अगर
अगर तुम साथ देते तो
आशियाँ हम सजा देते,
यूँ बिखरी सी ज़िन्दगी को
हम जीने की वजह देते.
समज़ ये हम को भी है की
हमारे तुम नहीं लेकिन,
समज़ दिल को भी होती तो,
हमसफर गम नही होते.
- नेता
अगर तुम साथ देते तो
आशियाँ हम सजा देते,
यूँ बिखरी सी ज़िन्दगी को
हम जीने की वजह देते.
समज़ ये हम को भी है की
हमारे तुम नहीं लेकिन,
समज़ दिल को भी होती तो,
हमसफर गम नही होते.
- नेता
खोल मी आहे किती पाहून घेतो
मी जरा माझ्यामध्ये डुंबून घेतो
सावल्यांनी पोळलो आहे कधी मी
ऊनही आता जरा फुंकून घेतो
बेगडी आहे तुझी दुनियाच सारी
मी अता रानीवनी भटकून घेतो
मी उद्या होईनही काफर कदाचित
ये, तुला थोडी फुले वाहून घेतो
तू किती भिनलीस माझ्या आत राणी-
ये, तुझ्या नजरेमध्ये पाहून घेतो
डॉ.सुनील अहिरराव
चांगला होता जरी हा "त्या"स कधि ना भावला
"चांगला असणे"च ह्याचा दोष "त्या"ला घावला ..
आज पटली त्या यमाला फार माझी थोरवी
श्वासही माझाच तो का पळवण्याला धावला ..
एक सदरा मी सुखाचा माणसाचा घातला
फाडण्याचा घाट त्यांचा का अती सोकावला ..
हाय ना मी फेडला पहिला नवस त्याचा कधी
क्षण सुखाचा मज मिळेना देवही रागावला
लेउनीया साज आली कामिनी थाटात ती
तेज बघुनी कामिनीचे साजही भारावला
कविवर्य सुरेश भटांच्या फेमस आव्हानाला समस्त पुरुषजातीचे उत्तर...
तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?
अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?
सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे आणि तू मिटलास का रे ?
बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे ?
उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा
तू किनार्यासारखा पण कोरडा उरलास का रे ?
आजकाल मिसळपावावर वधूंच्या वाढत्या अपेक्षा आणि त्यामुळे उपवर तरूणांची होणारी कुचंबणा, हा विषय चांगलाच गाजतो आहे. एवढा की या विषयावरच्या एका धाग्याने प्रतिक्रियांचा इतिहास रचला. खालील काव्यसुमन हे देखिल याच विषयाला वाहिलेले आहे.
काही नतद्रष्ट वाचक या कवितेवर या धाग्याचा प्रभाव जाणवतो आहे, असे म्हणतील, त्यांना इग्नॉर मारावे, ही विनंती.
मनगटावर मोगर्याचे हार आले
आज सोळा स्थळांचे नकार आले
वेदनांचे मोकळे कोठार झाले
पोरगेला तरूण आता मी न उरलो
बर्थडे माझे तीसावर चार झाले
आज डोळा आसवांचे भार झाले
वेदनांचे मोकळे कोठार झाले
दुश्मनांची राहिली ना जरब काही
ओळखीचे चोर येथे फार झाले
देवभोळा साव आता मी न उरलो
दैव माझे यारहो गद्दार झाले
भ्रष्ट का अंधारही होतो अताशा..?
चंद्र तारे कां निशेचे, 'जार' झाले?
आळ घ्यावा ज्यावरी, ना शस्त्र उरले
काळजावर मोगर्याचे वार झाले
वाचले जे झुंजले जगती 'विशाला'
पाठ दावुन धावले ते ठार झाले !
***********************************
(वृत्त:मंजुघोषा)
***********************************
किती वाकुडे बोल बोलून झाले
स्वत:च्याच सत्वास गाळून झाले
धरा सांगताहे कथा पावसाची
किती थेंब पदरात झेलून झाले ?
जरी भोवती 'माणसे' फार झाली
तरी एकट्यानेच 'खेळून' झाले
नको रोकडा, दागिनेही नकोसे
बियाण्यासवे सत्व तोलून झाले
जमावा कसा नाच मोरा प्रमाणे ?
चकोरापरी प्राण उधळून झाले
कसा रे मुरारी तुझा हा अबोला?
सुरांवर तुझ्या आज भाळून झाले
'बळीच्या घरी सौख्य नांदो सदाचे'
पुन्हा आरशालाच टाळून झाले
किती राहिले श्वास देहात बाकी ?
'प्रभो' रे किती डाव खेळून झाले ?
शब्दात गझल वेड्या गावेल का कधी रे?
मोजून फक्त मात्रा साधेल का कधी रे?
करतोस काय गप्पा नुसत्याच काफियांच्या?
वगळून आशयाला चालेल का कधी रे?
नाही मनात श्रद्धा, अन् हात जोडलेले
दगडात देव आहे वाटेल का कधी रे?
खुर्चीच माय झाली स्वार्थांध मानवाची
सत्तेशिवाय त्याचे भागेल का कधी रे?
टाळून याचकाला, अभिषेक सावळ्याचा
वेड्या, विठू तुलाही पावेल का कधी रे?
व्हावे 'विशाल' आता, कोतेपणा गळावा
वृत्ती मनामधे ही बाणेल का कधी रे?
विशाल...
लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!
आता तयार व्हावे लढण्यास लेखणीने
रक्षण अबोलतेचे करण्यास लेखणीने
अभ्यास चिंतनाला शास्त्रात घोळवावे
कसदार शब्दशेती फुलण्यास लेखणीने
वास्तव चितारण्याची अवगत कला करावी
भक्कम नवीन पाया रचण्यास लेखणीने
नवज्ञान निर्मितेला जेथे उभार तेथे
आशय हळूच न्यावा भिजण्यास लेखणीने
भाकड-वृथा कथांच्या कक्षेपल्याड जावे
अभिजात सृजनाला पुजण्यास लेखणीने
लटकी-पुचाट वाणी शिरजोर होत आहे
यावे रणात गच्ची धरण्यास लेखणीने
जेव्हा चहूदिशांनी वादळ विराट तेव्हा
द्यावे अभय दिव्याला जळण्यास लेखणीने
गाढवाला सांगतो, गीता... असा मी बावळा
दांभिकांची कैद ज्ञाना, ज्ञानवंता कोहळा
धर्म नामे सर्प डसतो, मानवी वेडेपणा
भूक घेते प्राण येथे, पिंड मागे कावळा
भाव नाही जाणलेला वरलिया रंगा भुले
वर्ण वाटे गोरटा मनरंग काळा सावळा
करपलेल्या भाकरीचे पदर घेतो वाटुनी
घास उदरी पोचला तो, होय मोठा सोहळा
मी हरीच्या पायरीवर पीर आहे रेखिला
भ्रष्ट म्हणती लोक आम्हा, कोण येथे सोवळा?
घाबरावे या जगां इतका नसे कमजोर तू
सांग त्यांना ठासुनी, समजू नका मी कोवळा !
वृत्त : कालगंगा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा