" अचानक"

कैलास गायकवाड's picture
कैलास गायकवाड in जनातलं, मनातलं
30 Aug 2013 - 4:38 pm

मी रात्री अमुक करत होतो.टी.व्ही.वर अमकं-ढमकं लागलं होतं. अमकं -ढमकं ऐन रंगात आलं होतं...

आणि अचानक लाईट गेले .

असं काही वाचलं की माझं डोकंच सणकतं.
अचानक लाईट गेली म्हणजे काय्?लाईट काय पूर्वकल्पना देवून जाते?की शनवारी मी ८.३२ ला जाणार आहे.मग लिहीणारा ''अचानक'' शब्द वगळून लिहेल की रात्री ८.३२ ला टाटा म्हणून लाईट गेली.

आपल्या भाषेच्या अशा काही गमती जमती मजेशीर वाटतात...मात्र काही वेळा काही प्रकार वाचून डोकं ठणकायला लागतं .( मघाशी सणकलं होतं....आता ठणकलं )

उदा...--- घरी आल्या आल्या मी अंगातला शर्ट काढून हँगरला लावला. ( शर्ट अंगात असतो की अंग शर्टात ? )

--- पायात चप्पल घातली .
---डोक्यात टोपी घातली .

---हे आलं आपलं गाव. ( आपण गावात नाही आलो??? )

किंवा काही शब्दांना विशेषणे अगदी गळूसारखी ( हे आणखी एक विशेषण ) चिकटलेली असतात.

उदा. नियम म्हटला म्हणजे तो ''अलिखित''च असतो.
वर्णनातील आकाश ''निरभ्र''च असतं.
कादंबरीतील तरुणी ''टंच'' च असते.
सासू खाष्ट असते...... यार हा लंगोटीच असतो वगैरे वगैरे...

हम्म्म्म

विचार करकरुन डोकं उठलं ( सणकलं,ठणकलं.....आता उठलं ( ? ) )

म्हटलं आता एक मोट्ठा लेखच लिहीतो यावर...

पीसी ऑन केला.
कीबोर्ड बडवायला सुरुवात केली.

.
.
.
.
.
.
'' आणि अचानक लाईट गेले''.

--डॉ.कैलास गायकवाड

विनोदलेख

प्रतिक्रिया

अग्निकोल्हा's picture

30 Aug 2013 - 4:42 pm | अग्निकोल्हा

.

कपिलमुनी's picture

30 Aug 2013 - 4:50 pm | कपिलमुनी

कादंबरीतील तरुणी ''टंच'' च असते

.

तुम्ही कोणत्या कांदबर्‍या वाचता ते समजला ;)

रामपुरी's picture

30 Aug 2013 - 9:41 pm | रामपुरी

"पायात चप्पल घातली "
आणि गाव कुठलं तेही समजलं.

ब़जरबट्टू's picture

31 Aug 2013 - 10:59 am | ब़जरबट्टू

:) :) :)

कैलास गायकवाड's picture

30 Aug 2013 - 5:11 pm | कैलास गायकवाड

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र.....

मोट्ठंच गुपित उघड झालं तिच्या ( फुल्या फुल्या फुल्या ).

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Aug 2013 - 5:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून येऊ द्या....!!!

-दिलीप बिरुटे

आदूबाळ's picture

30 Aug 2013 - 9:27 pm | आदूबाळ

असेच म्हणतो !

पुलेशु!

;)

कवितानागेश's picture

30 Aug 2013 - 5:20 pm | कवितानागेश

गळूसारखी नाही हो, जळूसारखी. जळू चिकटते. गळू फुटते, ठणकते इ. इ.

दत्ता काळे's picture

30 Aug 2013 - 9:54 pm | दत्ता काळे

आपल्या भाषेच्या अशा काही गमती जमती मजेशीर वाटतात...... हा.. हा..
"गमती जमती" ह्या मजेशीरच असतात.