गुप्तकाशीतील योगी 2

यकु's picture
यकु in जनातलं, मनातलं
31 May 2012 - 4:50 am

गुरुमाऊली नवरत्न नाथांनी माझ्या दीक्षेचा वृत्तांत कोणताही आडपडदा न ठेवता कथन करण्‍यास परवानगी दिली आहे. कारण जे काही त्यांच्याकडे आहे ते परोपकारार्थ वापरलं जावं असं त्यांनी सांगितलंय. तर काल ज्या ठिकाणी थांबलो होतो तिथून सुरु करु.
विलासराव आणि मी त्या राजराजेश्वर मंदीराच्या प्रांगणात सॅक टाकून निवांत बसलो. मस्त वारा सुटला होता, विलासराव म्हणे
आपल्याला झोपायला हीच जागा मस्त आहे. म्हटलं बरंय - इथेच झोपू. पण पिडा अशी झाली की मला लागली होती उन्हाळी!
विलासरावला मी ते आधीच सांगितलं होतं आणि त्या टॉकीज जवळ एकदा जाऊन आल्यानंतरही चार-पाच वेळा जाऊन यावं लागलं होतं.

एरव्ही मला कधी उन्हात फिरायची सवय नाही. कंपनीत जाताना रिक्षावाल्याला वीस रुपये गेले तर गेले, पण भर दुपारी उन्हातून चालत जायला जीवावर येतं. सकाळी कधी जाग आलीच तर दहा वाजता मात्र रिक्षाने जात नाही, आणि रात्री परत येतानाही रिक्षा नसला तरी चालतो. मग आधीच्या रात्री झोप झालेली नसताना दिवसभरात डांबरी रोडवरुन 14 किलोमीटर तंगडेतोड केल्यावर आम्हाला उन्हाळी लागणारच! विलासरावलाही रोज-रोज उन्हातून 25-30 किलोमीटर चालून माझ्यापेक्षाही जबरदस्त उन्हाळी लागली होती. उठून लघवीच्या जागी जाईपर्यंतही तो त्रास सहन होत नव्हता म्हणे. पण त्यांनी कुठल्यातरी गावात मेडीकलवाला गाठला आणि औषध घेतलं; पण ते घेऊनही फरक पडला नाही वाटतं, कारण त्यांनी दुसर्‍या एका माणसाने दिलेली आणखी एक गोळी घेतली, कारण हे जबरदस्त औषध आहे आणि उन्हाळी एका फटक्यात थांबेल असा छातीठोक विश्वास त्यांना भेटलेल्या कुठल्यतरी अस्सल एमपीवाल्यानं दिला होता - आणि ते घेतल्यानंतर त्यांची उन्हाळीही थांबली. त्यांची रोजची नर्मदा पूजा झाल्यानंतर त्यांनी सॅकमधून ती दोन्ही औषधं काढली आणि दोन्ही घ्‍यायला सांगितली, कारण विलासरावचा गुरुमंत्र ! आपल्याला काय कळतं? नेमक्या कोणत्या औषधामुळं आपल्याला गुण आलाय दोन्ही औषधं घेतली असतील तर नक्की कळू शकत नाही. मी ही उन्हाळीनं बेजार असल्यानं काही समजून घ्‍यायच्या मूडमध्‍ये नव्हतोच, उन्हाळी थांबण्‍याशी मतलब ;-)

तर त्यांनी दिलेली ती औषधं घेतली आणि निवांत आडबाजूला जाऊन मोकळा होत राहिलो. चालून चालून पाय बधीर झाले होते, झोप नसल्यानं मेंदू नीट काम करीत नव्हता. विलासराव म्हणाले चला घाटावर जाऊन येऊ. तो घाट, तो महेश्वरचा अभेद्य स्‍थापत्य आणि आत कितीतरी प्राचीन सुंदरतम् ईमारती असलेला किल्ला किती जुना आहे देवजाणे. महिरपदार कमानीनंतर नर्मदेच्या पात्रात उतरलेल्या लाल दगडांच्या पायर्‍यांवरुन खाली गेलो. घाटाच्या दगडावर बसून थेट नर्मदेत पाय सोडले - त्वदीय पाद पंकजम् नमामि देवि नर्मदे! नर्मदा एवढी जीवंत आहे, की माणसात असलेल्या एकन् एक गुणाचं दर्शन ती तिच्यासोबत चालणार्‍या लोकांना घडवते. नर्मदेनं माझ्या पायाला केलेल्या, जगातल्या मी तोपर्यंत अनुभवलेल्या शीतलतम् मालिशनं पायांचा बधीरपणा कुठल्याकुठे पळून गेला. नर्मदेत पाय सोडून

विलासराव आणि मी खूपवेळ गप्पा मारत राहिलो.

आत्मशून्य कुठे थांबला होता देवजाणे. नर्मदेवर कितीतरी घाट आणि कितीतरी आश्रम. घाट चढून परत वर आलो. खाली जातानच माझं लक्ष घाटाच्या उजव्या बाजूस उभ्या खडेसर योग्याकडे गेलं होतं आणि तो विचार माझ्या मनात राहिला होता. असं वाटलं कशाला हे लोक शरीराला इतके कष्‍ट देतात? म्हणजे एकदा ह्यांनी ठरवलं की उभंच रहायचं, तर कित्येक महिने उभेच रहातात. एवढी नर्मदा समोर वाहतेय - मस्त ती देते ते खावं, प्यावं - तिच्याच मांडीवर बसावं-उठावं, हसावं, रडावं तर ते नाही! हे हट्‍टाने उभेच रहाणार, हे हठयोगी. सिद्धीबिद्धी, तंत्रमंत्र, साम-दाम-दंड-भेद यांच्याकडे असायचेच.

च्यायला आपण कुणासारखाही एक साधाच माणूस - काहीच मिळालं नाही आपल्याला, आणि काही मिळवण्याचीही गरज नाही, उलट जे जे जमवलंय ते आपोआप सुटतंय, हे बरंच आहे - वगैरे विचार माझ्या मनात आले होतेच. वर राजेश्वर मंदीरासमोर सॅक टाकून दिल्या होत्या तिथे आलो. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसलो. चित्रगुप्तांनी मागे अहिल्याबाईंच्या काळातील कागदपत्रांचा धागा मिपावर टाकला होता, तर ते अहिल्याबाईंचे वंशज कोण रॉबर्ट की कोण ते कुठे भेटू शकतील ते विचारावं म्हणून जानव्यानं पाठ खाजवत मंदीराच्या पायरीवर पुजारी महाराज बसले होते त्यांच्या खालच्या पायरीवर जाऊन बसलो. हो ना! उगाच त्यांना अपमान झाला असं वाटायला नको. त्यांना विचारलं तर त्यांना आधी मी काय विचारतोय ते लक्षातच येईना. पुन्हा पुन्हा 'अहिल्याबाई के वंशज, रॉबर्ट कुछ नाम है ना' वगैरे सांगितल्यावर ते म्हणे 'हां, हां, वो - वो है, लेकीन उनका नाम राजा शिवाजीराव है.. क्या करना है उनसे मिलके?' म्हटलं बुवा अशी अशी कागदपत्रं नर्मदेत बुडवणार आहेत असं ऐकलंय, त्याबाबतीत होतं. तर ते म्हणे 'वो अमरिका में रहते है..' म्हटलं मग इथं कधी येतात? तर ते म्हणे 'आते है कभी कभार आठ दिनों के लिये, और वापिस जाते है.. लेकीन ज्यादातर अ‍मेरिका में ही रहते है..' म्हटलं ग्रंथ मिटला!

मग आमच्या सॅक टाकल्या होत्या तिथे परत येऊन बसलो. विलासराव कुठेतरी गायब झाले होते. ते फ्रिझरकडून येताना दिसले. म्हणे, कुठे जाऊन बसले होते? म्हटलं तो असा असा धागा मिपावर आला होता, तर ते म्हणे जाऊ द्या ना राव - ते मिपावरचे धागे वाचणार आणि तुम्ही इकडं परेशान होणार, इथे आहात तर आनंद घ्या. म्हटलं खरंय, पण आता आलोच आहोत तर काहीच विचारपूस केली नाही असं व्हायला नको.

तेवढ्यात एक मुलगा सांगत आला - 'अरे, आप यहां रुकें है? मैने तो गुप्ताजी को फोन करके बागडी आश्रम में आपके रहने की व्यवस्‍था की है.. उधर चलिए ना..वहां पंखे वगैरा है, यहां रातको मच्छर काटेंगे' वगैरे. एकूण इथे थांबू नकाच. ते ऐकून विलासराव म्हणे इथंच बरंय, मोकळी हवा आहे, झोप मस्त लागेल. त्या पोराला म्हटलं, 'हमारा एक दोस्त खोजना है, उसको मिल आते है, और आ जाते है.. किधर है वो आश्रम?' तर तो खालच्या बाजूला हात करुन म्हणे, 'ये क्या, यहीं नीचे है.. देखो, इतनी अच्छी व्यवस्‍था है वहां, आ जाना उधर.' विलासरावांना त्या मंदीराचं ते प्रांगण आवडलं होतं, आणि आम्ही रात्री तिथेच झोपणार होतो, पण आता कुणी एवढ्या प्रेमानं स्वत: येऊन व्यवस्‍था करीत असेल तर काय बोलणार. तरी पण 'बट व्हाय?' हे वाटलंच होतं. विलासरावांनाही मी हे विचारलं होतं - ते म्हणे आता आपली वृत्तीच अशी असते त्याला काय करणार? आणि त्यांनाही कुणीतरी येऊन सांगितलं होतं की रात्री फार डास चावतील इथे झोपू नका. म्हणून त्याला म्हटलं, 'हमारा एक दोस्त परिक्रमा में है, यहां कोई पंढरीनाथ आश्रम है, वहां रुका है.. उसको पहले मिल आना है.. वो आश्रम किधर है?' तर सोनू म्हणे 'अरे वो घाट पर बहोत दूर है..' म्हणून तो निघून जाऊ लागला. त्याला म्हटलं, थँक्यू सोनूभैय्या..मिल आते है उसको. हा सोनूभैय्या म्हणजे कोण ते लक्षात आलं ना? तोच तो, आम्ही महेश्वरमध्‍ये प्रवेश केल्यानंतर ज्याला पत्ता विचारला होता आणि ज्यानं 'जल्द ही मिलते है' म्हटलं होतं तो!

विलासरावांनी त्यांच्यासोबत बाटलीत असलेल्या नर्मदेची आरती वगैरे केली, मलाही आग्रहानं नर्मदेची आरती म्हणायला लावली. ते झालं की मी आत्मशून्याला पाहून येतो म्हणून पुन्हा घाटाखाली गेलो. सायंकाळनंतरचं प्रसन्न वातावरण होतं. घाटावर हॅलोजनचे मोठ्ठे लाइट लागले होते. लोक मस्त मजा करीत होतो, पोरी फुगड्या, शिवाशिव खेळत होत्या, काही यात्रेकरु लोकांची जेवणखाणं सुरु होती. आता इथे पंढरीनाथ आश्रम शोधणे आले! विचारत विचारत पुढे जाऊ लागलो. कुणीतरी काहीतरी खूण सांगितली, त्या दिशेने दूरपर्यंत जाऊन आलो, पण जिकडेतिकडे शुकशुकाट, आणि अंधार, तरी बरं रामदासकाकांनी दिलेली, विलासरावचा फार जीव असलेली बॅटरी हातात होती. त्या जुन्यापुराण्‍या घाटावरच्या नेमक्या कुठल्या आश्रमात आत्मशून्य थांबला असेल देवजाणे! निराश होऊन परत आलो. तरी परत येताना एकजण तिथे निवांत बसलेला दिसला. त्याच्याजवळ जाऊन बसलो आणि पंढरीनाथ आश्रमाबद्दल विचारलं, तर ते म्हणे 'मैं पंढरीनाथ आश्रम में ही रहता हूं.. किसे खोजना है?' म्हटलं बुवा असा असा मित्र परिक्रमेला आला आहे, धामणोदमध्‍येच भेट घेता आली असती,

पण तो पुढे निघून आला आणि इथे पंढरीनाथ आश्रमात थांबलाय. ते म्हणे दिखने में कैसा है? म्हटलं 'है मेरे जैसा ही, लेकीन अब
परिक्रमा में है तो आधा भी नहीं रहा होगा..' ते म्हणे 'महाराष्‍ट्र के चार लोग आश्रम में रुके है, लेकीन आप बता रहें है वैसा वहां कोई
नहीं है. मै आश्रम में ही जा रहां हूं.. फिर एकबार पूछताछ करता हूं..' म्हटलं, 'मिला तो देखीए, उसको बताना तुम्हारे दोस्त तुम्हें खोज रहें है और राजराजेश्वर मंदीर में रुकें है' ते माझ्याकडं पाहून गोड हसले, त्यांना धन्यवाद!' म्हणून तिथून उठलो आणि नर्मदेच्या
घाटावरची शोभा पहात-पहात परत येऊ लागलो.. भूक लागली होती पण घाटावर खाण्‍यापिण्याचं दुकान दिसत नव्हतं. रंगबिरंगी
बर्फगोळ्याचे गाडे होते, तिथेच एक खाल्ला आणि एक विलासरावसाठी द्रोणात घेऊन राजराजेश्वर मंदीराकडे परत आलो. ते म्हणे इथे
नकोच राव, रातच्याला डास झोपू देणार नाहीत असं सगळे लोक म्हणत आहेत. म्हटलं चला! बागडी आश्रम जिंदाबाद. ते म्हणे तुम्हाला माहित आहे तो आश्रम? म्हटलं त्याला काय, सोनू म्हणाला ना इथेच खाली आहे म्हणून. जाऊन पाहू. ते म्हणे चला. पुन्हा खाली आलो.

सोनू कुठे गायब झाला होता देवजाणे. विलासरावला म्हटलं तुम्ही वरच थांबा. आत्मशून्याला शोधून घाट चढून वर येताना सोनू त्या योगी महाराजांसोबत गप्पा मारत उभा होता. खाली गेलो तर ते एकटेच उभे असलेले दिसत होते. त्यांना विचारलं, 'सोनू कहां है?' त्यांचं अवधान तीव्रतम होऊन नजर माझा वेध घेत असल्याचं दिसलं आणि नजर तशीच माझ्यावर खिळलेली राहून ते देत असलेल्या उत्तरावर लक्ष न देता ते म्हणून गेले, 'बाजार में जाने की बात कर रहा था..'

परत वर विलासरावांकडे आलो. म्हटलं चला, आपणच शोधू, सोनू कुठेतरी गेलाय. सॅक वगैरे घेऊन खाली आलो, तो बागडी आश्रम तिथेच खाली होता, पण दार बंद दिसत होतं. एक कुणीतरी बाई हातात पुजेचं साहित्य हातात घेऊन घाट चढून आमच्याकडे येताना दिसल्या. आम्ही विचारी होऊन तिथे उभे असलेले पाहुन त्यांनी आम्हाला विचारलं, 'यहां क्यों खडे, है, क्या चाहिए?' विलासराव त्यांच्याशी बोलले. परिक्रमेत आहोत, इथे आत झोपायचं थांबायचं आहे, पण आश्रम बंद दिसतोय. त्या बाईंनी स्वत: गेट वाजवलं, आतल्या बाईंना उठवलं आणि हे लोक आलेत, यांना इथे झोपायचं आहे वगैरे सांगितलं. आत गेलो. आश्रमाच्या आत एक आरसीसीचं घर होतं, आणि एका बाजूला एक मठी टाईप जागा होती, तिचा दरवाजा बंद. ते दार वाजवलं. आतून कुणीतरी उघडलं.

आम्ही तिथे थांबायला येणार असल्याचं त्यांना सोनूने आधीच सांगितलं असावं. कारण त्यांनी फार आगतस्वागत केलं. तिथे एक अगदी शरीराची काडी शिल्लक राहिलेले, जटासंभार, दाढी मोकळी सोडलेले एक संन्यासी, दुसरे एक परिक्रमी आराम करीत होते. त्या आश्रमातल्या दर्भांपासून तयार केलेल्या गादीवर निवांत बसलो. हे कोण, ते कोण झालं. त्यातल्या एकाने जेवण झालंय का, की करायचं आहे हे विचारलं. विलासराव म्हणे, जेवण नकोय आज, आमच्याकडे खरबूज आहे, सब मिलके खायेंगे. त्यांनी पुन्हा आग्रह केला, फिर भी, कुछ चाहिए तो बता दिजीए, अभी बनाते है..चाय वगैरा कुछ? मी म्हटलं सब के लिये बन रही है तो बनाईये, हमारे लिये स्पेशल मत बनाओ.. मग ते उठले आणि आतल्या बाजूला असलेल्या स्वयंपाक घरात गेले. आम्ही बसलो होतो तिथून गॅस वगैरे दिसत होता. विलासरावांनी मला सॅकमधून खरबूज काढायला लावलं. त्या चहा बनवत असलेल्या रामभक्त माणसाला बतई कुठेय ते विचारलं आणि दरडावून बाहेर बोलावलं, 'गॅस बारीक करुन चहा बनत राहू द्या, इकडे या खरबूज खाऊ' तिथेच शेजारी ठेवलेल्या करंडीत दोनचार बतया पडलेल्या होत्या, विलासरावांनी त्यातलीच एक उचलून टरबूज कापायला सुरु केलं होतं.

त्या रामभक्ताने बाहेर येऊन चांगली धार असलेली बतई दिली आणि विलासरावांनी आधीची बतई खाली ठेऊन टरबूजाच्या दहा बारा फोडी केल्या आणि त्या संन्याशाला दोन आणि दुसर्‍या माणसाला दोन दिल्या. विलासराव आणि मी एकाच ताटात ठेवलेल्या खरबूजाच्या फोडी खात होतो. चहा बनून बाहेर आला. त्या रामभक्तालाही विलासरावांनी दोन फोडी दिल्या, मला आग्रह करुन शिल्लक राहिलेली फोड खायला लावली. म्हटलं बास ! पोट भरलंय. ते म्हणे घ्या हो, पुन्हा भूक लागेल रात्री, मग मी त्या फोडीचे आणखी दोन भाग केले, एक त्यांना दिला एक मी खाल्ला. विलासराव म्हणे तुमचं आमच्यावर भलतंच प्रेम! मग झोपण्‍याच्या तयारीला लागलो. मी पँट वगैरे काढून बर्म्युडा घातली. जीन्सची पँट काढताना बघून ते संन्यासीबाबा हसून म्हणे, 'अंदर हवा नहीं जाता है.' दर्भांच्या गाद्यावर निवांत पसरलो आणि थोड्यावेळ गप्पा हाणत बसलो. विलासरावांनीही तिथेच थप्पी लावलेल्या दर्भाच्या गाद्यांतून एक गादी काढून त्या मठीतल्या देवघरासमोर टाकली, त्यावर त्यांची सतरंजी टाकली आणि आडवे झाले.

रामभक्त बाबाच्या मोबाईलवर गाणी सुरु होती, त्यांना मध्‍ये एकदोन वेळा फोन येऊन गेला - आलेत का ते लोक, जेवणखाण्याची व्यवस्‍था केलीय ना? वगैरे. मग त्यांनी फोनवर अपडेट दिले. सगळे निद्रादेवीच्या आराधनेला लागले. मी पण या कुशीवरुन त्या कुशीवर होऊ लागलो. होत होत रात्रीचा एक-दीड वाजला. सगळे झोपले होते. मला काही झोप येईना. शेवटी उठलो आणि सिगारेट, तंबाखू, बॅटरी बर्म्युडाच्या खिशात टाकली, पाण्याची बाटली घेतली. त्या मठीचं दार उघडून बाहेर पडून लाऊ लागलो तर लागेचना. मग दगड उचलला आणि बाहेरुन दाराला लावला. तरी मध्‍येच त्या रामभक्ताला जाग आलीच ! 'कौन है?' मी म्हटलंच मीच आहे, जरा हो आता हूं. बाहेर पडलो आणि मठी‍ बाहेरच्या ओट्यावर येऊन बसलो.

एवढी शांत रात्र पडलेली! महेश्वर किंवा गुप्त काशी म्हणतात ते पुरातन शहर. आजूबाजूला नुसत्या प्राचीन ईमारती आणि शांतपणे हलणारे महावृक्ष. थोडावेळ बसून राहिलो आणि खाली घाटावर गेलो. सायंकाळी खळखळाट करीत वाहणारी नर्मदा आता गंभीर होऊन शांत वाहात होती. वीतभर लांब मासे अगदी काठापर्यंत येऊन परत जात होते. मध्‍येच डुबूक! करुन वर उडी घेत होते. मांडी घातली आणि डोळे मिटून घेतले. आतही नर्मदाच वाहात होती. अर्धा पाऊण तास बसून राहिलो. डोळे उघडल्यानंतर पुन्हा निरीक्षण करीत बसलो. वर परत जावं वाटेना. घाटावर जटाभार वाढलेले, अस्ताव्यस्त संन्यासी तुरळक पडून होतेच. मला वाटलं हीच माझी झोपण्‍याची जागा. तिथेच अंग टाकलं. शांऽऽऽत! अर्धापाऊण तास गेला असेल की विलासराव मला शोधत आलेच! म्हणे काय यकु? मला वाटलं गेलात काय की नर्मदेमध्‍ये. ते जवळ येऊन बसले. त्यांना म्हणालो विलासराव, योगी आहोत हो आपण पूर्वजन्मीचे. ते म्हणे, आपल्याला हे काही समजत नाही बाबा. ते म्हणे मलाही तिथं झोप येत नव्हतीच. म्हटलं इथेच मस्त आहे, झोपा निवांत. थोडावेळ गप्पा केल्या, झोप आपोआप उतरली. गरमी नहीं, ठंड नही, मच्छर नहीं कुछ नहीं.

सकाळी साडेपाचला जाग आली असेल. घाटावरुन वरुन खाली उतरताना उजव्या बाजूला उभ्या असणार्‍या योगी महाराजांचा विषय कसाकाय निघाला माहित नाही. मी म्हटलं प्रॅक्टीकल करुन पहाणार्‍या लोकांना बरीच माहिती असते. त्यांच्यासोबत बोलून पहायला पाहिजे. असं काहीबाही बरंच बोलून वर मठीत गेलो. कपडे वगैरे घेतले आणि स्नानासाठी परत घाटावर आलो. नर्मदेत मस्त लांबपर्यंत हात मारत जाऊन परत आलो - नर्मदेच्या पाण्यानं अंग स्वच्छ केलं. घाट चढून वर येत असताना बहुतेक विलासराव त्या योगी महाराजांसोबत बोलत बसले आणि मी वर मठीत गेलो आणि थोड्या वेळात परत विलासराव शेजारी येऊन बसलो. त्या दोघांचं काय बोलणं सुरु होतं माहित नाही कारण मी घाटावर बसून नर्मदेचं निरीक्षण करीत होतो. ते नाथपंथीय योगी असून परिक्रमेतच आहेत असं ते म्हणाले. शरीराचं संतुलन गेल्यानं महिनाभरापासून उभेच असून एकूण पाच महिनेपर्यंत उभंच रहायचं आहे वगैरे. ते झोपही गळ्यापर्यंत असलेल्या ओट्यावर काही कपडे ठेऊन त्यावर उभ्यानंच डोकं ठेऊन घेत असावेत, कारण मी रात्री दीड वाजता ध्‍यानासाठी घाट उतरत होतो तेव्हा ते झोपल्यासारखे तर दिसत होते पण झोपले होते की जागे ते त्यांनाच माहित. ते सिल्व्हासा की कुठे नोकरी करीत होते तेव्हा काहीतरी वाचून की कुठल्या घटनेमुळे तीन दिवस सतत रडत राहिले आणि त्यांना उपरती झाली. मग सगळं सोडून ते तिथून शिर्डीला चालत आले. विलासराव अहमदनगर जिल्ह्यातलेच असल्याने त्या दोघांतच संवाद चालला होता. शिर्डीपासून जवळच असलेल्या कोकणखार गावाबद्दल बोलणं सुरु होतं. बहुतेक जनार्दन स्वामी त्यांचे गुरु. कारण जनार्दन स्वामींचा सगळ्यात अव्वल पट्‍टशिष्य होऊन दाखवीन असं काहीतरी त्यांच्या बोलण्‍यात आलं होतं. परिक्रमेबद्दल वगैरे बराच वेळ बोलणं सुरु होतं.

शहरात जाऊन चहा, नाष्‍टा करुन येण्याचा विषय निघाला. ते म्हणे चला, मी पण येतो. मग त्यांनी आधी बहुतेक आम्हाला विश्वेश्वराच्या मंदीरात नेलं. तिथे दर्शन वगैरे घेऊन मंदीरातूनच वर गेलेल्या रस्त्याने आम्ही आम्ही थांबलो होतो त्या मठीत आलो. मी तिथे त्यांचे आणि त्यांच्या पायाचे फोटो काढले. विलासराव म्हणे, झालं! हे लिहिणार आता तुमच्याबद्दल इंटरनेटवर. म्हटलं हो, आपल्याला प्रॅक्टीकल करुन पहाणारी माणसं आवडतात. योगी महाराज हसले.

त्या रामभक्त माणसानं सगळ्यांसाठी चहा केला.
योगी महाराजांना चिलीम प्यायची असावी, म्हणून आमच्या मठीतूनच मागच्या बाजूला जाणार्‍या दारातून विश्वेश्वर मंदीराच्या शिखराला भिडूनच असलेल्या माळवदावर ते, तो रामभक्त, गांजा वगैरे आणणारा पोरगा, मी आणि मागून विलासरावही येऊन बसले. कुठल्याही प्रकारचा नशा माणसाच्या जाणीवेवर परिणाम करु शकत नाही हे मी भांग खाऊन स्वत: अनुभवलं होतं. माणसाची जाणीव तशीच अभंग रहाते. जाणीव in the sense, whatever drugs you may consume, you cannot get
out of this whole business. शरीर काही काळ निष्क्रिय होऊन पडेल, पण आत जाणीव तशीच कार्यरत असते.
शरीर आणि जाणीव एकात एक गुंतलेल्या दोन गोष्‍टी असल्या तरी त्या स्वतंत्रपणे ऑपरेट होतात, ही शरीर आणि जाणीव ऑपरेट
करणारा सोर्स जाणून घेणं बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्‍ट आहे, आणि ते जाणून घेण्यापूर्वीच You become formless
still in form, thoughtless still with thoughts.

योगी लोक गांजा, भांग वगैरे नेहमी घेतात ते त्यातल्या नशेच्या आनंदासाठी नव्हेच, जाणीवेचा शरीराशी संबंध तुटावा म्हणून. हा वेगळा भाग झाला. पण मी जेव्हा भांग खाऊन रस्त्याने फिरत होतो तेव्हा माझ्या त्या नशेतल्या बोलण्‍या, चालण्‍यात आणि नॉर्मल बोलण्‍या चालण्‍यात काहीच फरक वाटत नव्हता, काही लोक म्हणे भांग खाल्ली की लोक विचित्र वागायला लागतात, भांगेमुळे मला अवधान केंद्रित करण्‍यासाठी जास्त मदत झाली. मागे गवि म्हणाले होते की भांग खाल्ली की लोक तीच-तीच गोष्‍ट पुन्हा पुन्हा करतात, हे मात्र खरं असलं तरी एरव्हीही नॉर्मल असताना आपण त्याच गोष्‍टी पुन्हा पुन्हा करीत असतोच की, फक्त आपल्याला त्या रिपीट होत आहेत याचं भान नसतं. भांग, पिल्यानंतर काही लोकांचं शरीरावरचं नियंत्रण जात असेल, सुरुवातीला माझंही गेलंच होतं, पण भांग खाऊन शरीर आणि मनाचं अवधान साधलं तेव्हा जाणवलं की जाणीव तीव्र होतेय in the sence you can beat anybody intellectually.पण हे एका मर्यादेपर्यंतच मजा देतं. तुम्ही दुसर्‍यांना इंटलेक्चुअली किंवा दुसर्‍या कोणत्याही प्रकारे मात देऊन काय करणार? कोणताही प्रश्न आपला स्वत:चा असतो, आपलं त्याबद्दल काहीतरी इंटरप्रिटेशन असतं आणि आपण ते लोकांवर थापत असतो. Why? एकमेव कारण म्हणजे आपल्याला आतून त्या उत्तराबद्दल Recognition आलेलं नसतं, म्हणून तीच गोष्‍ट आपण बाहेर सांगून बाहेरुन Recognition मिळण्याचा प्रयत्न करतो. बाहेरुन कुणी दिलेलं रेकग्नीशन, तुमची दुसर्‍याने तयार
केलेली कुठलीही ओळख बोगस असते. उदाहरणार्थ यकु चांगला आहे, यकु चांगलं लिहितो, यकु डोकं आऊट करणारं लिहितो, यकु वाईट आहे, यकु गांजेकस आहे, यकु अमका, यकु ढमका काहीही म्हटलं तरी त्याचा माझ्यावर कसाकाय परिणाम होऊ शकतो? Whoever gives me any recognition, that is their own problem - because I don't know how I am & there is no need to know. उदाहरणार्थ मला फार दिवसांपासून प्रश्न पडला होता की लैंगिकतेकडे ओढा का निर्माण होतो? मला असं आढळलं की पूर्ण शरीरभर, नव्हे माणसाच्या अस्तित्वभर संवेदना निर्माण करु शकणारा शरीरातला एकमेव शक्तीशाली पॉइंट म्हणजे शिस्न. जेवढ्या तीव्र संवेदना शीस्नाच्या घर्षणातून उत्पन्न होतात, तेवढ्‍या इतर कुठल्याच मानवी इंद्रियाच्या वापरातून होत नाहीत. So we use that organ again & again to sensitize ourself! बाकी मग त्यामधून निर्माण होणारी पुढची लफडी आपण पाडलेली अर्भकं अमानवी पद्धतीने नष्‍ट करणार्‍या डॉक्टरच्या रुपात समाजात पहातोच.
आता हे सगळं लिहितोय याचा अर्थ सगळ्या लोकांनी भांग खाल्ली पाहिजे, आणि गांजा ओढला पाहिजे असं माझं म्हणणं नाही. फक्त हे असं केल्यानंतर काय झालं ते मी सांगतोय. भांगेच्या चारपाच गोळ्या गादीखाली पडून आहेत, पण आता त्याची गरज राहिलेली नाही, आणि गांजाची तर नाहीच. असो. अवांतर झालं.

तर या सगळ्या गोष्‍टीमुळं आज चिलीम ओढून पहाण्याची संधी आली होती तर ती मी सोडणार नव्हतो. चिलीम वगैरे तयार होईपर्यंत ते योगीमहाराज बोलत होते आणि आम्ही ऐकत होतो. चिलीम तयार होऊन ते झुरका मारत असताना मला जाणवलं की चिलीम हाताच्या पकडीत पकडून श्वास आत घेत असताना कुंडलिनी त्यांच्या डोळ्यांतून ब्रह्मांडात जात आहे, कारण मी पण इकडे काही न करता ते अनुभवत होतो. कुंडलिनी डोळ्यातूनच ब्रह्मांडात जात असेल असं काही नाही, पण तेव्हा डोळे जबरदस्त दिसत होते.
आता कुंडलिनी ब्रह्मांडात जात होती म्हणजे नेमकं काय, तर मला जे अनुभवाला येत होतं ते म्हणजे बसलेल्या स्थितीत असताना
जमीनीला शरीराच्या जेवढ्या भागाला स्पर्श होतो तेवढीच या जगातली अनुभूती शिल्लक उरलीय, बाकी शरीर नाहीच, सगळं केवळ दृश्य, ते दृश्य पहाणारा अस्तित्त्वात नाही. मी घाबरुन गेलो. आणि पटकन हात जमिनीवर टेकले, सगळं ओके होतं. शरीर होतं, मी होतो, माझे विचार होते, सगळं होतं. पण पुन्हा त्यांनी झुरका मारला तेव्हा तीच अनुभूती. मग माझ्याकडंही चिलीम देण्यात आली. मी ओढून पाहिली तेव्हा तोच अनुभव. काहीच फरक नाही. पण एक जाणवत होतं, की ते माझ्‍यात चालू असलेला विचार वाचत आहेत. माझ्या मनात विचार येऊन गेला हे सगळं इंटरनेटवर लिहायला पाहिजे, क्षणात त्यांनी इंटरनेटवर हा अनुभव लिहिण्याबद्दल बोलायला सुरुवात केली. मला वाटतं मी चिलीम ओढत असताना विलासरावांनीच त्या योगी महाराजांना माझ्यामागे उभं राहून आशीर्वादाचा हात वर केलेला फोटो काढला आहे.

आम्ही खूपवेळ चिलीम ओढत बसलो. आम्ही म्हणजे विलासराव वगळता. विलासरावांनाही नवरत्न महाराजांनी चिलीम ऑफर केली होती, पण ते म्हणे मी बिडी, सिगरेट, चिलीम काहीही ओढत नाही. मात्र गांज्याच्या नशेनं माझे डोळे जडावले, डोळे म्हणजे फक्त डोळेच, जाणीव नव्हे.
हा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी परत आम्हाला घाटाजवळच्या त्यांच्या मठीत गेलो. तिथेही बराच वेळ ते माझ्याच मनातले विचार पुढे नेत आहेत हे जाणवलं. विलासरावही येऊन बसले होतेच. मध्‍येमध्‍ये मी त्यांना नेमकं काय चाललंय ते सांगत होतो, तर विलासरावचं ते ठरलेलं उत्तर 'आपल्याला काही कळत नाही.' ते आपले डोळे मिटून विपश्यना करीत होते. मग योगी महाराजांनी आम्हाला चला काही खाऊन येऊ म्हणून बाहेर काढलं. This is something quiet interesting for you to know.
प्रभू रामचंद्राचा जन्म अयोध्‍येत झाला, मग त्यांचं काही नामोनिशाण आज अयोध्‍या म्हणून जे शहर ओळखलं जातं तिथे असायला पाहिजे वगैरे सब झूठ है. प्रभू रामचंद्राचा जन्म महेश्वर किंवा गुप्त काशीत झाला. एकही दगड न भंगलेला, अगदी अक्षत, आत्ता कालपर्वा बांधून काढलाय असं वाटावा एवढा सुंदर राजवाडा आजही महेश्वरमध्‍ये आपल्याला पहायला मिळू शकतो. मी पाहिलाय, म्हणजे माझे गुरु नवरत्न नाथ यांनी तो मला दाखवलाय. तुम्ही तिथं पहायला गेलात तर त्या राजवाड्यावर पाटी आहे 'राम मंदीर' आणि गाभार्‍यात शिव पिंड आहे.

आता हे गौडबंगाल समजूनच घेता येणार नाही, त्यासाठी भारतीय संस्कृती काय चीज आहे ते आधी नीट पहावं लागेल. इतिहास
संशोधकांना थोडे कष्‍ट घेऊन या दाव्याबद्दल खरंखोट करता येईल. चित्रगुप्तांनी मिपावर टाकलेल्या धाग्यानुसार, अहिल्याबाईंच्या काळातील जुनीपुराणी कागदपत्रे नर्मदेत बुडवली जाणार आहेत, तत्पूर्वी ते रॉबर्ट किंवा राजा शिवाजीराव या अहिल्याबाईंच्या संपर्क साधून ती कागदपत्रे हस्तगत करावीत आणि ते राम मंदीर अहिल्याबाईंनी बांधलं का ते तपासून पहावं. They will not find any record. अहिल्याबाई या फक्त त्या मंदीराच्या संरक्षक होत्या, कारण basically she was Shiv Yogini.

काळाच्या दृष्‍टीनं विचार करायचा तर भगवान शंकर आधीचे, राम त्यांच्या नंतरचे, आणि त्यांच्या नंतरच्या अहिल्याबाई. त्यामुळं ते
बांधकाम अहिल्याबाईंनीच केलंय असं म्हटलं जाणार. आता कदाचित रामाच्या मंदीरात शिव पिंड आणि तो राजवाडा अहिल्याबाईंनी बांधलेल्या किल्ल्यात का त्याची संगती लागली असेल.

हा राजवाडा पाहिला आणि नंतर त्यांनी आम्हाला एका शक्तीपीठाचं दर्शन करुन आणलं.

यानंतर त्यांनी ते ज्या स्‍थळी साधना करत होते ते स्‍थान दाखवलं. तिथे सेम ते जसे उभे रहातात तशीच एक मूर्ती आहे - त्या दैवताचं नाव बटलेश्वर.

त्यानंतर त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या शरीरात परकाया प्रवेश केला आणि मला हे सगळं काय आहे त्याचं उत्तर विचारलं. वरुन चिलमीच्या फेर्‍यावर फेर्‍या चालूच होत्या. म्हणजे थेट आव्हानच! ते म्हणे हे सगळं काय आहे ते तू मला समजून सांग, मी तुझा शिष्य बनतो, नाहीतर मी तुला समजून सांगतो - तु माझा शिष्‍य बन. मी म्हटलं येताना मी काहीच सोबत आणलेलं नाही, काहीच नव्हतं. मै जब नहीं था तो मै बना कैसै? असं काहीतरी बोललो आणि म्हटलं मला काही विचारु नका. ## वर लाथ मारुन इथून हाकलून दिलंत तर जास्त बरं, पण अशी परिक्षा पाहू नका. दुसर्‍याच्या शरीरात शिरण्‍याचे हे प्रकार मला समजूच शकत नाहीत. या उत्तराने कदाचित त्यांचं समाधान झालं असावं. त्यांनी आडबाजूला जाऊन मला दीक्षा देण्यासाठी त्यांनी त्यांच्या गुरुंची प्रार्थना करुन परवानगी घेतली आणि मी दिलेलं उत्तर ऐकून त्यांचे गुरु 'अवघड काम आहे! देऊन टाक!' म्हणाल्याचं त्यांनी दीक्षा झाल्यानंतर आम्हाला सांगितलं. त्या स्‍थानाहून परत येत असताना एका पाणथळ जागी चार की पाच कुत्रे डुंबत होते त्यांचं दर्शन घ्यायला लावलं. ते भैरव आहेत असं त्यांनी सांगितलं. परत आम्ही त्या भवानीच्या किंवा शक्तीच्या मंदीरात आलो. तेव्हा तेच भैरव भवानीच्या मंदीराजवळ येऊन बसले होते. तिथे थोडावेळ थांबलो. निघताना रस्त्यात त्यांनी मला सांगितलं 'माझं मागून दर्शन घेणारा माणूस भाग्यवान बनतो.' मी घेतलं.

त्यानंतर आमची पदयात्रा एका कटींग सलूनमध्‍ये गेली. तिथल्या न्हाव्याला सांगितलं इसके बाल कटवाओ. पोलीस कट रखो. इथेही परकाया प्रवेश चालूच होता. पोलीसकट मला आवडतो. माझ्या सिनीयर पोलीस प्रॉसीक्यूटर राहिलेल्या आजोबांना पाहून पाहून मला तसे केस ठेवणं खूप लहानपणापासून आवडतं. अर्थात ते स्वत: काही पोलीस नव्हते, पण पोलीसात निवड झालेल्या लोकांना कायदा शिकवणार्‍या निवासी पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य होते, मग त्यांच्याही केसांची स्टाइल पोलीसांसारखी असणार आणि मलाही पोलीस कट आवडणार. पोलीस कट सांगूनही न्हावी कायच्या काय कटींग करतात ते सोडून द्या!

मग आम्हाला त्यांनी एका हॉटेलमध्‍ये नेलं. तिथे विलासराव आणि मी मस्त दाबून जिलब्या, कचोर्‍या हाणल्या. नवरत्न नाथांनी फक्त चहा घेतला. बील मी दिलं - तेव्हा विलासराव 'ये राजा आदमी है' म्हणाल्याचं मला आठवतंय. त्यांना मोबाईलचं एक रिचार्ज कार्ड पाहिजे होतं, ती त्यांनी मला आणायला सांगितली. मी एका ऐवजी चार आणली. एक कुठेतरी पडलं असं ते म्हणत होते, मी तरी जेवढी आणली तेवढीच त्यांच्या हवाली केली. मी माझी सँडल भवानीच्या मंदीरात गेलो असताना तिथेच विसरुन आलो होतो. मग परत त्यांच्या मठीत येईपर्यंत पुन्हा एकदा माझी सत्वपरिक्षा सुरु! ते अनवाणी पुढे आणि मी मागे - वर दुपारचा तळपता सूर्य. जमीन असली तापली होती की ज्याचं नाव ते, निखार्‍यावरुनच चालत होतो म्हटलं तरी चालेल. रस्ताभर नुसता ठणाणा बोंबलत होतो - बस करो! बस करो! वरुन पुन्हा विलासरावांचे पायाखालचा ताप आणखी वाढवणारे प्रश्न! नवरत्न नाथ पुढे निघून गेले की गुप्त झाले पत्ता नाही, पण विलासराव सोबत होते. राजराजेश्वराच्या मंदीरापर्यंत आलो तेव्हा विलासराव त्या पुजार्‍याचं निमित्त करुन प्रेमळपणे उखडले. ही झोपायला चांगली जागा आहे काय? झोपा आता जाऊन तिथे. म्हटलं मरण जवळ आलं! एवढ्या उन्हात त्या तापलेल्या फरशीवर झोपायचं? विलासरावला पुन्हा विचारलं, झोपू का? ते म्हणे काही गरज नाही, चला पुढे!

शेवटी पुन्हा नवरत्न नाथांच्या मठीत येऊन पोचलो. तिथे त्यांनी त्यांच्याकडंचं जानवं काढलं. सध्‍या तीनच तारा देतो म्हणे. त्या जानव्यात त्यांनी त्यांच्या गळ्यातल्या रुद्राक्षाच्या माळेतला एक रुद्राक्ष ओवला. माझं नाव काय आहे ते विचारलं. तोपर्यंत नाव, गाव काही विचारलं नव्हतं. हे जानवं हातात धर आणि सूर्याकडं एकटक पाहून दहा वेळा गायत्री मंत्र म्हण म्हणाले. मी ते जानवं चुकीचं पकडलं होतं. दोन्ही हाताच्या तर्जनी व अंगठ्यात जानवं लांबवून त्यातून सूर्याकडे पहायचं अशी पद्धत त्यांनी सांगितली. बाहेर गेलो. सूर्य अगदी डोक्यावरच होता. त्यांनी सांगितल्याप्रमाणं कृती केली आणि गायत्री मंत्र म्हणत गेलो तेव्हा वरच्या सूर्याचं तेज खाली फाकत येऊन माझ्या त्रिनेत्रावर आदळलं, आणि आत सावलीत आलो तरी जिकडे नजर जाईल तिकडे झगझगीत प्रतिबिंब बराच वेळ चमकत राहिलं. आत आलो तेव्हा ते म्हणाले - देखो, चेहरा भी बदल गया है.

पुढेही पुन्हा पझल सॉल्व्हींग होतंच. बहुतेक विलासरावांनी येताना दोन खरबूजं घेतली होती. नवरत्न नाथांनी त्यापैकी एक कापायला लावलं. अर्धं भक्कल मला दिलं आणि अर्धं विलासराव आणि नाथांचा कुणीतरी शिष्‍य आला होता त्यांना दिलं. नाथ म्हणे हे न तोडता खा. टरबूजाचं ते भक्कल मी न तोडता तसंच कोरुन कोरुन खाल्लं. ते म्हणे तु ब्राह्मणाच्या कुळातला म्हणजे तुमचं खापर निर्गुण ब्रह्म भोगणारं. आता हे सुलट ठेऊन नर्मदेत सोडून दे आणि म्हण की नर्मदे मला हा धर्मलाभ झाला आहे, मला हे जे मिळालं आहे त्याचागैरवापर न करण्‍याची बुद्धी दे, हे तुझं तुला अर्पण असो. हे झाल्यानंतर नवरत्न नाथ म्हणे यानं स्वत: काही गोष्‍टी समजून घेतल्या होत्या, हे सगळं प्रकृती ठरवते. पात्र तयार असेल तर त्यात पडतंच अशा अर्थानं काहीतरी. मला आज खूप चांगलं वाटलं. एरव्ही मी कधी बाहेर जात नाही, पण आज फिरल्यानं खूप बरं वाटलं. यानं मला ओळखलं आणि मी याला ओळखलं. विलासराव आणि मी खाली नर्मदेकडे गेलो. ते टरबूजाचं भक्कल त्यांनी सांगितल्याप्रमाणं नर्मदेत सोडलं, स्नान केलं. विलासराव नर्मदेचं पाणी हातात घेऊन खाली नर्मदेत सोडत म्हणाले ही गोष्‍टी एवढी सोपी आहे.

पुन्हा मठीत आलो. पुन्हा गप्पा होत राहिल्या. पुन्हा नाथांनी चिलीम पेटवली. त्यांनी ओढली. माझ्याकडं दिली तेव्हा ती विझली होती. मला ते म्हणे पेटव आणि ओढ. यावेळी बहुतेक विलासराव मठीत नव्हते, ते आम्ही थांबलो होतो तिकडे गेले होते. विलासराव मला महेश्वरहून पुढे मंडलेश्वरपर्यंत सोबत चला म्हणत होते. मला इंदूरला परतावं वाटत होतं. नवरत्न नाथांनी विलासरावांना त्यांच्या चातुर्मासासाठी काही पत्ते सांगितले. काहीही ओळख सांगण्याची गरज नाही म्हणे. मी परत वर गेलो, सँडल दिसत नव्हती. नाथ म्हणे तु भवानीच्या मंदीरात विसरुन आलास. म्हटलं तिकडे जावं लागणार. ते म्हणे काही गरज नाही, साडेसहा वाजता मिळून जाईल. मागे कधीतरी किडा म्हणून दोस्तांसोबत चिलीम ओढली असली तरी स्वत: हातात धरुन पेटविण्याची ही पहिलीच वेळ होती. मी ती सिगारेटसारखी थेट तोंडात पकडली तेव्हा ते जे भडकले, सांगता सोय नाही! तुझ्या मनात काहीतरी वेगळं आलं म्हणून ते तुला देत नाहीयेत असं ते म्हणाले. दोन-तीन दिवसात तुझ्या तोंडावर काळिमा पसरेल वगैरे काहीतरी बोलले, डोळे तप्त! मी म्हणालो काय चुकलं माहित नाही, हे असंच आहे, हवंतर मारुन टाका - पण असं काही बोलू नका. मग त्यांनी माझ्या तोंडावरुन हात फिरवला. म्हणे - बस्स! बस्स! आजच दीक्षा झाल्यानं त्यांनी तुला पुन्हा एकदा दिलं नसेल. जेवढं मिळालंय तेवढ्यावर समाधान मान. गोल श्रीयंत्र वगैरे असतं तसं काहीतरी काढलं आणि ते माझ्या कपाळावर लावलं. ते त्यांच्या पूजेतल्या नर्मदेच्या फोटोकडं बघून म्हणाले - आई याला अक्कल दे - अभी समझता नहीं है. वीर्य व्यर्थ घालवणं बंद कर. लग्न होईल तेव्हा पहिली तीन वर्षे बायको आणि तु दगडाच्या मूर्तींसारखे झोपा. तीन वर्षांनंतर जेव्हा वेळ येईल तेव्हा एकच थेंब वीर्य सोडून मूल जन्माला घाल. मी म्हणालो पण मला लग्न करायचं नाहीय. ते म्हणाले, तिची काळजी करायचं तुला कारण नाही, तिची ती समर्थ असेल. मला ब्रह्मसंकर हवाय. या देशाला तु काही देणं लागतो की नाही? बराच वेळ ते नर्मदेशी बोलत राहिले, मला वाटलं मलाच काहीतरी बोलतायत म्हणून मी काय? म्हणून परत त्यांच्याकडे गेलो तर त्यांचा नर्मदेसोबतचा संवाद सुरु होता.

वर आलो, विलासराव सॅक भरुन तयार होते. मी पण पँट वगैरे घातली, आवराआवर केली आणि दरवाजात आलो तर सँडल तिथे पडलेली दिसली. विलासरावांना चालत मंडलेश्वरपर्यंत जायचं होतं. किमान थोडावेळ सोबत चला. मग एका पुलापर्यंत त्यांच्यासोबत गेलो. आता थांबतो म्हटलं. गळाभेट घेतली आणि परत फिरलो. बस स्टँड कुठेय ते रस्त्यात कुणालातरी विचारलं. तिथे गेलो. एका मुलाला इंदूरच्या गाडीबद्दल विचारलं तर तो म्हणे पौने पाँच बजे इंदूर जानेवाली व्हाइट सिद्धीविनायक आयेगी, ये ड्राइवर कुछ भी बतायेंगे, अंदर जा के धर्मशाला में बैठ जाओ. गुपचूप आत जाऊन बसलो. पावणेपाच वाजता बस आली.

विलासरावचा निरोप घेण्‍यापूर्वी काढलेला फोटो

(समाप्त)
--------------------------------------------------------
रजनीश असोत की युजी, मुजी की पुंजाजी की एकहार्ट टुली की गोयंकाजी - की मानसशास्‍त्रावर काम करणारा ब्रायन वीइस सारखा सायकॅट्रिस्ट, कितीही आणि कोणत्याही क्षेत्रातील नावं घ्‍या - They are talking same thing! म्हणून युजीसारखं अँण्‍टीगुरुचं वाचून अनुभवत असताना गुरु कसा मिळाला यात आश्चर्य नाही, because what we are dealing with is HUMAN race & everything is only HUMAN creation.

मांडणीसंस्कृतीनाट्यधर्मइतिहासवाङ्मयप्रेमकाव्यमुक्तकव्युत्पत्तीसमाजजीवनमानरेखाटनस्थिरचित्रप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

31 May 2012 - 5:25 am | स्पंदना

सुरवातीच वाचुन शेवट गाठेपर्यंत सुरवातीच विसरल. एकुण काय झाल यशवंत? तु कुणाची दिक्षा घेतलीस? अन दिक्षा म्हणजे नक्की काय? ते सार राहु दे. शेवट करायच्या आधी तु इंदुरला पोहचल्यावर काय झाल ते सांगाय्च ना. एकुण बराच फेरा झालाय, अन भांग, गांजा यांची नाव तर अशी काही सहज घेतली गेलीयत की जणु तु दुध कंपन्यांची नाव घेतो आहेस.
आप्लया तर कल्पनेच्या बाहेरच विश्व आहे. तुही परत आला आहेस हे ही बरच.
चल . काळजी घे.

मोदक's picture

31 May 2012 - 5:58 am | मोदक

>>>सुरवातीच वाचुन शेवट गाठेपर्यंत सुरवातीच विसरलं

टाळ्या..!! :-D

अर्धवटराव's picture

31 May 2012 - 5:27 am | अर्धवटराव

.

अर्धवटराव

विलासराव तब्बेतीने लैच खराब झाले... :-(

एवढं वाचण्याइतका संयम नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 May 2012 - 9:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

परिक्रमा करणार्‍यासोबत काही वेळ घातल्यानंतर मनात चाललेल्या विचारांची गर्दी आणि बाह्यजगाशी त्याचा लावलेला संबंध, काहीतरी अद्भूत शोधण्याचा-अद्भूततेशी संबंध जोडण्या प्रयत्न असा एकूण मांडलेला लेखाजोगा वाटला.

लेखन आवडतंच रे...इंदोरला कामावर रुजू झालात की नाही ?

बाकी, विलासराव यांची तब्येत लैच डाऊन वाटली. :(
विलासराव काळजी घ्या.

-दिलीप बिरुटे

दोन्ही भाग वाचून पुर्ण भंजाळलोय.....
ते साईबाबांच्या रुपातले विलासराव (की विलासरावांच्या रुपातले साईबाबा) ते प्रकरण अर्धवटच राहिल...
राममंदीर -पिंड - अहिल्याबाई ते ही निट समजल नाही.
दीक्षेबद्दल पण सांगा... म्हण्जे अता इंदोर ला पोचल्यानंतर काय काय झाले वगैरे.
दादानु जरा उलगडून सांगा ना.....

ऋषिकेश's picture

31 May 2012 - 10:00 am | ऋषिकेश

हा भागही रंजक आहे.
बाकी, मुख्य गोष्ट राहिली.. नोकरीत रिझ्युम झालायत की नाही?

शिल्पा ब's picture

31 May 2012 - 10:05 am | शिल्पा ब

काय तुम्ही लोकं तरी!! नोकरी नोकरी नुसतं!
काय ठेवलंय त्या नोकरीत, आं?

यकु's picture

31 May 2012 - 10:19 am | यकु

भर.

बाकी, मुख्य गोष्ट राहिली.. नोकरीत रिझ्युम झालायत की नाही?

जनरल मॅनेजर साहेब म्हणे कुणाचीतरी भेट घालून देतो.
होऊ की. काय गडबड आहे.

बाकी गुरु महाराजांनी दिलेली नोकरी तर सुरुच आहे. ;-)

ते साईबाबांच्या रुपातले विलासराव (की विलासरावांच्या रुपातले साईबाबा) ते प्रकरण अर्धवटच राहिल...

माझ्या गुरुंना हव्या त्या माणसाचे विचार जाणून घेता येतात - त्यांना विलासरावांनी सांगितलेला 'प्रति साई' चा किस्सा कळला असेल, विलासराव अहमदनगर जिल्ह्यातून आले आहेत हेही नाथांना विलासरावांनीच सांगितलं होतं, ते विपश्यनेबद्दलही ज्याला त्याला सांगत फिरत आहेत, परिक्रमेत तर काय कुणीही भणंग फिरेल पण आपल्या स्वत:च्या गावात असं फिरता आलं पाहिजे, मी याच अवतारात (म्हणजे परिक्रमेमुळं झालेल्या) ओळखीच्या सगळ्या लोकांची भेट घेणार आहे वगैरे विलासराव बोलत होते - या सगळ्या गोष्‍टींचा गुरुमहाराजांनी 'योग' साधला असेल आणि मला विलासराव हे साईबाबा आहेत, तु त्यांना शिकवण्याच्या भानगडीत पडून नको असा दृष्‍टांत दिला असेल. हे सगळे माझ्यापुरते सुसंगत अंदाज.

राममंदीर -पिंड - अहिल्याबाई ते ही निट समजल नाही.

शक्य झालं तर ते मंदीर स्वत: डोळ्यानं पाहून या, काहीच समजून घेण्याची गरज पडणार एवढा सुंदर अनुभव येईल.

दीक्षेबद्दल पण सांगा... म्हण्जे अता इंदोर ला पोचल्यानंतर काय काय झाले वगैरे.

इंदूरला पोचल्यानंतर विशेष काही नाही, काहीवेळा इथल्या बर्‍याच लोकांच्या मार्फत गुरु महाराजांनी संवाद साधला. पोरगं खरोखर बोललं तसं वागतंय का ते तपासून पाहिलं आणि त्यांची खात्री झाल्यावर मग मी काहीही न करताही योगीक क्रिया, शरीरात प्रचंड उष्‍णता वगैरे बरंच काहीकाही झालं, ते आणि मी आता दिसायला वेगळे असलो तरी तिकडे आणि इकडे सगळं सेम टू सेम होतं - एकमेकांपासून वेगळं होता येत नाही हीच दीक्षा.

मेल्या कपाळकरंट्या यक्क्या.. आयुष्य नावाचं सुंदर स्वप्न पडत असताना ते तुटू नये अशी इच्छा करत पहात राहायचं की उगा ती झोप मोडावी अन जाग यावी यासाठी उपाय शोधत बसायचे?

झोपून राहा गपचीप. नंतर मेल्यावर अतएव जाग आल्यावर आहेच सत्य .. पण त्याला वेळ आहे. तोसवर भरपूर वीर्योत्पादन करुन घे..

शिवाय एकीकडे "गरज नाही.. गरज नाही.." म्हणत भांग, गांजा वगैरेची गुलामी गळ्यात पडू देऊ नकोस या शून्याला भागत बसण्याच्या उद्योगात.. गविमाऊलीच्या आज्ञेने एकदा मुंबई कट्ट्यास ये.. पॉप टेट्सला..

+१, लाईक अ लसिथ मलिंगा यॉर्कर अ‍ॅट द बॉटम ऑफ मिडल स्टंम्प, आता बेल्स हुडकाव्या लागतील कुठं गेल्या त्या ?

मदनबाण's picture

31 May 2012 - 10:38 am | मदनबाण

योगी लोक गांजा, भांग वगैरे नेहमी घेतात ते त्यातल्या नशेच्या आनंदासाठी नव्हेच, जाणीवेचा शरीराशी संबंध तुटावा म्हणून. हा वेगळा भाग झाला.
सहमत... उच्च कोटीची एकाग्रता आणि त्यातुनच मग कुंडलिनीची सुरुवात करणे सोप्पे होते,परंतु काही साधु (फक्त नावाचे साधु) मात्र ह्याचा व्यसन म्हणुनच उपयोग करतात... उच्च कोटीच्या योग्याला कशाचीही गरज भासत नाही. त्याचे ध्यानच इतक्या उच्चतम अवस्थेचे असते की त्यांना असल्या कुठल्याही मादक पदार्थाची गरज भासत नाही.
भांग,गांजा इं पदार्थांचा मेंदुतील अल्फा,बिटा आणि गॅमा तसेच थिटा व्हेव्जशी संबंध असावा... असे मला तरी वाटते.
असो...

एक वेगळा अनुभव घ्यायची संधी तुला मिळाली हे वरील लिखाण वाचुन कळाले.

नाय हो गवि, भांग-गांजाची उपयुक्तता होती ती माझ्यापुरती संपली. आता ते पुन्हा होणे नाही, हां पण तुम्ही म्हणत असाल तर बसू एकदा ;-)

.. गविमाऊलीच्या आज्ञेने एकदा मुंबई कट्ट्यास ये.. पॉप टेट्सला..

ज्जे बात !
कधी येऊ सांगा.

नाय हो गवि, भांग-गांजाची उपयुक्तता होती ती माझ्यापुरती संपली. आता ते पुन्हा होणे नाही

मग गुरुमाऊली अजूनही का वापरतात?? की नाही वापरत?

मग गुरुमाऊली अजूनही का वापरतात?? की नाही वापरत?

कदाचित वापरतही नसतील. माझ्यासारखे काहीही करुन पहाणारे सर्किट लोक आले तेही ते करुन दाखवत असतील ;-)

प्रास's picture

1 Jun 2012 - 12:36 pm | प्रास

कधी येऊ सांगा.

केव्हाही या, कट्टेकरी हजर असतीलच.....

बाकी, हा दुसरा भाग व्यवस्थित पुन्हा पुन्हा वाचून समजून घेऊन प्रतिक्रिया देईन म्हणतो.....

मृत्युन्जय's picture

31 May 2012 - 10:50 am | मृत्युन्जय

यक्कु एक सांग. अगदी खरेखरे. त्या तुझ्या म्यानेजरचे काय झाले? आणि तु परत नौकरीवर रुजु झालास का? झाला असशील तर आधी जिथे होतास तिथेच की अजुन कुठे? आणि तिथेच झाला असशील तर ती बाई आता तुझ्याशी कशी वागते आहे?

वरील प्रश्नांची उत्तरे माहिती असुनही मला दिली नाहीस तर ......................................................... तर मी तुला परत एकदा विचारेन. ;)

सविता००१'s picture

31 May 2012 - 10:50 am | सविता००१

जबरीच अनुभव कथन आहे. पारच भंजाळून गेले आहे. परत सगळ नीट वाचणार आहे.
एकूण काय तर यकु, तू ग्रेट आहेस. :)

लेख आवडला
विलासरावांचे कौतुक वाटते आहे :)

अवांतर : मध्येच खरबुजाचे टरबुजात रुपांतर झालेले आहे ;)

मृत्युन्जय

यक्कु एक सांग. अगदी खरेखरे. त्या तुझ्या म्यानेजरचे काय झाले? आणि तु परत नौकरीवर रुजु झालास का? झाला असशील तर आधी जिथे होतास तिथेच की अजुन कुठे? आणि तिथेच झाला असशील तर ती बाई आता तुझ्याशी कशी वागते आहे?

मॅनेजरचे काय झाले काय माहीत. तो म्हणे इधर आना भी मत, फोन लावला तरी तापायला लागला. जनरल मॅनेजरनं मला बोलावून घेतलं होतं तेव्हा त्याला बोलावून घेतलं असावं, ढमुक सर के लिये चाय लाइए.. ढमुक सर के लिये चाय लाइए सुरु होतं कुणाचं तरी.
जॉइनींग वगैरे सगळं आता त्या लोकांनीच ठरवायचं, मी तर नेहमीच कुठल्याही गोष्‍टीसाठी तयार असतो.

सविता

एकूण काय तर यकु, तू ग्रेट आहेस.

पार फाटली होती माझी हे सगळं होत असताना, घाबरून उठून जाऊ लागलो तेव्हा गुरु महाराजांनी नीट समजाऊन सांगितलं. अवतीभवतीची सगळीच माणसं तुमच्या मनातले विचार बोलून दाखवून तुम्हाला हवं तसं फरफटत नेत असतील तेव्हा काय मजा होत असेल त्याची कल्पना करुन पहा.

पियुशा

मध्येच खरबुजाचे टरबुजात रुपांतर झालेले आहे

ओहो! घ्या मजा आता मग काय.. टरबूज तर टरबूज. खरबूजा खरबूजे को पहचानता है ;-)

कुणी अस वागाय लागल तर लगीच चारचौघात म्हनत्यात
"काय लेका ?गांजा वडुन आलास काय ?" आणि तु तर खरोखरीच गांजा ओढला आहेस :-(

यक्कु, मीत्रा एक ही गोष्ट पटली नाही रे. (गांजा सेवना सकट)
तुझ्या सारखा आभ्यासु,जिज्ञासु,विवेकी आणि वास्तववादी माणुस अस काही लिहु शकतो, वागु शकतो हे पाहुन चिलमी शिवाय तार लागली.

या असल्या नाथ, बाबा ,महराजांपेक्शा समाजासाठी भरीव काम करणा-या फुले, गाडगेबाबा मदरतेरेसा, बाबा आमटे यांनाच मी संतत्व दीईन आणि त्यांचीच दिक्शा घेईन.

उदय के'सागर's picture

31 May 2012 - 11:16 am | उदय के'सागर

या असल्या नाथ, बाबा ,महराजांपेक्शा समाजासाठी भरीव काम करणा-या फुले, गाडगेबाबा मदरतेरेसा, बाबा आमटे यांनाच मी संतत्व दीईन आणि त्यांचीच दिक्शा घेईन. >>> फार मोलाची गोष्ट बोललात साहेब तुम्ही.... एकदम पटली...:)

यकु's picture

31 May 2012 - 11:13 am | यकु

तुझ्या सारखा आभ्यासु,जिज्ञासु,विवेकी आणि वास्तववादी माणुस अस काही लिहु शकतो, वागु शकतो हे पाहुन चिलमी शिवाय तार लागली.

चिलीम वास्तव आहे, माणसं हजारो वर्षापासून गांजा पितात हेही वास्तव आहे, उलट गांजा पिऊन अवास्तव नशेत बरळलो नाही हे वास्तव पहा ना.

या असल्या नाथ, बाबा ,महराजांपेक्शा समाजासाठी भरीव काम करणा-या फुले, गाडगेबाबा मदरतेरेसा, बाबा आमटे यांनाच मी संतत्व दीईन आणि त्यांचीच दिक्शा घेईन.

आधी त्यांच्याकडून दीक्षा मिळते, मग जे त्या पात्रतेचे असतील त्यांना संतत्व मिळून जातं. हे महाराज लोक समाजासाठी भरीव काम करीत नाहीत हा तुमचा गैरसमज आहे.

jaypal's picture

31 May 2012 - 11:24 am | jaypal

काय बोलु/लिहू? काळ हेच औशध असाव. जोपर्यंत मला अनुभव/ अनुभुती येत नाही तो पर्यंत विशवास बसण कठीण आहे.

अवांतर = विपश्यना करणा-या विलासरावांना परिक्रमा कराविशी वाटली म्हणुन आश्चर्य वाटल. असो तुम्हा सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. भवतु सब्ब मंगल. (सगळ्यांच मंगल होवो)

dinner

maths

यकु's picture

31 May 2012 - 11:26 am | यकु

=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))=))
=)) =)) =))
=)) =))
=))

छोटा डॉन's picture

31 May 2012 - 11:15 am | छोटा डॉन

दोन्ही भाग शांत चित्ताने १-२ वेळा वाचले.
विलासरावांच्या परिक्रमा संकल्पाचे कौतुक वाटले पण त्यासोबतच हे खडतर व्रत करत असताना त्यांच्या तब्येतीची झालेली अवस्था पाहुन काळजी वाटली.

यश्याबाबत तर कायकाय वाटले हे इथे शब्दात लिहण्यासारखे नाही. ;)
काळजी घे रे बाबा, डोके जरा थंड ठेव एवढेच सांगतो.

- छोटा डॉन

विजुभाऊ's picture

31 May 2012 - 11:19 am | विजुभाऊ

तुझा एकुणातच पांडुरंग सांगवीकर झालाय

विजुभाऊ's picture

31 May 2012 - 11:19 am | विजुभाऊ

तुझा एकुणातच पांडुरंग सांगवीकर झालाय

बिपिन कार्यकर्ते's picture

31 May 2012 - 1:01 pm | बिपिन कार्यकर्ते

हं!

उदय के'सागर's picture

31 May 2012 - 1:25 pm | उदय के'सागर

हम्म! बाकि एकंदरीत तुमच्या अनुभवा बद्दल काय बोलणार... काहि पटलं बरंच नाहि पटलं...पण मी हे एका सामान्य विश्वात राहुन फक्त वाचतच असल्याने कदाचित मला ते "बरचस" पटलं नसावं... तुम्हि प्रत्यक्ष अनुभवच घेतलाय म्हंटल्यावर बाकि आम्हि काहि न बोलणेच बरे...

पण हे वाक्य बाकि अगदि पटलं बरं का :) असच असावं माणसाने !!!

उदाहरणार्थ यकु चांगला आहे, यकु चांगलं लिहितो, यकु डोकं आऊट करणारं लिहितो, यकु वाईट आहे, यकु गांजेकस आहे, यकु अमका, यकु ढमका काहीही म्हटलं तरी त्याचा माझ्यावर कसाकाय परिणाम होऊ शकतो? Whoever gives me any recognition, that is their own problem - because I don't know how I am & there is no need to know.

राजघराणं's picture

31 May 2012 - 2:00 pm | राजघराणं

याला आपला म्हणा

स्मिता.'s picture

31 May 2012 - 2:36 pm | स्मिता.

ते गांजा वगैरे प्रकरण अजिबात पटलेलं नाही. उगाच अनुभूतीच्या नावाखाली नशापाण्याचं उदात्तीकरण वाटलं. त्यापेक्षा मित्रांबरोबर कुतूहल म्हणून ओढून पाहिलेला गांजा परवडला.
आशा आहे की आता पुन्हा कुठल्या नशेच्या पदार्थांना हात लावणार नाहीस.

ते त्यांच्या पूजेतल्या नर्मदेच्या फोटोकडं बघून म्हणाले - आई याला अक्कल दे - अभी समझता नहीं है. वीर्य व्यर्थ घालवणं बंद कर. लग्न होईल तेव्हा पहिली तीन वर्षे बायको आणि तु दगडाच्या मूर्तींसारखे झोपा. तीन वर्षांनंतर जेव्हा वेळ येईल तेव्हा एकच थेंब वीर्य सोडून मूल जन्माला घाल. मी म्हणालो पण मला लग्न करायचं नाहीय. ते म्हणाले, तिची काळजी करायचं तुला कारण नाही, तिची ती समर्थ असेल. मला ब्रह्मसंकर हवाय.

हे तर अजिबात पटले नाही. हे असे लग्न करून बायकोवर जबरदस्तीचं ब्रह्मचर्य का लादायचं? का एका मुलीच्या आयुष्याची अशी परवड करायची? चार माणसांसारखा नॉर्मल संसार करायचा नसेल तर ती जोडीदाराची शुद्ध फसवणूक आहे.

बाकीच्या लेखाबद्दल... लवकरात लवकर जागा हो आणि स्वतःच्या आयुष्याची वाट लागण्यापासून त्याला वाचव. योगच करायचा असेल तर कर्मयोगी हो, त्यानंतर तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील.

संजय क्षीरसागर's picture

31 May 2012 - 2:48 pm | संजय क्षीरसागर

प्रतिसादाला तिथे >अश्लिल प्रतिसाद! का म्हटलय ते आता कळलं

५० फक्त's picture

31 May 2012 - 2:53 pm | ५० फक्त

हे तर अजिबात पटले नाही. हे असे लग्न करून बायकोवर जबरदस्तीचं ब्रह्मचर्य का लादायचं? का एका मुलीच्या आयुष्याची अशी परवड करायची? चार माणसांसारखा नॉर्मल संसार करायचा नसेल तर ती जोडीदाराची शुद्ध फसवणूक आहे.

+१, स्मिता.

उदय के'सागर's picture

31 May 2012 - 2:58 pm | उदय के'सागर

हे तर अजिबात पटले नाही. हे असे लग्न करून बायकोवर जबरदस्तीचं ब्रह्मचर्य का लादायचं? का एका मुलीच्या आयुष्याची अशी परवड करायची? चार माणसांसारखा नॉर्मल संसार करायचा नसेल तर ती जोडीदाराची शुद्ध फसवणूक आहे. >> +१००००

ढब्बू पैसा's picture

31 May 2012 - 3:15 pm | ढब्बू पैसा

हे तर अजिबात पटले नाही. हे असे लग्न करून बायकोवर जबरदस्तीचं ब्रह्मचर्य का लादायचं? का एका मुलीच्या आयुष्याची अशी परवड करायची? चार माणसांसारखा नॉर्मल संसार करायचा नसेल तर ती जोडीदाराची शुद्ध फसवणूक आहे.

सहमत!

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Jun 2012 - 4:08 pm | llपुण्याचे पेशवेll

हे तर अजिबात पटले नाही. हे असे लग्न करून बायकोवर जबरदस्तीचं ब्रह्मचर्य का लादायचं? का एका मुलीच्या आयुष्याची अशी परवड करायची? चार माणसांसारखा नॉर्मल संसार करायचा नसेल तर ती जोडीदाराची शुद्ध फसवणूक आहे.
-१
हे जर त्याने त्याच्या भावी पत्नीशी बोलून ठरवलं आणि ती राजी असेल तर शुद्ध अशुद्ध फसवणूक ठरवणारे बाकीचे कोण?
तो च्यवन ऋषी नव्हता का म्हातारा तरी त्याच्या बायकोने हट्टाने केलेच ना लग्नं त्याच्याशी. मग तसं येशा आणि त्याची बायको घेतील बघून.

कवितानागेश's picture

1 Jun 2012 - 5:07 pm | कवितानागेश

यक्कुचे गुरु, यक्कु, आणि इथले सगळे प्रतिसादकर्ते, सगळ्यांशीच असहमत. :(
'लग्न नक्की कशासाठी करायचं, आणि लग्नानंतर एकमेकांशी कसे वागायचे आणि का' यावरच एक नविन धागा काढावा लागणार बहुतेक.
शिवाय 'चार माणसांसारखा नॉर्मल संसार' म्हणजे तरी नक्की काय, हा प्रश्न पडलाय...
इथे नको चर्चा.

स्वगतः माउ, तुला शिंग नसतानादेखिल, जुन्या, नविन, कच्च्या, पक्क्या, सगळ्या आयडींना अंगावर घ्यायची खाज कुठून आली?

मदनबाण's picture

1 Jun 2012 - 5:51 pm | मदनबाण

तो च्यवन ऋषी नव्हता का म्हातारा तरी त्याच्या बायकोने हट्टाने केलेच ना लग्नं त्याच्याशी.
त्यांच्या बायकोने हट्टाने लग्न केले नव्हते, तर तिला नाईलाजास्तव लग्न करावे लागले.
शर्याती राजा त्याच्या सैन्य आणि मुली सकट च्यवन ऋषी जिथे तप करत बसले होते त्या अरण्यात आला होता,च्यवन ऋषींच्या अंगावर वारुळ तयार झाले होते,त्यातुन त्यांचे डोळे दिसत होते,सुकन्येने कुतुहलाने त्यात काडी टोचली,ज्यामुळे
ऋषींचे डोळे फुटले व भळाभळा रक्त वाहु लागले.या प्रकारामुळे राजाच्या सैन्याच्या मल-मुत्र क्रिया बंद झाल्या व सैन्यात हाहाकार उडाला,चौकशी अंती सुकन्येकडुन राजाला झालेला प्रकार कळला.त्याने च्यवन ऋषींची क्षमा याचना केली,त्या बरोबर सैन्याची स्थीती सामान्य झाली. च्यवन ऋषी राजाला म्हणाले की मी असा म्हातारा आणि आता डोळेही फुटले असल्याने पुढील आयुष्य कंठण्यासाठी मला तुझी मुलगी माझी पत्नी म्हणुन हवी आहे.नाईलाजाने आणि शाप भयाने शर्याती राजाला आपल्या तरुण मुलीचे म्हातार्‍या च्यवन ऋषीं बरोबर लग्न करुन द्यावे लागले.

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Jun 2012 - 5:59 pm | llपुण्याचे पेशवेll

आमच्या माहीतीनुसार सुकन्येने जबाबदारी ओळखून च्यवनाशी लग्नं केले. इतकेच नव्हे तर मनोभावे त्याची सेवा केली. च्यवनाचे तप पूर्ण झाल्यावर च्यवनाने खूष होऊन धन्वंतरींना (का अश्विनीकुमारांना) पाचारण करून दिव्य देह प्राप्त वगैरे केला. तेथेही सुकन्येने स्वतःच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्याने स्वतःचा नवरा बरोबर ओळखला. असो ती कथा स्त्रीमुक्तीच्या धाग्यावर टाकून धागा ५०० + चालवता येईल.
इथे आशय महत्वाचा की तपस्वी नवरा असूनही त्याबरोबर सुखाने राहण्याचा.
बरं आपण जोडी बदलू त्या हिमालयाची मुलगी पार्वती अजूनही करते आहे ना सुखाने संसार भणंग शिवाबरोबर.

परिकथेतील राजकुमार's picture

1 Jun 2012 - 6:09 pm | परिकथेतील राजकुमार

बरं आपण जोडी बदलू त्या हिमालयाची मुलगी पार्वती अजूनही करते आहे ना सुखाने संसार भणंग शिवाबरोबर.

बाबा रे पुप्या, तो च्यवन म्हणजे मोठा तपस्वी माणूस आणि भणंग शिवा म्हणजे साक्षात महादेव आहेत रे. हा यक्कु पडला गंजाडी आणि दर ८ तासाने नोकरीला लाथ मारणारा. ;) शिंच्या ह्याची बरोबरी तिकडे कुठे करतो ? उद्या गेला लंगोट बांधून हिमालायात तर बायकोने काय करायचे ?

हो का नाय रे यक्कु ? बाकी सध्या भाव काय चालू आहे रे पावडरचा ?

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Jun 2012 - 7:44 pm | llपुण्याचे पेशवेll

बाबा रे पुप्या, तो च्यवन म्हणजे मोठा तपस्वी माणूस आणि भणंग शिवा म्हणजे साक्षात महादेव आहेत रे. हा यक्कु पडला गंजाडी आणि दर ८ तासाने नोकरीला लाथ मारणारा.
वा रे पर्‍या चामायला आमच्या भणंग जोग्याने गांजा प्यायला त्यास शिव्या घालायच्या आणि तिकडे तुमच्या त्या झीनत अमान की कोणी गांजा प्यायला की त्यावर पिच्चर काढायचा 'दम मारो दम' म्हणून हा रे कुठला न्याय.
शिंच्या ह्याची बरोबरी तिकडे कुठे करतो ? उद्या गेला लंगोट बांधून हिमालायात तर बायकोने काय करायचे ?
अरे मेल्या लंगोटी बांधून हिमालयात जाणे हे कंबर बांधून झमझम्बार मधे जाण्यापेक्षा चांगले नाय का रे?

असो तू म्हणतोस तर असेलही तू म्हणतोस तसे. :)

हा यक्कु पडला गंजाडी आणि दर ८ तासाने नोकरीला लाथ मारणारा. शिंच्या ह्याची बरोबरी तिकडे कुठे करतो ? उद्या गेला लंगोट बांधून हिमालायात तर बायकोने काय करायचे ?

गुरु महाराज काय वाट्टेल ते करुन घेऊ शकतात.
आपलं काहीच म्हणणं राहिलेलं नाही आता.
सब स्वीकार है.

नेमक्या कोंच्या पावडरचा भाव हो?

पेशवे तुमच्या आशयाशी मी सहमत आहे, मी फक्त ती कथा सांगितली इतकेच.

सातबारा's picture

31 May 2012 - 2:10 pm | सातबारा

यकु,
कार्लोस कास्टानेडा वाच !

गणेशा's picture

31 May 2012 - 2:40 pm | गणेशा

प्रिय मित्र यकु,

तुझे दोन्ही लेख वाचले... लिखान ज्या पद्धतीने ओघवते सुंदर झाले आहे.. त्या प्रमाणे मात्र लिहिणार्याचे आयुष्य ओघवते सुंदर वाटत नाहिये..
गुरु.. माऊली .. संत.. हे हृदयावर कोरण्याआधीही त्यांची शिल्पे समाजात कोरली गेलेली असतात..
काहीतरी वेगळे करणे.. म्हणजे आयुष्याच्या आनंदाचे.. रोजचे क्षण काहीतरी वेगळ्या कारणासाठी घालवणे नाही असे वाटते.
ब्रम्ह संकर बिंकर तर अतिशय व्यर्थ वाटले.. आनि मी लग्नच करणार नाही हे तर लहान मुलांच्या तोंडातले शब्द वाटले..

विलासरावांशी प्रत्यक्ष बोलण्याचा संबंध कधी आला नाही.. पन शिरुर या गावा बद्दल बोलण्याने निर्माण झालेला स्नेह आठवला.. त्यांची काळजी वाटती आहे.. तुझी काळजी वाटत नाहीहे कारण तु शुन्य नाही तर आत्मशुन्य सम भासतो आहेस..

आत्मशुन्य बद्दल पहिल्या भागात तु जे लिहिले ते ही निरर्थक वाटले आणि चुकीचे ही...

बाकी परिक्रमे बद्दल माझे मत काहीच नाही ... पण गुरु जर परिक्रमा करत असतील तर शिष्य इंदोर ला बसुन सेम आयुष्य कसे व्यथीत करतो आहे ते कळेना...

विलासरावांच्या रुपातील साईबाबा.. वगैरे तर समजले नाहि म्हणण्यापेक्षा ही आवडले नाही.. विलास राव साधे वाटतायेत.. आयुष्यात सगळे उपभोगु शकणारी माणसे असतात.. पण त्यांना त्याही पलिकडे एक साधे जीवन प्रिय असते ते ते जगत आहेत असे वाटते.
परंतु मला तरी तुझ्यात असे जाणवत नाहिये.. आयुष्य परिपुर्ण जगल्यांनतर.. जर साधे सरळ जीवन जगायचे असेल तर निवांत असला मार्ग असावा.. पण आयुष्य आणि हा मार्ग ह्या दोन्हीमध्ये फरफट होऊ नये असे वाटते.

मला एकच सांगायचे आहे मित्रा... आयुष्याला सामोरे जात रहा.. आलेल्या प्रश्नांना तितक्याच कसोशीने उत्तरे देत रहा.. स्वतासाठी नाहि तर घरच्यांसाठी ही जगत रहा...
आणि जर मार्ग वेगळा असावा असे वाटत असेल तर आहे तेथे एक आश्रम उभा कर.. आणि जगातुन.. भारतातुन येणार्या परिक्रमी माणसांना १ दिवस सोबत करुन त्यांना आनंद दे..

- गणेशा

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Jun 2012 - 7:47 pm | llपुण्याचे पेशवेll

गुरु.. माऊली .. संत.. हे हृदयावर कोरण्याआधीही त्यांची शिल्पे समाजात कोरली गेलेली असतात..
असहमत. 'तुका झाला ऐसा सांडा , बडविती पोरे रांडा' असे तुकाराम महाराजांनी स्वतःबद्द्लच लिहीले आहे. ते समाजावर वगैरे कोरणे हे सगळे होते चमत्कार झाले (केले/घडले) की.

असो पण तुमची कळकळ जाणवली.

पप्पुपेजर's picture

31 May 2012 - 3:34 pm | पप्पुपेजर

+१ गणेशा

इष्टुर फाकडा's picture

31 May 2012 - 3:40 pm | इष्टुर फाकडा

हे सगळं पटवून घ्यावसं वाटतंय पण सोसत नाहीये. किंवा कळतही नाहीये आणि वळतही नाहीये. मधेच 'माझं मागून दर्शन घेणारे भाग्यवान होतात' अशी वाक्ये हे सगळं समजायला अवघड करताहेत. तीन वर्षे लग्नानंतर पाषाणमूर्ती सारखे झोप वगैरे तुमच्या बायकोला कसे शक्य आहे? का ती collateral damage ? एक थेंब वीर्य! - कसं काय?
गांजा ने जी तुम्ही वर्णन केलीये ती अनुभूती मलाही आली होती. त्याकडे बघण्याचा माझा अप्प्रोच वेगळा होता. माझा त्यानंतरचा निष्कर्ष असा होता कि गांजा ओढायचं 'Intention' हे त्याच्या नशेवर जबरदस्त परिणाम करत असतं. कारण ती नशा करताना जो विचार तुमच्या मध्ये घोळत असतो तो जबरदस्त Intensify होतो. असं काही तुमच्या बाबतीत झालं असेल का? कारण तुम्ही जे नशेतल्या जाणीवेबाबत बोललात ते अगदी अनुभवसिद्ध आहे आणि इथे मी मांडलेल्या मुद्द्याशी सुसंगत आहे.
अर्थात मी या सगळ्याबाबत फक्त तर्कच करू शकतो. तुमचे हे सगळे अनुभव वाचून शहारायला झालं एवढं नक्की.

आंबोळी's picture

31 May 2012 - 7:49 pm | आंबोळी

स्मिता, गणेशा, सागर, ढब्बू पैसा, ५० फक्त या सर्वांशी सहमत.

हे सगळं पटवून घ्यावसं वाटतंय पण सोसत नाहीये. किंवा कळतही नाहीये आणि वळतही नाहीये. मधेच 'माझं मागून दर्शन घेणारे भाग्यवान होतात' अशी वाक्ये हे सगळं समजायला अवघड करताहेत. तीन वर्षे लग्नानंतर पाषाणमूर्ती सारखे झोप वगैरे तुमच्या बायकोला कसे शक्य आहे? का ती collateral damage ? एक थेंब वीर्य! - कसं काय?

शब्दा-शब्दाशी सहमत.

यक्कुशेठ खुप डिट्टेलवारी लिहिलय... लिखाण उत्तमच झालय. (आधी थोडी शंका आली की जालिंदरबाबांची आवृत्ती तर नव्हे.) पण आमच्यासारख्या यःकस्चीत (आरे हा शब्द कसा ल्ह्यायचा रे?) पामरांना ते खुपच विस्कळीत आणि आगा-पिछा गायब करून लिहिल्यासारखे वाटतय...

सध्या काय चालू आहे? इंदौरातल्या बर्‍याच लोकांमार्फत नाथांनी तुमच्याशी संपर्क साधला म्हणजे काय केले? कसे केले ? त्यांचे समाधान झाले हे तुम्हाला कसे कळाले?
त्यांनी तुमच्या लग्नाबाबत जो आदेश दिलाय त्यावर तुमचे मत काय? तुम्ही तो पाळणार आहात कि फाट्यावर मारणार आहात? फाट्यावर मारणार आहात तर कसा? लग्न करुन पाषाणवत न रहाता की लग्नच न करता?
फाट्यावर मारणार नसाल तर लग्न करून ३ वर्ष पाषाणवत राहुन आपण एखाद्या मुलीवर अन्याय करतोय असे वाटत नाही का? लग्न करायच्या आधी त्या मुलीला विश्वासात घेउन हे सगळे सांगणार आहात का? १ थेंब कसा कंट्रोल करणार आहात?
आणि मुख्य म्हणजे विलासरावांची यासगळ्यावर काय प्रतिक्रीया आहे?

अजुनही बरेच प्रश्न घोंगावतायत. शब्दात बांधता आले की विचारतोच.

यकु's picture

31 May 2012 - 8:57 pm | यकु

आता बस झालं.

स्मिता, गणेशा, सागर, ढब्बू पैसा, ५० फक्त यांचे प्रतिसाद पूर्णतः फाट्यावर मारण्यात येत आहेत.

च्यायला यक्कुलाच का असले सगळे बाबा भेटतात? मला का भेटत नाहीत.. ;)

बाकी यक्कु लेका, तुझी मर्जी. तू वाट्टेल ते करायला मोकळा आहेस..

- (त्रासून गेलेला) पिंगू

इष्टुर फाकडा's picture

31 May 2012 - 6:58 pm | इष्टुर फाकडा

हरकत नाही. दुखावण्याचा हेतू न्हवता.

पैसा's picture

31 May 2012 - 7:03 pm | पैसा

कवितानागेश's picture

31 May 2012 - 11:44 pm | कवितानागेश

शून्य बाकी राहिला का गं? :P

यकु's picture

31 May 2012 - 11:48 pm | यकु

सतत बाकी शून्यच आहे.

पैसा's picture

1 Jun 2012 - 8:55 am | पैसा

:)

सागर किंवा वर नावे लिहिलेल्या कुणाच्याही प्रतिसादामुळे दुखावला गेलेलो नाहीय, पण सगळी कर्म कहाणी इत्थंभूत लिहूनही तुम्हाला काही गोष्टी चुकीच्या, कुणावर तरी अन्याय करणार्‍या वाटत असतील तर मग त्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय पर्याय नाही.

इष्टुर फाकडा's picture

31 May 2012 - 7:53 pm | इष्टुर फाकडा

तुम्ही भारी लिहिता पण तुमची लेखणी एवढीही सिद्धहस्त नाही कि तुम्ही जे असामान्य अनुभव घेतले आहेत ते जसे च्या तसे आम्हाला; निदानपक्षी मलातरी पूर्ण समजून घेता येतील :)
त्यात तुमच्या बाकीच्या लेखापेक्षा हा लेख थोडासा संदर्भ लावण्यामध्ये जड जातोय. यात योगीबाबांच्या काही विधानांवर शंका येणं हे अज्ञानी लोकांसाठी स्वाभाविक नाही काय (तुमच्या लेखी जरी कर्म कहाणी इत्थंभूत असली तरी)?

शिल्पा ब's picture

31 May 2012 - 10:02 pm | शिल्पा ब

अरे दोस्ता, तु तुझ्या आयुष्याचं काय वाटेल ते केलं तरी तो पुर्णपणे तुझा निर्णय असेल. पण एखाद्या मुलीशी लग्न करुन तिला संसारसुखापासुन केवळ अमका बाबा/ साधु म्हणाला म्हणुन वंचित ठेवणे हा तिच्यावरचा अन्यायच झाला ना!

जर त्या अथवा ईतर बाबा/महराजांकडुन उर्ध्वरेतन प्रक्रिया शिकता आली तर सगळ्यांचा सगळाच प्रॉबलेम सॉल्व्ह होईल. काय म्हणता? ;-)

इष्टुर फाकडा's picture

31 May 2012 - 11:29 pm | इष्टुर फाकडा

बेष्ट उपाय :)

बैल डोळ्यानं करुन पाहिलं.. होतंय.. एका मर्यादेपर्यंत.
डावीकडे उजवीकडे फिरतंय ते तुटलं पाहिजे म्हणजे स्‍फोट होतो असं ऐकलंय.
खरंय का?

इष्टुर फाकडा's picture

1 Jun 2012 - 2:45 pm | इष्टुर फाकडा

माफी असावी .

यकु साहेब , लेख आवडला पण....

नर्मदे मातेची परिक्रमा करायची ती , माता वहाताना ज्या रीतीने लोकांचे आयुष्य फुलवते आहे , आनंदी करत आहे . ते बघण्यासाठी. तिच्या उपकाराची जाणीव ठेवण्यासाठी. आपल्या मनाला मी पणाचा जो मैल चिकटलेला असतो, तो तिच्या पाण्यात धुऊन मन स्वच्छ करण्यासाठी . व हे करत असताना देहाची रोजची काम ही पार पाडावयाची आहेत हे ही भान ठेउन. मुळात नर्मदे सारखा खरा गुरु असताना तुम्हाला दुसरा गुरु करायला लागला म्हंजे तुमची नर्मदेची वारी फुकट गेली.

आपल्या शिष्यावर नको ती बंधन ती दिक्षा आहे अस सांगणारा गुरु व ती बंधन पाळताना सारासार विवेकाचा विचार न करता ती बंधन गुरु दिक्षा म्हणुन पाळणारा शिष्य (तुमच्या लग्न व त्यानंतरच्या तीन वर्षे ह्या बद्दल बोलतो आहे.) तुम्ही दोघही तितकेच दोषी आहात. नर्मदे माते रुपी स्त्रि शक्तिच्या पाया पडायला जात असताना लग्न करुन घरी येणार्‍या लक्ष्मी रुपी स्त्रि शक्तिचा अपमान कर अस सागणार्‍या तुमच्या गुरु ला मला नाही वाटत कोणी देव प्रसन्न होईल म्हणुन .

स्वताच्या देहाला यातना देउन देव भेटत नसतो तर दुसर्‍याना होणार्‍या यातना त्रास दुर केल्याने देव भेटतो.
असो.

स्वताच्या देहाला यातना देउन देव भेटत नसतो तर दुसर्‍याना होणार्‍या यातना त्रास दुर केल्याने देव भेटतो.

येस्स!!

स्वताच्या देहाला यातना देउन देव भेटत नसतो तर दुसर्‍याना होणार्‍या यातना त्रास दुर केल्याने देव भेटतो. - पण म्हणजे यासाठी आधी दुस-याला वेदना झाल्या पाहिजेत, तर आपल्याला देव भेटणार.

मग त्या ' सर्वेपि सुखिनं सन्तु ' किंवा ' जो जे वांछील तो ते लाहो ' याचं काय ?

५० फक्त साहेब, हो जिथे मानव शरीर आहे तिथे यातना आहेतच.

देव कुठे असतो तर तो बाबा आमटे रुपी देवमाणसात होता. हजारो पिडित कुष्ठ रोगी लोकांची सेवा करणार्‍या ह्या महामानवात होता.

तसाच तो देव तुमच्या आमच्यातही आहे. पण आपण बर्‍याच वेळा तो शोधतच नाही आपल्यात. मग जातो शोधायला बाहेर.

मानव काय किंवा ईतर प्राणी काय ज्याना , भुक लागते त्या प्रत्येकाला यातना ह्या आहेतच . मी भुक हा शब्ब्द फक्त अन्न ह्या एका साठी न वापरता, प्रत्येक गोष्टी साठी वापरला आहे जसे, अन्नाची भुक , संपत्तीची भुक, शारीरीक वासनेची भुक.

त्यामुळे जिथे भुक आहे व मानवी शरीर आहे तिथे यातना दु:ख वेदना आहेतच.

विसुनाना's picture

1 Jun 2012 - 1:23 pm | विसुनाना

यशवंतराव कुलकर्णी, वर्तमानकालात तुम्हाला जे योग्य वाटत आहे ते तुम्ही करत आहात.
शेवटी मी आणि हे समस्त चराचर विश्व - जाणीव-नेणीव म्हणजे माझा मेंदूच असतो. त्यापलिकडे काही नाही. इतकेच म्हणतो.

बाकी, तुम्हाला आलेल्या अनुभवांबद्दल वाचताना असेच इतर अनुभवही आठवले. लेखन अत्यंत मनोज्ञ झाले आहे.

सुधीर's picture

1 Jun 2012 - 1:26 pm | सुधीर

सत्य शोधण्याचे तुमचे (तुम्ही, अतृप्तआत्मा, विलासराव ई.) प्रयत्न प्रामाणिक आहेत. तुमचा स्वतःचा व्यासंग तर उत्तम आहेच. खुद्द स्टीव्ह जॉब्स साहेब "नीम करोली बाबा" यांना भेटायला भारतात आले होते. त्यांना स्वतःपुरता जे काही उमजायचं होतं ते उमजलं असेलच! त्यानंतरचा इतिहास जगाला माहीत आहे. एनीवे सध्या एवढच म्हणेन, तुम्हा सर्वांचे प्रयत्न प्रामाणिक आहेत! फक्त पोटाची खळगी भरण्यापुरता जगायला आलेल्यांकडून "टुकार विडंबनच" बाहेर पडू शकतं.

प्यारे१'s picture

1 Jun 2012 - 2:29 pm | प्यारे१

अतृप्तआत्मा????

हे 'सद-आत्मे ' मनसोक्त खादाडी नंतर त्यांचं फेव्हरीट 'पान खाऊन' सत्य शोधतात नी ते त्यांना लगेच सापडतं देखील असा आमचा अनुभव आहे. ;)
तुम्हाला आत्मशून्य म्हणायचे आहे हे ठाऊक आहे पण आम्ही देखील 'फक्त पोटाची खळगी भरण्यापुरता जगायला आलेले'. ;)

ह घ्यालच. :)

जयंत कुलकर्णी's picture

1 Jun 2012 - 2:22 pm | जयंत कुलकर्णी

यशवंत,

१ आपण जे लिहिले आहे ते अजिबात पटले नाही.
२ आपल्याकडून अशी वहावत जायची अपेक्षा केली नव्हती
३आपल्याकडे प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायची वृत्ती होती ती कुठे गेली ?
असो.

पण आम्हाला आपला प्रामाणिकपणा अत्यंत आवडला नाहीतर आजकाल जे वाटले, भोगले, उपभोगले त्याबद्दल मनात येणार्‍या खर्‍याखुर्‍या विचारांबद्दल प्रामाणिकपणाने लिहिणारा माणूस विरळाच.....

याच, याच प्रामाणिकपणामुळे मला खात्री आहे जेव्हा तुम्हाला या सगळ्यातील फोलपणा समजेल तेव्हा तुम्ही परत स्वतःच्या आनंदात मग्न व्हाल.... त्यासाठी तुम्हाला आशिर्वाद. व शुभेच्छा....

याच, याच प्रामाणिकपणामुळे मला खात्री आहे जेव्हा तुम्हाला या सगळ्यातील फोलपणा समजेल तेव्हा तुम्ही परत स्वतःच्या आनंदात मग्न होशील.... त्यासाठी तुम्हाला आशिर्वाद. व शुभेच्छा....

:) :) :) :)
तसंच झालंय.

मला मिपावर मिळालेला हा दुसरा आशिर्वाद.. पहिला चिंतामणी काकांचा.

श्रावण मोडक's picture

1 Jun 2012 - 2:46 pm | श्रावण मोडक

पहिल्या भागावर मी म्हटलं होतं की ट्रेडमिल वॉक ठरायचं हे लेखन. तसंच झालं.
जे लिहिलं आहे ते सारं खरंच आहे, असं म्हटलं तर, प्रचंड कल्लोळ आहे. प्रचंड संभ्रमही आहे. तो सोडवायच्या प्रयत्नांना शुभेच्छा. अर्थात, तो कल्लोळ नीटपणे मांडला आहे हे निश्चित. हा कल्लोळ या लेखनाच्या टॅगमध्येही दिसून येतो. नाट्य, प्रेमकाव्य, मांडणी, संस्कृती, धर्म, इतिहास, मुक्तक, वाङ्मय, व्युत्पत्ती, समाज, जीवनमान, रेखाटन, स्थिरचित्र, लेख, माध्यमवेध, अनुभव, माहिती, प्रतिक्रिया, आस्वाद, समीक्षा - हे इतके टॅग ज्याअर्थी लेखकाला नीट निवडता आले, त्याअर्थी आता यकु नॉर्मल आहे. त्याची उगाच काळजी करण्याची गरज नाही. या सगळ्या टॅगना बांधून ठेवणारा एक धागा म्हणजे कल्लोळ! :-)

हे इतके टॅग ज्याअर्थी लेखकाला नीट निवडता आले

श्रामो मर्मभेद न करतील तो सुदिन! :p :p :p

श्रावण मोडक's picture

1 Jun 2012 - 3:41 pm | श्रावण मोडक

अर्र... लेखन आवडले (त्यातला आशय आवडला पाहिजेच असे काही नाही). त्या आनंदात प्रतिसाद लिहिला. आता त्यातून हे असं काही होईल याचा अंदाजच नव्हता. :-)

नाही नाही हो, काही झालं नाही :)

मी ती सिगारेटसारखी थेट तोंडात पकडली तेव्हा ते जे भडकले, सांगता सोय नाही! तुझ्या मनात काहीतरी वेगळं आलं म्हणून ते तुला देत नाहीयेत असं ते म्हणाले. दोन-तीन दिवसात तुझ्या तोंडावर काळिमा पसरेल वगैरे काहीतरी बोलले, डोळे तप्त! मी म्हणालो काय चुकलं माहित नाही, हे असंच आहे, हवंतर मारुन टाका - पण असं काही बोलू नका. मग त्यांनी माझ्या तोंडावरुन हात फिरवला. म्हणे - बस्स! बस्स! आजच दीक्षा झाल्यानं त्यांनी तुला पुन्हा एकदा दिलं नसेल. जेवढं मिळालंय तेवढ्यावर समाधान मान.

याची काही टोटल लागली नाही.
चिलीम तोंडात धरल्याने ते का भडकले? त्याचा तुझ्या मनात काही वेगळे आलेचा काय संबंध? आजच दीक्षा झाल्याने कुणी पुन्हा काय दिल नसेल?
यकु आरे डोके आउट झालय... काय कळेना... निट समजाउन सांग ना ... बाकिच्या चहा , उन्हाळीच्या गोष्टी डिटेलवारी टाकतो आणि हेच क्रिप्टीक का?

मन१'s picture

1 Jun 2012 - 3:07 pm | मन१

अजूनही लेख वाचतोच आहे. ;)
तो झाल्यावर प्रतिसाद वाचावेत म्हणतोय, आणि तेही झाले की/तर माझा प्रतिसाद देइन म्हणतोय; तोवर ही फक्त पोच. ;)

राम श्रोत्री's picture

1 Jun 2012 - 3:10 pm | राम श्रोत्री

आपले शिष्यत्व स्वीकारायची लई इच्चाय

चिलीम तोंडात धरल्याने ते का भडकले? त्याचा तुझ्या मनात काही वेगळे आलेचा काय संबंध? आजच दीक्षा झाल्याने कुणी पुन्हा काय दिल नसेल?

मी तिथे उगी शानपणा दाखवत असलो तरी ते सगळं पाहून आतून टरकलो होतो. बस तेवढंच.
हा असला अनुभव आयुष्‍यात पहिलाच होता.

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Jun 2012 - 4:19 pm | llपुण्याचे पेशवेll

मस्तं लेख. शेवटी ज्याची त्याची अनुभूती. आणि अनुभूतीच श्रेष्ठ; शब्दांचे बुडबुडे जिथे संपतात जिथे खरंच निशब्द म्हणतात.
आजि आनंदू रे एकी परमानंदू रे| तया श्रुति नेति नेति म्हणति गोविंदू रे||
असा आनंद मिळाला का?

शेवटी नशिबात असेल तर गुरु कुठे कसे भेटतिल काही सांगता येत नाही.

राघव's picture

1 Jun 2012 - 6:43 pm | राघव

हे म्हणजे भलतंच काहीतरी झालं माझ्या कल्पनेपेक्षा.

तू हा अनुभव लिहित असतांना ते सर्व परत अनुभवत असल्यासारखं लिहिलं आहेस.. त्यामुळे मधूनच संगती न लागता विस्कळीत झाल्यासारखं वाटतं.

अनुभव सत्य असेल तर बाकी गोष्टी क्षुद्र ठरतात.
पण तुझा अनुभव हा गांजाच्या नशेत असतांना आलाय तुला.. त्यावर काय बोलणार.. कारण मला आजवर असल्या कोणत्याही गोष्टीच्या नशेची गरजच पडली नाही.. असो.

तू कितीही आदळआपट केलीस तरी हे सहज कळतं की तू विचारांच्या बाबत अत्यंत संवेदनशील आहेस.. सतत विचार करून नसता गुंता करून घेतोस अन् मग त्रागा होतो..शांत हो. काळजी घे.

राघव

पण तुझा अनुभव हा गांजाच्या नशेत असतांना आलाय तुला.. त्यावर काय बोलणार..
+१००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

अर्धवटराव's picture

1 Jun 2012 - 9:04 pm | अर्धवटराव

बाकी काहिही असो, एक गोष्ट मात्र नक्की रे यकु... तुझी साडेसाती उतरली बहुतेक.
बघ ना, काहि दिवसापुर्वी पब्लीक यकुशी वाद घालायचे, चर्चा करायचे, किंवा यकुला फट्यावर मारायचे... पण नवरत्न महाराज गुरु म्हणुन काय भेटले, यकु चे मिपावर असंख्य स्वयंघोषीत गुरु तयार झाले... कोणि तुला "हा सर्व भांगेचा/चिलिमीचा प्रभाव" हे पटवुन देतय, कुणी खरा देव/गुरु म्हणजे काय हे समजुन सांगतय, कुणी नोकरीधंदा कसा करावा याचा उपदेश करतय, कुणी समाजसेवा हीच ईश्वरसेवा या अर्थाचे डोज पाजतय, लग्न वगैरे संबंधी बोधामृताच्या धारा प्रसवताहेत , कुणी विडंबने करुन यकुच्या डोक्यावर पडल्याची खात्री पटवुन देतय ... आणि मुख्य म्हणजे हे सगळं यकु ला माहेश्वरला नेमका काय आणि कसा अनुभव आला याचा ओ का ठ्ठो विचार न करता... हुश्श्श्
किती भाग्यवान रे यकु तु...

नाना चेंगट's picture

2 Jun 2012 - 2:29 pm | नाना चेंगट

हा हा हा

सहमत आहे.

सर्वांनी यकुला "आपलं" म्हटलंय... ;)