विराणी

हं ! ते तुला कधी जमणारच नाही

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
29 Apr 2015 - 4:37 pm

प्रस्तावना: कविता आजकाल सुचत नसली तरी परम मित्र वल्ली यामुळे काही तरी लिहिले आहे.. नविन काव्य असे होत नसते म्हणुन काल आवडलेल्या कवितेला (धानजीरावांच्या) कवितेतुन उत्तर देत आहे
मुळ कविता : तू ये...

अरे द्यायचेच असेल तर दे
आभाळालाही कवेत घेवु पाहणारे ते हात
हं ! ते तुला कधी जमणारच नाही

तोडलेल्या पाशावरती, कशास कुंपण अन भिंती
शब्दांच्याच वादळांची कसली आहे कोणास भिती

अरे गायचेच असेल तर गा
ते स्वर बंदिशी मिलनाचे...
हं ! ते तुला कधी जमणारच नाही

विराणीकविता

तू ये...

सतिश गावडे's picture
सतिश गावडे in जे न देखे रवी...
26 Apr 2015 - 10:07 am

तुझ्यासाठी कोसळतं आभाळ कवेत घेईन
तू ये, तुला फुकट देईन...

वादळांची अता तमा न मजला, न प्रलयाची मज भीती
तोडून दिले सारे पाश अता मी, मज ना कुणाची क्षीती

तुझ्यासाठी रणरणत्या उन्हात भैरवी गाईन
तू ये, तुला फुकट देईन...

अर्थ नसे कसलाच कशाला, फेकली फुकाची ओझी
परी अंतरी हळवा कोपरा, अता घेतसे परिक्षा माझी

तुझ्यासाठी दगडाला जास्वंदीची फुले वाहीन
तू ये, तुला फुकट देईन...

अर्थस्य पुरुषः दासः म्हणूनी उद्घोष तो करी मी
नसे तयात माझा आत्मा, उगा ओंजळ भरी मी

विराणीकविता

ठळक माझी मेहुणी....

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
17 Apr 2015 - 10:58 am

ठळक माझी मेहुणी, ठ परी ठळकातल्या
स्थूल आणि ठेंगणी, ळ परी ठळकातल्या
गोल आणि देखणी, क परी ठळकातल्या

कडक माझी मेहुणी, वाघ बकरी चहापरी
वाघ माझी बायको, डोळा सदा माझ्यावरी
गुरकते, डरकाळते , पण मेहुणी जबरी खरी

लाख नखरे बायकोचे शांत चित्ते साहतो
मेहुणी येता घरा मी सभ्यतेने वागतो
आलिया भोगासि म्हणुनी बोल नशिबा लावतो
:(:(:(:(:(:(:(:(:(:(

विराणीकविताराशी

एका बापाची व्यथा .......

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
31 Mar 2015 - 12:48 pm

पाटी पुसून कोरडी करणं इतकं सोपं नसतं गं
मागे राहिलेल्यांचं जगणं इतकं सोपं नसतं गं

फोडासारखं जपलं तुला, मनासारखं फुलू दिले
रागावलोही बाप म्हणून, जरी मुक्त खुलू दिले
तेव्हाचं ते रडू विसरणं इतकं सोपं नसतं गं

सतरा हे काय वय का गं असा निर्णय घेण्याचं
अव्हेरून सारी नाती शरीर झोकून देण्याचं
तुझं नसणं मान्य करणं इतकं सोपं नसतं गं

काय सलत होतं तुला कधी बोलली असतीस तर
त्या घडीला तुझ्याजवळ मी हजर असतो तर
'जरतर'ला या सामोरं जाणं इतकं सोपं नसतं गं

विराणीकविता

लग्नाचे बंध होती पुरुषाचे भोग आता

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
30 Jan 2015 - 12:01 pm

आमच्या मित्राने एक बाजू मोठ्या कळकळीने मांडली.

त्याच्या भावनांशी बर्‍याच अंशी सहमत होताना नाण्याची दुसरी बाजूही समोर यावी असे वाटले.

पुरुषांची बाजू मांडण्याचा केलेला हा केविलवाणा खाटाटोप म्हणाना....

प्रत्येक नजर वाटे
गिळते मी तूज आता
लग्नाचे बंध होती
पुरुषाचे भोग आता ||धृ||

अभय-गझलआरोग्यदायी पाककृतीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालसाहित्यभूछत्रीमार्गदर्शनविराणीसांत्वनावीररसपाकक्रियाकविताउखाणेजीवनमानऔषधोपचारगुंतवणूककृष्णमुर्तीशिक्षण

<पतंग>

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जे न देखे रवी...
15 Oct 2014 - 7:03 am

प्राथमिक प्रेरणा - तवंग
दुय्यम प्रेरणा - <लवंग>

माझा पतंग
सतत हरवतो
तुझ्या अभाळी
.
.
पेच लावती
ढगाढगात ढाले
ढालगजांचे
.
.
ढील देत मी
फिरकी झपझप
मांजा वाहतो
.
.
मांजा कातर
पडतो सैलसर
केएलपीडी
.
.
झाडा तारांत
पतंग ढिगभर
लटकलेले
.
.
नवा पतंग
उडेल लवकर
नव्या अभाळी

अभंगअभय-काव्यअभय-गझलअभय-लेखनअहिराणीआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडगोवाचौरागढनागद्वारनागपुरी तडकाप्रकाशचित्रणप्रवासवर्णनबालसाहित्यभूछत्रीमराठी गझलमराठीचे श्लोकमार्गदर्शनलावणीवाङ्मयशेतीविठोबाविठ्ठलविराणीशृंगारश्लोकसांत्वनास्वरकाफियाहझलभयानकहास्यबिभत्सकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरसविडंबन

डर्बी लाजिरवाणी (मॅन्चेस्टर युनायटेड च्या पराभवाचं गीत)

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
26 Mar 2014 - 2:19 pm

काल गजर लावून सव्वा वाजता उठून मॅन्चेस्टर डर्बी बघितली... आणि हाय रे दुर्दैवा... ३-० ची हार बघावी लागली. झोपही गेली आणि हारही झाली. निराशेतून सुचलेलं हे कवन, आपणासमोर ठेवतोय, फुटबॉल रसिकांना, त्यातून युनायटेड फॅन्स ना या भावना नक्कीच जास्त समजतील.

(धुनः भातुकलीच्या खेळामधली)

मॅन्चेस्टरच्या युनायटेड ची, हालत केविलवाणी
अर्ध्या मिनिटी घाव लागला, डर्बी लाजिरवाणी ||धृ||

पर्सी बसला, होऊनि जखमी, स्तंभ एक ढासळला
जुना मावळा, रूनी सुद्धा, मुळीच नाही फळला
होता होता गोल होईना, पळे तोंडचे पाणी ||१||

विराणीसांत्वनाकविताविडंबनमौजमजा

संत मीराबाईची विराणी

आयुर्हित's picture
आयुर्हित in जे न देखे रवी...
3 Feb 2014 - 9:21 pm

नाते जोडले नामाशी, कधीच मी तोडणार नाही||

पिवळ्या पानावानी दिसे मी जरी, नसे हा पंडूरोग|
चोरून करीते उपवास, देईल रामभेटीचे योग||

पकडून माझी भुजा, वडिलांनी वैद्य बोलवला |
कळे ना त्या मुर्खाला, हृदयात माझ्या पीळ पडलेला||

जावो वैद्य आपुल्या घरी, माझे नाव काढू नको|
विरहाने जळालेली मी अशी, औषध मला देऊ नको||

अंगावरील मांस उतरले, उरला हाडांचा सापळा|
बोटाच्या अंगठीत घुसेल, झाला बारीक दंड आगळा||

राहून राहून पापी कोकीळ, समोर प्रियाचे नाव आळवतो|
विरहात सांभाळते स्वःताला, प्रियासाठी जीव जाळवतो||

करुणसंस्कृतीवाङ्मयकवितामुक्तकविराणी