जुनुनियत....

अनिरुद्ध प्रभू's picture
अनिरुद्ध प्रभू in जनातलं, मनातलं
8 Jul 2016 - 4:01 pm

चित्रपट हे एक उत्तम माध्यम आहे कथाकथनाचं पण कथा मांडताना माध्यमाचा वापर योग्य पद्धतीनं झाला नाही तर चित्रपट फसतो. फक्त गोरे-गोरे, सुंदर चेहर्‍याचे कलाकार घेतले, कुठेतरी बर्फाळ प्रदेशात चित्रिकरण केलं आणि तिच घासुन घासुन चोथा झालेली कथा 'it's different' म्हणुन सादर केली कि चित्रपट होतो हा गैरसमज आहे. हा समज द्रुढ करणारा अजुन एक चित्रपट म्हणजे 'जुनुनियत....'
कर्नल जोहान बक्षी- सुहानी कपूर या दोघांची ही कथा. टिपिकल प्रेमकथा पठडीतली..त्यामुळे अधिक लिहिणं गरजेच नाही. कथा ठिकठाक असली तरी पटकथा अत्यंत सुमार दर्जाची. विवेक अग्निहोत्रि सारखा कलाकार असं काहिसं लिहु शकतो हे पाहुन आश्चर्याशिवाय अजुन काही वाटत नाही. बुद्धा इन ट्राफिक जॅम सारखा चित्रपट केल्यानंतर असा काहिसा चित्रपट बनवण्याचं त्यानं केलेलं धाडस निश्चितच कौतुकाला पात्र आहे. चित्रपटाचा दुसरा महत्वाचा भाग म्हणजे अभिनय.. पुलकित सम्राट आणि यामी गौतमचि जोडि ठिकठाक वाटते. अभिनयात तरी यामी पुलकितपेक्षा वरचढ आहे जाणवतं. उत्तरार्धात येणारा गुलशन देविआह आणि सुहानीच्या वहिनिच्या भूमिकेत असलेली ह्रिशिता भट ही दोघं पुलकित-यामी या दोघांपेक्षा जरा जास्तच भाव खाउन जातात. बाकि अधुन मधुन येणारी पात्र सुद्धा आपापल काम नीट पार पाडतात.
हे सगळं कमी म्हणून कि काय दिग्दर्शक जाणे पण सतत येणारी गाणी डोक उठवतात. अंकित तिवारी, मीत बंधु द्वयी यांनी कितिही उत्तम संगीत दिलं असलं तरीही जागा चुकल्यामुळे गणित फसतं.
कथा-पटकथा,संगीत, दिग्दर्शन अशा कुठल्याच पातळीवर हा चित्रपट चांगल्या या ही सुचित बसत नाही. खरतर यात समिक्षा करण्यासारखं काहीच नाही, पण मी हा चित्रपट पाहण्याचा केलेला मुर्खपणा आपण करु नये म्हणुन हा खटाटोप....
पुलकित सम्राट-यामी गौतम या दोघांपैकी कुणाचेच पंखे नसाल आणि समोर वेळ घालवण्यासाठी अन्य कुठलाही मार्ग असेल तर हा चित्रपट अजिबात पाहु नये...

चित्रपटसमीक्षा