मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

गाडीची देखभाल; काही उपयुक्त टिप्स!

Primary tabs

उपयोजक's picture
उपयोजक in तंत्रजगत
16 Jun 2019 - 5:02 pm

ही पोस्ट मिलिंद भिडे,भिलाई नगर,छत्तीसगढ़ यांची आहे.त्यांच्या परवानगीने इथे देत आहे.पुढील मजकूर त्यांच्याच शब्दात:

नमस्कार मंडळी,

पावसाळ्याचे आगमन आता केव्हाही होईल म्हणून आपले,मुलांचे,कुटुंबियांचे रेनकोट शोधून स्वच्छ करून ठेवलेच असतीलच.

आपल्या दुचाकी वाहनांकरिता कव्हरही शोधून ठेवले असतील किंवा विकत आणायची तयारी केलीच असेल.

हे सगळे करत असताना आपल्या कारचं सर्व्हिसिंग ही केलं असेल.सर्व्हिसिंग म्हणजे फक्त वरवर धुणे नाही.तर जिथे जिथे धूळ,माती जमली असेल किंवा जमायची शक्यता असेल, त्या सर्व जागा एकदा पावसाळ्याआधी नीट स्वच्छ करून घ्याव्यात नंतर कार सर्व्हिसिंगला घेऊन जावी.

सर्व्हीस सेन्टरला पोहोचल्या वर कारच्या दाराच्या आतील हार्ड बोर्ड, टेल लाइट,रबरी आणि कापडी मॅटिंग काढून घ्यावे म्हणजे कारचे इंटर्नल सर्व्हिसिंगही होऊन जाईल.तसेच कारचे बोनेट आणि विंड स्क्रीनच्या मधे असलेले प्लास्टिक कव्हर ही काढून घ्यावे. कार नियमितपणे जर झाडाखाली पार्क करत असाल तर प्लास्टिक कव्हरच्या व्हेंट मधून झाडाची पाने आत एकत्र होतात आणि सर्व्हिसिंगचे पाणी एका जागी साठायला सहाय्यभूत होतात. ह्यामुळे प्लास्टिक कव्हरखालील पत्रा गंजतो आणि आपल्या लक्षातही येत नाही.कारच्या डिक्कीमधून स्टेपनी काढून,आतील भाग आधी कोरड्या आणि नंतर ओल्या फडक्याने चांगला पुसून घ्या.गरज असेल तर व्हॅक्यूम क्लीनरही वापरून बारीक धूळ स्वच्छ करुन घ्या.

कार रँपवर किंवा हायड्रॉलिक जॅकवर उभी केल्यानंतर चार ही चाके काढून घ्या;जेणेकरून व्हील ड्रमच्या मागे जमलेली माती, चिखल, रस्त्यावरची पॉलीथिन, प्लास्टिकची पोती वगैरे व्यवस्थित धुतली जातील आणि सर्व्हिसिंग नंतर धूळमातीचा लवलेशही राहणार नाही. तसेच सर्व्हिसिंगच्या वेळेस कार डोअरच्या खालील भागात असलेली छिद्रे निवांतपणे बसून स्वच्छ करुन घ्या. ही छिद्रे स्वच्छ राहीली तर कारची दारे खालून गंजणार नाहीत. कार सर्व्हिसिंग करून घेत असताना चारही चाकांच्या वरचे गोल mudguard आत हात घालून स्वच्छ करायला लावा.सामान्यत: आपल्या चारचाकी वाहनाचे दारावरचे गोल मडगार्ड दाराच्या खालून गंजायला सुरुवात होते कारण बाहेरून कार बॉडी धूवून घेताना ह्या किरकोळ बाबीकडे आपले लक्ष जात नाही.

पावसाळ्याआधी आणि नंतर कारच्या सीटसकट आतील कापडी मॅट बाहेर काढा आणि व्यवस्थित आतून, बाहेरून कार धूवून घ्यावी आणि पूर्णपणे वाळल्यानंतर सीट, कापड़ी मॅट, हार्डबोर्ड बसवून घ्या, शिवाय कार मॅटिंगच्या खाली napthalene balls टाकायची सवय ठेवा.ह्या बॉल्स मुळे उंदीर आणि पाल आत थांबत नाहीत. ह्या एका सवयी मुळे तुमच्या कारचे आतून, बाहेरून व्यवस्थित निरीक्षण होऊन जाईल आणि वेळीच मेंटेनेंस मुळेगरजे प्रमाणे स्वच्छतेची ही सवय तुम्हाला मोठ्या खर्चापासून वाचवेल.कापडी मॅटिंग काढल्यामुळे कारच्या फ्लोअरची आतून स्थिती काय आहे, हे ही दिसून येईल. समजा आतून कुठे ही कार फ्लोर वर गंजायचे चिन्ह दिसले तर वेळीच आतून स्वच्छ करून वेल्डिंगची गरज असल्यास लगेच करून घ्या. ह्या निमित्याने कारची इंटरनल वायरिंग कंडीशन ही दिसून येईल आणि उंदराने जर का वायरिंग कुरतडली असेल तर वेळीच काळजी घेऊन कारला शार्ट सर्किटमुळे लागणार्‍या आगीपासून वाचवू शकाल.

सर्वसाधारणपणे आपल्या पॅसेंजर्सना लांबच्या प्रवासात कारच्या आत बसून खायची सवय असते.ज्यातले अंश कळत, नकळत कारच्या आतच पडून जातात.जे साहजिकच उंदराला आमंत्रण ठरते.हा पाहुणा एकदा का कारमध्ये घुसला की कारच्या वायरिंग,सकट सीटच्या फोमचा यथेच्छ समाचार घेतो आणि परिणामत: आपल्या खिश्याला नको तेव्हा, नको तेवढी भोके पडतात.घाईच्या वेळेस कार मध्येच उभी होते,तेव्हा असली संकटे निस्तरायला वेळ नसतो आणि अनपेक्षित संकटामुळे आपली काम खोळंबतात.

आतील स्वच्छतेबरोबरच वार्षिक निदान एकदा, पावसाळ्याच्या नंतर प्रत्येक चाकाचे टायर, ट्यूब काढून घेऊन व्हील ड्रमच्या आतील बाजूस लागलेली गंज, एमरी पेपर ने स्वच्छ घासून घेवून त्यावर इनॅमल पेंट लावून घ्या. ही क्रिया स्टेपनीसकट प्रत्येक चाकाबरोबर रिपीट करा.हे न केल्याने कार व्हील मध्ये हवा भरायच्या नोजलच्या जवळपास व्हील ड्रम गंजतो आणि एखाद्या दिवशी चालत्या कारची ट्यूब अचानक कट लागून फाटते आणि मोठा अपघात होऊ शकतो.

इतकी काळजी नियमित घेतली तर आपली कार व्यवस्थित चालते आणि आपले पैसे आणि सर्वात मुल्यवान जीव वाचतो.

पावसाळ्यात लाँग ड्राइव्हवर जायची आवड असेल तर कारमध्ये वायपर खराब झाल्यास विंड स्क्रीनवर घासायला तम्बाखू, जुने वर्तमानपत्र, तसेच रस्त्यात धुके लागल्यास स्पष्ट दिसायला पिवळा सेलोफेन पेपर,हेड लाइट वर सेलोफेन पेपर चिकटवायला सेलोटेप आणि पिवळी काच असलेला गॉगल,जरूर ठेवा.ह्या शिवाय 2 स्पेयर हेडलाइट बल्ब, निदान ५ ते ८ फूट लांब वायर आणि कारच्या स्पेसिफिकेशन प्रमाणे स्पेयर फ्यूज, टॉर्च, गरज पडल्यास कार टो करायला नायलॉन ची दोरी ही जवळ असु द्या.ह्या सगळ्याचा वापर तुमच्यासाठी नाही करता आला तरी निदान दुसऱ्याला मदत करायला उपयोग होऊ शकेल.

पोस्ट आवडली असेल तर आपल्या आप्त, स्वकीयांना लिंक पाठवा जेणे करून ते ही मोठ्या खर्चातून वाचतील.

पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद आणि आभार. _/\_ :-)