तंत्रजगत

चहाबिस्कीट's picture
चहाबिस्कीट in तंत्रजगत
12 Jun 2018 - 09:43

आपला आवाज कसा रेकॉर्ड करावा [ऑडिओ-व्हिडीओ एडिटिंग / दृक-श्राव्य संपादन] [भाग १]

भाग १ https://www.misalpav.com/node/42802
भाग २ https://www.misalpav.com/node/42838

नमस्कार,

मागे कबूल केल्याप्रमाणे ऑडिओ/व्हिडिओ एडिटिंगवर सदर सुरु करत आहोत.

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
26 May 2018 - 14:30

आप (Discussion on characteristics, properties and classification of liquids)

(प्रशस्तपादभाष्याच्या ४थ्या धड्यातील आप किंवा द्रवरूप पदार्थांच गुणधर्म, प्रकार, वागण्याच्या तऱ्हा व उपयोग या संबंधीची माहिती या धड‌यात आहे. हे श्लोक ३ऱ्या - ४थ्या शतकातले असून तेव्हाची भारतीयांमध्ये वापरात असलेली जल किंवा आपद्रव्यांच्या अभ्यासाची पद्धत दर्शवतात. काही गोष्टी किंवा संकल्पना पटणारही नाहीत पण त्यासाठी पूर्णच अभ्यासाची पद्धत नाकारू नये. जे जे प्रत्ययास येईल तेवढेच मानावे. असो)े

उपयोजक's picture
उपयोजक in तंत्रजगत
6 May 2018 - 15:45

सिंगल डोअर फ्रिज फ्रॉस्ट फ्री कसा कराल?

तुमचा सिंगल डोअर फ्रिज फ्रॉस्ट फ्री कसा करायचा ? डबल डोअर सारखा!

1) सिंगल डोअर फ्रिज ला वर एक फ्रीझर बॉक्स किंवा बर्फाचा कप्पा/बॉक्स असतो आणि त्याला एक साधे टेकणारे दार असते.
फ्रिज च्या थंड करणाऱ्या कॉपर कॉइल्स त्या फ्रीझर बॉक्स भवती फिक्स केलेल्या असतात त्या सगळ्या तो बॉक्स आणि अख्खं फ्रिज थंड करत असतो.

कौशिक लेले's picture
कौशिक लेले in तंत्रजगत
5 May 2018 - 18:17

मराठी भाषा शिकणाऱ्यांना थेट व्हिडिओ चॅटद्वारे सरावाची सोय

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेच्या सेवेत अजून एक उपक्रम. आता मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट ऑनलाईन व्हिडिओ चॅटद्वारे माझ्याशी बोलून मराठी बोलण्याचा सराव आणि शंका निरसन करता येईल. परस्परांच्या सोयीने वेळ ठरवून बोलता येईल. प्रायोगिक तत्त्वावर असल्याने सध्या हा उपक्रम मोफत ठेवत आहे.

राहुल करंजे's picture
राहुल करंजे in तंत्रजगत
22 Apr 2018 - 13:50

कमी बजेट मध्ये कुठली गाडी घ्यावी ??

नमस्कार..
मला कुटुंबासाठी म्हणजे चार व्यक्तींसाठी कार घ्यायची आहे , माझे रोजचे फिरणे नाही पण मला लाँग ड्राईव्ह ला जायला आवडते कुटुंबासमवेत , मला सर्वात जास्त पर्यटन आवडते , माझे नाशिक जळगाव कोल्हापूर जाणे होते , कोल्हापूर हे आवडते ठिकाण म्हणून , पण मला सीएनजी कार घ्यावी की नको त्याचे फायदे तोटे तसेच कुठली गाडी घ्यावी कमी बजेट मध्ये ??? याचे मार्गदर्शन झाले तर मला खूप मदत होईल...

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in तंत्रजगत
7 Apr 2018 - 07:09

विकीपेडिया वरील माहितीचे संकलन...

विकीपेडिया हा वाचकांच्या सहकार्याने माहिती पुरवणारा संदर्भ कोश आहे असे मानले जाते...
विकीपेडियात खालील माहिती वाचनात आली ती बरोबर आहे असे मानावे काय? जर संदर्भ न देता माहिती भरली गेली असेल ती चुकीची किंवा अपुरी असेल तर तिला दुरुस्त करायची काय सोय आहे? ...
येथील तज्ज्ञ सदस्यांचे मार्गदर्शन अपेक्षित आहे...

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
15 Mar 2018 - 14:51

पृथ्वी (Discussion on characteristics, properties and classification of solids)

(प्रशस्तपादभाष्याच्या ४थ्या धड्यातील पृथ्वी किंवा स्थायूंचे गुणधर्म, प्रकार, वागण्याच्या तऱ्हा व उपयोग या संबंधीची माहिती या धड‌यात आहे. हे श्लोक ३ऱ्या - ४थ्या शतकातले असून तेव्हाची भारतीयांमध्ये वापरात असलेली स्थायूद्रव्यांच्या अभ्यासाची पद्धत दर्शवतात. काही गोष्टी किंवा संकल्पना पटणारही नाहीत पण त्यासाठी पूर्णच अभ्यासाची पद्धत नाकारू नये. जे जे प्रत्ययास येईल तेवढेच मानावे. असो.)

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in तंत्रजगत
12 Mar 2018 - 12:38

नवीन data card ( dongle ) घ्यायचे असल्यास ते कोणत्या कंपनीचे घेणे सोयीचे पडेल ?

नवीन data card ( dongle ) घ्यायचे असल्यास ते कोणत्या कंपनीचे घेणे सोयीचे पडेल ? आधीचे tata photon चे data card हे नुकतेच ती कंपनी बंद पडल्यामुळे बाद झाले आहे .

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
11 Mar 2018 - 20:39

३) हौझिंग सोसाइटी अकाउंट्स

*** *** *** *** ***
कंजूस
 यांचे सर्व लेखन इथे पाहा
*** *** *** *** ***
(३) अकाउंट्स (सोसायटी )

सतिश पाटील's picture
सतिश पाटील in तंत्रजगत
28 Feb 2018 - 11:54

गाडीच्या इंजिनात शिरणारे उंदीर कसे रोखावेत?

मागच्या महिन्यात मी १० -१२ दिवस बाहेर असल्याने गाड़ी पार्किंग मधेच उभी होती, हीच संधी साधून २ लहान डुकराएवढ्या उंदीर/घुशिंनी गाडीच्या इंजिनात संसार थाटला होता. गाड़ी चालू होत न्हवती म्हणून बाजुच्या ग्यारेज मधून मेकनिक आणून तपासले असता समजले की, उंदीर मामाने वायरिंग कुरतडली आहे. ब्याट्रीतुन इंजिनला पॉवर सप्लाय होत न्हवता. पण धक्का मारून चालू होत होती.

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
23 Feb 2018 - 23:16

सनी व बबन्याच्या टेक्निकल गप्पा..

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा..या निमित्त एक नवीन लेखन प्रयोग सादर करतोय..बोली भाषेत टेक्निकल चर्चा मांडण्याचा..

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
26 Jan 2018 - 16:38

द्रव्यांचे जवळ येणे व दूर जाणे (Substances and their movements)

नितळ पाण्याच्या तळ्यातील माशांचा व इतर जलचरांचा वेध घेणे हे चिंतनशील अशा विक्रम राजाचा आवडता छंदच. अहाहा काय ते सुंदर दृष्य..पाण्याचा उथळ पृष्ठभाग सकाळच्या कोवळ्या किरणांमध्ये लख्ख उजळून निघावा. सकाळच्या किरणांचं आगमन झाल्यावर अनाहूत पाहुण्यांच्या आगमनाने होते तशी पाण्यातल्या सर्वच माशांची, कासवांची, ओक्टोपसांची व इतरेजनांची गडबड व्हावी. मग मासे एकमेकांकडे यावेत.

shashu's picture
shashu in तंत्रजगत
22 Jan 2018 - 18:51

नवीन भ्रमण-संगणक (लॅपटॉप) घ्यावयाचा आहे. मार्गदर्शन करावे.

नवीन भ्रमण-संगणक (लॅपटॉप) घ्यावयाचा आहे. मार्गदर्शन करावे.
दैनंदिन घरगुती वापरासाठी भ्रमण-संगणक (लॅपटॉप) घ्यावयाचा आहे.
बजेट : ३००००-४००००.

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
20 Jan 2018 - 11:36

सर्व द्रव्यांमधला समान धागा कोणता? (What is the similarity between all the nine substances)

राजा कालस्य कारणम्..म्हणजे राजाच्या इच्छेने राज्यात बऱ्याचश्या गोष्टींना चालना मिळते. घरातल्या कर्त्या पिढीच्या मताने घरातल्या गोष्टी घडतात. विक्रमाच्या राज्यातही काही वेगळे घडत नव्हते. पण सृष्टीमध्ये अशाही काही गोष्टी घडतात की जिथे असा कोणी माणूस, कोणी सजीव काही करताना दिसत नाही. जसं लोहचुंबक(magnet) जवळ आल्यावर गुळाला मुंगळे चिकटावे तसा लोहकीस त्याला चिकटतो.

arunjoshi123's picture
arunjoshi123 in तंत्रजगत
17 Nov 2017 - 12:54

वैज्ञानिक घडामोडी - भाग १

प्रिय मित्रहो,
आपण विज्ञानशासित जगात राहतो. खालच्या पानावर scientific revolution शास्त्रीय समजुती कशा बदलतात हे कुन या लेखकाने मांडले आहे. वैज्ञानिक ज्ञानाच्या स्वरुपाबद्दल त्यांचं वरच्या लिंकमधे दिलेलं पुस्तक महत्त्वाचं मानलं जातं.

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
15 Nov 2017 - 21:46

पदार्थधर्मसंग्रह: पदार्थाची सहा अंगे (Padarthsharmsangraha: Six facets of any entity according to Vaisheshika)

(टीप: प्रस्तुत लेखातील संस्कृत श्लोक हे प्रशस्तपादभाष्यातील, इंग्रजी अनुवाद हा महामहोपाध्याय पंडित गंगानाथ झा यांच्या इंग्रजी भाषांतरातून घेतला आहे. त्याखाली भावानुवाद केला आहे. नंतरच्या तिरक्या अक्षरातील मराठीतील टिपा व उदाहरण या अर्थ सोपा करण्याच्या हेतूने देण्यात आल्या आहेत.

एखाद्या कॅलिडोस्कोप मधून साध्याच काचेच्या चुऱ्याच्या वेगवेगळ्या सुंदर रचना दिसाव्यात तसेच वैशेषिकांनी पदार्थाकडे पहायचे सहा दृष्टिकोन सांगितले आहेत. त्यांमधून कोणत्याही पदार्थाची सहा अंगे दिसतात. खाली दिलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून या सहा अंगांविषयी माहिती दिली आहे. ते प्रश्नसुद्धा समजायला सोपे जावे म्हणून दिले आहेत.)

पदार्थ ज्या द्रव्यांचा बनलेला असतो ती द्रव्ये कोणती?

प्रशस्तपाद म्हणतात:
अथ के द्रव्यादय: पदार्था:, किञ्च तेषां साधर्म्यं विधर्म्यञ्चेति |
Question: Which are the categories, substance and the rest? And what are their similarities and dissimilarities?

पदार्थातील ती द्रव्ये कोणती? त्यांच्यातील सारखेपणा आणि वेगळेपणा कोणता?

वैशेषिक विश्लेषण पद्धतीचा हा पहिला टप्पा. यात पदार्थ कोणत्या द्रव्याचा बनला आहे याचा विचार होतो.

तत्रद्रव्याणि पृथव्यप्तेजोर्वाय्वाकाशकालदिगात्ममनांसि सामान्यविशेषसंज्ञयोक्तानि नवैवेति |
तद्व्यतिरेकेणान्यस्य संज्ञानभिधानात् ||

Answer: Among these the substances are – Earth, Water, Light, Air, Ether (Akash), Time, Space, Self and Mind. These mentioned in the sutra by their general as well as specific names, are nine only; as besides these none other is mentioned by name.

ती द्रव्ये म्हणजे स्थायू (solid), द्रव(liquid), ऊर्जा/उष्णता/प्रकाश(energy), वायू(gas), आकाश(ether), काल(time), स्थल(space), आत्मा(self/atma) व मन(mind). वैशेषिक सूत्रांमध्ये नावांसहित वर्णन केल्या प्रमाणे ती संख्येने ९ इतकी भरतात. बाकी इतर कुठल्याही द्रव्याची नोंद सूत्रामध्ये नाही.

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in तंत्रजगत
13 Nov 2017 - 10:44

व्होल्टेज स्टॅबिलायझर ची गरज

पुर्वी टीव्ही / फ्रीज विकत घेताना त्या उपकरणांच्या सुरक्षेसाठी सोबत व्होल्टेज स्टॅबिलायझर सुद्धा विकत घ्यावा लागत असे . हल्लीच्या काळात या उपकरणांसाठी व्होल्टेज स्टॅबिलायझर आवश्यक आहे का ? असल्यास कुठल्या कंपनीचा व्होल्टेज स्टॅबिलायझर चांगला आहे ?

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
10 Nov 2017 - 14:50

पदार्थधर्मसंग्रह: ग्रंथारंभ व उद्देश (Padarthdharmsangraha: Salutation and reasons for studying physics)

(टीप: मागे एका लेखात २ऱ्या शतकातल्या ज्या प्रशस्तपादभाष्य/पदार्थधर्मसंग्रह पुस्तकाचं वर्णन केलं होतं त्याच्या पहिल्या धड्यातील संस्कृत श्लोक, १९१७ सालचं आता कुठंही न मिळणारं इंग्रजी भाषांतर व त्यावर आधारलेला मराठी भावानुवाद देताना अतिशय छान वाटतंय..नंतरच्या तिरक्या अक्षरातील मराठीतील टिपा या अर्थ सोपा करण्याच्या हेतूने देण्यात आल्या आहेत.कोण्या अधिकारी/शास्त्रज्ञ माणसाने विषयाला अधिक न्याय जरूर

अमितदादा's picture
अमितदादा in तंत्रजगत
22 Oct 2017 - 19:47

कंपन, अनुनाद आणि दुर्घटना

प्रेरणा मोजमापे, युनिट आणि दुर्घटना

टीप
     १. लेखात अनेक ठिकाणी क्लिष्टता टाळण्यासाठी सरलीकरण (simplification) केलेलं आहे, काही ठिकाणी इंग्रजी शब्द जाणीवपूर्वक तसेच ठेवले आहेत.