नराधम

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
1 Jul 2023 - 8:50 pm

नराधम

आज माझ्याकडे सोनोग्राफी साठी एक रुग्ण बाई आल्या होत्या. वय वर्षे ४२.

त्यांची फाईल पहिली तर त्यात बऱ्याच गोष्टी तर्कास न पटणाऱ्या होत्या. त्यांना एक वर्षांपूर्वी गर्भाशयाच्या कर्करोगाची सुरुवात झालेली होती. पण आजतागायत गर्भाशय काढून टाकलेला नव्हता. प्रथितयश अशा स्त्रीरोग तज्ज्ञांनी गर्भाशय काढून टाकणे आवश्यक आहे असे एक वर्षांपूर्वी स्पष्ट लिहून दिलेले होते. अगोदर झालेल्या सोनोग्राफी प्रमाणे या बाईंच्या गर्भाशयात निदान सात आठ तरी फायब्रॉइड्स होते आणि गर्भाशयाच्या मधल्या भागास अडेनोमायोसिस म्हणूनआजार झालेला होता. तीन महिन्यापूर्वी पेट सिटी (PET CT) झालेला होता. त्यावेळेस हा कर्करोग गर्भाशयाच्या बाहेर पडलेला नव्हता.

या महाशयांनी कोणी एक डॉक्टर गाठला होता ज्याने हॉर्मोन थेरपी चालू केली होती ज्यामुळे त्या बाईंना गेले सहा महिने पाळी आली नव्हती.

मी त्यांची सोनोग्राफी करताना मी त्यांच्या यजमानांना विचारले अजून तुम्ही शल्यक्रिया का केलेली नाही? त्यावर त्यांनी मला सांगितले कि आम्ही तीन चार वेळेस वंध्यत्वासाठी आय व्ही एफ चे उपचार केले परंतु त्यात यश आले नाही म्हणून आम्ही या डॉक्टरांकडे जाऊन शल्यक्रियेच्या ऐवजी हॉर्मोन थेरपी चालू केली.

सोनोग्राफीमध्ये गर्भाशयाचे आतील आवरण बरेच वाढलेले दिसत होते याचा सरळ अर्थ असा होता कि हा कर्करोग त्या हॉर्मोन थेरपीला जुमानत नव्हता

मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले कि या हॉर्मोन थेरपीला कोणताही शास्त्राधार नाही. याने केवळ पाळी येणे बंद होईल गर्भाशयाचे आतले आवरण वाढणार नाही म्हणून कर्करोग थांबेल असा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.

मुळात आपल्या पत्नीच्या गर्भाशयात असलेल्या फायब्रॉइड्स आणि ऍडेनोमायोसीसमुळे त्यांना गर्भधारणा होण्याची शक्यता फारच कमी ( फारतर ५%) आहे. त्यातून तुम्ही हॉर्मोन थेरपी घेत आहेत त्याने स्त्रीबीज निर्मिती होत नाही मग गर्भधारणा कशी होणार? त्यातून अगदी गर्भधारणा झालीच तरी गर्भाशयाचा कर्करोग गरोदरपणाच्या हॉर्मोन्स मुळे वेगाने वाढून गर्भपात होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि या काळात हा कर्करोग गर्भाशयाच्या बाहेर पाडण्याचीशक्यत कितीतरी जास्त आहे.

असे असताना तुम्ही तुम्ही केवळ आपल्याला मूल हवे त्यांच्या जीवाशी खेळता आहात. "शल्यक्रिया करू नका" असे सांगणारा डॉक्टर शोधणे बंद करा आणि कोणत्याही अनुभवी स्त्रीरोगतज्ञाचा ताबडतोब सल्ला घ्या किंवा टाटा रुग्णालयात जाऊन दाखवा. नऊ वर्षे कर्करोग केंद्रात काम केल्याने मला थोडाफार अनुभव आहे यामुळेच मी तुम्हाला हा सल्ला देतो आहे. तुमच्या दृष्टीने सर्वात चांगला मार्ग म्हणजे अनुभवी स्त्रीरोगतज्ञाचा ताबडतोब सल्ला घ्या आणि ताबडतोब शल्यक्रिया करून घ्या आणि नंतर सरोगसी मार्गाने (तुमचा गर्भ दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात वाढवायचा उपाय) वंध्यत्वावर उपचार करा.

मी त्यांना स्वच्छ शब्दात सांगितले कि आपल्या पत्नीला गर्भधारणा होण्याची शक्यता फारशी नाही हे सांगताना मला अजिबात आनंद होत नाहीये. परंतु कुणी तरी हे वाईट काम करणे आवश्यक आहे आणि लष्करात गोल गोल बोलण्याचे आम्हाला शिकवलेले नाही. यामुळे जे आहे ते तोंडावर स्पष्ट सांगणे आवश्यक आहे. अशा बोलण्याने दोन चार रुग्ण गेले तरी मला फरक पडत नाही.

एवढ्यात या महाशयांना एक फोन आला म्हणून ते बाहेर गेले त्या वेळेत त्या बाईंनी सांगितले कि हा माणूस माझा शत्रू आहे. मला शल्यक्रिया करू देत नाहीये. जितक्या डॉक्टरांकडे गेलो तितक्यांनी मला ताबडतोब शल्यक्रिया करा असा सल्ला दिला आहे.

एवढ्यात ते यजमान परत आले. त्यावर त्या बाई गप्प झाल्या.

मी त्यांना हाच सल्ला परत एकदा कळकळीने दिला. त्यांना तो फारसा पटलेला दिसला नाही. पुढे काय होईल माहिती नाही.

अर्थात मी याच्यापेक्षा अधिक काहीही करू शकत नव्हतो. डॉक्टर्स डे च्या दिवशी माझी अगतिकता मला प्रकर्षाने जाणवत होती.

या बाई कोणत्या कारणाने या माणसाचे ऐकत होत्या आणि आपला जीव धोक्यात टाकत होत्या हे समजत नव्हते. त्यांची काहीतरी अगतिकता असावी असेच मला वाटते.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

फार वाईट वाटले. जिवाला धोका आहे हे कळत असून ही भलतीच बळजबरी...

कॉमी's picture

1 Jul 2023 - 9:06 pm | कॉमी

काय बोलावे.

पत्नीला जबरदस्तीने उपचार न घेउ देणे हा गुन्हा असावा...

हार्मोन थेरपी इत्यादी काम न करणारे उपाय जाणून बुजून पैश्यासाठी देत राहणारा डॉक्टर सुद्धा किती कोत्या मनाचा म्हणावा...

आंद्रे वडापाव's picture

2 Jul 2023 - 10:24 am | आंद्रे वडापाव

कटू आहे .. पण माझ्याही पाहण्यात अश्या सडलेल्या मानसिकतेचे पुरुष (पेशंट बरोबरील) पाहिलेत ...
हार्मोन थेरेपी देणारा डॉ हा खरंच आधुनिक वैद्यकीय शास्त्राचा पदवीधर असण्याची शक्यता कमी माझ्यामते ...

भारतात नावापुढे डॉ लावणारा हा फक्त एम बी बी एस / बिडीएस या एमसीए च्या मान्यताप्राप्त आधुनिक शास्त्रातील पदवीधर च लावू शकतो ...
बाकीच्यांना टाचणी सुद्धा टोचायला मनाई आहे ... इंजेक्शन तर लांब राहीले ..

धर्मराजमुटके's picture

1 Jul 2023 - 9:15 pm | धर्मराजमुटके

आपल्या समाजात स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून निर्णय घेण्यास अडचणी येतात कारण बालपणापासून झालेली जडणघडण.
शिवाय जास्त स्वतंत्र विचारांच्या स्त्रीला अतिशहाणी हे बिरुद मिरवावे लागते.
मी देखील जुन्याच जडणघडणीत वाढून घरातील स्त्रियांवर कळत नकळत अत्याचार केले असतील (मत स्वातंत्र्याच्या बाबतीत) पण आज स्वतःच्या चुका सुधारताना स्त्रियांची निर्णय प्रक्रियेतील जडणघडण सुधारणे खुप अवघड आहे असे जाणवते. त्यासाठी सतत प्रयत्न करतो आहे.
तुम्हाला अशा प्रवृत्तींना भेटण्याची / त्यांना उपदेश करण्याची संधी मिळते म्हणून आदर आणि कौतुक आहे पण त्याचवेळी तुम्हाला होणार्‍या मानसिक त्रासासाठी वाईट देखील वाटते पण एक वाचक म्हणून हळहळ व्यक्त करणे आणि आपल्या व्यक्तीगत विचारात सुधारणा करणे एवढे माझ्या हातात नक्की आहे.

(स्पष्टवक्तेपणा प्रथम दर्शनी वाईट वाटला तरी तो हितकर आहे याची जाणिव असणारा एक वाचक)

प्रसाद गोडबोले's picture

1 Jul 2023 - 10:42 pm | प्रसाद गोडबोले

हिंदु विवाह कायद्याने पुरुषांचे मानसिक खच्चिकरण केले नसते अन बहुपत्नीत्व बेकायदेशीर नसते तर सदरहु व्यक्तीने आधीच दुसरे लग्न करुन स्वतःची अपत्यप्राप्तीची इच्छा पुर्ण केली असती.

प्रत्येक गोष्ट काळी पांढरी अशी विभागता कशी येईल , प्रत्येकाला ग्रे शेड आहे, सगळ्यांचे पाय मातीचेच आहेत . किमान त्या स्त्रीने , आपल्याला शक्य नाही म्हणल्यावर पतीला दुसरे लग्न करण्याची परवानगी दिली असती आणि सुखनैव स्वतःचे ऑपरेशन करुन घेतले असते. शिवाय दुसर्‍या पत्नीकडुन झालेल्या स्त्रीचे अपत्यही प्रेमाणे , आईचा लळा लाऊन वाढवता आले असते.

कॉमी's picture

1 Jul 2023 - 11:11 pm | कॉमी

काहीही बकवास.

रंगीला रतन's picture

1 Jul 2023 - 11:41 pm | रंगीला रतन

+०१०७२०२३
अशे बिनडोक प्रतिसाद देण्यासाठी कुठ्ला क्रॅशकोर्स आहे का? किंवा कुठ्ला कडक माल मारायचा याची काही आयडीया :=)

आंद्रे वडापाव's picture

2 Jul 2023 - 10:18 pm | आंद्रे वडापाव

मी काय म्हणतो... हिंदुं पुरुषांना परवानगी घेवून दुसरे लग्न करण्याची मुभा मिळाल्याने, काहींच्या मते न्याय होणार असेल.
तर
तशीच सुधारणा स्त्रियांच्या बाबतीत व्हावी..
म्हणजे हिंदू स्त्रीला सुद्धा दुसरा, तिसरा.. नवरा करण्याची मुभा मिळावी.

प्रसाद गोडबोले's picture

3 Jul 2023 - 11:29 pm | प्रसाद गोडबोले

आंद्रे वडापाव,

एका वडापाव सोबत एक्स्ट्रापाव घेऊन , दोन पाव आरामात खाता येतात , पण एका पावात दोन वडे कोंबुन खायला गेले तर , नीट पकडताही येत नाही अन , तोंड डबल भाजते . तस्मात ते प्रॅक्टीकल नाही.
अर्थात ज्यांना खायचे ते खाऊ शकतातच , आमची हरकत नाही.

आंद्रे वडापाव's picture

4 Jul 2023 - 7:27 am | आंद्रे वडापाव

शक्य आहे..

पण ते वाड्याच्या आणि पावाच्या साईझ वर पण अवलंबून असेल...
कोणी एकच वडा २-४ पावाबरोबर पुरवून पुरवून खाईल...
कोणी एकाच पावत दोन वडे घुसडून डबल डेकर खाईल..

कोणी नुसते वडे वडे च खाईल..
कोणी नुसते पाव पाव चघळेल...

“एकांचं वड्यां सोंबत दोनं तिनं पावं चांलतील...
परंतु
एकांचं पावां सोंबत दोनं तिनं वडे न्नाहिं चांलतील...”

हे फुकटचे सल्ले कोणी देवू नये...
कारण को तो आपल्या पैश्याने वडापाव खाऊ शकतो.
कोणाच्या परवानगीची किंवा शिकवणुकी ची गरज लोकांना नाही..

पण, समाजामध्ये पावांची मालकी वड्यांकडे आहे हा मुद्दा तुम्ही विसरलात... त्यामुळे एका वड्याला आणखी पाव घ्यायचे असतील तर पावाची परमिशन लागेल. पण पावाला आणखी वडे हवे असतील तर वड्याने गप बसायचे...

समाज पावसत्ताक आहे भाऊ...

प्रसाद गोडबोले's picture

4 Jul 2023 - 9:35 pm | प्रसाद गोडबोले

तुम्हाला वाचता येत नाही का ?

हे फुकटचे सल्ले कोणी देवू नये

परत एकदा टाईपकरतो , मोठ्ठ्या फॉन्ट मध्ये , सविस्तर वेळ देऊन एकेक अक्षर , एकेक शब्द नीट वाचा , घाई गडबड करु नका , कोणीही पळुन चाललेलं नाहीये की धागा संपादित किंव्वा वाचनमात्र होण्याची चिन्हे नाहीयेत. शांतपणे समजाला लागेल तेवढा वेळ घ्या निवांत.

अर्थात ज्यांना खायचे ते खाऊ शकतातच , आमची हरकत नाही.

आणि हो, पुढच्या वेळेस एका पावात २-४ वडे कोंबुन खाताना फोटो काढा आणि नक्की टाकात इथे प्रतिसादात !

अर्थात ज्यांना खायचे ते खाऊ शकतातच , आमची हरकत नाही.

Trump's picture

2 Jul 2023 - 1:45 pm | Trump

हिंदु विवाह कायद्याने पुरुषांचे मानसिक खच्चिकरण केले नसते अन बहुपत्नीत्व बेकायदेशीर नसते तर सदरहु व्यक्तीने आधीच दुसरे लग्न करुन स्वतःची अपत्यप्राप्तीची इच्छा पुर्ण केली असती.

प्रत्येक गोष्ट काळी पांढरी अशी विभागता कशी येईल , प्रत्येकाला ग्रे शेड आहे, सगळ्यांचे पाय मातीचेच आहेत . किमान त्या स्त्रीने , आपल्याला शक्य नाही म्हणल्यावर पतीला दुसरे लग्न करण्याची परवानगी दिली असती आणि सुखनैव स्वतःचे ऑपरेशन करुन घेतले असते. शिवाय दुसर्‍या पत्नीकडुन झालेल्या स्त्रीचे अपत्यही प्रेमाणे , आईचा लळा लाऊन वाढवता आले असते.

श्री मार्कस ऑरेलियस यांच्या भावनांबरोबर सहमत आहे, हिंदुना राजरोसपणे, जर आधीची बायको सहमत नसेल तर दुसरे लग्न खुपच मुश्कील आहे.
श्री सुबोध खरे यांचे विचार वैद्यकीय दृष्टीकोनातुन आले आहेत आणि मुळ विषय समजुन न घेता लक्षणावर उपाय करण्याचा प्रयत्न केला आहे. माणसाला नुसतेच शरीर नसते त्याला मनही असते ह्याचा विचार केला नाही.
त्यांनी सदर स्त्रीने नवर्‍याला दुसरे लग्न करायला किंवा इतर पध्दतीने अपत्य जन्मास घालायला परवानगी दिली आहे का ह्यावर प्रकाश टाकावा. ती परवानगी न दिल्याने, जर अपत्य नसल्यामुळे त्या मनुष्याला होणार्‍या मानसिक त्रासांना/व्याधींना कोण जबाबदार ह्यावर विचार व्ह्यायला हवा.
परगर्भधारण (surrogacy) कायद्याची सरकारने चांगलीच वाट लावुन ठेवली आहे, सरकारी मुर्खपणा काय असतो त्याचे एक ढळढळीत उदाहरण आहे. परगर्भधारणा कायद्याच्या अटीत सर्वसामान्य माणसे बसणे आणि परवडणे अशक्य होऊन गेले आहे. त्या कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात खटले चालु आहेत.
काही संबधित बातम्या:

----
सदर मनुष्याने मुस्लीम होऊन दुसरे लग्न करणे भारतीय घटनेने दिलेला मार्ग अनुसरणे योग्य राहील. ते अयोग्य वाटत असल्यास निर्भिडपणे बाहेर प्रेमपप्रकरणे करुन अपत्ये जन्मास घालावीत.

सुबोध खरे's picture

3 Jul 2023 - 9:54 am | सुबोध खरे

@TRUMP

सदर मनुष्याने मुस्लीम होऊन दुसरे लग्न करणे भारतीय घटनेने दिलेला मार्ग अनुसरणे योग्य राहील. ते अयोग्य वाटत असल्यास निर्भिडपणे बाहेर प्रेमपप्रकरणे करुन अपत्ये जन्मास घालावीत.

अशीच परिस्थिती एखाद्या स्त्रीची असल्यास( किंवा नसली तरी) तिने निर्भिडपणे बाहेर प्रेमप्रकरणे करुन अपत्ये जन्मास घालावीत काय? म्हणजे मुलाला एक सोडून अनेक बाप मिळतील आणि मुलं श्रीमंत होऊन समाजाचे कोटकल्याण होईल

अशीच परिस्थिती एखाद्या स्त्रीची असल्यास( किंवा नसली तरी) तिने निर्भिडपणे बाहेर प्रेमप्रकरणे करुन अपत्ये जन्मास घालावीत काय? म्हणजे मुलाला एक सोडून अनेक बाप मिळतील आणि मुलं श्रीमंत होऊन समाजाचे कोटकल्याण होईल

वीर्यपेढी / नियोग कशासाठी असतो!!! स्त्रीला कमीत कमी ते पर्याय असतात.
तुमच्यासारख्या डॉक्टरकडुन असल्या बालिश प्रतिसादाची अपेक्षा नाही. तुम्ही अजुन मुळ प्रश्नाला उत्तर दिले नाही.

वीर्यपेढी / नियोग कशासाठी असतो!!! स्त्रीला कमीत कमी ते पर्याय असतात.

पर्याय खूप असतात हो. पेढीपर्यंत जायचीही गरज नाही. डॉ खरे बहुधा असा प्रश्न विचारत आहेत की हे समाजमान्य ठरेल का? पुरुषांना चालेल का? (ज्या सहजतेने बहुपत्निक समाजमान्य असण्याची मागणी होते त्या मानाने)

पर्याय खूप असतात हो. पेढीपर्यंत जायचीही गरज नाही. डॉ खरे बहुधा असा प्रश्न विचारत आहेत की हे समाजमान्य ठरेल का? पुरुषांना चालेल का? (ज्या सहजतेने बहुपत्निक समाजमान्य असण्याची मागणी होते त्या मानाने)

माझ्या माहितीने हा वीर्यपेढीचा पर्याय गोपनीय असतो. जोपर्यंत स्वतःहुन माहिती देत नाही, तोपर्यंत समाजात माहिती होत नाही. त्यामुळे समाजमान्यतेचा प्रश्न नाही. जर पुरुषाला अपत्य पाहिजे असेल आणि त्याला शारिरीकदृष्ट्या शक्य नसेल तर हेच सोयिस्कर पर्याय आहेत.
माझ्या माहितीत काही पुरुषांनी आधीच (बहुदा आधीच्या लग्नापासुन) मुल असलेल्या स्त्रीबरोबर लग्न केले आहे. तेवढा समजुतदारपणा काही पुरुषांनमध्ये नक्कीच असेल.

-
दुसरी बाजु.
अपत्यप्राप्तीसाठी बहुपत्निकपणा खरे तर प्रतिगामी पर्याय आहे. पण सरकारने इतर सगळ्या पर्यायांची वाट लावुन (त्रासदायक, न परवडणारे, जवळपास अशक्य, वेळखाऊ) टाकली आहे. बहुपत्नि / प्रेयसीशिवाय कोणता पर्याय शिल्लक आहे !!!

सुबोध खरे's picture

3 Jul 2023 - 12:10 pm | सुबोध खरे

वीर्यपेढी / नियोग कशासाठी असतो!!! स्त्रीला कमीत कमी ते पर्याय असतात.

"सरोगसी" हा पुरुषाला उपलब्ध असणारा पर्याय आहे हा मी त्या महाशयांना सुचवलेला आहेच.

तुमच्यासारख्या डॉक्टरकडुन असल्या बालिश प्रतिसादाची अपेक्षा नाही.

म्हणजे तुमच्या दृष्टीने पुरुषाने निर्भिडपणे बाहेर प्रेमप्रकरणे करणे आणि मुलांना जन्माला घालणे हा परिपक्वपणा (mature) आहे आणि तसे स्त्रीने करणे हा बालिश पर्याय आहे? कि मुसल्मान होणे हा परीपक्व पणा आहे?

बाकी वीर्यपेढी/ नियोग मध्ये मी स्वतः सात वर्षे काम केलेले आहे. त्यातील अनेक अनुभव मी मिपा वर लिहिलेले आहेतच. येथे आपली जाहिरात करण्यात मला रस नाही.

तुमचा मूळ प्रश्न नक्की काय आहे?

त्यांनी सदर स्त्रीने नवर्‍याला दुसरे लग्न करायला किंवा इतर पध्दतीने अपत्य जन्मास घालायला परवानगी दिली आहे का ह्यावर प्रकाश टाकावा हा जर असेल

तर एक वर्ष पूर्वी पर्यंत त्यांचे मूल होण्यासाठी सर्व प्रयत्न चालू होतेच.

पण बायकोने स्वतः ला कर्करोग झाल्यावर तिने नवऱ्याला दुसरे लग्न करावे म्हणून परवानगी द्यायला हवी होती? तिची शुश्रूषा नवऱ्याने करायची कि आणखी कुणी? आणि दुसऱ्या बायकोने आपले नवे नवतीचे दिवस सोडून काय म्हणून कर्करोग झालेल्या सवतीची शुश्रूषा करायची?

नवऱ्याला मन असतं मग बायकोला नसतं का? तिला कर्करोग झाला हा तिचाच दोष? हे काही दारू पिऊन लिव्हर खराब झालं किंवा सिग्रेटी पिऊन फुप्फुसाचा कर्कर्ग झाला असा नसतं.

कर्करोग झाला हे एक दुर्दैव, त्यातून असा नवरा मिळाला हे दुहेरी दुर्दैव यावर तुम्ही असे पर्याय सुचवता आहात?

धन्य आहे

म्हणजे तुमच्या दृष्टीने पुरुषाने निर्भिडपणे बाहेर प्रेमप्रकरणे करणे आणि मुलांना जन्माला घालणे हा परिपक्वपणा (mature) आहे आणि तसे स्त्रीने करणे हा बालिश पर्याय आहे? कि मुसल्मान होणे हा परीपक्व पणा आहे?

मग कोणते पर्याय पुरुषाला शिल्लक आहेत ??
परगर्भधारणा कायद्याची सरकारने वाट लावली आहे. दत्तक प्रकार मुश्कील आहे. हे दोन्ही मी वरती लिहीले आहे.

त्यांनी सदर स्त्रीने नवर्‍याला दुसरे लग्न करायला किंवा इतर पध्दतीने अपत्य जन्मास घालायला परवानगी दिली आहे का ह्यावर प्रकाश टाकावा हा जर असेल
तर एक वर्ष पूर्वी पर्यंत त्यांचे मूल होण्यासाठी सर्व प्रयत्न चालू होतेच.
पण बायकोने स्वतः ला कर्करोग झाल्यावर तिने नवऱ्याला दुसरे लग्न करावे म्हणून परवानगी द्यायला हवी होती? तिची शुश्रूषा नवऱ्याने करायची कि आणखी कुणी? आणि दुसऱ्या बायकोने आपले नवे नवतीचे दिवस सोडून काय म्हणून कर्करोग झालेल्या सवतीची शुश्रूषा करायची?
नवऱ्याला मन असतं मग बायकोला नसतं का? तिला कर्करोग झाला हा तिचाच दोष? हे काही दारू पिऊन लिव्हर खराब झालं किंवा सिग्रेटी पिऊन फुप्फुसाचा कर्कर्ग झाला असा नसतं.
कर्करोग झाला हे एक दुर्दैव, त्यातून असा नवरा मिळाला हे दुहेरी दुर्दैव यावर तुम्ही असे पर्याय सुचवता आहात?
धन्य आहे

तुम्ही खुपच एकांगी चित्र रेखाटता आहात. मी विचारलेल्या मुळ प्रश्नाला उत्तर न देता, तुम्हीच स्वतः प्रश्न विचारत आहात. जर तुम्हाला मुळ समस्येला हात न घालता लक्षणावरुन त्या पुरुषाला झोडण्यात रस असेल तर पुढे लिहीण्यात काहीच अर्थ नाही.
आयुष्यात चांगले आणि वाईट पर्याय यातुन एक पर्याय निवडायची वेळ खुप कमी वेळा येते. बहुदा सगळ्या पर्यांयामधुन कमीत कमी वाईट पर्याय निवडावा लागतो.

सुबोध खरे's picture

3 Jul 2023 - 1:00 pm | सुबोध खरे

आपला मूळ प्रश्न काय आहे ?

त्यांनी सदर स्त्रीने नवर्‍याला दुसरे लग्न करायला किंवा इतर पध्दतीने अपत्य जन्मास घालायला परवानगी दिली आहे का ह्यावर प्रकाश टाकावा.
https://www.misalpav.com/comment/1166280#comment-1166280

सुबोध खरे's picture

3 Jul 2023 - 6:26 pm | सुबोध खरे

तिला कर्करोग निदान होऊन एक वर्ष झालेले आहे. अशा काळात ती आपल्या नवऱ्याला दुसरे लग्न करण्यासाठी परवानगी देईल अशी शक्यताही माझ्या मनाला शिवलीं नाही. तेंव्हा तिने अशी परवानगी दिली नसावी असेच माझे गृहीतक आहे.

अर्थात कोणती स्त्री अशी परवानगी देईल. महान संत प्रवृत्ती असेल किंवा सर्व उपचार करूनही उपयोग न झाल्याने आता आपला शेवट जवळ आला आहे म्हणून निरुपायाने एखाद्या स्त्रीने अशी परवानगी कदाचित दिली असती.

दुसरया तर्हेने अपत्य जन्मासाठी मीच त्यांना गर्भाशय काढून टाका आणि नंतर सरोगसीच्या उपायाने मूल होण्यासाठी उपचार करा हे सुचवले आहे.

अर्थात आपल्याला मूल हवे म्हणून आपल्या धर्मपत्नीला उपलब्ध असणाऱ्या उपचारांपासून वंचित ठेऊन मृत्यूच्या दाढेत लोटणारा हा माणूस नराधमच आहे असे मात्र माझे स्पष्ट मत झाले.

माझा संशय खरा ठरला.
-
तुमच्याकडे माझ्यापेक्षा जास्त रुग्णमाहिती माहिती असेलच. जी माहिती तुम्ही दिली आहे, ती जर वेगळ्या पध्द्तीने मांडली तर अजुन वेगळा निष्कर्ष निघु शकतो. तुम्ही ज्या पध्दतीने माहिती मांडली आहे, ती खुपच एकांगी आणि केवळ लक्षणावर आधारीत आहे. माझ्या मते त्या जोडप्याला संपुर्ण समोपदेशानाची गरज आहे.

सुबोध खरे's picture

3 Jul 2023 - 7:01 pm | सुबोध खरे

तुम्ही ज्या पध्दतीने माहिती मांडली आहे, ती खुपच एकांगी आणि केवळ लक्षणावर आधारीत आहे

हो ना

त्या पत्नीला समुपदेशन करायला हवं होतं कि ते "सात जन्म" वगैरे काही नसतं तू खरं तर एक वर्षांपूर्वीच नवऱ्याला सोडून द्यायला हवं होतं.

म्हणजे त्याला मूल होण्यासाठी दुसरी बायको करता आली असती

आणि

अपत्य नसल्यामुळे त्या मनुष्याला होणार्‍या मानसिक त्रासांना/व्याधींच्या जबाबदारीतुन तू मुक्त झाली असतीस.

गांधीजींनी बलात्कार टाळण्यासाठी बायकांनी आपला श्वास अवरोधून आत्महत्या करायला हवी होतीस असे एका बलात्कार झालेल्या स्त्रीला सुचवले होते त्याची आठवण झाली.

सुबोध खरे's picture

3 Jul 2023 - 7:03 pm | सुबोध खरे

मला त्यांची संपूर्ण फाईल वाचून आणि ते माझ्याबरोबर जेवढा वेळ होते त्यावरूनच मी हा लेख लिहिलेला आहे.

त्यामुळे अर्थातच माझी संपूर्ण माहिती एकांगी आणि पूर्वग्रहदूषितच आहे हे मी मान्यच करून टाकतो.

म्हणजे पुढचे गैरसमज टळतील.

कानडाऊ योगेशु's picture

4 Jul 2023 - 9:26 am | कानडाऊ योगेशु

डॉक्टर साहेब थोडे अवांतर करतो.

गांधीजींनी बलात्कार टाळण्यासाठी बायकांनी आपला श्वास अवरोधून आत्महत्या करायला हवी होतीस असे एका बलात्कार झालेल्या स्त्रीला सुचवले होते त्याची आठवण झाली.

ह्यात काहीही तथ्य नाही. असा प्रसंग घडलेला नाही. कोण्या एका गांधीविरोधकाने एका मुलाखतीत जर कुणी शांतिदूत हिंदू स्त्रीवर अत्याचार करत असेल तर तिने काय करावे असा प्रश्न गांधींजीना विचारला तर ते असे अमुक अमुक उत्तर देतील असे सांगताना वरील विधान केले होते. हा प्रकार "पानी मे से बिजली निकालोगे तो किसानोके लिये बचेगा का?" अशोक गेहलोत ह्यांची जी एडिटेड क्लिप फिरत होती त्यासारखाच प्रकार आहे.
बाकी मी गांधीवादी ही नाही व गांधी विरोधक ही नाही.

प्रदीप's picture

2 Jul 2023 - 2:23 pm | प्रदीप

किमान त्या स्त्रीने , आपल्याला शक्य नाही म्हणल्यावर पतीला दुसरे लग्न करण्याची परवानगी दिली असती आणि सुखनैव स्वतःचे ऑपरेशन करुन घेतले असते.

त्या दाम्पत्यास एखादे मूल दत्तक घेता येते. स्वतःचे मूल असण्यासाठी, पुरुषाने अथवा स्त्रीने, दुसरे लग्न करण्याची आवश्यकता काय आहे?

मी रहतो तेथे अनेक भारतीय, व विशेष्तः मराठी कुटुंबे आहेत, ज्यांनी मूल दत्तक घेतले आहे. (ह्याची वैयक्तिक कारणे वेगवेगळी असू शकतील). आणी ही मुले ह्या सार्‍यांनी, भारताबाहेर राहून, भारतांतील- विशेषतः महाराष्ट्रांतील अनाथालयांतून दत्तक घेतलेली आहेत. हा तपशील नमूद करण्याचे कारण इतकेच की, असे दुरून करतांना त्यांना काही कष्ट घ्यावे लागले. तरीही त्यांनी ते केले.

त्या दाम्पत्यास एखादे मूल दत्तक घेता येते. स्वतःचे मूल असण्यासाठी, पुरुषाने अथवा स्त्रीने, दुसरे लग्न करण्याची आवश्यकता काय आहे?

दत्तक घेणे हे तितके सोपे नाही. वेळा भरपुर लागतो आणि पैसेही खर्च होतात. दत्तक मुलाला अनुवांशिक आजार असु शकतात. काही लोकांना स्वत:च्या रक्ताचे मुल हवे असते.

अजुन एक भारतीय कायद्यातील रत्न सापडले.

4. Can I Adopt a Child If I Already have a Child?
Yes, you can. However, under the Hindu Adoption and Maintenance Act, you can only adopt a child of the opposite gender your child. The Guardians and Wards Act and the Juvenile Justice Act, do not have any such diktats. If the child you will be adopting is old enough to express his views on the matter, his opinion will be taken in writing.
https://parenting.firstcry.com/articles/a-complete-guide-to-child-adopti...

सुबोध खरे's picture

3 Jul 2023 - 9:59 am | सुबोध खरे

@Trump
दत्तक घेणे हे तितके सोपे नाही. वेळा भरपुर लागतो आणि पैसेही खर्च होतात. काही लोकांना स्वत:च्या रक्ताचे मुल हवे असते.

हि गोष्ट मान्य आहे.

दत्तक घेण्याची प्रक्रिया इतकी किचकट आणि कटकटीची केलेली आहे कि सामान्य माणसाला नको वाटावे.

माझ्याकडे अशी दोन जोडपी आली होती कि दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत इतका विलंब झाला कि तोवर त्यांना वंध्यत्वावर उपचार (आय व्ही एफ) करून स्वतःचे मूल झाले.

आणि दत्तक मूल आणि रक्ताचे मूल यात जमीन अस्मानाचा फरक आहे एवढेच मी म्हणेन.

मुक्त विहारि's picture

2 Jul 2023 - 4:28 pm | मुक्त विहारि

अशा परिस्थित, दुसरे लग्न करणे, हा पण एक पर्याय होऊ शकतो...

आणि

असे लग्न झाले पण आहे ...

https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/two-twin-sisters-marr...

-------

कुणाला प्रतिसाद द्यायचा आणि कुणाला नाही? हे ठरवण्याचा माझा हक्क आहे ....

इथे पती आपल्या हुशारीने पत्नीवर बळजबरी करत आहे. एकपत्नी असो वा बहुपत्नी हि गोष्ट चुकीची आहे.

माझ्या दूरच्या ओळखीच्या एका जैन परिवारांत अशीच गोष्ट घडली. पत्नीला सरळ ३ मुली झाल्या. पतीला पुत्र पाहिजे होता पण पत्नीच्या गर्भाशयांत शक्ती नव्हती. शेवटी पत्नीने पतीला पाहिजेच तर दुसऱ्या स्त्री कडून अपत्य प्राप्त करून घ्या असा सल्ला दिला. नक्की करार काय होता ठाऊक नाही पण सरोगसी नव्हते. शेवटी एक तरुण मुलगी पैश्यांच्या आशेने आली, गरोदर सुद्धा राहिली. पण मूल जन्माला आले ते अत्यंत रिटार्डेड. पहिली पत्नी मुलाचा सांभाळ करण्यास तयार नाही. दुसरीला पैसे पाहिजेत पण आपले मूळ असे तिच्या हातांत पूर्णतः सुपूर्द करण्यास पतीला वाईट वाटते अशी बरीच क्लिष्टता निर्माण झाली आहे.

अपत्य प्राप्ती आणि त्यातल्या त्यांत पुत्र रत्न प्राप्ती हा भारतीय लग्नव्यवस्थेचा महत्वाचा घटक आहे असे किमान बाहेरून तरी दिसते पण एकूणच कायदे व्यवस्था विनाकारण क्लिष्ट करून ठेवली आहे. कोणाला किती पत्नी आणि किती पती असावेत ह्यावर कायदे असावेत असे मला वाटत नाही. पण समाज असल्या गोष्टी साठी अजून तयार नाही. त्यामुळे किमान अपत्य प्राप्ती दृष्टिकोनातून इतर पुरुष किंवा स्त्री कडून अपत्य प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ असली पाहिजे.

अपत्य दत्तक व्यवस्था किती क्लिष्ट आहे ह्यावर आधीच एका मिपाकरांनी तळपायाची आग मस्तकाला जावी अश्या प्रकारचा लेख लिहिला होता. लेखकाचे नाव आठवत नाही पण लेखक टाटा मोटर्स मध्ये कामाला होते असे आठवणीत आहे.

मोदी सरकारने एक गोष्ट चांगली केली ती म्हणजे राष्ट्रीय स्तरावरची दत्तक CARA संस्था आणि २०२२ मधील नवीन नियम. ह्या मुले प्रक्रिया बरीच सुकर झाली असे असे दत्तक मार्गावर चालणाऱ्या एका मैत्रिणीने सांगितले. पण अजून तिला मूल काही मिळाले नाही.

सुबोध खरे's picture

3 Jul 2023 - 9:51 am | सुबोध खरे

@ मार्कस ऑरेलियस

सदरहु व्यक्तीने आधीच दुसरे लग्न करुन स्वतःची अपत्यप्राप्तीची इच्छा पुर्ण केली असती.

पुरुष जर नपुंसक असेल किंवा वीर्यात शुक्राणू कमी असतील/ अशक्त असतील ( ज्यामुळे त्या पुरुषाला मूल होणे शक्य नाही) तर त्या स्त्रीने त्या नवऱ्यासह राहून दुसरे लग्न करावे का? हे समाजाला कितपत मान्य होईल?

किमान त्या स्त्रीने , आपल्याला शक्य नाही म्हणल्यावर पतीला दुसरे लग्न करण्याची परवानगी दिली असती आणि सुखनैव स्वतःचे ऑपरेशन करुन घेतले असते. शिवाय दुसर्‍या पत्नीकडुन झालेल्या स्त्रीचे अपत्यही प्रेमाणे , आईचा लळा लाऊन वाढवता आले असते.

अशीच परवानगी एखादा पुरुष आपल्या बायकोला देईल का? आणि असे दोन बाप असलेले मूल दुहेरी उत्पन्न मिळाल्यामुळे श्रीमंत होईल आणि समाजाची भरभराट होईल असे आपल्याला वाटते का?

जोवर समाजाची मनोवृत्ती इतकी प्रगल्भ होत नाही तोवर सद्यस्थिती वाईट नाही असेच म्हणावे लागेल.

अर्थात याला स्वातंत्र्य म्हणावे कि स्वैराचार हा एक वादग्रस्त मुद्दा राहतोच.

मुक्त विहारि's picture

3 Jul 2023 - 10:40 am | मुक्त विहारि

बहु पतीत्व आणि बहु पत्नीत्व, ही गोष्ट होतीच

आज देखील, काही जमातीत, बहू पतीत्वाची चाल आहेच

https://hpgeneralstudies.com/what-is-polyandry-himachal-pradesh-general-...

प्रसाद गोडबोले's picture

3 Jul 2023 - 11:21 pm | प्रसाद गोडबोले

पुरुष जर नपुंसक असेल किंवा वीर्यात शुक्राणू कमी असतील/ अशक्त असतील ( ज्यामुळे त्या पुरुषाला मूल होणे शक्य नाही) तर त्या स्त्रीने त्या नवऱ्यासह राहून दुसरे लग्न करावे का? हे समाजाला कितपत मान्य होईल?

>>> स्त्री आणि पुरुष मुळातच समान नसतात. ते समान असतात असे विनाकारण आपल्या पिढीवर ठसवल्याने आपण गोंधळ करुन घेतला आहे .
आपण वर लिहिलेल्या परिस्थिती मध्ये मी त्या स्त्रीला ४ ऑप्शन्स देईन >
१. पतीच्या परवानगनीने , स्पर्मबँकेतुन स्पर्म वापरुन अपत्य जन्माला घालावे
२. पतीच्या परवानगीने , पतीला योग्य वाटत असेल त्या व्यक्तीचे स्पर्म वापरुन अपत्याला जन्म देणे. ( ह्याला पुर्वी नियोग असे म्हणत, आजच्या काळात अ‍ॅक्चुअल सेक्स करायची गरज नाही, नुसते स्पर्म वापरुन कार्यभाग साधता येईल.)
३. पती वरील पैकी कोणतीच परवानगी देत नसल्यास, पती नपुंसक आहे ह्या कारणाने घटस्फोट घ्यावा व दुसरे लग्न करुन अपत्य जन्माला घालावे. (नपुंसकता आणि अपत्य जन्माला घालण्यातील असमर्थता हे मानसिक क्रौर्य च असल्याने न्यायालय अगदी सहज घटस्फोट मान्य करेल. अर्थात त्या घटस्फोटात पतीला लुबाळुन देशोधडीला लाऊ नये इतकी माफक अपेक्षा आहे.)
४. पतीची परवानगी असेल तर दुसरे लग्न करायलाही हरकत नाही . पण हा डेंजरस ऑप्शन आहे कारण पती शारिरिक दृष्ट्या जरी नपुंसक असला तरी मानसिक दृष्ट्या नक्कीच नसतो, त्यामुळे बायकोवरील अन विशेष्तः पोरावरील हक्काच्या नादात एकामेकाचे मुडदे पाडण्याचा संभव जास्त आहे , तस्मात सख्खे भाऊ वगैरे असतील तरच हा पर्याय वापरावा.

अशीच परवानगी एखादा पुरुष आपल्या बायकोला देईल का? आणि असे दोन बाप असलेले मूल दुहेरी उत्पन्न मिळाल्यामुळे श्रीमंत होईल आणि समाजाची भरभराट होईल असे आपल्याला वाटते का?

लग्न ही अतिषय किचकट व्यवस्था आहे. पण जशी आहे त्या व्यवस्थेत पुरुष हा मालक आणि स्त्री ही सह्हाय्यक ह्या भुमीकेत आहे. शेतकरी आणि शेतजमीन असे नाते असते तसे काहीसे. एका जमीनीत पिक येत नाही म्हणुन एखाद्या शेतकर्‍याने दुसरी जमीन विकत घेऊन त्यात पिक घेता येईल , पण हेच एखाद्या शेतकर्‍याला शेती नीट करता येत नसल्याने दुसर्‍या कोणीतरी त्याच्या शेतात येऊन पिक घेऊन दाखवावे म्हणले तर त्यात मालकी हक्काचा वाद निर्माण होणारच ! आणि वादावादीने कोणत्याही समजाची भरभराट होत नाही.

समाजाची भरभराट हाच उद्देश असल्यास कमाल शेतजमीन धारणा कायदा रद्द करावा , ज्याला उत्तम शेती करता येते , सांभाळता येते , उत्तम पिक घेतायेते , वाढवता येते त्यांन्ना वाट्टेल तितकी शेतजमीन घेण्याची परवानगी द्यावी.

आजच्या स्त्रीमुक्तीच्या जमान्यात बायकांना वरील शब्दरचना आक्षेपार्ह वाटेल पण कायदा आणि समाजव्यवस्था तशीच आहे. आहे हे असं आहे . अजुन पुढे जाऊन म्हणतो कि आज काल तर जमाना इतका बदलला आहे की २५ लाखाची नोकरी असलेल्या एकपत्नीव्रती नवर्‍यापेक्षा , एक करोड उत्पन्न असलेला पण " बायको व्यतिरिक्त अजुन ३ बायका ठेवणार" असे म्हणणार्‍या पोराला पोरी जास्त पसंती देतील. ! ही वस्तुस्थीती आहे .

अर्थात याला स्वातंत्र्य म्हणावे कि स्वैराचार हा एक वादग्रस्त मुद्दा राहतोच.

कोण काय म्हणतो ह्याने आपल्याला का फरक पडावा ? मला जे माझ्या लॉजिकने योग्य वाटले ते मी लिहिले. तुम्हाला जे योग्य वाटले त्या नुसार तुम्ही सल्ला दिलात. आणि त्या कपल ला शेवटी जे वाटेल ते त्यांच्या विचाराने करतील.

पण कॅन्सर होऊन हाल हाल होऊन निपुत्रिक मरण्यापेक्षा , पतीला दुसर्‍या लग्नाची किंव्वा अन्य स्त्रीकडुन अपत्य जन्माला घालायची परवानगी देणे , अन स्वतःचे ऑपरेशन करुन उर्वरीत आयुष्य निरागस गोड बाळाला खेळवत घालवणे हा माझ्यालेखी खुप लॉजिकल आणि सुखाचा पर्याय आहे !

सुबोध खरे's picture

4 Jul 2023 - 9:51 am | सुबोध खरे

१. पतीच्या परवानगनीने , स्पर्मबँकेतुन स्पर्म वापरुन अपत्य जन्माला घालावे

२. पतीच्या परवानगीने , पतीला योग्य वाटत असेल त्या व्यक्तीचे स्पर्म वापरुन अपत्याला जन्म देणे. ( ह्याला पुर्वी नियोग असे म्हणत, आजच्या काळात अ‍ॅक्चुअल सेक्स करायची गरज नाही, नुसते स्पर्म वापरुन कार्यभाग साधता येईल.)

या दोन्ही बाबतीत मी स्वतः काम केलेले आहे आणि ते किती कठीण आहे याची मला पूर्ण कल्पना आहे.

शुक्राणू रहित वीर्य असणे( azoospermia) आणि नपुंसक( impotency) या दोन गोष्टी मुळात वेगळ्या आहेत.

वीर्यामध्ये शुक्राणू नसले तरी माणूस समाधानकारक संभोग करू शकतो परंतु त्याला उपचारांशिवाय स्वतःचे मूल होणे अशक्य

मुळात आपण नपुंसक आहोत हेच कितीतरी पुरुष मान्य करत नाहीत त्यामुळे त्यावर उपाय करणे कठीण जाते. नपुंसकतेच्या अनेक प्रकार आहेत ज्यात शुक्राणू सहित वीर्य असूनही संभोग न करू शकणे पासून मुळात पुरुषी संप्रेरकाचा अभाव असणे सारखे असंख्य प्रकार असतात ( टेस्टोस्टिरॉन नसणे, टेस्टोस्टिरॉनला शरीर प्रतिसाद न देणे सारखे) या खोलात मी जात नाही.

परंतु आपण बायकोला मूल देऊ शकत नाही हे समाजाला समजूच नये याचा अनेक जण आटोकाट प्रयत्न करतात त्यात बायकोला बाहेरख्याली ठरवून मारहाण करणे आणि हाकलून देणे सारखे प्रकार होतात. (मूठ झाकलेलीच राहावी म्हणून)

जे सम्भोग करू शकतात पण शुक्राणूरहित वीर्य असते त्यांना दुसऱ्या पुरुषाचे वीर्य आपल्या बायकोच्या शरीरात सोडणे हा प्रकार व्यभिचार वाटत राहतो.
अशांचे समुपदेशन करावे लागते. लष्करात माणसे आपल्या गावापासून वेगळी राहत असल्याने त्यांना समजावणे सोपे असते. त्यांना सांगता येते कि तुम्हाला मूळ झाले नाही तर गावचे लोकांना सत्य समजून येईन यापेक्षा वीर्यदान करून घेऊन तुमची बायको गरोदर झाली तर हे मूल तुमचे नाही हे कोणालाहि समजणार नाही. मग तुम्ही नपुंसक असा किंवा शुक्राणूंचा अभाव. हा उपाय बहुतेक लोक निरुपायाने स्वीकारत असत.

बायकांना तर स्वच्छ माहिती असे कि नवरा तर आपल्याला मूल देऊ शकत नाही. मग विर्यदात्याच्या वीर्याने झाले तरी मूल आपलेच असणार आहे. शिवाय आपण वांझ नाही हे सिद्ध करणे सहज सोपे असते. याशिवाय लग्नाचा नवरा सोडून जायची गरज नाही. सर्व काही झाकलेलेच राहते.

३. पती वरील पैकी कोणतीच परवानगी देत नसल्यास, पती नपुंसक आहे ह्या कारणाने घटस्फोट घ्यावा व दुसरे लग्न करुन अपत्य जन्माला घालावे. (नपुंसकता आणि अपत्य जन्माला घालण्यातील असमर्थता हे मानसिक क्रौर्य च असल्याने न्यायालय अगदी सहज घटस्फोट मान्य करेल. अर्थात त्या घटस्फोटात पतीला लुबाळुन देशोधडीला लाऊ नये इतकी माफक अपेक्षा आहे.)

सुबोध खरे's picture

4 Jul 2023 - 10:00 am | सुबोध खरे

. पती वरील पैकी कोणतीच परवानगी देत नसल्यास, पती नपुंसक आहे ह्या कारणाने घटस्फोट घ्यावा व दुसरे लग्न करुन अपत्य जन्माला घालावे.

हे जितके सहज आपण टंकले आहे तितकेच ते अवघड आहे.

नवरा नपुंसक आहे हे सिद्ध करणे जवळ जवळ अशक्य असते. त्यातून कोणताही माणूस असे सहजासहजी मान्य करणार नाही. आणि एकदा न्यायालयात खटला गेला कि आपण नपुंसक नसून बायकोच व्यभिचारी आहे आणि तिचे बाहेर संबंध आहेत म्हणून तिला घटस्फोट हवा आहे असे अत्यंत लांच्छनास्पद आरोप तिच्यावर भर न्यायालयात होतात.

त्यातून शुक्राणूरहित वीर्य असले तर घटस्फोट मिळत नाही कारण न्यायालय साधारणपणे वीर्यदान हा पर्याय वापरायला सांगते. खटला हरण्याची स्थिती येते तेंव्हा नवरे ते मान्य करतात परंतु प्रत्यक्ष वीर्य दान करण्याच्या वेळेस बायकोला साफ विरोध करतात. यानंतर बायकोला परत न्यायालयाचा दरवाजा ठोठवायला लागतो. त्यात नवरा मला क्रूरपणे वागवतो म्हणून आरोप प्रत्यारोप होतात यावर परत केवळ मला मूल होत नाही म्हणून ती माझ्यावर क्रूरपणाचा आरोप करते आहे असा बचाव केला जातो. यात इतकी वर्षे आणि अमाप पैसे वाया जातो एवढा पैसे ती स्त्री स्वतः मिळवत असेल तर ठीक आहे

परंतु किती बाप/ भाऊ आपल्या मुलीला/ बहिणीला असा आधार देतात हे आपण कधी पहिले आहे का? नसती ब्याद गळ्यात कशाला म्हणून ते आपल्या मुलीला "जमवून घे" असाच सल्ला देताना दिसतात.

कागदोपत्री आपले उपाय अत्यन्त साधे सोपे वाटतात. पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती पासून फार दूर आहेत

सुबोध खरे's picture

4 Jul 2023 - 10:06 am | सुबोध खरे

. पतीची परवानगी असेल तर दुसरे लग्न करायलाही हरकत नाही

याला कोणता कायदा परवानगी देतो?

उगाच काहींच्या काही

पण कॅन्सर होऊन हाल हाल होऊन निपुत्रिक मरण्यापेक्षा , पतीला दुसर्‍या लग्नाची किंव्वा अन्य स्त्रीकडुन अपत्य जन्माला घालायची परवानगी देणे , अन स्वतःचे ऑपरेशन करुन उर्वरीत आयुष्य निरागस गोड बाळाला खेळवत घालवणे हा माझ्यालेखी खुप लॉजिकल आणि सुखाचा पर्याय आहे !

मुळात तुम्हाला या विषयाची सखोल माहितीच नाही. मी लिहिलेल्या स्त्रीचा कर्करोग एक वर्षांपूर्वी निदान झालेलें असताना केवळ गर्भाशय काढून टाकून संपूर्ण बरा होण्यातला होता. यानंतर सरोगसी उपायाने तिला (आणि त्या नवऱ्याला) स्वतःच्या रक्तामासांचे मूल होणे शक्य होते. एक वर्षानंतर आता तो रोग किती पसरला आहे हे आता मला सांगता येणार नाही. पण जर पसरला नसेल तर अजूनही हाच उपाय वापरता येईल यासाठीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या मी त्यांना सांगितले.

ते सोडून हे महाशय भलताच उपाय करत आहेत ज्यामुळे या स्त्रीला संपूर्ण रोगमुक्त होण्याची शक्यता दिवसेंदिवस मावळत चालली आहे हे आपल्याला लक्षात येत नाही का?

प्रसाद गोडबोले's picture

4 Jul 2023 - 9:49 pm | प्रसाद गोडबोले

याला कोणता कायदा परवानगी देतो? उगाच काहींच्या काही

हेच मी माझ्या पहिल्या प्रतिसादात म्हणालो होतो, की कायद्याने गोची करुन ठेवली आहे. तुम्हाला नराधम म्हणायचे असेल तर ज्यांन्नी कायदा केला अन लोकांवर ही आणली त्यांना म्हणा .

पतीला अपत्य हवेच असेल तर पत्नीने घटस्फोट देऊन पतीला दुसर्‍या लग्नाची अनुमती देणे अन स्वतःवर योग्य ते उपचार करुन जीव वाचवुन घेणे हाच एकमेव प्रॅक्टिकल उपाय आहे.

बाकी इतके पुरे.
आपल्या वैद्यकीय ज्ञानावद्दल आदर आहे पण त्या पुरुषाला "नराधम " म्हणणे हे काही पटले नाही. अपत्यप्राप्ती ही निसर्गसुलभ इच्छा आहे, आणि कायदा दुसर्‍या लग्नाची परवानगी देत नाही म्हणुन तो माणुस आगतिक आहे बस्स इतकेच मला जाणवले !

कॉलिंग नराधम .... धिज इज जस्ट टू मच प्रीजुडाईस!
यु मस्ट बी अ व्हेरी गूड डॉक्टर बट यु आर सर्टनली नॉट अ गूड जज !

इत्यलम.

पतीला अपत्य हवेच असेल तर पत्नीने घटस्फोट देऊन पतीला दुसर्‍या लग्नाची अनुमती देणे अन स्वतःवर योग्य ते उपचार करुन जीव वाचवुन घेणे हाच एकमेव प्रॅक्टिकल उपाय आहे.

हाही उपाय चुकीचा आहे. हिंदु विवाह कायद्यानुसार पुढील प्रकारे घटस्फोट मिळवु शकतो.

1.Grounds for Divorce under the Hindu Marriage Act, 1955
The following are the grounds for divorce in India mentioned under the Hindu Marriage Act, 1955.
Adultery – The act of indulging in any kind of sexual relationship including intercourse outside marriage is termed adultery. Adultery is counted as a criminal offense and substantial proof are required to establish it. An amendment to the law in 1976 states that one single act of adultery is enough for the petitioner to get a divorce.
Cruelty – A spouse can file a divorce case when he/she is subjected to any kind of mental and physical injury that causes danger to life, limb and health. The intangible acts of cruelty through mental torture are not judged upon one single act but series of incidents. Certain instances like the food being denied, continuous ill-treatment and abuses to acquire dowry, perverse sexual act etc are included under cruelty.
Desertion – If one of the spouses voluntarily abandons his/her partner for at least a period of two years, the abandoned spouse can file a divorce case on the ground of desertion.
Conversion – In case either of the two converts himself/herself into another religion, the other spouse may file a divorce case based on this ground.
Mental Disorder – Mental disorder can become a ground for filing a divorce if the spouse of the petitioner suffers from incurable mental disorder and insanity and therefore cannot be expected from the couple to stay together.
Leprosy – In case of a ‘virulent and incurable’ form of leprosy, a petition can be filed by the other spouse based on this ground.
Venereal Disease – If one of the spouses is suffering from a serious disease that is easily communicable, a divorce can be filed by the other spouse. Sexually transmitted diseases like AIDS are accounted to be venereal diseases.
Renunciation – A spouse is entitled to file for a divorce if the other renounces all worldly affairs by embracing a religious order.
Not Heard Alive – If a person is not seen or heard alive by those who are expected to be ‘naturally heard’ of the person for a continuous period of seven years, the person is presumed to be dead. The other spouse should need to file a divorce if he/she is interested in remarriage.
No Resumption of Co-habitation – It becomes a ground for divorce if the couple fails to resume their co-habitation after the court has passed a decree of separation.
https://timesofindia.indiatimes.com/readersblog/lawpedia/grounds-for-div...

ह्यात मुल हवे म्हणुन घटस्फोट मिळत नाही. जरी परस्पर संमतीने घटस्फोट हवा असेल तरी त्याला एक ते तीन वर्षे लागु शकतात. त्या बायकोने नडण्याचे ठरवले तर त्या पुरुषाचे बारा वाजतील आणि किती वेळ लागेल, खर्च किती होईल ते सांगता येत नाही. येथे तीला कर्करोग झाला आहे म्हणजे पुर्ण सहानुभुती तिला जाणार. आई/बाप होण्यासाठी एक ठराविक वय असते, ते उलटुन गेले की कितीही उपाय केली तरी उपयोगी पडत नाहीत. स्त्रीहट्ट आणि बालहट्ट यापुढे कोणाचे काय चालते!!

सुबोध खरे's picture

5 Jul 2023 - 11:47 am | सुबोध खरे

अपत्यप्राप्ती ही निसर्गसुलभ इच्छा आहे, आणि कायदा दुसर्‍या लग्नाची परवानगी देत नाही म्हणुन तो माणुस आगतिक आहे बस्स इतकेच मला जाणवले !

हे दोन मुद्दे वेग वेगळे आहेत.

किती तरी बायकांना मूल होत नाही म्हणून नवऱ्याने त्यांना सोडूनच द्यायला पाहिजे का?

किंवा एखादा पुरुष नपुसंक असेल तर बायकोने बाहेरख्यालीपणा करून गर्भधारणा करून घ्यायला हवी का?

अगदी इथपर्यंतहि मान्य केले तरी

काहीही करून नवऱ्याला मूल हवेच ही त्याची इच्छा मान्य आहे परंतु त्यासाठी बायकोचा जीव धोक्यात घालणे हे काही पटले नाही.

याचे कारण हा कर्करोग आहे हे चाचण्यातून स्पष्टपणे सिद्ध झालेले आहे या शिवाय अनेक डॉक्टरांनी त्याला लवकरात लवकर गर्भाशय काढून टाका अन्यथा तिच्या जीवाला धोका आहे असाच सल्ला दिलेला आहे असे असताना हा मनुष्य ते उपचार करायला तयार नाही.

सद्य स्थितीत आपल्या पत्नीला गर्भधारणा होणे माझ्या ज्ञानाप्रमाणे जवळ जवळ अशक्य आहे हे मी त्याला स्पष्टपणे सांगितले आणि उपचार न केल्यास तिच्या जीवाला धोका आहे हे हि स्पष्टपणे सांगितले तरीही त्याची बायकोवर उपचार करुन घेण्याची तयारी दिसली नाही.

कदाचित त्याची विचारसरणी अशीही असेल कि आपण केलेल्या अक्षम्य दिरंगाई मुले बायको मरेल. त्यानंतर आपण दुसरे लग्न करायला मोकळे होऊ. (हा केवळ एक तर्क आहे. असा कोणताही संवाद किंवा तसा संदेश नवऱ्याकडून मला दिसला नाही).

परंतु ज्या बायकोला जन्मभर सुखात आणि दुःखात साथ देऊ हि वचने देऊन लग्न केल्यावर दुर्धर रोग झाल्यावर बायकोच्या उपचारात अक्षम्य दिरंगाई करणे हे केवळ अत्यंत नीच वृत्तीचे लक्षण आहे त्यामुळे मला तो माणूस नराधमच वाटतो.

मग इतर कुणाला काहीही वाटो

आपल्याला मी पूर्वग्रहदूषित वाटलो तर तसे समजण्याचा आपला अधिकार आहे.

प्रसाद गोडबोले's picture

6 Jul 2023 - 12:53 am | प्रसाद गोडबोले

काहीही करून नवऱ्याला मूल हवेच ही त्याची इच्छा मान्य आहे परंतु त्यासाठी बायकोचा जीव धोक्यात घालणे हे काही पटले नाही.

करेक्ट !

मी फक्त इतकेच म्हणत आहे की त्या बिचार्‍या बायकोचा जीव धोक्यात घालणारा तिचा नवरा नसुन कायदा आहे !

तुमच्या लेखी व्यक्ती नराधम आहे आणि माझ्या लेखी त्या व्यक्तीला त्या परिस्थितित पाडणारा कायदा नीच नराधम आहे !

बस्स इतकेच.

रात्रीचे चांदणे's picture

7 Jul 2023 - 8:00 pm | रात्रीचे चांदणे

मी फक्त इतकेच म्हणत आहे की त्या बिचार्‍या बायकोचा जीव धोक्यात घालणारा तिचा नवरा नसुन कायदा आहे !
नवऱ्याची काही जबाबदारी आहे की नाही बायकोबद्दल? मूल पाहिजे म्हणून बायकोचा जीव जाणूनबुजून धोक्यात घालणारा नवरा नराधम च आहे.

सुबोध खरे's picture

7 Jul 2023 - 8:16 pm | सुबोध खरे

जाऊ द्या हो.

त्यांची ठाम धारणा अशीच आहे कि बायकोच्या जिवापेक्षा नवर्याच्या भावना महत्त्वाच्या आहेत. ती धारणा काही बदलणार नाही

मुक्त विहारि's picture

8 Jul 2023 - 8:30 pm | मुक्त विहारि

षंढ नवरा असेल तर,

बायकोने दुसरा नवरा करायला हवा, ही नैसर्गिक मानसिकता आहे

मग, बायको जर आई होऊ शकत नसेल तर, पतीने दुसरे लग्न का करू नये?

एकाच नाण्याला बघून, कधीच निर्णय घेऊ नये

Every coins has an infinite sides ...

ताजा कलम ...

कृपया, सुबोध खरे यांनी, हा प्रतिसाद वैयक्तिक घेऊ नये ...

प्रसाद गोडबोले's picture

8 Jul 2023 - 9:58 pm | प्रसाद गोडबोले

त्यांची ठाम धारणा अशीच आहे कि बायकोच्या जिवापेक्षा नवर्याच्या भावना महत्त्वाच्या आहेत.

अहो कोण भावना ? भावना बिवना गेली खड्ड्यात . मी इतकेच म्हणत आहे पहिल्यापासुन की बहुपत्नीत्व बेकायदेशीर नसते तर कदाचित ही वेळ त्या नवर्‍यावर आलीच नसती, त्यामुळे नवर्‍याला दोष न देता , कायद्याला दोष द्यायला पाहिजे.

तुम्हीच नसते फाटे फोडत आहात. मग बहुपतीत्वाचे काय , बाहेरुन अपत्यप्रापती केलीच पाहिजे का , बायकोचा जीव की नवर्‍याची भावना वगैरे बाष्कळपणा.

बाकी लहानपणी शाळेत एक विधान ऐकलेले -

मिल्ट्री मधील लोकांना सारखं सावधान विश्राम करायला लावतात , एका तालात चालायला , पाय आपटायाला , वळायाला , स्लॅल्युट ठोकायला लावतात , त्यामुळे काही अंशी का होईना पण स्वतंत्रपणे विचार करण्याच्या , काहीतरी नवीन विचार करण्याच्या , विविध पैलुतुन गोष्टी पाहण्याच्या, कोणतीही सॄजनात्मक गोष्ट करण्याच्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्टॅस क्वो ला आव्हान देऊन काहीतरी बदल सुचवण्याच्या त्यांच्या क्षमतेते घट होतेच. ते काही नवीन , चौकटीबाहेरचा विचार करुच शकत नाहीत . रादर विचार केला तर जीव जाण्याची भिती असते. आहे हे असे नीट फोलो करणे ह्यावर त्यांचे जीवन अवलंबुन असते.
तस्मात जॉर्ज वॉशिंग्टन सारखे काही अत्युच मोजके अफवाद वगळता जगात कोणत्याही मिल्ट्री लीडर ने "फॉर गूड" दुनियेच्या भल्यासाठी असा बदल केलेला आहे अशी उदाहरणे दाखवता येणार नाहीत !

श्यॅ काहीही म्हणुन तेव्हा फाट्यावर मारलेले ते विधान आता एकदम सत्य वाटायला लागले.

तुम्ही साधा दुसरा विचार विचार म्हणुन ही करुन पहायला तयार नाही, ५ मिनिट डोळे मिटुन शांतपणे विचार करुन पहा - बहुभार्या पध्दती असती तर त्या नवर्‍यावर ही वेळच आली नसती. हा अतिषय साधा तर्कशुध्द , तात्विक विचार आहेत . त्यात काहीही विचित्र नाही, हजारो वर्षे ही परंपरा भारतात होती , आजही सुप्तपणे आहेच. हीच उघडपणे न्याय्य असती तर त्या बाईचे आयुष्य खुप सोप्पे झाले असते बस्स इतकेच .

अर्थात तुम्हाला पाय आपटुन, कायद्याला , संविधानाला सॅल्यूट ठोकायचे असल्यास ठोका, आमची त्याला ना नाही . पण दुसरे काही वेगळा विचार करतात , करु शकतात , त्यात उगाच भावना बिवना घुसडु नका .

रात्रीचे चांदणे's picture

8 Jul 2023 - 10:13 pm | रात्रीचे चांदणे

बर त्या नवऱ्याने अत्ता सध्याला काय करायला पाहिजे?
१डॉक्टरांचा सल्ल्याने गर्भाशय काढून, तात्पुरते तरी संतती सुखा पासून दूर जायला पाहिजे?
२ बायकोचा जिव धोक्यात घालून बाळ होऊन द्यायला पाहिजे
३ कायदा बदलन्यासाठी सरकारवर दबाव म्हणून उपोषण किंवा कोर्टात वगेरे जायला पाहिजे.
का एखादा चाकोरी बाहेरचा विचार तुमच्या मनात आहे?

प्रसाद गोडबोले's picture

8 Jul 2023 - 11:12 pm | प्रसाद गोडबोले

बर त्या नवऱ्याने अत्ता सध्याला काय करायला पाहिजे?

अतिषय सहज उत्तर आहे . आपण विनाकारण हुच्चशिक्षित असल्याने आपल्याला सुधरत नाही , कोणत्याही अडाणी माणसाला विचारले तर तो फटक्यात उत्तर देईल !
नवर्‍याने बायकोला अतिषय शांतपणे सांगायला हवे की
" हे पहा , तुझा विकार विकोपाला चालला आहे, त्यावर अत्ताच ताबडतोब औषधोपचार केले नाहीत तर तुझा जीव धोक्यात येईल. पण तुला हेही ठाऊक आहे की मला अपत्यप्राप्तीची किती तीव्र इच्छा आहे. त्यामुळे आपण कायदेशीर दृष्ट्या सहसंमतीने घटस्फोट ऊयात जो कि अगदी सहजपणे मिळुन जाईल , त्यानंतर तुझ्या औषधोपचारांचा आणि योगक्षेमाचा खर्च मी तुला कायदेशीर पोटगी म्हणुन देईनच.
मी स्वतः दुसरे लग्न करुन अपत्यप्रप्तीचे सुख मिळवु शकेन. ह्यातच दोघांचे भले आहे. "

इतका सहज सोप्पा उपाय आहे हा . खुद्द तुकाराम महाराजांना पहिल्या पत्नीपासुन अपत्य प्राप्ती होत नव्हती म्हणुन त्यांनी दुसरा विवाह केला होता च ना!
तस्मात ह्यात काही अनैतिक , अन्याय्य, अधार्मिक पाप वगैरे काही नाही.

रात्रीचे चांदणे's picture

8 Jul 2023 - 11:51 pm | रात्रीचे चांदणे

आपल्या विचारा वरून तरी आपणच अती झालेले हूच्च शिक्षित वाटत आहात. तुम्ही सांगितलेल्या उपायानुसर बायकोचा जीव नक्की जाईल आस वाटतय.
त्यानंतर तुझ्या औषधोपचारांचा आणि योगक्षेमाचा खर्च मी तुला कायदेशीर पोटगी म्हणुन देईनच.
वरती ट्रम्प यांनी म्हंटल्याप्रमाणे संमतीने घटस्फोट घ्यायचा म्हणल तरी १-३ वर्षे जाईल. Avarage २ वर्षे जरी पकडले तरी ह्या २ वर्षात कॅन्सर वाढत जाईल. त्यानंतर त्या बाईच्या वाचण्याची शक्यता किती हे डॉक्टरच सांगतील.
पहिल्या बायकोला कॅन्सर झाला म्हणून तिला सोडून देऊन दुसर लगीन करतोय आस सांगितल्यावर त्याला मुलगी एखादा अती हूच्च शिक्षित्तच देईल.

प्रसाद गोडबोले's picture

9 Jul 2023 - 2:04 am | प्रसाद गोडबोले

संमतीने घटस्फोट घ्यायचा म्हणल तरी १-३ वर्षे जाईल.

हेच तर मी पहिल्या प्रतिसादापासुन स्पष्ट पणे सांगत आहे ! जर कायद्याने बहुपत्नीत्व निशिध्द केले नसते तर त्या माणासावर ही वेळच आली नसती, त्याच्यावर ही वेळ आलीये याला सर्वस्वी कायदाच जबाबदार आहे! नाहीतर त्याला आधीच लग्न करता आले असते.

आता आहे ह्या कायद्याच्या चौकटीत राहुन , बायकोचा जीव जाऊ नये अन पुरुषाला अपत्यप्राप्ती व्हावी ह्या तीन्ही अटी पाळायच्या म्हणल्यावर कोठेतरी काहीतरी हातातुन निसटणारच ! त्याला नाईलाज आहे.

बाकी "....मुलगी देईल " हा वाक्प्रचार आवडला ! =)))) तुम्ही कोणत्या काळात जगत आहात ? पैसेवाला माणुस असेल तर पोरी टपाटप उड्यामारत लग्नाला तयार होतील. जमाना बदलला फार . पाहण्यात एक विवाहित व्यक्ती आहे ३८-४० वर्षाची त्याला २३ वर्षाची गर्लफ्रेंड आहे जस्ट कॉलेज पास ऑउट ! Last time when I checked, they were just waiting for her to get married so that they can make a baby !

पापभीरु , लॉ-अबायडींग , सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांच्या लुलुलुलु बामणी नैतिकतेच्या डबक्याबाहेर डोकाऊन पहा , दुनिया फार मोठ्ठी आणि रोचक आहे.
:)

सुबोध खरे's picture

10 Jul 2023 - 9:58 am | सुबोध खरे

आपल्या विविक्षित विचारसरणीबद्दल आपल्याला शुभेच्छा

संमतीने घटस्फोट घ्यायचा म्हणल तरी १-३ वर्षे जाईल. Avarage २ वर्षे जरी पकडले तरी ह्या २ वर्षात कॅन्सर वाढत जाईल. त्यानंतर त्या बाईच्या वाचण्याची शक्यता किती हे डॉक्टरच सांगतील.

पण घटस्फोट होईपर्यंत उपचार करायचे नाहीत असे थोडीच आहे.
पतीने एकीकडे घटस्फोटाची प्रक्रिया सुरु करावी व दुसरीकडे पत्नीवरचे उपचार सुरु करावेत. बहुपत्नीत्वाची गरज आहे असे वाटत नाही. आणि बहुपत्नित्वास कायदा हा एकमेव अडथळा आहे असे नाही , तर आता ही पद्धत समाजातून (निदान सुशिक्षित समाजातून तरी) बहुतांशी हद्दपार झालीये. त्यामुळे कायद्याचा अडसर थोडा बाजूला ठेवला तरी कोणती स्त्री सहजपणे या माणसाची दुसरी पत्नी (पहिलीला घटस्फोट दिलेला नसताना ) होण्यास तयार होईल असे वाटत नाही. बहुपत्नीत्वाला आता सामाजिक मान्यता फारशी नाही त्यामुळे समाजात त्या माणसाची प्रतिष्ठा कमी होईल

रंगीला रतन's picture

1 Jul 2023 - 11:34 pm | रंगीला रतन

निःशब्द.. कठीण आहे!

कंजूस's picture

2 Jul 2023 - 2:43 am | कंजूस

याबरोबरच उघड न झालेले किस्सेही असणारच वैद्यकीय सेवेत.
खरं म्हणजे अपप्रचार आणि अपप्रवृत्ती वाढण्यामागे दोन्हींकडे दोष आहेत. वैद्यकीय सेवा ही दुकानदारी होऊ लागली आहे. माझ्याकडे जो माल आहे तोच योग्य आहे सांगून खपवणे वृत्ती.
त्याचबरोबर रुग्णही आपल्या मनातलेच उपचार करा म्हणून आग्रह धरतात. "सुई लावा डॉक्टर" एक काळ असा होता की जेनरल प्रॅक्टिश्नर उर्फ फॅमिली डॉक्टर "काही औषध नको जा आणि आराम कर" सांगून हाकलायचे. पण आता पैसे खुळखुळायला लागल्याने रुग्णही सेकंड ओपिनियनच्या नावाखाली दुसरीकडे जातात. मग तिथे अपेक्षित योग्य उपचार दिले जातात.

सुबोध खरे's picture

3 Jul 2023 - 6:52 pm | सुबोध खरे

वैद्यकीय सेवा ही दुकानदारी होऊ लागली आहे.

आपल्याला हवा तो माल न देणाऱ्या डॉक्टरच्या दुकानात कोणी जाऊ इच्छित नाही.

केवळ खोटे मेडिकल सर्टिफिकेट देत नाहीं म्हणून माझे स्वतःचे वर्गमित्र माझ्या पत्नीकडे येत नाहीत हे गेली २० वर्षे मी पाहतो आहे.

मुलुंडला एका सार्वजनिक समारंभात भाषण देताना एका वरिष्ठ नागरिकाने आजकाल डॉक्टरी हा व्यवसाय नसून धंदा झालेला आहे असे उद्गार काढल्यावर मी भर सभेत बोललो होतो कि या सभेतील ९० % लोकांनी आयुष्यात कधी ना कधी खोटे मेडिकल सर्टिफिकेट घेतलेले आहे.
यानंतर सभेत चिडीचूप शांतता होती.

२५ वर्षे आमच्याकडे येणारे रुग्णांना आम्ही असे सर्टिफिकेट देत नाही म्हणून सांगणे बहुसंख्य फॅमिली डॉक्टरांना शक्य नसते हे मी कित्येक जुन्या फॅमिली डॉक्टरांकडून ऐकलेले आहे.

डेथ सर्टिफिकेटची अवस्था तर याहून वाईट आहे. कुणाकुणाचे संदर्भ घेऊन लोक आमच्याकडे "मृत्यूचे प्रमाणपत्र" मागायला येत असतात.

भावाच्या वर्गात अकरावी बारावीत असलेला (१९८०-८१), वडिल काम करत असलेल्या समाजसेवी संस्थेत कधी तरी काम केलेले गृहस्थ, माझ्या कडे कामाला असलेल्या (१० वर्षांपूर्वी सोडून गेलेल्या) स्वागत सहायिकेचे शेजारी अशी अनेक उदाहरणे देता येतील.

(अर्थात यात बहुसंख्य माणसांना काहीही गैर वाटत नाही- आमचा प्रिय माणूस गेला आहे आणि तुम्ही साधं सर्टिफिकेट देऊ शकत नाही?) ट्राय तर करून पाहू.

एका भावाच्या मित्राने तर मी अमुक तमुक डॉक्टरांकडे बोललो आहे पण त्यांनी नाही दिलं तर तू देशील का? अशी फिल्डिंग पण लावलेली मी पहिली आहे

आम्हाला कोव्हीड झालेला असताना आम्हाला साधा फोन करण्याची तसदी आमच्या सोसायटीतील कुणीही घेतली नव्हती पण एक महाभाग त्यांची आई गावाहून आली आणि दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी रात्री तिचे देहावसान झाले तर रात्री बारा वाजता आमचा दरवाजा ठोठावून मेडिकल सर्टिफिकेट द्या असे सांगताना कोणतीही लाज बाळगत नाहीत.

आम्ही त्यांचे फॅमिली डॉक्टर नाही त्यांनी आम्हाला एकदाही विचारले नाही पण त्यांच्या सोयीसाठी जिला काळी का गोरी पहिली नाही अशा त्यांच्या आईसाठी आम्ही मात्र सर्टिफिकेट मात्र द्यायला हवे होते.

ते न दिल्याने त्यांनी आमची बदनामी मात्र केली.

मी आता उघडपणे म्हणतो समाजाची जी लायकी आहे त्याप्रमाणेच त्यांना डॉक्टर मिळणार आहेत

आंद्रे वडापाव's picture

4 Jul 2023 - 7:13 am | आंद्रे वडापाव

मी आता उघडपणे म्हणतो समाजाची जी लायकी आहे त्याप्रमाणेच त्यांना डॉक्टर मिळणार आहेत

अती तीव्र सहमत.

एवढेच नाही, मी तर म्हणेन...
समाजाची जी लायकी आहे त्याप्रमाणेच त्यांना डॉक्टर / पंतप्रधान/ मुख्यमंत्री/ उप मुखयमंत्री / रोल मॉ डे ल मिळणार आहेत..

चौकस२१२'s picture

6 Jul 2023 - 6:15 am | चौकस२१२

सहमत

मी आता उघडपणे म्हणतो समाजाची जी लायकी आहे त्याप्रमाणेच त्यांना डॉक्टर मिळणार आहेत

प्रत्येक समाजात भलेबुरे लोक असतात. मी स्वतः भोळ्या भाबड्या लोकांना खोटे सांगणारे/लुबाडणारे, पावत्या न देणारे, जुबबी प्रशिक्षणावर परिचारीकांना इंजेंक्षण द्यायला लावणारे, करोनामध्ये सरकारी अनुदाने लाटणारे, वेगवेगळे प्रयोग करणारे, जरी स्वस्तातील औषधे उपलब्ध असली तरी मुद्दाम महागडी औषधे लिहुन देणारे डॉक्टर बघितले आहेत.
तसेच वक्तशीरपणा पाळणारे, गुणवत्तेवर भर असणारे, व्यक्तिगत/कौटुंबिक संबध ठेवणारे (म्हणजे विवाह, समाजकार्य, धर्मकार्य इ. यात एकत्र येणारे), स्वतःहुन पावती देणारे डॉक्टर बघितले आहेत.
अजुनतरी भारतीय समाज डॉक्टराकडे एक आदर्श, वेळेवर धावुन येणारा, एकप्रकारचा देवमाणुस म्हणुन बघतो आहे, पण त्याचे प्रमाण कमी होत चालले आहे.

इपित्तर इतिहासकार's picture

2 Jul 2023 - 7:35 am | इपित्तर इतिहासकार

डॉक्टर PC PNDT वगैरे संबंधी गर्भलिंग चाचणी वगैरे मागणी करणाऱ्या रुग्णांना जसे रिपोर्ट करून कारवाई करविण्याचा मार्ग डॉक्टर्सना असतो तसा इथे हवा होता.

आमच्या गावात आम्ही गैरलष्करी पण विलक्षण स्पष्टवक्ते डॉक्टर्स बघुन आहोत, त्यांची अन् तुमची तात्विक बैठक सेम दिसली, इतका इथिकल ट्रॉमा रोज झेलायचा ते पण रुग्णांच्या कडून हे एक दिव्यच होय.

सहसा असे स्पष्टवक्ते डॉक्टर लष्करी सेवेतून निवृत्त किंवा जुन्या आमदानीतले FRCS वगैरे झालेले विलक्षण बुद्धिमान म्हातारे डॉक्टर्स दिसतात (माझे मर्यादित निरीक्षण) हल्लीच्या डॉक्टर्स कडे गेले की त्यांना पहिले तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या फीज आठवत असतील लांब लांब लिहितात फक्त ही टेस्ट करा ती टेस्ट करा अमुक फोटो काढा तमुक स्कॅन करा... इत्यादी.

या बाई कोणत्या कारणाने या माणसाचे ऐकत होत्या आणि आपला जीव धोक्यात टाकत होत्या हे समजत नव्हते. त्यांची काहीतरी अगतिकता असावी असेच मला वाटते.

आर्थिक कारण? अवलंबित्व? ही शस्त्रक्रिया अगदी कमी पैशात होऊ शकत असेल का? आणि तशी जाऊन स्वतः करून घेतली तरी पुढील खर्च?

हे एक प्रमुख कारण असू शकते. इन फॅक्ट पुन्हा एकदा विचार करता, यजमानांच्या पुढेही जेनुईनली ही समस्या असू शकते. (हार्मोन थेरपी अधिक महाग असल्यास माहीत नाही)

सुबोध खरे's picture

3 Jul 2023 - 10:05 am | सुबोध खरे

नाही.

आर्थिक कारण असावे असे वाटत नाही.

ज्याअर्थी त्या जोडप्याने आय व्ही एफ उपचार करून घेतले ज्याला दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो त्याअर्थी त्यांची शल्यक्रियेसाठी ६०-७०००० रुपये खर्च करण्याची ऐपत नाही असे वाटत नाही.

आणि अगदी तसे असले तरी टाटा किंवा के इ एम रुग्णालयात हि शल्यक्रिया फुकट होते आणि त्याला फारतर एक महिना लागला असता. एक वर्ष नक्कीच नाही.

शिवाय दर तीन महिन्याला झोलाडेक्स चे इंजेक्शन ते घेत आहेत जे २७ हजार रुपये आहे त्याहिशेबाने आर्थिक कारण असण्याची शक्यता नगण्य आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jul 2023 - 9:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनुभव वाचतांना वाईट वाटलं. स्पष्ट दिलेला सल्ला आवड़लाच.
डॉ. साहेब, डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

"डॉक्टर्स डे च्या दिवशी माझी अगतिकता मला प्रकर्षाने जाणवत होती."

मी डॉक्टर नाही, पण गेल्या दोन वर्षांत चार कर्करोगग्रस्तांच्या केसेस पाहिल्या असल्याने हि अगतिकता नक्कीच समजू शकतो.

केस क्र. १
दोन वर्षांपूर्वी एका जवळच्या मित्राच्या बायकोला प्राथमिक अवस्थेतील स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले. B.tech पर्यंत शिक्षण घेतलेली हि स्त्री डॉक्टरांनी दिलेला शल्यक्रियेचा (एक स्तन काढून टाकणे आणि खबरदारीचा उपाय म्हणून नंतर तीन सौम्य केमो घेण्याचा) सल्ला मानण्यास अजिबात तयार नव्हती. (तुम्ही दिलेल्या उदाहरणाच्या अगदी उलट) डॉक्टर, तिचा नवरा आणि आम्हा सर्व हितचिंतकांचा आग्रह फाट्यावर मारून तिने पर्यायी उपाय म्हणून तिच्या माहेरच्या लोकांच्या सल्ल्याने मित्राला मुंबईहुन पार यवतमाळला न्यायला लाऊन तिथल्या एका तथाकथित सुप्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर/वैद्याकडे उपचार घेण्यात पहिले दोन महिने अक्षरशः वाया घालवले.
त्या आयुर्वेदिक उपचारांनी तिचा आजार कमी होणे तर जाऊद्या उलट आणखीन वाढला. शेवटी पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये शल्यक्रिया आणि सहा केमो घेतल्यावर आता तिथल्याच डॉक्टरांच्या सल्ल्याने गेल्या काही महिन्यांपासून हॉर्मोन थेरपी अंतर्गत रोज एक ह्या प्रमाणे Pfizer कंपनीच्या 'Palbociclib-125mg' ह्या कॅप्सूल्स घेत आहे. २१ कॅप्सूल्सच्या पॅकची किंमत (५% डिस्काउंट कापून) ९०,२५०/- रुपये मात्र आहे. ह्या कॅप्सूल्स घेण्याच्या बाबतीत सेकंडच नाही तर थर्ड ओपिनियनही आम्ही घेतलं, त्यावर उपचार म्हणून नाही पण आयुष्य वाढवण्यास सहाय्यक ठरतील असा त्या अन्य ऑन्कॉलॉजिस्टचा सल्ला मिळाला.
माझा ऍलोपॅथी सोडून अन्य कुठल्याही वैद्यकीय उपचारांवर विश्वास नाही, कॅन्सरच्या बाबतीत तर नाहीच नाही! पण एक प्रश्न पडतो कि ह्या केस मध्ये दर महिन्याला सदर उपचारांवर लाखभर रुपये खर्च करण्याची ह्या कुटुंबाची ऐपत/क्रयशक्ती आहे हे ठीक, पण हे असले उपचार एखाद्या गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबाला परवडू शकतील का?

केस क्र. २
एक चांगले परिचित, वय वर्षे सत्तर. त्यांना दीड-पावणे दोन वर्षांपूर्वी घशाच्या कर्करोगाचे निदान झाले. सुरुवातीला टाटा मेमोरियल मध्ये दोन-चार फेऱ्या मारल्यावर तिथल्या गर्दीला कंटाळून त्यांचे वय आणि रोगाचा झालेला प्रसार विचारात घेऊन त्यांच्या मुलांनी नवी मुंबईतल्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायचे ठरवले. शल्यक्रिया शक्य नसल्याने जेमतेम तीन केमो झाल्या पण शरीराने उपचारांना साथ न दिल्याने त्यांचा सहा महिन्यांच्या आतच मृत्यू झाला.
तेवढ्या अवधीतही त्यांच्या उपचारांचा खर्च १२ लाखांच्या वर झाला होता.

केस क्र. ३
माझ्या मामाच्या दुकाना शेजारी दुकान असलेला पन्नाशीच्या आतला एक मारवाडी ज्वेलर. चार महिन्यांपूर्वी त्याचे स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे थोड्या उशिराने निदान झाले. नवरा बायको, दोन मुली आणि एक मुलगा असे पाच जणांचे त्याचे कुटुंब. त्यातल्या मोठया मुलीचे लग्न झाले आहे, दुसरी मुलगी कॉलेज मध्ये आहे तर मुलगा आता ९ वी - १०वीत असेल. आर्थिक परिस्थिती उत्तम असूनही कुठलाही शारीरिक त्रास/वेदना सहन करण्याची मानसिक तयारी नसलेल्या ह्या व्यक्तीने व्यवसायातले सर्व व्यवहार मार्गी लावून, मृत्युपत्र वगैरे करून, सुसाईड नोट मध्ये सर्व काही लिहून कुठलेही उपचार न घेता कर्करोगाचे निदान झाल्यापासून अवघ्या १५ दिवसांत आत्महत्या केली.

केस क्र. ४
माझी मामेबहीण. गेल्या वर्षी फुप्पुसांजवळ पाणी जमल्याने काही तपासण्या केल्यावर ठाण्याच्या एका नामवंत डॉक्टरांनी तिला कर्करोग असल्याचा निर्वाळा दिला. ६ जून २०२२ रोजी टाटा मेमोरियल (प्रायव्हेट) हॉस्पिटलमध्ये उपचारांना सुरुवात झाली. तिथे असंख्य वेळा ब्लड टेस्टस, एक्स-रे, पेट स्कॅन, कोलोनोस्कोपी, मॅमोग्राफी असे सर्व काही करून झाल्यावरही तिथल्या तद्न्य डॉक्टरांच्या टीमला तिला नक्की कुठल्या अवयवाचा कॅन्सर झाला आहे आणि त्याचा किती प्रसार झाला आहे ह्याचा काहीच अंदाज येत नसल्याने उपचारांची दिशा ठरवता येईना. शेवटी त्यांच्यात चर्चा होऊन केमो देऊन उपचारांना सुरुवात करण्यावर एकमत झाले. २१ दिवसांच्या अंतराने सहा केमो देऊन झाल्यावर काही दिवस तिला जरा बरे वाटले पण पुन्हा पाणी जमा व्हायला लागल्यावर लगेच आणखीन केमो देणे शक्य नसल्याने नव्वद दिवसांसाठी रोज एक प्रमाणे Pfizer कंपनीच्या 'Talazoparib' ह्या प्रचंड महाग (३० कॅप्सुल्सच्या डबीची किंमत जवळपास चार लाख रुपये) कॅप्सूल्स घेण्याचा सल्ला तिथल्या डॉक्टरांनी दिला.

cap

जेमतेम पंधरा दिवस ह्या कॅप्सूल्स घेतल्यावर तिच्या रक्तातले हिमोग्लोबिनचे प्रमाण आणि प्लेटलेट्सची संख्या प्रचंड खालावली. अंथरुणावरून उठण्याचीही ताकद तिच्या शरीरात राहिली नाही. मग महिनाभर टाटा (HBB) मध्ये ऍडमिट करून रक्त आणि प्लेटलेट्स चढवण्याचा सिलसिला सुरु झाला. मग तब्ब्येतीत थोडी सुधारणा आढळून आल्यावर पुन्हा दोन केमो दिल्या. ह्या दोन केमों नंतर मात्र तिची प्रकृती कमालीची खालावली.
रक्तातले हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट्सच्या प्रमाणाने धोक्याची पातळी ओलांडली. हे कमी कि काय म्हणून पहिल्या केमोनंतर बंद झालेली तिची मासिक पाळी अचानक सुरु झाली. कुठल्याही कारणाने शरीरातून रक्ताचा एक थेंबही बाहेर पडणे अत्यंत धोकादायक असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने जवळपास दीड महिना पुन्हा HBB मध्ये ऍडमिट करून उपचार केले. २३ मे २०२३ रोजी टाटा वाल्यांनी तिची फाईल बंद करून डिस्चार्ज दिला. त्यादिवशी रात्री साडेदहाला आम्ही तिला घरी आणली पण जेमतेम चार तासात तिची प्राणज्योत मालवली.

माझ्या अर्धवट राहिलेल्या कोकण-गोवा मालिकेतील काही भागांत ज्या गोव्यातल्या मामे बहिणीचा उल्लेख आला आहे तीच हि बहीण. उण्यापुऱ्या वर्षभराच्या अवधीत पाण्यासारखा पैसा खर्च करून (७० लाखांपेक्षा अधिक) आणि प्रचंड मरणयातना भोगून तिचा झालेला असा दुःखद/वेदनादायी अंत जिव्हारी लागल्याने अद्याप त्या मालिकेचा पुढचा भाग लिहिण्याची इच्छा होत नाहीये.

असो, तुम्ही लेखात उल्लेख केलेल्या स्त्री विषयी प्रचंड सहानुभूती आहे आणि तिला योग्य वैद्यकीय उपचारांपासून वंचित ठेवणाऱ्या तिच्या नवऱ्यासाठी वापरलेला 'नराधम' हा शब्दही अगदी परफेक्ट आहे!

प्रदीप's picture

2 Jul 2023 - 2:44 pm | प्रदीप

आता करत आहे, कारण टर्मिनेटर ह्यांनी ज्या काही कॅन्सरच्या केसेस वर्णिलेल्या आहेत, त्याच अनुषंगाने थोडे अजून लिहीतो.

एक, वैद्यकीय क्षेत्रांतील जवळजवळ शून्य माहिती असलेला मी, इथे 'ब्रेस्ट कॅन्सरच्या विषयावरील माझे निरीक्षण असे नमूद करतो की, पूर्वी (म्हणजे सुमारे २० वर्षांपूर्वीपर्यंत) मी ऐकलेल्या/ पाहिलेल्या केसेस मधील स्त्रीया उपचार घेऊन, विशेषतः कॅन्सरग्रस्त स्तन काढून टाकल्यावर संपूर्ण रोगमुक्त झाल्या. मात्र गेल्या एक- दोन वर्षांत मात्र सुरूवातीसच लक्षांत येऊन उपचार सुरू केल्यावरही, असे आढळून आले की रोग झपाट्याने शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचलेला असतो--- एका जेमतेम पन्नाशीच्या स्त्रीचा ब्रेस्ट कॅन्सर, योग्य वेळी व योग्य ठिकाणी उपचार केल्यामुळे बराचसा नियंत्रणांत आहे, पण सुरूवातीसच पेट् स्कॅनमधे दिसून आले की तो तिच्या लिव्हरपर्यंतही पोहोचलेला आहे, नियमित व्यववस्थित उपचार सुरू आहेत.

दुसर्‍या एका स्त्री वयोवृद्ध आहेत-- वय ऐशीच्या पुढे, त्या आपल्या मुलीकडे अमेरिकेत गेल्या असतांना, एकाएकी त्याण्ना असह्य पाठदुखी सुरू झाली, तेथील तपासण्यांतून शेवटी, ब्रेस्ट कॅन्सरचे रोगनिदान झाले.

तसेच अलिकडे भरतीयांत कोलोन/ कोलो- रेक्टल कॅन्सरचे प्रमाण वाढल्याचेही दिसून आले.

टर्मीनेटर's picture

2 Jul 2023 - 6:51 pm | टर्मीनेटर

थोडे विषयांतर आता करत आहे

हे विषयांतर नसुन धागा विषयाला धरुनच आहे!

पूर्वी (म्हणजे सुमारे २० वर्षांपूर्वीपर्यंत) मी ऐकलेल्या/ पाहिलेल्या केसेस मधील स्त्रीया उपचार घेऊन, विशेषतः कॅन्सरग्रस्त स्तन काढून टाकल्यावर संपूर्ण रोगमुक्त झाल्या.

योग्य निरीक्षण! सहमत आहे.
अशा तीन केसेस आमच्या आप्तस्वकियांमध्ये असुन त्यातली एक तर आमच्या घरातच आहे! २००९ साली टाटा हॉस्पिटल मध्ये माझ्या आईचा कॅन्सरग्रस्त स्तन काढून तिला पाच केमो दिल्या होत्या. आता त्या गोष्टीला जवळपास १४ वर्षे लोटली असुन ती संपूर्ण कर्करोगमुक्त जीवन जगत आहे. वयोमानानुसार तिला काही शारीरीक कुरबुरी आहेत पण ते स्वाभावीक आहे!
मागे चार-एक वर्षांपुर्वी खरे सहेबांनीच 'विळखा' नावाची एक मालिका लिहिली होती, त्यात त्यांनी त्यांच्या मातोश्रींना झालेल्या ह्या आजाराबद्दल लिहिले होते. त्या धाग्यावर दिलेल्या ह्या प्रतिसादातही मी वरील गोष्टीचा उल्लेख केला होता.

पण आता ह्या रोगाचे आणि त्यावरील उपचारांचे स्वरुप फारच बदलले असल्याचे माझे निरिक्षण आहे. दिवसेंदिवस वाढत्या रुग्णसंख्येच्या मानाने सध्या सर्वसामान्यांना परवडु शकतील असे उपचार देणारी रुग्णालये फारच कमी आहेत. आणि खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी होणाऱ्या खर्चाविषयी तर बोलायलाच नको, तो तर आता सर्वसामान्यांच्या आवाक्यापलिकडे गेला आहे!

सुबोध खरे's picture

3 Jul 2023 - 12:17 pm | सुबोध खरे

कर्करोगाचे शेकडो प्रकार आहेत आणि त्यातील अनेक प्रकारामध्ये उपचार अत्यंत स्वस्त आहेत तसेच अत्यंत महागडे पण आहेत

त्यामुळे केवळ कर्करोग आणि उपचार याचे सार्वत्रीकरण शक्य नाही.

रोग निदान झाल्यापासून चौथ्या दिवशी निधन झालेली स्वतः डॉक्टर ( गर्भश्रीमंत घरात जन्माला आलेली) असलेली मुलगी मी पाहिली आहे

तसेच १९८४ मध्ये चौथ्या स्टेज मध्ये असलेली एका सैनिकाची आई शेवटी २००६ मध्ये (मुलगा सुभेदार झालेला) संपूर्ण रोगमुक्त असलेली सुद्धा मी पाहिली आहे.

तर्कवादी's picture

7 Jul 2023 - 4:59 pm | तर्कवादी

टर्मिनेटर यांच्या प्रतिसादात कर्करोगावरील प्रचंड खर्चाचा मुद्दा आला आहे. त्या अनुषंगाने --
काही विमा कंपन्या आता टर्म इन्शुरन्समध्ये अशी सुविधा देतात की जर कर्करोगासारख्या प्राणघातक आजाराचे (याला या कंपन्यांनी टर्मिनल डिसीज असे म्हंटले आहे) निदान झाले तर सदर व्यक्ती जिवंत असतानाच विम्याची रक्कम त्याला मिळू शकते व तो ती रक्कम उपचारार्थ वापरु शकतो.
यातले सगळे बारकावे मला माहित नाही. जाणकारांनी कृपया अधिक माहिती द्यावी.

सुबोध खरे's picture

7 Jul 2023 - 6:42 pm | सुबोध खरे

याला रायडर म्हणतात.

माझ्या ५० लाखाच्या "भारती एकसा" च्या टर्म विम्यावर (ज्याचा हप्ता १५ हजार रुपये वर्षाचा आहे) मी असे रायडर घेतले आहे ज्यात २० वेगवेगळे प्राणघातक आजाराचे जर निदान झाले आणि त्यात तुमचे एक महिन्यात मृत्यू झाला नाही तर एक महिना अखेरीस तुमच्या खात्यात १० लाख रुपये जमा करतात.यासाठी वर्षाला मी ८ हजार रुपये अतिरिक्त भरतो.

(जर एक महिन्याच्या आत मृत्यू झाला तर आपला आयुर्विम्याचे ५० लाख मिळतील आणि हे १० लाख रुपये मिळणार नाहीत)

२० वेगवेगळे आजार असे आहेत, कर्करोग, हृदयविकार, मूत्रपिंडे निकामी होणे, लकवा (पॅरालीसीस), ल्युकेमिया, यकृत निकामी होणे असे महत्त्वाचे पण साधारणपणे जास्त आढळून येणारे ( common) आजार आहेत.

असे रायडर अनेक कंपन्या देतात.

हा सोडून मी दुसऱ्या कंपनीचा ५० लाखाचा दुसरा आयुर्विमा ( टर्म इन्शुरन्स) पण घेतलेला आहे.

सर्व विम्याचे हप्त्याचे पैसे फुकट जावेत अशीच माझी परमेश्वर चरणी प्रार्थना असते.

कुमार१'s picture

2 Jul 2023 - 12:07 pm | कुमार१

अनुभव वाचतांना वाईट वाटलं.

मुक्त विहारि's picture

2 Jul 2023 - 4:18 pm | मुक्त विहारि

कठीण आहे

कर्नलतपस्वी's picture

2 Jul 2023 - 10:26 pm | कर्नलतपस्वी

का लोक असे वागतात.

पैशाची अडचण असेल तर फंड रेज होऊ शकतो.

बाईंचे कुणी नातेवाईक?

गंभीर आजारा कडे डोळेझाक करण्याचे कारण समजत नाही.

कर्क रोगा बद्दल पुष्कळ अवेअरनेस समाजात आला आहे.

बराच कालावधी झाला, उपचार नसल्यामुळे कर्क रोग इतरत्र पसरला नसेल काय?

MDTC मधे काऊन्सिलर असतात ते गाईड करू शकतील.

बाईना मदतीची खरेच गरज आहे. तुम्ही त्यांच्या इतर नातेवाईकांना सुचित करू शकता काय.

डाॅ.आपली तळमळ कळते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Jul 2023 - 2:59 pm | राजेंद्र मेहेंदळे

बायकोचा जीव (किवा कोणाचाही जीव) वाचणे जास्त महत्वाचे आहे की नवीन मूल जन्माला घालणे? हा प्रश्न मनात डोकावला.
आणि ईतर वाचकांनी म्हटल्याप्रमाणे--त्या बाईची अशी कोणती अडचण असेल(आर्थिक्/सामाजिक्/कौटुंबिक) की ती ठामपणे नवर्‍याला असे सांगु शकत नाही की "तु काहीपण झक मार, पण मी ऑपरेशन करणारच"

काही करणांमुळे, असे नवरे पदरी पडले आणि घर सोडायची हिंमत नसेल तर, अशा स्त्रीयांचे जीवन म्हणजे, जिवंतपणी नरकयातना....

अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, मौर्य काळांत, स्त्रीयांच्या भल्यासाठी पण काही कायदे केले होते ... संदर्भ, कौटिल्याचे अर्थशास्त्र, पान क्रमांक 239-240 ...

सुबोध खरे's picture

3 Jul 2023 - 6:34 pm | सुबोध खरे

त्या बाईची अशी कोणती अडचण असेल

आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी नसेल आणि आई वडिलांचा आधार नसेल अशा असंख्य स्त्रिया अशा अगतिक अवस्थेत असतात.

गरोदर असताना पोटावर लाथ मारणारे नवरे अनेक पाहिले आहेत. कारण नंतर पोट दुखायला लागले कि त्या स्त्रिया सोनोग्राफी साठी येतात.

आणि सुरुवातीला पोटावर पडले, पाय घसरला सारखी कारणे देणाऱ्या बायका नवरा समोर नसताना लाथ मारल्याचे कबुल करतात.

४२ वर्षाची स्त्री असेल तर आई वडील साठीच्या पुढचे नक्कीच असतात. तेंव्हा मुलीला आधार देण्याअगोदर त्यांना स्वतःचाच विचार करावा लागतो किंवा घरात करता मुलगा असेल तर त्याचा किंवा सुनेचा पाठिंबा असणे आवश्यक असते.

उगाच नसतं लफडं कशाला गळ्यात घ्या असा विचार करणारे भाऊ भावजयी भरपूर असतात.

त्यामुळे असा तर्हेवाईक/ विक्षिप्त जावई/मेहुणा असला तरी मुलीला/बहिणीला कायमचा आधार देणे हे किती लोकांना जमेल?

कर्नलतपस्वी's picture

4 Jul 2023 - 6:34 am | कर्नलतपस्वी

दररोज आसपास खुप दिसतात.

चलत मुसाफिर's picture

3 Jul 2023 - 9:34 pm | चलत मुसाफिर

वर कुणीतरी दत्तक घेणे फार कठीण आहे अशा प्रकारचे विधान केले आहे. ते समजले नाही. प्रतीक्षा यादीत वेळ लागतो हे खरे आहे पण कठीण हे त्यात काही नाही

मिपावर राजकीय चर्चा लवकर सुरू करावी असे आज या धाग्याकडे पाहून वाटले.

गवि's picture

4 Jul 2023 - 8:57 am | गवि

मार्मिक...!!

सौंदाळा's picture

4 Jul 2023 - 10:30 am | सौंदाळा

खरच नराधम आहे हा नवरा.
त्या स्त्रीला लवकर आराम पडो किंवा या नराधमापासून तिची सुटका होवो हे सोडून काहीच बोलता येण्यासारखे नाही.

इपित्तर इतिहासकार's picture

4 Jul 2023 - 9:50 pm | इपित्तर इतिहासकार

अब यार धागलेखक ही आर्ग्युमेंट मे गांधी वगैरे विषय ले कर आ रहे तब कोई क्या बोल सकता है.

वैसे एक धागे मे कितने बार गांधी लाना रिझनेबल होता है ?

(दिग्दर्शक)
ई. ई

प्रेरणा :- ३ इडियट्स

इपित्तर इतिहासकार's picture

4 Jul 2023 - 9:57 pm | इपित्तर इतिहासकार

गांधीजींनी बलात्कार टाळण्यासाठी बायकांनी आपला श्वास अवरोधून आत्महत्या करायला हवी होतीस असे एका बलात्कार झालेल्या स्त्रीला सुचवले होते त्याची आठवण झाली.

आठवणीत आहे तर संदर्भ देऊनच टाका ह्या विधानाचा. नसेल तर सज्जनपणाचा एक आदर्श घालून द्या, स्वतःच संपादक मंडळाला सांगून तो विविक्षित वाक्य समूह delete करायला सांगून.

धन्यवाद.

- (जस्टिस) ई. ई.

ते लोहगड, कळसूबाई इथली भयानक गर्दी पाहून जीवावर (कर्करोग असताना)मनावर(दुसरं लग्न)उदार होऊन मूल जन्माला घालून लोकसंख्येत भरच पडेल.एखाद्या अनाथाला एडआप्ट करावं.ही अशी विकृती येतेच कुठून?त्या स्त्रीची अवस्था फारच वाईट आहे,तिने खंबीर व्हावं असं काहीतरी घडावं.

आंद्रे वडापाव's picture

5 Jul 2023 - 7:41 am | आंद्रे वडापाव

छोडो मेहँदी खडक संभालो
खुद ही अपना चीर बचा लो
द्यूत बिछाये बैठे शकुनि,
मस्तक सब बिक जायेंगे
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयेंगे|

कब तक आस लगाओगी तुम,
बिक़े हुए अखबारों से,
कैसी रक्षा मांग रही हो
दुशासन दरबारों से|

स्वयं जो लज्जा हीन पड़े हैं
वे क्या लाज बचायेंगे
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आयंगे|

कल तक केवल अँधा राजा,
अब गूंगा बहरा भी है
होठ सी दिए हैं जनता के,
कानों पर पहरा भी है|

तुम ही कहो ये अश्रु तुम्हारे,
किसको क्या समझायेंगे?
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयंगे|

इंटरनेटवरून साभार

चौथा कोनाडा's picture

7 Jul 2023 - 5:52 pm | चौथा कोनाडा

अरेरे ... स्त्री च्या नशीबाची दुर्दैवी कहाणी.
नराधम नवरा तिचा जीव घेऊनच थांबणार. बिचार्‍या "ती" ला माहेराचा / नातेवाईकांचा आधार पाठींंबा नसणार त्यामुळे "ती" चे मरण ओढावणार हा विचार करुन वाईट वाटायला लागलंय !

रोचक आणि साधक बाधक चर्चा आहे !

माणसाला आपल्या प्राथमिकता नेहमीच तपासून पहायला हव्यात. काय करायचं, कशासाठी करायचं ह्याचं भान असायलाच हवं.

अवांतरः
कर्करोगाचं मूळ कारण कधी समजू शकतं का? म्हणजे शरीरात अमुक बिघाड झाल्यामुळं अमुक यंत्रणा काम करेनाशी झाली आणि या सर्वाचा परिणाम म्हणजे अमुक कर्करोग.. अशी काहीशी कारण मिमांसा करणं शक्य आहे काय? अन् तसं शक्य असल्यास आणि त्या मूळ कारणावर उपचार केल्यास कर्करोग बरा होण्याचे चान्सेस वाढू शकतील काय? मी वैद्यकीय क्षेत्रातला नाही अन् याबद्दल काही माहितीही मला नाही. केवळ जिज्ञासा म्हणून असा विचार आला. त्यामुळं चुभुद्याघ्या.

अति-अवांतरः
काही अपवादात्मक केसेस मधे न्यायालय स्वतःच एखादी केस दाखल करून घेते. किंवा पोलीस स्वतःच तक्रार नोंदवून तपास करतात.
तसं वैद्यकीय बाबतीत अशी काही अनुचित घटना दिसत असेल की ज्यामुळे पेशंटच्या जिवाला धोका आहे, तर अशावेळेस डॉक्टरनं अशी तक्रार नोंदवून काही करणं शक्य असतं काय? किंवा याबाबतीत महिला आयोगाकडे डॉक्टरनं अशी बाब नोंदवली तर ते याबाबतीत थेट कारवाई करू शकतील काय?

सुबोध खरे's picture

13 Jul 2023 - 11:38 am | सुबोध खरे

महिला आयोगाकडे डॉक्टरनं अशी बाब नोंदवली तर ते याबाबतीत थेट कारवाई करू शकतील काय?

होय ते किंवा न्यायालय अशा तक्रारींची दखल घेऊ शकतात.

पण त्या तक्रारीचा पाठपुरावा आकारण्यास ती महिला येणार नसेल तर या सर्व खटाटोपीतून केवळ मनःस्ताप सोडला तर काहीही निष्पन्न होणार नाही.

तिची अगतिकता काय आहे हे समजल्याशिवाय तिला मदत करणे फार कठीण आहे. कारण ४२ वर्षाच्या महिलेचे आईवडील हयात असतील तरी वरिष्ठ नागरिकच असणार तेंव्हा त्यांचा सबळ आधार नसेल तर एखादी स्त्री सहजासहजी नवऱ्याविरुद्ध तक्रार करू धजत नाही.

नवऱ्याने लाथ मारलेल्या गरोदर स्त्रिया अधून मधून सोनोग्राफीसाठी येतात. बहुसंख्य बायका आम्ही बाथरूम मध्ये पाय घसरून पडलो असेच सांगतात. कारण अशा नाजूक स्थितीत सासरच्यांशी भांडण करणे बहुसंख्य बायकांना परवडणारे नसते. आणि बहुसंख्य वेळेस माहेरचा धड आधारही नसतो. नवऱ्याशी जमवून घे असाच सल्ला मिळत असतो. अगदीच टोकाचा छळ झाला तर बायका तक्रार करतात असाच अनुभव आहे.

कायदा कागदोपत्री छान असतो पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती फार वेगळी असते.