अडीच हजार गायींची चोरी करणारा अल्वरेज केली
आठवणीतला हाॅलीवुड-सात
चोरी ती चोरीच...पण त्या चोरीचं तत्कालीन अमेरिकी राष्ट्रध्क्षांनी देखील कौतुक केलं होतं. म्हैस किंवा गाय चोरून नेण्याची एखादी घटना आपल्याला जवळपास कधीतरी बघायला मिळते, पण अडीच हजार गायी एकत्र पळवून नेणं...अशक्यच...नाही कां...! अशाच चोरीच्या एका सत्य घटनेचं रोमहर्षक चित्रण होतं हॉलीवुडच्या ‘अल्वरेज केली’ या चित्रपटांत, दिग्दर्शक होता एडवर्ड डिमट्रिक्स.
चित्रपटाच्या सुरवातीला पडद्यावर ही अक्षरे येतात...