रमन राघव २.०
सामान्यतः समाजात चांगली आणि वाईट अशा दोन प्रव्रुत्तीची माणसं असतात असं मानतात. दोन्ही प्रव्रुत्तींचे रंग ही ठरलेले.....चांगल्यासाठी सफेद तर वाईटासाठी काळा. एवढ साध सरळ सोप असुनही आपण वर्गिकरण करण्यात चुकतो... बर्याच वेळा समोर असणारी व्रुत्ती ही फक्त चांगली वा वाईट एवढ्याच फरकात बसवता येत नाही किंबहुना ते ओळखणही खूप कठीण असतं. चांगला आणि वाईट, सफेद आणि काळा हे दोन्ही रंग जिथे एकमेकांना भिडतात तिथे अजुन एक छटा निर्माण होते....करडी(ग्रे शेड). कदाचित समोर दिसणारं करड्या छटेतलंही असु शकेल. काही प्रव्रुत्त्या, काही माणसं या ही छटेतली असतात...असु शकतात.