गंप्या आणि अजान
गंप्या भल्या पहाटे पक्षी निरीक्षणास निघाला ,तो जेव्हा गावाबाहेर पडला तेव्हा त्याला एका झोपडी बाहेरील कोंबड्याच्या दडब्यातून काही आवाज आला ,त्याने तेथे थांबून ऐकण्यास सुरुवात केली,तेथे एक कोंबडी ,कोंबड्यास म्हणत होती ,अहो लवकर उठा ,तुम्हाला आरवायचे नाही का ?तुमच्या शिवाय लोक उठतील कसे?त्यावर कोंबडा आळसावत म्हणाला अग आता माझे काम मशीद वाले कर्णे लावून अजान देवून करतात ,मला मस्त झोपू दे ,गंप्या हसत ह्सत पुढे निघाला थोड्याच वेळात गंप्या जंगलात पोचला ,नुकताच सूर्योदय झाला होता,गंप्या एका झाडा खाली बसून आपल्या दुर्बिणीने पक्षी निरीक्षण करू लागला एवढ्यात त्याच्या कानावर एका पोपटीणीचा आवाज आला ,अहो