अभय-लेखन

पायाखालची वीट दे....!

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
10 Jul 2015 - 9:56 am

पायाखालची वीट दे....!

पंढ़रीच्या पांडुरंगा
तुझ्या चरणी ठाव दे
तीर्थप्रसाद काही नको
शेतमालास भाव दे

दुर्दशेने फस्त केल्या
रानाकडे ध्यान दे
शहरावाणी खेडे होईल
असे थोडे ज्ञान दे

हृदयामध्ये राम आणि
मुखामध्ये नाम दे
सूट-माफी-सवलत नको
घामासाठी दाम दे

पाऊस पाणी येऊ दे
शेत माझे न्हाऊ दे
चोच फुटल्या अंकुरांना
दोन घास खाऊ दे

संपत्तीच्या वृद्धीसाठी
लालसेचा रोग दे
शेतीमधल्या कष्टालाही
वेतनवाला आयोग दे

अभंगअभय-काव्यअभय-लेखनवाङ्मयशेतीविठोबाविठ्ठलवाङ्मयकविता

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
24 Jun 2015 - 8:40 am

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

गरिबावरती गरजते, धनिकावरी बरसते
एक सांगा भाऊसाहेब
सरकार म्हंजे यापेक्षा वेगळं काय असते?

हिरवं गेलं, निळसर गेलं, भगवं आलं
अस्काऱ्याच्या म्हशीले टोणगं झालं
टोणग्याच्या पाठीवर मलमली झूल
म्हशीच्या वेणीले धोतऱ्याचं फूल
साल बदललं तरीबी हाल बदलत नसते?

सातव्या आयोगाचा तिजोरीवर डल्ला
सामूहिक लग्नाचा शेतकऱ्याले सल्ला
अकलेचे कांदे बदबद पिकले
नाकाचे नकटे प्रवचन शिकले
समज ना उमज पण खुर्चीत धसते?

अभय-काव्यअभय-लेखननागपुरी तडकावाङ्मयशेतीवाङ्मयकविता

मलाही कविता सुचली

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
21 May 2015 - 12:57 pm

मलाही कविता सुचली
मलाही कविता सुचली ।। ध्रु. ।।
सक्काळी सक्काळी उठून
ब्रशला पेस्ट मी लावली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।। १ ।।
आंघोळीसाठी दरवाज्याची
कडी मी लावली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।। २ ।।
हाफिसात निघताना
बुटाची लेस मी बांधली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।। ३ ।।
बायकोच्या आज्ञे वरून
रात्री भांडी मी घासली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।। ४ ।।

अभय-काव्यअभय-लेखनधोरणमांडणीधर्मपाकक्रिया

लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
26 Apr 2015 - 8:51 pm

लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका

खाली करा शेतशिवार, इथून चालते व्हा
कुठं जाऊ पुसू नका, ढोड्यामंधी जा ...॥

शूद्र तुम्ही शेतकरी, ध्यानी धरा पक्के
सरकाराचे बाप आम्ही, चार पानी एक्के
वाद फालतू घालू नका, उगाच काहीबाही
कोर्टामधी जाण्याची, तुम्हांस मुभा नाही
कायदा कडक वाटतो? तर तेल माखून घ्या ...॥

घटनेमधले परिशिष्ट, नऊ वाचून पहा
शेतकऱ्यांनो तुम्ही तुमच्या, औकातीत राहा
मर्जीनुसार हिसकून घेऊ, तुमचा जमीनजुमला
कायद्यानंच बांधू तिथं, फाइव्ह स्टार बंगला
तुमच्या लेकीसूना घेऊन, नाचासाठी या ...॥

अभय-काव्यअभय-लेखननागपुरी तडकावाङ्मयशेतीकविता

मराठी

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
8 Apr 2015 - 5:04 pm

महाराष्ट्रात मराठी चित्रपट सिनेमागृहात प्राइम टाइम ला दाखवणे चित्रपटगृहांना अनिवार्य करण्यात आले

ही बातमी वाचली. ट्विटरवर या विरोधातील पोस्ट्स मुळे का होईना #Marathi ट्रेंडिंग झालं. आता गेले काही वर्ष, मराठी आणि मुंबई बाबत जे घडलंय, घडतंय, त्यावर सुचलेलं हे मुक्तक.

अभय-लेखनभावकविताकवितामुक्तकसाहित्यिकसमाज

कावळा *** लकी नसतो;

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
7 Feb 2015 - 2:52 pm

आमची प्रेरणा डोळा लवतो लकी नसतो;
कावळा *** लकी नसतो;
विचारा मला मी सांगतो!

एक सुंदरी शेजारी आली,
हसली आणि 'नाव काय?' म्हणाली;
खुश होऊन बोलायला जातो....
इतक्यात मेला कावळा ***!
शब्द घशात अन् स्वप्न ढगात...
कोण म्हणत...
नशीब उघडत कावळा *** त?

अभय-काव्यअभय-लेखनहास्यसुभाषिते

..का आज सारे गप्प

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in जे न देखे रवी...
26 Dec 2014 - 4:33 pm

..का आज सारे गप्प
आपल्यांची हाक आली!
कुंपणापार ती निरागस
अन् आसामी का निराळी?

तेव्हा पेटले गहिवर वन्हि
झाल्या मेणबत्त्यांच्या मशाली
आज आपुलेच वाहता रक्त
का वाटे व्यथा निराळी?

तुम्हा न गोड लागे
तेव्हा अन्न अन् पाणी
गात्रे आज ती थिजली
अन् बसली दातखीळ साली!

ना शब्द करुणा ल्याले
ना ओल डोळा आली
आज पुन्हा का तुमची
विवेकबुद्धी नग्न झाली?

अभय-लेखनकरुणसमाज

<पतंग>

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जे न देखे रवी...
15 Oct 2014 - 7:03 am

प्राथमिक प्रेरणा - तवंग
दुय्यम प्रेरणा - <लवंग>

माझा पतंग
सतत हरवतो
तुझ्या अभाळी
.
.
पेच लावती
ढगाढगात ढाले
ढालगजांचे
.
.
ढील देत मी
फिरकी झपझप
मांजा वाहतो
.
.
मांजा कातर
पडतो सैलसर
केएलपीडी
.
.
झाडा तारांत
पतंग ढिगभर
लटकलेले
.
.
नवा पतंग
उडेल लवकर
नव्या अभाळी

अभंगअभय-काव्यअभय-गझलअभय-लेखनअहिराणीआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडगोवाचौरागढनागद्वारनागपुरी तडकाप्रकाशचित्रणप्रवासवर्णनबालसाहित्यभूछत्रीमराठी गझलमराठीचे श्लोकमार्गदर्शनलावणीवाङ्मयशेतीविठोबाविठ्ठलविराणीशृंगारश्लोकसांत्वनास्वरकाफियाहझलभयानकहास्यबिभत्सकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरसविडंबन

"माझी गझल निराळी" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
1 Jul 2014 - 9:25 pm

दिनांक : ०१-०७-२०१४

"माझी गझल निराळी" : दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा

                     शब्दांजली प्रकाशन, पुणे तर्फे दिनांक २९-०६-२०१४ रोजी पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे सकाळी ११:३० वाजता "माझी गझल निराळी" या गझलसंग्रहाच्या दुसर्‍या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संगीता जोशी,  सौ. विनिता देशमुख आणि डॉ. अविनाश भोंडवे उपस्थित होते.

अभय-लेखनमराठी गझलवाङ्मयशेतीवाङ्मयकवितागझल

मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
22 Jun 2014 - 2:09 pm

मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका

माझा बाप...
रामप्रहरी उठायचा
शेणपुंजा करायचा
नांगर घेऊन खांद्यावर
दम टाकीत चालायचा
गार गार थंडीतही
घामामध्ये भिजायचा

माझा बाप....
गायी-म्हशी चारायचा
दूधदुभते करायचा
भूमातेच्या कुशीमध्ये
मरेस्तोवर राबायचा
कांदा-मिरची-भाकर खाऊन
आला दिवस ढकलायचा....

माझा बाप....
आजारी पडला तरी
घरामध्येच कण्हायचा
औषधाला पैसा-अधला
कुठून आणू म्हणायचा
देव तरी पावेल म्हणून
पूजा अर्चा करायचा ....

अभय-लेखननागपुरी तडकावाङ्मयशेतीकरुणवाङ्मयकविता