मोबाईल फंडे आणं मोठं मोठे गंडे

VINODBANKHELE's picture
VINODBANKHELE in जनातलं, मनातलं
23 Sep 2011 - 1:53 pm

मोबाईल आजच्या युगातला अल्लाउद्दिनाचा दिवाच जणू , अगदी लहान मुला पासून वयोवृद्ध पर्यंत प्रत्येकाच्या हातात असायलाच हवे असे नव्या युगाचे आयुध , अडी अडचणीला , वेळ प्रसंगाला नव्हे तर अगदी सदा सर्वदा हातात , खिशात पर्स मध्ये असणारा मानवाचा ट्रेड मार्कच जणू .

अगदी शेतकरी राजा सुद्धा मोबाईल द्वारे आपल्या विहिरी वरची मोटार चालू आणि बंद सुद्धा करायला लागला , भिकारी एका गल्लीतून दुसर्या गल्लीतील भिकार्याची हाल हवाल विचारायला लागला ,बळी राजाला अगदी देश परदेशातला शेतमालाचा भाव ह्या मोबाईल च्या कृपेने आपल्या बांधावर बसून पाहता येऊ लागला . आपली तरुण पिढी तर अक्षरश: दिवाणी झाली , आधी missed call, मग sms , mms,मग Bluetooth, मग wai fi ,2g ,3g आणि आता 4g ,
राजकारणा प्रमाणेच आपल्या समाज मनाला व्यापून तरीही दशांगुळे उरलेले हे मोबाईल विश्व मानवाच्या एवढे उपयोगाचे आहे म्हंटल्यावर मानव नावाचा इब्लीस प्राणी त्याचा गैर वापर केल्या शिवाय थोडाच राहणार ,

ह्या साधनाचा दुरुपयोग करणारे महाभाग हि आहेतच जगात ,

अगदी लोकांना विनाकारण वेळी अवेळी रिंग देणे ,अश्लील मेसेज करणे यासारख्या टुकार उद्योग करणाऱ्या प्राण्या प्रमाणेच अगदी मोबाईल धारकाला वैताग येई पर्यंत s m s व call द्वारे आपला व्यवसाय करणारे महाभाग देखील पहावयाला मिळतात , हे सगळे कमी आहे म्हणून कि काय काही महाभागांनी आता असा प्रकार सुरु केलाय , ते मोबाईल वर s m s पाठवतात तुमचा नंबर आमच्या लकी नंबर योजनेत भाग्यवान विजेता ठरला आहे तुम्हाला 5 लाख great British pound मिळणार आहेत . तुमचे डिटेल्स s m s करा .

वाचणारा शहाणा असला तर डिलीट करतो , पण असे शहाणे आपल्या देशात फार कमी असतात , जवळ पास दुर्मिळ प्रजाती . मग काय हे s m s पाठवतात तिकडून call येतो किंवा यांना दम नाही धरवला तर हेच दहा वेळा call करून विचारतात sir / madam आमच्या बक्षिसाच काय झाले ?

मग सुरु होतो खरा खेळ , तिकडून उत्तर देणारा सांगतो मी तुमचे पैसे घेऊन निघणारच आहे पण काही कागदपत्रे आणि tax म्हणून तुम्हाला अमुक टक्के रक्कम भरावी लागेल , यांच्या कडे तेवढे पैसे असतील तर लगेच अकौंट नंबर दिला जातो , पैसे भरून पावती मेल करायला सांगतात . आपल्या ह्या बकर्या कडे पैसे जर कमी असतील तर चक्क बार्गेनिंग पण होते , रक्कम कमी जास्त करून पैसे भरले जातात पावती स्कॅन करून मेल पाठवला जातो , आणि परत सुरु होते फोनाफोनी .

मग दोनचार दिवसांनी हा बकराच फोन करतो तेव्हा सांगितले जाते मी आताच इंडियात येतोय तुमचे बक्षीस घेऊन विमानतळा वर आहे पण तुमच्या सरकारचा इनकम tax भरल्या शिवाय मला येथून बाहेर सोडणार नाहीत . तेव्हा अजून x y z % रक्कम अमुक अमुक tax एजंट च्या खात्यात भरा ,

आता पर्यंत बकर्याने पोट तर फाडून घेतलेलेच असते पण आता त्याला वाटते हि प्रोसेस म्हणजे त्या फाडलेल्या पोटा ला टाके असतील , पण त्याला काय माहित कि हे टाके घालणे नसून त्याचा कोथळा बाहेर काढणे चालले आहे , बिचारा मोठ्या आशेने परत दुसर्या account ला पैसे जमा करतो पावती मेल करतो , परत फोना फोनी

आताची फोनाफोनी जरा वेगळी असते , आपल्या बकर्याचा संयम संपत आलेला असतो पण दोन्ही हात दगडा खाली अडकलेले असतात एकदा नाही तर दोन वेळा माती खाल्लेली असते . आणि तिकडून चालू असते तिसर्यांदा माती खायला लावायची जबरदस्त गोड गळचेपी .अजून थोडेसे पैसे अमुक अमुक ऑफिसरला दिल्यास तुमचे बक्षीस डायरेक्ट तुम्हाला कॅश मिळणार असते किंवा चेक़ दिला जाणार असतो पण त्याच वेळेस हे देखील सुचवले जाते कि आधीच क्लेम करायला , तुम्हाला पैसे भरायला खूप उशीर झालाय आता लगेच हे पैसे भरले नाहीत तर तुमचा क्लेम रद्द होऊन तुम्ही भरलेले पैसे वाया जातील, आम्ही एवढी मदत करतोय पण तुम्हीच सहकार्य करायला तयार नाहीत . आपल्या बकर्यात थोडी धुगधुगी असलीच तर बकरा त्यांच्यावर उखडतो , मग तिकडून सुरु होते, जा तुला काय करायचे ते कर हि भाषा .आणि मग सरकते आपल्या बकर्याच्या पायाखालील जमीन .

कारण जवळपास आताशी त्याच्या डोक्यात उजेड पडलेला असतो कि आपल्याला बकरा करण्यात आलेय , मोठ्या आणि फुकट बक्षिसाच्या आशेने आपण आपली आहे ती पुंजी पण गमावून बसलोय . पण हे सगळ कळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो .

आजच्या ह्या मतलबी दुनियेत कुणी हि कुणाला हि काहीही फुकट देत नाही हे साधे सत्य आपण किती सहज पणे विसरतो आणि अश्या फसवणुकीला बळी पडतो ,

ह्यात देखील व्हरायटी असते बरका , कधी कधी s m s येतो कि परदेशात एक बडा पैसेवाला वारलाय , त्याला वारस नाही , त्याच्या संपत्तीचे व्यवहार आम्ही बघतोय , तुम्ही तुमची माहिती पाठवल्यास आम्ही ती संपत्ती तुम्हाला charity trust तर्फे दान केली असे दाखवू , त्या साठी पहिले तुम्ही थोडेसे पैसे कागदपत्रे बनवण्यासाठी आणि tax भरण्यासाठी अमुक account मध्ये जमा करा , आमचे कमिशन जे काही असेल ते तुम्हाला तुमचे पैसे मिळाल्यावर दिले तरी चालेल .आमचा तुमच्यावर विश्वास आहे.

कधी s m s येतो तुच्या नंबर द्वारे तुम्हाला तुमच्या जागेवर मोबाईल tower allot झाला आहे , त्या साठी तुम्ही इच्छुक असाल तर तुमचा पत्ता आणि इमेल आयडी , जागेचा उतारा मेल करा , तुम्हाला त्यासाठी तुम्हाला पाहिजे त्या tower कडून १०,००,००० रुपये diposit आणि महिना १५,००० रुपये भाडे मिळेल ,

आता हा s m s बघून आपण नक्की रिप्लाय करतो आणि सुरु होतो त्याच तिकीटा वर तोच खेळ ,. तुमच्या कडे साहेबाला खुश करण्या साठी आणि प्रोसिस्सिंग फी म्हणून पैसे मागितले जातात , sorry account ला भरायला सांगितले जातात , आणि मग परत वरचीच स्टोरी रिपीट .

कधी s m s येतो तुमच्याशी मला confidential बोलायचे आहे मला ह्या X Y Z मेल वर मेल करा ,तुम्हाला त्रास देतोय पण माझा काही इलाज नाही sorry , तुम्ही मेल केला कि सांगितले जाते असेच काही तरी थातूर मातुर आणि नंतर account ला पैसे भरा हा मंत्र , आणि मग परत पहिले पाढे पंचावन्न .

अजून एक कार्यक्रम ,
तुमचा बायोडाटा मारुती सुझुकी कंपनी साठी किंवा एखाद्या फेमस कंपनी मध्ये जॉब साठी सिलेक्ट झाला आहे , तुम्ही ह्या तारखेला इंटरव्यु साठी या तुमचा बायोडाटा इमेल करा आणि तुमच्या प्रवासाच्या साठी आम्ही तुम्हाला जे प्लेन चे तिकीट पाठवू त्याचे आणि रजिस्ट्रेशन फी चे असे अमुक तमुक रुपयांचा डिमांड ड्राफ्ट काढून पाठवा किंवा चेक़ पाठवा , मग आम्ही तुम्हाला तुमचे तिकीट आणि जे लेटर पाठवू त्याची प्रिंट घेऊन ठरलेल्या वेळी मुलाखतीला या, मुलाखती नंतर तुमचे पैसे लगेचच परत दिले जातील .

अहो हा एक s m s आणि वरचा tower चा s m s यांनी तर भले भले सुशिक्षित लोकांना माती खायला लावलीय हो , sorry सुशिक्षित नाही फ़क़्त शिकलेल्या लोकांना .

अजून आता चीन च्या मोबाईल क्रांती नि सगळे डबडे एकदम स्वस्त होऊन राहिलेत म्हणजे जवळपास सगळ्या मोबाईल मध्ये इंटरनेट असतंय , आता त्याच्यात पण हेच फंडे आन वापरणाऱ्या दिड्शाण्याला मोठ मोठे गंडे.मोबाईल नंबर च्या ऐवजी इमेल आयडी असतोय फ़क़्त बाकी सगळी भाषा सेम सगळी प्रक्रिया सेम आणि सगळी बोंबाबोंब पण सेम .

फक्त मोबाईल वापरनार्यात कदाचित बरेच जण अडाणी असतील पण नेट वापरणारे आणि त्याद्वारे असे गंडले जाणारे नक्कीच किमान लिहिता वाचता येणारे असतात , का बरे लोक आपली थोडी बुद्धी चालवून पहात ?

किती जादू असते ह्या पैशाची माहितीय का तुम्हाला ? तुमच्या एखाद्या परिचिताला असा s m s किंवा मेल आला असेल ना तर त्याला जरा सांगून पहा , म्हणावं बाबा असे कोणी नसत , असे कुणी कुणाला पैसे देते का ? बर देणार असेल तर ते तुझ्या कडे कशाला मागतेय ?जे काय द्यायचेय त्यातून कापून घेऊन उरलेले देऊन टाका की म्हणावं .

असे सांगितल्या बरोबर त्याचे डोळे पहा मग कळेल तुम्हाला तुम्ही कुठल्या मोहळावर दगड मारलाय ते , त्याची नजर तुम्हाला सांगेल तुम्ही जगातले १नंबर धोकेबाज आहात , कैकयी पेक्षा मत्सरी आहात , आणि कदाचित या पृथ्वी वरचे त्याचे एकमात्र शत्रू आहात .

ती व्यक्ती जर थोडी सडेतोड असेलना तर तुम्हाला जागेवर ऐकायला मिळेल त्यांच्या नशिबाची थोरवी , आणि तुमच्या करंट्या नशिबाचे प्रमाणपत्र......

अर्थव्यवहारधोरणविनोदमुक्तकजीवनमानतंत्रमौजमजास्थिरचित्रप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छालेखमतसंदर्भप्रतिसादअभिनंदनबातमीशिफारसचौकशीमाध्यमवेधसल्लाअनुभवप्रश्नोत्तरेमदतमाहितीप्रतिक्रियावादआस्वादसमीक्षाप्रतिभाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

23 Sep 2011 - 2:08 pm | किसन शिंदे

हा हा हा...

बाणखेले साहेब, एवढं खोलात उतरून लिहलयं म्हणजे या गंडणार्‍यापैकीच एक तुम्ही सुध्दा आहात असं मानायचं का आम्ही.! ;)

VINODBANKHELE's picture

23 Sep 2011 - 2:22 pm | VINODBANKHELE

नाहि हो शिंदे सरकार,
बुडति हे जन देखवेना डोळा,

आपल्या सायबर क्याफे मधे असे खुप जन येतात, त्यांचि परिस्थिती नसते तरि कर्ज वगैरे काढुन उद्योग करतात.

सगळे त्यांचेच अनुभव आहेत.
कालच एक जन आला होता मोबाईल टा॓वर साठी ७००० रु भरले होते.महानुभाव पन्थिय साधु होता.
खुप दिवसां पासुन पहातोय आज अगदिच राहवले नाहि म्हनुन हा पत्र प्रपंच.

चांगले लिहिता. लिहित जा.

बाकी मिसळपाववर लिहिलेत ते बरे केलेत असे निरीक्षण नोंदवतो.... ;)

विनीत संखे's picture

23 Sep 2011 - 2:49 pm | विनीत संखे

धनबक्षिसाचे जे ईमेल किंवा एसेमेस कांड आजच्या जगात होतात ते होत राहतात कारण कुणीनाकुणीतरी बकरा त्यांना बळी पडत राहतोच.

आमच्या कॉलनीत एका बँकेत काम करणारी एक काकू ह्या प्रलोभनाला बळी पडली. तिला युरोप टूर फ्री च एसेमेस आला होता. त्यासाठी तिनं विझा बनवण्यासाठी त्या निनावी एजण्टला दहा हजार रूपये भरले. कमालीची गोष्ट म्हणजे त्या एजण्टने कुठलीही कागदपत्र ... अगदी पासपोर्ट सुद्धा तिच्याकडून मागितला नाही.

आता इतकी सुशिक्षित माणसं बावळटपणा करू शकतात तर अशिक्षित बावळटांची काय कहाणी कथन करावी?

हि जमात पण भारी अक्कलवान असते,
माझ्या कडे आलेल्या अनेक अश्या बकर्यां पैकी जवळपास प्रत्येक जण बँकेत काम करणार्या कुनाला तरी भेटुन त्यांचा सल्ला घेउन मग पैसे भरुन पावती ईमेल करायला येतात.
एका महाभागाला मी फोन केला तर ते बेणं मला म्हनालं

ते पॅन कार्ड पण मागतात म्हणजे खरोखर देतिल पैसे.

आता काय म्हणणार या युक्तिवादा वर?

प्रचेतस's picture

23 Sep 2011 - 2:56 pm | प्रचेतस

मस्त लिहिलयं विनोदराव.

अवांतरः लेण्याद्रीजवळील पाताळेश्वराचा सचित्र वृत्तांत टाका की राव एकदा. यावेळी ते मंदिर बघायचं राहूनच गेलं.

लेण्याद्रीजवळील पाताळेश्वराचा सचित्र वृत्तांत ...........

वल्ली भाई ,
आपन मिपाकर जाउयात एकदा पाताळेश्वर ला ........
आणि दिवाळी नंतर कधितरी हरिश्चन्द्रगडा वर दोन तिन दिवस मुक्कामी.

दीप्स's picture

23 Sep 2011 - 4:10 pm | दीप्स

विनोद्जी
छान लिहिले आहे तुम्ही आणि खरेही आहे ते. अहो माझा स्वतःचा अनुभव सांगते. कॉलेजेचे विद्यार्थी पण काही कमी नाही माझे आजोबा खूप आजारी होते त्यांना भेटायला मी गावी गेले आणि आक्षार्षां दिवसभर त्या मुलांनी फोन करून हैराण केले. दर १५ - २० मिनिटाने वेगवेगळ्या नंबर वरून फोन करून राकेश आहे का ?असे विचारायचे आणि मी रोंग नंबर सांगायचे (इथे मला नाव आठवत नाही म्हणून मी राकेश नाव वापरले आहे). असे करत करत संध्याकाळचे सहा वाजले आणि आता मात्र हद्द झली असे म्हणून मी त्या आलेल्या फोनवर भडकले यावेळी एक मुलगी होती तिने मला सोरी म्हणायला फोन केला होता तेव्हा तिने मला सांगितले कि आम्ही रोज काही नंबर जमाकारतो आणि त्यातून लकी नंबर काढतो व दिवसभर त्या व्यक्तीला फोन करून टाईम पास करतो. हे ऐकल्यावर तर माझे चांगलेच सटकले ती तिला चांगलेच झापले आणि समजून सांगितले कि आज मी दवाखान्यात होते माझ्यावरचा प्रसंग काय होता याची कल्पना आहे का तुला? आणि तुम्ही तिकडे मजा करत होते. (मांजराच खेळ होतो उंदराचा मात्र जीव जातो अशी गम्मत ) मग बरेच बोलणे झाल्यावर तिने मला प्रोमिस केले आता पुन्हा ते असे नाही करणार...

तसे बघायला गेलेतर जाश्या नाण्याला दोन बाजू असतात तसेच प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात चांगली बाजू कुठली ते आपण बघायचे असते. असेच या फोनचे पण आहे याच चांगल्यात चांगला उपयोग किवा सदुपयोग असा करायचं हे आपल्यावर असेते .

जाम भारी वाटलं वाचुन, पुर्वी एकदा एका अशा लफड्यात पडलो होतो आणि जवळपास रु.१४०० घालवुन बसलो आहे. आणि त्यानंतर ते सागाचे झाडे लावणॅ, पण ह्या सगळ्या फसवणूकी लग्नापुर्वीच्या आहेत, त्यानंतर जी काय अक्कल आली की ज्याचं नाव ते,

आता असे फोन आले की मी सऱळ सांगतो, ' मला जरा मोठ्या चेकवर सह्या करायच्या आहेत माझ्या सेक्रेटरीशी बोला' अन फोन बायकोला देतो..

पिवळा डांबिस's picture

24 Sep 2011 - 12:23 am | पिवळा डांबिस

आता असे फोन आले की मी सऱळ सांगतो, ' मला जरा मोठ्या चेकवर सह्या करायच्या आहेत माझ्या सेक्रेटरीशी बोला' अन फोन बायकोला देतो..

त्यापेक्षा असं सांगा की "आता माला वाईच टेबलं पुसायची हायती. तुमी जरा आमच्या मॅडमसायबांशी बोला!". असं म्हणुन बायकोकडे फोन द्या....
बायको फोनशी तर डील करेलच पण मॅडमसायेब म्हटल्याबद्दल नंतर तुम्हाला काहीतरी गोड-गुलाबी मिळण्याची शक्यता वाढेल!!!!
:)
आपला अनुभवी,
नाना फडणवीस
;)

असं काय काका,किमान एखाद्या अनोळखी पोरीसमोर तरी आपल्याला आपल्या घरात बायकोपेक्षा मोठं स्थान आहे हे सांगण्याची मजा का हिरावुन घेताय ओ, तेवढंच आत्मिक समाधान.

असं खरंखुरं वास्तव जगासमोर विस्कटुन मांडुन कसं चालेल सांगा बरं?

उगा ' कशी नशिबानं थट्टा आज मांड्ली ; म्हणण्यापेक्षा ' नको न्याह्याळु नितळ काया'; म्हणलं की कसं बरं वाटतं. ना ?

मी-सौरभ's picture

27 Sep 2011 - 3:51 pm | मी-सौरभ

बायको बरीच साधी असावी तुमची.....म्हणून तुम्ही असं म्हणू शकता.

पि.डां. काकांबद्दल मी पामर काय बोलणार :)

शुचि's picture

23 Sep 2011 - 7:24 pm | शुचि

बाप रे!!

असे बरेच लॉटरीवाले समस हल्ली जवळपास रोज येतात. ! डिलीट करुन करुन वैताग आला आहे. :(
फालतु फोन देखील येतात.एकदम वैतागवाडी आहे हा सर्व प्रकार. डु नॉट डिस्टर्बच्या यादीत नाव नोंदवुन देखील परिस्थीतीत काही फरक पडलेला नाय.समस बद्धल आधी तक्रार करायचो...मग समस कोणत्या नंबर वरुन आलाय,समस मधे काय लिवलय इं चौकश्या झाल्या की तक्रार नोंदवुन घेतली जाते,पण समस येणे काही बंद झाले नाहीये. :( कारण दर वेळी वेगवेगळ्या नंबर वरुन समस पाठवले जातात.
सध्या तरी समस डिलीटवण्या पलिकडे काहीच पर्याय नाही. :(

अत्रुप्त आत्मा's picture

23 Sep 2011 - 10:30 pm | अत्रुप्त आत्मा

असले एसेमेस खूप येतात..आपण तर बुवा तात्काळ उडवतो..पण फोनही येतात, मी एकाला---तूला माझा 'फायदा' करून द्यायचाय ना?...मग हे पहिले पैसे पण तूच मला आणून दे..मग मी ते तूला पाहिजे तिथे भरतो...असा उलट बाण मारला होता... त्या कोल्ह्यानी तात्काळ फोन कट केला.... वस्तुतः आंम्ही तुमचं 'कल्याण' करायला आलोय...(आणी नंतर तुमची डोंबीवली करणार आहोत...)...अशी वाक्य कुणीही उच्चारली तरी समजावं ''धोका'' आहे...कारण एम.एल.एम... हे ही असलच आधुनिक बुवाबाजीचं जाळं आहे,,,इथलीही भाषा,साधनं,शैली..हे सर्व काही फसव,मधुर,शीघ्र परिणाम कारक स्वरुपाचं असतं... त्यांनाही हेच उत्तर द्याव--माझे पहिले सगळे पैसे तुंम्ही गुंतवा... लगेच ती गिधाड पुढच्या फांदीवर नव भक्ष शोधायला जातात...

अवांतर- एम.एल.एम.ची आंतरीक उद-घोषणा ---आमचे येथे स्वतःच स्वतःला फुकटात फसवुन मिळेल..... ;-)

नगरीनिरंजन's picture

23 Sep 2011 - 10:33 pm | नगरीनिरंजन

छान लिहीलंय.
चेतन सुभाष गुगळे यांचे यावर मत आणि अनुभव ऐकायला उत्सुक आहे.

शैलेन्द्र's picture

24 Sep 2011 - 12:03 am | शैलेन्द्र

त्यांच मत ते मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत देतीलच.. आणी त्यावर शासनाचा जी आर पण निघेल.. थोडा दम काढा.

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Sep 2011 - 10:37 am | चेतन सुभाष गुगळे

असे (https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...) जर एखादे गंभीर प्रकरण असते तर त्यांच्या कडे तक्रार केलीही असती, आणि त्यांनी नक्कीच दखल घेतली असती, पण ज्या समस्या आपल्या पातळीवर सोडविता येण्याजोग्या असतात त्याकरिता त्यांना त्रास कशाला द्यावा?

(अवांतर: उद्या कोणी म्हणेल मिसळपाव वर नको ते प्रतिसाद देऊन जेरीस आणणार्‍या सदस्यांचा बंदोबस्त करण्याकरिताही मुख्यमंत्र्यांकडे बैठक भरवा. अशा किरकोळ बाबींकरता त्यांची मदत मागायची तर मग सरकार कोणी चालवायचे?)

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Sep 2011 - 10:22 am | चेतन सुभाष गुगळे

तुमचा मोबाईल नंबर डू नॉट डिस्टर्ब लिस्ट मध्ये नोंद केलेला असतानाही नको असलेले कॉल वा संदेश येत असतील तर ट्राय कडे तक्रार नोंदवा. दोषींना अडीच लाख रूपये दंड होईल. अर्थात याकरिता आपला वेळ खर्चावा लागतो व पाठपुरावा करावा लागतो.

मी एक सोपा उपाय केला. स्नॅपडील वाले मला रोज संदेश पाठवित. एकदा तर त्यांनी मला रात्री अडीच वाजता संदेश पाठविला. मग मी सरळ त्यांच्या संकेतस्थळावरून एक Cash On Delivery पद्धतीने order नोंदविली. प्रत्यक्षात वस्तु माझ्यापर्यंत पोचल्यावर ती घेण्याचे नाकारले. त्यानंतर कंपनीतून फोन आला, "तुम्ही वस्तु मागविली आणि नंतर पैसे भरून ती स्वीकारण्यास नकार का दिलात?" मग उत्तरादाखल मी त्यांना सांगितले की माझा फोन डू नॉट डिस्टर्ब मध्ये नोंद असूनही तुमचे संदेश येत असतात. मला मनस्ताप होतो, म्हणून तुम्हालाही दिला (मी कुणाचंच काही फुकट घेत नाही, अगदी मनस्ताप देखील). बाई काय समजायचं ते समजल्या. माफी मागत पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची त्यांनी ग्वाही दिली. आता त्यांच्याकडून संदेश यायचं बंद झालंय. मला नको असणारे संदेश पाठविणार्‍या बहुतेक सर्व कंपन्यांना मी असा दणका देतच असतो. त्यामुळे आंतरजालावर अनेक ठिकाणी अगदी उघडपणे माझा मोबाईल क्रमांक प्रकाशित असला तरी सहसा त्यावर आता मनस्ताप देण्याची आगळीक कुठली कंपनी करीत नाही.

प्रचेतस's picture

24 Sep 2011 - 12:07 pm | प्रचेतस

मलाही स्नॅपडील आणि फ्युचरबाझारचे समस रोज असतात, आता हाच उपाय करून पाहीन म्हणतो.

नगरीनिरंजन's picture

24 Sep 2011 - 2:03 pm | नगरीनिरंजन

अपेक्षेप्रमाणे उपयुक्त आणि मार्गदर्शक प्रतिसाद! धन्यवाद!

कोणी कोणतीही गोष्ट आपल्याला फुकट का देतयं? पैसे कधी कोणी फुकट देतं का? जरा विचार करावा...बाकी अनोळखी समस वर विश्वास अज्जिबात ठेउ नये...कंपनी मुलाखतीसाठी समस पाठवते का, पैसे मागते का?
लोकं पण कशावरही विश्वास ठेवतात.

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Sep 2011 - 10:47 am | चेतन सुभाष गुगळे

<< कोणी कोणतीही गोष्ट आपल्याला फुकट का देतयं? पैसे कधी कोणी फुकट देतं का? जरा विचार करावा... >>

पूर्णत: सहमत. ज्यांना कमी कष्टात जास्त मिळवायची हाव असते तेच असला जुगार खेळायची जोखीम पत्करतात आणि सर्वस्व गमावून बसतात. मेहनत करून त्याचा योग्य मोबदला मिळण्याची आशा ठेवलीत तर माणूस सहसा फसत नाही.

मी-सौरभ's picture

27 Sep 2011 - 3:52 pm | मी-सौरभ

या संदर्भात बातमी आली आहे...
त्यामुळे काही फरक पडेल असे वाटते....