव मीठ -सिंधू नदीच्या भागात सापडते
खेवडा/खैबुर/लाहिरी मीठ-पाकिस्तानमधील खेवडा प्रांतात याच्या खाणी आहेत.
गुलाबी मीठ-रंगाने गुलाबी आहे.
Rock salt-खनिज पदार्थापासून मिळवलं जातं.
नराधम
आज माझ्याकडे सोनोग्राफी साठी एक रुग्ण बाई आल्या होत्या. वय वर्षे ४२.
जीवन सार्थकी लावायचे म्हणजे पोहणे न शिकताच पुराने फुगलेली एखादी महानदी पार करणे. पुढे काय संघर्ष/सवलत वाट्याला येणार, याची कल्पना न देता आत्म्यांच्या सतत ढासळणाऱ्या कड्यावरून आपले जीव या प्रवाहात फेकले जातात. काहींना पहिलाच तडाखा एवढा जबरदस्त बसतो, की उपजत शारीरिक मर्यादांमुळे 'अपंग' म्हणून जन्माला आलेले हे जीव कसे जगणार याची 'समर्थ' जीवांना काळजी लागते. एकदा या जगण्याच्या लोंढ्यात माणूस गटांगळ्या खाऊ लागला, की मग प्रत्येकातले सुप्त अपंगत्व बाहेर येते. ज्यांना दुर्दैवाने एखादा अवयव/ज्ञानेंद्रिय नाही असे जीव त्यांच्या परीने जगण्याची कला शिकून जीवन लीलया सार्थकी लावतात.
महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून पांडुरंगाची सेवा सहज,बालपणापासून करता येते हे एक भाग्याचीच गोष्ट आहे. एकादशीची लगबग ,पहाटे उठून सगळ्यांनी दूरदर्शनवर विठ्ठल महापूजा भक्तीभावाने पाहणे.अशा अनेक आठवणी मांडता येतील.जाणतेपणा आल्यावर आषाढी वारी कुतुहलाने,अभ्यासाने,शिस्तबद्धता जाणण्यासाठी अनुभवण्याची आस लागतेच.संत साहित्याचा अभ्यास करणारे डॉ.सदानंद मोरे यांनी या विषयी अनेक प्रकारे जागरुकता सामान्यापुढे सोप्या भाषेत मांडला आहे आणि ते कायम यावर काम करत आहेत.अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतात.