चित्रपट

शिवाय

समीर_happy go lucky's picture
समीर_happy go lucky in जनातलं, मनातलं
30 Oct 2016 - 5:46 pm

अभिनेता अजय देवगण हे आता दिग्दर्शक बनले असून कारकिर्दीतील या नव्या टप्प्यात प्रेक्षकांसाठी एक नवीन कलाकृती घेऊन आले असून, शिवाय हे त्याचे नाव. कोणत्याही नवीन दिग्दर्शकाची पहिली कलाकृती जेंव्हा प्रेक्षक बघायला जातात तेंव्हा दिग्दर्शकांचे मूळ कल्पनेशी\कहाणीही\कन्सेप्टशी एकनिष्ठ राहण्याच्या प्रयत्नात कहाणीची होणारी वाताहत हा एक कॉमन सिन असतो. कौतुकास्पदरित्या अजय यातून सुटला असून एका वेगळ्या पण कदाचित मेनस्ट्रीम चित्रपटांशी फटकून असणाऱ्या कहाणीही एकनिष्ठ राहूनही अन मुख्य अभिनेता असूनही त्याची कहाणीवरील पकड अजिबात ढिली होत नाही.

चित्रपटसमीक्षा

...ए स्ट्रेंजर इन टाउन... ‘फ्रैंक मोर्गन’

महामाया's picture
महामाया in जनातलं, मनातलं
28 Oct 2016 - 4:32 am

गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो..

आठवणीतला हॉलीवुड-सात

चित्रपटआस्वाद

उंबरठा!

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
23 Oct 2016 - 9:32 pm

उंबरठा!
गंजल्या ओठांस माझ्या, धार वज्राची मिळूदे
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे ...

चित्रपटसमीक्षा

धोनी - ऐसी न कोई होनी

विअर्ड विक्स's picture
विअर्ड विक्स in जनातलं, मनातलं
20 Oct 2016 - 12:48 am

सतीश राजवाडेंचा प्रेमाची गोष्ट चित्रपट पहिला असेलच !!! त्यात राजवाडेंचा एक संवाद आहे चित्रपटाचे शीर्षक कसे क्लिअर पाहिजे त्यातून लोकांना कोडी घालत बसू नयेत. " एम. एस . धोनी - the untold story " हे शीर्षक चित्रपटाला साजेसेच आहे. ह्या चित्रपटात " मेरे नाम में भी महम्मद है " वा " किसीको इतना भी मत डराओ .... " असे हमखास टाळ्या खेचणारे संवाद नायकाच्या मुखी बिलकुल नाहीत , असे असूनसुद्धा धोनी हा चित्रपट संपल्यावर रसिकांना हा चित्रपट एक आनंद देऊन जातो हेच याच चित्रपटाचे खरे यश आहे.

कलाचित्रपटप्रकटनविचारसमीक्षा

अशी स्मिता होणे नाही...

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
17 Oct 2016 - 3:51 pm

लौकिकार्थाने काही लोक आपल्यात नसले तरीही त्यांच्या कार्याने, कलाकृतीने ते कायम आपल्या सोबत असतात. पु.ल. , वसंतराव देशपांडे हि अशीच काही माणसं. स्मिता पाटील पण अगदी याच रांगेत सहज सामावून जाते, ते तिच्या अभिनयामुळे. आज तिचा ६१ वा वाढदिवस. मी वाढदिवस या साठी म्हणतोय कि ती कुठे गेलीच नाही, ती कायम आपल्यात वावरत असते कधी उंबरठा मधली सुलभा बनून तर कधी जैत रे जैत मधली नाग्याची चिंधी बनून. उण्यापुर्या ७५ चित्रपट आणि ३१ वर्षांच्या आयुष्यात तिने अनेकांच्या हृदयावर अमीट छाप सोडली.

संस्कृतीकलासमाजचित्रपटआस्वादलेखप्रतिभा

जाऊं द्याना बाळासाहेब : वेगळ्या वाटेवरच्या माणसाची अर्धवट गोष्ट

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
9 Oct 2016 - 8:31 pm

नमस्कार, रसिक मायबापहो

चित्रपटआस्वादसमीक्षामाध्यमवेध

बहुचर्चित "सैराट"

१००मित्र's picture
१००मित्र in जनातलं, मनातलं
3 Oct 2016 - 9:54 am

बहुचर्चित "सैराट"

बहुचर्चित "सैराट" काल बघितला. इतका उशीरा का ? असं काहींच्या मनात आलं सुद्धा असेल, खास करून , माझे काही मित्र मैत्रिणी , ज्यांना हा सिनेमा खूपच भिडलाय. असो. खरं म्हणजे कुठलाही सिनेमा ...अगदी सुपरेस्ट हिट ही का असेना , मला लग्गेच थेटरात जाऊन पहावा असा उत्साह बिलकुल नव्हता, अजूनही नाही.

वावरकलाचित्रपटविचार

‘व्हॉय वी ट्रीट एनीमल्स लाइक एनीमल्स’-रैक्स हैरिसन

महामाया's picture
महामाया in जनातलं, मनातलं
28 Sep 2016 - 7:25 pm

गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो...

अविस्मरणीय हाॅलीवुड/ सहा-

डॉक्टर डूलिटिल चा सवाल

आपण जनावरांसोबत जनावरां सारखं कां वागतो...! खरं म्हणजे वेळ पडल्यावर ही जनावरं आपल्या साठी जीव सुद्धा देतात...?

चित्रपटआस्वाद

'सोनाली केबल'..

अनिरुद्ध प्रभू's picture
अनिरुद्ध प्रभू in जनातलं, मनातलं
20 Sep 2016 - 3:25 pm

कमी बजेटच्या, जास्त मोठे चेहरे नसलेल्या चित्रपटांमधे बर्‍याचवेळा काहिना काही वेगळं बघायला मिळालयं. मग यारा सिलि सिली असेल किंवा डिअर डॅड. असे बरेच चित्रपट, त्यांचे विषय, त्यांना मांडणारे लेखक-दिग्दर्शक अगदीच नवखे असल्यानं त्यांच बजेट किंवा त्यांची जाहीरात, प्रसिद्धी या सर्व बाबतीत इतर बड्या बॅनर्सपेक्षा बर्‍याच मोठ्या प्रमाणात मागे राहतात. पण त्यांच्यामधे एक वेगळेपण असतं. याच पठडीतला गेल्या वर्षी प्रदर्शीत झालेला चित्रपट म्हणजे...'सोनाली केबल'..

चित्रपटसमीक्षा

बार बार देखो

समीर_happy go lucky's picture
समीर_happy go lucky in जनातलं, मनातलं
14 Sep 2016 - 9:17 pm

निर्माता धर्मा प्रोडक्शन्स (जोहर फॅमिली) आणि रितेश सिधवानी, फरहान अख्तर नवीन चित्रपट घेऊन आलेले आहेत, बार बार देखो. काही वर्षांपूर्वी करण जोहरच्याच सुपरस्टार शाहरुख खानच्या “कभी अलविदा ना केहना” मध्ये पण एका चांगल्या कन्सेप्टची निरर्थक हाताळणी मुळे वाट लागली होती, त्या अनुभवाची आठवण धर्मा प्रोडक्शन्सला ‘बार बार देखो’ करून देणार हे नक्की.

चित्रपटसमीक्षा