MLM (मोहाचा विळखा ३/३ )
मल्टीलेवल मार्केटींग स्कॅम
इन्स्टन्ट गोरेपन, इन्स्टन्ट शक्ती, इन्स्टन्ट कॉफी इत्यादीच्या इन्स्टन्ट जमान्यात कोणालाही आपले स्वप्न पूर्ण व्हावे तर ते झटपट, आताच्या आता, इन्स्टन्ट झाले तर आवडेलच. त्यात त्याला फारसे काही करायची गरज नसेल, केवळ जुजबी मिटींग्स अटेन्ड करणे, थोड्याफार लोकांना भेटणे आणि बाकी दिवस, महिने आरामात आपल्या कुटूंबासमवेत घालवणे अशी चमचमीत संधी असेल तर? कुणाला नाही आवडणार. नक्कीच आवडेल. आणि मग अशा इन्स्टन्ट सक्सेसच्या मागे लागणारा तो इन्स्टन्स्ट पैसे घालवून बसणार व मित्रनातेवाइकांशी संबंधही इन्स्टन्ट बिघडवून बसणार हेही आलेच.