सुलतान

समीर_happy go lucky's picture
समीर_happy go lucky in जनातलं, मनातलं
10 Jul 2016 - 8:25 pm

सध्या आभासी जगाचा जमाना आहे, मग एखादा चित्रपट तिकीट बारीवर प्रचंड चालत असल्याचा आभास निर्माण करता येत असेल काय? हो कदाचित, कारण शंका असल्यास सुलतान हा चित्रपट बघून घ्यावा.चित्रपटाबद्दल आक्षेपार्ह काही नसेलही पण अति-पूर्वप्रसिद्धी?? यावर थोडा तरी चाप यशराज ने बसवावा माझ्यामते, सर्वाधिक विकेंड कलेक्शन - 500 कोटीच्या क्लबमधल्या काही मोजक्या कलाकृतींपैकी एक - सुपरस्टार सलमान च्या कारकिर्दीतील मैलाचा दगड इत्यादी इत्यादी इत्यादी पूर्वप्रसिद्धीने भुलून कदाचित, पण सध्या मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन दोन्हींचे दर आकाशाला भिडलेत. बरे असतीलही पण तितका प्रतिसाद चाहत्यांचा असेल काय?? शंकास्पद बाब आहे कारण मी जो शो बघितला त्या माझ्या दुपारच्या शोला जवळपास 70% खुर्च्या रिकाम्या होत्या.

सुलतान अली खान (सुपरस्टार सलमान खान) आणि आरफा (अनुष्का शर्मा) या दोन्ही कुस्तीपटूंच्या प्रेमाची घडलेली\बी-घडलेली आणि शेवटी पूर्ण झालेली कहाणी म्हणजे सुलतान.

सुपरस्टार सलमान खान हा कुस्तीपटू- रेसलर अश्या भूमिकेत आहे. वयाच्या पन्नासाव्या वर्षी ज्या शिताफीने त्याने दोन्ही भूमिका त्यातल्या विविधांगी कंगोऱ्यांसकट निभावून नेल्यात त्याला तोड नाही. कितीही चांगला दिग्दर्शक असता आणि समजा तुषार कपूर सुलतान खान असता तर......जस्ट इमॅजिन!!! सलमान ने खरोखर खूप मेहनत घेतल्याचे जाणवते बरेचदा विशेष करून क्लायमॅक्स ला.

अनुष्का शर्मा(आरफा) या महिला कुस्तीपटूच्या भूमिकेत आहे. सलमान खानच्या भूमिकेसमोर तिची भूमिका मुख्य अभिनेत्री असूनही आपोआप एक सहाय्यक अभिनेत्री इतकी मर्यादित होते. रणदीप हुडा काही काळ सहाय्यक भूमिकेतून दर्शन देतो आणि छोटीशी भूमिका असली तरी तिची नोंद घ्यायला भाग पडतो.

अली अब्बास जफर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कहाणी लेखक. आणि आदित्य चोप्रा बरोबर सहपटकथा लेखकही. आणि सांगण्यास समाधान की त्यांनी कुठेही आपल्या कर्तव्यात कसूर केलेली नाही. तसे पाहता सुलतानचा रेसलिंग क्लायमॅक्स हा सलमान ने कितीही मेहनत घेतली असती आणि दिग्दर्शक अननुभवी-कन्फ्युज्ड असता तर त्या मुख्य सीनची वाट लागली असती. पण त्यांनी सगळे व्यवस्थित निभावून नेले.

विशाल-शेखर या जोडगोळीने संगीत सुलतानला आहे. संगीतही अगदी उत्कृष्ट वगैरे नसले तरी अगदीच टाकाऊ कॅटेगोरीतही येत नाही. उलट ज्या शिताफीने सुलतान चा टायटल ट्रॅक आणि सच्ची-मुच्ची या दोन गाण्यांचा पार्श्वसंगीत म्हणून चित्रपटभर वापर आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे. आणि एक महत्वाचे सुरवातीलाच सलमान खानच्या एंट्रीला जे पार्श्वसंगीत आहे, काही सेकंदच, पण त्यासाठी विशेष कौतुक. कारण सलमानच्या एंट्रीलाच जर त्या भूमिकेची छाप पडली नसती तर पुढे जे इम्प्रेशन क्लायमॅक्स मुले क्रिएट होते त्यात फरक पडला असता हे नक्की

सलमान च्या चित्रपटांत तोच असतो डोळ्यांसमोर तीनही तास, दबंग 1-2, रेडी, वॉन्टेड, किक, बजरंगी भाईजान हे काही ठळक उदाहरणे, कहाणी काहीही असो पण पडद्यावर पूर्णवेळ तोच असतो आणि या परंपरेला सुलतान अपेक्षेप्रमाणे पुढे नेतो, अर्थात इथे कहाणीच तशी होती म्हणा पण तरीही ........

सुपरस्टार सलमान खान खरोखरच कदाचित त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी अभिनयाच्या दृष्टीने सुलतान मध्ये करून गेलाय. त्याचा धर्म - पूर्वायुष्यातील त्याच्या चुका - त्याचा प्रेमभंग इत्यादी इत्यादी पूर्वग्रह आधी करून घेतलेला असेल तर हा चित्रपट बघणाऱ्यांसाठी नाही. मान्य की एक व्यक्ती म्हणून त्याच्याबद्दल व्यक्ती-दरव्यक्ती प्रेक्षकांचे मत बदलेल पण तरीही कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता जर हा चित्रपट बघितलात तर आवडण्याचीही दाट शक्यता आहे. बाकी डिटेल्स बाजूला ठेवू पण ज्या तन्मयतेने त्याने वयाच्या पन्नासाव्या वर्षी कुस्तीपटू-रेसलर उभा केलेला आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे आणि म्हणूनच त्याच्या जाणवणाऱ्या प्रचंड मेहनतीसाठी मी माझ्यातर्फे सुलतानाला पाच पैकी चार (4*) स्टार देतो. बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

सुखी's picture

10 Jul 2016 - 10:25 pm | सुखी

Kahi drushye baghun Creed ya movie chi athavan Ali, tantotant uchaleguri keliye.... baghaycha moodach gela

https://en.m.wikipedia.org/wiki/Creed_(film)

समीर_happy go lucky's picture

11 Jul 2016 - 12:53 am | समीर_happy go lucky

दादा आम्ही सुखी गावंढळ लोक विंग्रजीच्या फंदात पडत नाय आमाला माहितच नाय

त्याचे अन शारूक्चे चित्रपट नक्की कोण बघतात हे कुतुहल आहे. परिचितांपैकी कुणी बघत नाहीत.

शेवटी पाहिलेला त्याचा साजन हा माधुरीमुळे आवडला.
वरच्या यादीतले चित्रपट दिसलेच तर वाहिनी बदलतो!

फॅनपर्यंत सगळे पाहिलेत. अगदी इंग्लिश बाबू देसी मेम, गुड्डू आणि वन टू का फोर हे भयाण चित्रपटही केवळ शाहरूख आहे म्हणून पाहिलेत. मला शाहरूख प्रचंड आवडतो. तो over acting करतो असं म्हणणाऱ्यांना अभिनयातलं कितपत कळतं हा प्रश्नच आहे. मला नक्कीच कळतं.

मृत्युन्जय's picture

11 Jul 2016 - 2:46 pm | मृत्युन्जय

मला शाहरुख अजिबात आवडत नाही त्याचे कारण तो ज्या प्रकारच्या भूमिका करतो त्यात्त आहे. पण त्याचे कभी हा कभी ना, स्वदेस आणि चक दे हे माझे अतिशय आवडते चित्रपट आहेत. शाहरुख over acting करतो असं काही मी म्हणत नाही पण त्याच्या अभिनयात एक विशिष्ट एक सुरीपणा आहे. पण काही भाव भावना केवळ शाहरुखच उत्तमरित्या व्यक्त करु शकतो ते त्याच्या समकालीन इतर अभिनेत्यांना अजिबात जमत नाही.

चिनार's picture

12 Jul 2016 - 12:27 pm | चिनार

मृत्युंजय भाऊ...सहमत !
या विषयावर मागे एक धाग्यावर मी एक प्रतिक्रिया दिली होती. तीच थोडी बदल करून इथे लिहितोय.थोडी विस्कळीत असली तरी भावना समजून घ्या.

1. कोई मिल गया मध्ये ह्रितिकने केलेली मतीमंद मुलाची भूमिका अप्रतीम जमली. त्यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला. ह्याच ह्रितिकला आशुतोष गोवारीकरने 'स्वदेस ' साठी विचारले होते. नासाचा प्रोजेक्ट म्यानेजर शोभला असता का तो? तो मोहन भार्गव शाहरुखने सुरेखरीत्या साकारला. हे ह्रितिक सुद्धा मान्य करेल. कारण मोहन भार्गवच्या व्यक्तीमत्वाला शाहरुख साजेसा होता.
2. हाच शाहरुख मुन्नाभाईची भूमिका करणार होता. कल्पना तरी करू शकतो का ?
3. आमिर खान दिग्दर्शित तारे जमीन पर मधला आमिरचा अभिनय कोण विसरू शकेल. त्या सिनेमाच्या प्रत्येक बाबीत आमिर मनापासून गुंतला होता म्हणूनच तो इतकी सुंदर भूमिका करू शकला.
4. अजय देवगण गंगाजल किंवा कंपनी सारख्या गंभीर भूमिकेत शोभून दिसतो. पण विनोदी भूमिकेत तो अक्षरश: उघडा पडतो. त्या सिनेमांच्या कमाईचे आकडे जरी डोळे फिरवणारे असले तरी मी अभिनयाबद्दल बोलतोय.
६. सलमानची अभिनय क्षमता यथातथाच असली तरी मैने प्यार किया किंवा हम आपके हैं कौन मधला प्रेम असावा तो सलमानच ! त्याच्या गेल्या काही वर्षातल्या सिनेमांविषयी ना बोललेले बरे. ह्याविषयी मी मागे एक लेख लिहिला होता.
http://www.misalpav.com/node/29919

थोडक्यात काय तर तुमच्या आमच्यासारख्या रसिकांच्या नशिबात असलं की सगळ्या गोष्टी जमून येतात आणि एक अविस्मरणीय कलाकृती आपल्या समोर येते.

वाल्मिक's picture

12 Jul 2016 - 2:55 pm | वाल्मिक

अक्षय कुमार नासा मध्ये जाऊ शकतो तर ह्रितिक का नाही

आणि क्रिश मध्ये तोच ह्रितिक वैज्ञानिक म्हणून शोभला की नाही

वाल्मिक's picture

12 Jul 2016 - 9:55 am | वाल्मिक

Yeh Lamhe Judaai के
बघून दाखवा

त्रिवेणी's picture

11 Jul 2016 - 9:55 am | त्रिवेणी

मी सलमानचे सगळे चित्रपट बघते कारण सलमान आवडतो मला.
कालच बघितला सुलतान. पण आता जरा वय जाणवते त्याचे.

धनंजय माने's picture

11 Jul 2016 - 2:14 pm | धनंजय माने

अक्खा बघितला? सा न
मी 27 व्या मिनिटाला बंद केला.
पैलवान आखाड्यात जाऊन लोकांनी पकडून दाखवा म्हणे. आता प्रेक्षकांनी हसावं अशा नोट लिहायला सुरु करा म्हणावं. ती अनुष्का आधी छान असताना आता बदकमुखी का झालीय कुणास ठाऊक? मधेच डकटेल्स सुरु करेल अशी आशा होती. पण.... असो!

धनंजय माने's picture

12 Jul 2016 - 12:16 pm | धनंजय माने

काल पुन्हा प्रयत्नपूर्वक बघितला. कुस्तीचं ठाऊक नाही पण फास्टेस्ट कुस्ती/ फास्टेस्ट बॉडी बनवणे/ फास्टेस्ट किक बॉक्सिंग शिकणे/ फास्टेस्ट हॉस्पिटल मधून रिकवरी वगैरे बद्दल बक्षीस मिळायला हवं साहेबांना.

मराठी_माणूस's picture

11 Jul 2016 - 5:10 pm | मराठी_माणूस

पूर्वायुष्यातील त्याच्या चुका -

हा सर्व काळकुट्ट भुतकाळ विसरुन लोक त्याच्या सिनेमाला गर्दी का करतात ?

समीर_happy go lucky's picture

11 Jul 2016 - 7:40 pm | समीर_happy go lucky

त्याचे अन शारूक्चे चित्रपट नक्की कोण बघतात हे कुतुहल आहे. परिचितांपैकी कुणी बघत नाहीत.
शेवटी पाहिलेला त्याचा साजन हा माधुरीमुळे आवडला.
वरच्या यादीतले चित्रपट दिसलेच तर वाहिनी बदलतो!

साधारणतः नव्वदीच्या आसपास तरुण झालेले पोरंटोरं हे बघतात, तुमचे वय झाले असेल किंवा प्रोफाइल चे नाव सार्थच करायचे असा चंग बांधला असेल. कुणी बघते किंवा कुणी बघत नाही यामुळे काहीही फरक पडत नाही, "बासुंदी चांगली असेल तरच हलवायाकडे विकल्या जाते, नाहीतर माल पडून राहतो"

बोका-ए-आझम - Mon, 11/07/2016 - 13:52
फॅनपर्यंत सगळे पाहिलेत. अगदी इंग्लिश बाबू देसी मेम, गुड्डू आणि वन टू का फोर हे भयाण चित्रपटही केवळ शाहरूख आहे म्हणून पाहिलेत. मला शाहरूख प्रचंड आवडतो. तो over acting करतो असं म्हणणाऱ्यांना अभिनयातलं कितपत कळतं हा प्रश्नच आहे. मला नक्कीच कळतं.

पूर्ण सहमत

मला शाहरुख अजिबात आवडत नाही त्याचे कारण तो ज्या प्रकारच्या भूमिका करतो त्यात्त आहे. पण त्याचे कभी हा कभी ना, स्वदेस आणि चक दे हे माझे अतिशय आवडते चित्रपट आहेत. शाहरुख over acting करतो असं काही मी म्हणत नाही पण त्याच्या अभिनयात एक विशिष्ट एक सुरीपणा आहे. पण काही भाव भावना केवळ शाहरुखच उत्तमरित्या व्यक्त करु शकतो ते त्याच्या समकालीन इतर अभिनेत्यांना अजिबात जमत नाही.

प्रसाद??? भाषा ओळखीची वाटली

त्रिवेणी - Mon, 11/07/2016 - 09:55
मी सलमानचे सगळे चित्रपट बघते कारण सलमान आवडतो मला.
कालच बघितला सुलतान. पण आता जरा वय जाणवते त्याचे.
असहमत

अक्खा बघितला? सा न
मी 27 व्या मिनिटाला बंद केला.
पैलवान आखाड्यात जाऊन लोकांनी पकडून दाखवा म्हणे. आता प्रेक्षकांनी हसावं अशा नोट लिहायला सुरु करा म्हणावं. ती अनुष्का आधी छान असताना आता बदकमुखी का झालीय कुणास ठाऊक? मधेच डकटेल्स सुरु करेल अशी आशा होती. पण.... असो!

अशोक सराफ मध्ये कितपत पेशन्स असेल हा प्रश्नच, असो वैयक्तिक मत सांगितल्याबद्दल धन्यवाद.

हा सर्व काळकुट्ट भुतकाळ विसरुन लोक त्याच्या सिनेमाला गर्दी का करतात ?
'व्यक्तिमत्वाची क्रेझ'?? विंग्रजीत छान शब्द आहे कायतरी मला आत्ता आठवत नाही आहे पण या क्रेझ पायीच तो चालतो आहे.

तुमचे वय झाले असेल किंवा प्रोफाइल चे नाव सार्थच करायचे असा चंग बांधला असेल.

येव्हढे वैयक्तिक टिप्पणीवर का येता ब्वोवा? आमचे वयही झाले अन खेडूत तर आम्ही आहोतच- वेगळं काय करावं लागत नाही.
तुम्ही तुमचं मत मांडलं आम्ही आमचं!सलमान काय आमचा पावणा नाय अन म्हेवणा पण नाय. पैसे टाकून नाही जावंसं तर तसं म्हणायचं पण नाही?
आम्हाला त्याच्यात आणि (पूर्वीच्या)संजूबाबात गुन्हेगार दिसतो जे कायद्याची खिल्ली उडवत मोकाट फिरतात.अन... जाऊदे.

धनंजय माने's picture

12 Jul 2016 - 1:46 pm | धनंजय माने

सर तुम्ही मिपा तर सोडून जाणार नाही ना? ;)

खेडूत's picture

12 Jul 2016 - 1:51 pm | खेडूत

नाय बा! म्या काहून?

समीर_happy go lucky's picture

12 Jul 2016 - 9:40 pm | समीर_happy go lucky

वैयक्तिक टिप्पणी हा हेतू नव्हता, गमतीत म्हटलं होतं, गैरसमज नसावा
असो............

नमकिन's picture

12 Jul 2016 - 5:58 am | नमकिन

दर आठवडी एखादा मराठी चित्रपटाचे वर्णन पण येऊ द्या.

समीर_happy go lucky's picture

12 Jul 2016 - 9:44 pm | समीर_happy go lucky

टाकायचो मी आधी पण मी पा वर लेखकाच्या प्रयत्नांची खिल्ली उडवणे हा हक्क मानला जातो असं समजलं, त्यामुळे बंद केलं, या एकतर्फी वाल्याला कुणी काहीही म्हटलं तर आपल्याला काय? म्हणून हा ट्राय मारला :P
असो .........

खटपट्या's picture

22 Jul 2016 - 1:45 am | खटपट्या

असं करु नका वो. लोक्स काय बोलतेत त्यांना फाट्यावर मारा. आम्ही आपल्या परीक्षणाचे चहाते हौत.

माझ्या मते अनुष्का शर्माच्या एवजी सोनक्षि सिन्हाला घ्यायला पाहिजे होते, अनुष्का हि कुठ्ल्याहि अ‍ॅंगलने महिला कुस्तिपटु वाट्त नव्हति, सोनक्षि सिन्हा हि महिला कुस्तिपटु म्हनुन थोडितरि अपिल झालि असती. बाकी हा सिनेमा बॉलिवूड मसाला सिनेमा आहे, अडिच-तिन तासात कुठेहि बोअर झाले नाहि. चांगला वाटला.

चिनार's picture

12 Jul 2016 - 1:57 pm | चिनार

आत्ता कसं बोललात !!

सोनाक्षीविषयी माझं हे मत फार आधीपासून आहे. ती शोभली तर फक्त कुस्तीपटू म्हणूनच शोभली असती...नायिका म्हणून नाही !! :-)

तेरे मस्त मस्त दो नैन म्हणे !!

नाखु's picture

12 Jul 2016 - 2:10 pm | नाखु

निमित्ताने यमगर्नीकर साहेबांचे टंकन-प्रतिसाद रुपी उपस्थीती मिपावर झाली म्हणून धागाकर्त्याला धन्यवाद..

कोल्हापुर कट्ट्याचा नाखुचा साक्षीदार

गजनीच्या मुर्गाडोसने दिग्दर्शन केलंय. त्यात तिने चांगली हाणामारी केलीय. निदान प्रोमोत तरी चांगली वाटतेय. तिने लूटेरा मध्ये चमक दाखवली होती, पण...

संदीप डांगे's picture

12 Jul 2016 - 11:31 pm | संदीप डांगे

भौतेक सुरुवातीची कास्टींग सोनाक्षीच होती, नंतर काय तरी इन्टर्नल म्याटर झालं असं आठवतं,,,

जव्हेरगंज's picture

12 Jul 2016 - 8:20 pm | जव्हेरगंज

सिनेमा सोसो आहे!
एव्हरेज.
अनुष्काने लिप्स सर्जरी अंडू करावी.

अनुष्काने लिप्स सर्जरी अंडू करावी.

ख्याक.. फुटलो, जबरा हसलो...
असले प्रतिसाद देण्यापूर्वी धूसक्लेमर देत जावा राव.
अचानक फुटलो ना हापिसात

मार्मिक गोडसे's picture

13 Jul 2016 - 9:26 am | मार्मिक गोडसे

अनुष्काने लिप्स सर्जरी अंडू करावी.

सहमत.

त्याचा धर्म - पूर्वायुष्यातील त्याच्या चुका - त्याचा प्रेमभंग इत्यादी इत्यादी पूर्वग्रह आधी करून घेतलेला असेल तर हा चित्रपट बघणाऱ्यांसाठी नाही.

खरंतर कुठलाच चित्रपट हा पूर्वग्रह न ठेवता बघायला पाहिजे. बहुतांश चित्रपट अंडर्वर्ल्डवाले/ व काळा पैसावाले फायनान्स करतात तरीही ते बघितले जातातच ना?
ह्या तिन्ही खानांचे चित्रपट मी आवडीने बघतो.

धर्मराजमुटके's picture

13 Jul 2016 - 2:47 pm | धर्मराजमुटके

चित्रपट बघीतला नाही पण जग घुमीया गाण्याचे स्त्री व पुरुषांनी गायलेली वर्जन्स ऐकली. मला वैयक्तीकरित्या नेहा भसीन ने गायलेले गाणे राहत फतेह अली खान ने गायलेल्या गाण्यापेक्षा कितीतरी पटीने आवडले.
नेहा ने गायलेल्या गाण्यात वाद्यांचा कमीत कमी वापर असल्यामुळे तिचा आवाज आणि गाण्याचे बोल मनाला भिडतात. आवाजातील चढ उतार तर भारीच.
अवांतर : या एका गाण्यासाठी तरी नेहाने आपले भसीन आडनाव बदलुन घेतले पाहिजे. भसीन = भसाडा आवाज असे काहितरी समीकरण माझ्या मनात तयार होते.

समीर_happy go lucky's picture

19 Jul 2016 - 9:53 pm | समीर_happy go lucky

.

दुर्गविहारी's picture

20 Jul 2016 - 8:51 pm | दुर्गविहारी

मु'सलमान' खान ह्या माणसाविषयी प्रचन्ड तिट्कारा असल्याने या जन्मीतरी या जन्मी तरी खानावळिचे पिक्चर बघायचे नाहीत असे ठरवले आहे. बाकी मनुष्यवधाच्या खटल्याचा लोकानवर काहीहि परिणाम होत नाही हे पाहून या समाजाची लाज वाटते.

एकुलता एक डॉन's picture

21 Jul 2016 - 9:49 am | एकुलता एक डॉन

हॅरो नसला तरी दुसरे कोणीतरी खान असतेच ,म्हणून आपण चित्रपट बघणे सोडणार ?

खानावळीचे चित्रपट सोडून बाकी बरेच चान्गले चित्रपट भारतात निघतात. आणि एखादा मनुष्यवधाचा खटला चालु झाला की ह्यान्च्या विरुद्ध सोशल मेडियावर गळे काढायचे आणी नवीन पिक्चर आला की तिकीट काढायला पळायचे असा दुट्प्पी पणा निदान मी तरी करत नाहि. बोम्ब स्फोट खटल्या नन्तर सन्जय दत्त्चा एकही पिक्चर ठरवून बघीतला नाही आणि त्याने काही अड्लेही नाही.

मुक्त विहारि's picture

21 Jul 2016 - 6:02 pm | मुक्त विहारि

+ १

स्वधर्म's picture

21 Jul 2016 - 6:19 pm | स्वधर्म

+१