माझा लोकलनामा - गाडीतला तो
शनिवार असल्याने गाडीला तुरळक गर्दी होती. पुढील स्टेशनावर मला उतरायचे असल्याने मी दरवाजातच उभा होतो. एवढ्यात माझ्या बाजूला दोन्ही पायाने अपंग असलेला एक तरुण मुलगा आपली चारचाकी ढकलगाडी (Trolly )घेवून दरवाजाजवळ येवून बसून राहिला. त्यालाही पुढील स्टेशनावर उतरायचे होते. डब्यातील सर्वांचे लक्ष त्या मुलाकडे लागले होते काहीजण कुतूहल म्हणून तर काहीजण चिंता म्हणून. कारण जे त्याच्या मागे येवून उभे राहिले होते ते हा कधी उतरणार आणि त्यानंतर मग आपल्यला कधी उतरायला मिळणार याच चिंतेत होते. त्याला मात्र त्याची फिकीर नव्हती, तो बिनधास्त होता.