ती सध्या काय करते ?
नाना पाटेकरशी एकदा चित्रपटकथेवर चर्चा झाली होती. तेव्हा तो म्हणाला होता की सर्वोत्तम कथा ती, की जीचा जीव एका वाक्यात सांगता येतो.
ती सध्या काय करते ? एका वाक्यात सांगायची तर, ती सध्या काहीही करत असू दे, समोरासमोर आल्यावर, आपण जे तेव्हा बोलू शकलो नाही ते आठवून आणि अवघडून जाऊन, अजून दूर जाण्यापेक्षा, आज ते बोलून, दोघातलं प्रेम तितक्याच उत्कटतेनं आणि अपराधशून्य मनानं जपून, आपण एकमेकांशी सुहास्यवदनानं बोलू शकतो.
इतकी साधी स्टोरीलाईन सतीश राजवाडेनी जी काय बेहद्द रंगवलीये ती भान विसरुन पाहात राहावी अशी आहे.