मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

रचना आणि निर्मिती ( डिझाईन आणि उत्पादन )

Primary tabs

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in तंत्रजगत
30 Sep 2019 - 7:29 am

रचना आणि निर्मिती ( डिझाईन आणि उत्पादन )
इंडस्ट्रियल डिझाईन किंवा प्रॉडक्ट डिझाईन इंजिनीरिंग , आणि त्याला सल्गना असलेले बहूउत्पादन
या क्षेत्रात कोणास मार्गदर्शन/ माहिती पाहिजे असल्यास संपर्क साधावा

प्रतिक्रिया

कंजूस's picture

30 Sep 2019 - 11:19 am | कंजूस

???

चौकस२१२'s picture

30 Sep 2019 - 12:04 pm | चौकस२१२

कंजूस आपणास काय प्रश्न पडला आहे ? मला कळले नाही ?

कंजूस's picture

30 Sep 2019 - 1:32 pm | कंजूस

हं ते लिहायचं राहिलंच.
तुम्ही बनवलेली एक दोन डिझाइन्स किंवा प्रॉडक्ट साम्पल्स टाकलीत तर थोडासा लेख होईल.

चौकस२१२'s picture

30 Sep 2019 - 6:28 pm | चौकस२१२

कंजूस अहो मग स्पष्ट विचार ना ,, हे प्रश्न चिन्ह काय? प्रॉडक्ट मध्ये पण स्पष्टपणा लागतो त्याशिवाय काम करता येत नाही , तसेच आहे
कोणी म्हणले कि अमुक अमुक डिझाईन करून द्या तर ३ प्रश्न असतात
१) एकूण किती संख्या
२) काय दर्जाचे
३) किती किमतीत

हा तर या प्रकारच्या ( याचं असा नाही) उत्पादनात काम केलं आहे
https://www.lodeking.com/
https://www.hearinglink.org/your-hearing/implants/middle-ear-implants/
https://www.yaleasia.com/en/
https://www.greenloo.org/
गंमत सांगतो...खरं वाटणार नाही.. जेवहा टॉयलेट कमोड चे डिझाईन चे काम असते तेव्हा त्यासाठी राष्ट्रीय स्टॅंडर्ड आह लेणी त्यात लॅन्डके कशी असावीत याचे सुद्धा परिमाण आहे! अन सॉसेज स्किन मध्ये विशिष्ट प्रकारची माती भरून त्याचा आव आणला जातो

अर्धवट प्रतिसाद पाठवला गेला आणि विसरलो. परत आल्यावर घोटाळा लक्षात आला.

टॉयलेट कमोडचे बाजारात मिळणारी बरीचशी डिजाईन्स गंडलेली आहेत. पाणी फार लागतं हा दोष आहे. लेंडकं त्या ओढ्यातच भोवऱ्यात फिरत राहतात पण पलीकडे जात नाहीत. सायफनचं डिजाईन, डायामिटर अजून परफेक्ट नाही. महाग म्हणजे चांगलं असं गळ्यात मारतात. भिंतीतलं आउटलेट घ्या सांगतात पण त्याचीही सायफन नळी बरोबर नसल्यास तोच प्रश्न. खूप पाणी ओतणे हे देशाच्या समृदधीस घातक आहे.

थेट तुमच्यावर आरोपबिरोप नसून फक्त चर्चा म्हणून उदाहरण.
------
दुसरे - पाठीवरची स्याक. कोणी हरीचा लाल पाण्याची याची बाटली पूर्ण अडकेल असे साईडपॉकेट्स शिवत नाही. काही चारपाच इंचाची जाळी शिवून ठेवतात त्यातून एक लिटरची बाटली बाहेर सटकत राहते.
----
प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स गोल करण्यापेक्षा चौकोनी हव्यात. किंवा हाफ राउंड. त्या ब्यागेत घट्ट बसतील.
अशी बरीच उदाहरणे आहेत जिथे काम आवश्यक आहे.

कंकाका हहपुवा लागली .. मी तुमच्या प्रतिसादातले सर्व इमॅजिन करून बघतोय .. ह्ही ह्ही ह्ही

चौकस२१२'s picture

3 Oct 2019 - 5:19 pm | चौकस२१२

कंजूस भाऊ
१) अपालासारखाय ग्राहकाच्या सूचना चांगला उद्योग असेल तर लक्षात घेते आणि उत्पादन पुढे सुधारण्याचा प्रयत्न करते.. कमोड बद्दल: कोणत्या देशातील कोणते ब्रँड तुम्ही म्हणताय माहित नाही परंतु "ओढ्यातच भोवऱ्यात फिरत राहतात पण पलीकडे जात नाहीत. " हे मी तरी अनुभवले नाहीये ( भारताबाहेरील उत्पादन )
अर्थात आत भारतात हि सध्या जगभरचे उत्पादन मिळते म्हणा ..
२) आपली टीका माझ्यावर नाही हे कळले परंतु आपण आधी जे " तुमचं सारखया कन्सल्टन्ट कडून ५-१० डिझाईन घेउन उत्पादक बेकार माल बाजारात आणतात.. असे काहीसे जे विधान होते ते मला तरी वाटते कि उचलली जीभ लावली टाळ्याला असे वाटले... कोणती कंपनी उगाच खर्च करेल आणि त्यातून निर्माण झालेलं टाकून देईल !
३) पाठीवरची स्याक... याच कारण असे असावे ... कि मुळात या वास्तूचा शोध जर भारताबाहेर लागलं असे गृहीत धरले तर तिथे १ लिटर चाय बाटल्या स्याक मध्ये घालण्याची पद्धत नसून लहालसार बाटल्या वापरलाय जातात असा अनुभव आहे,, भारतातील बाजारपेठेसाठी जेव्हा हे उत्पादन ज्याने कोणे सुरु केले तेव्हा स्तहनिक सवयवी चा विचार केलं गेला पाहिजेल होता . तुमचे निरीक्षण बरोबर आहे
४) पेट किंवा धातूची बाटली चौकोनी बनवणे गोल बनवण्यापेसकः थोडे किचकट असू शकते ( अशक्य नाही काही दारू च्या बाटल्या असतात कि चौकोनी पण त्या काचेच्या) तसेच ती "सटकणार" नाही असे नाही सांगता येत .

आता एक माझे ग्राहक म्हणून उत्पादन बद्दल चे निरीक्षण/ तक्रार:
स्टील ची भांडी बनवणारे त्यावरचे लेबल हे बरेचदा आतल्या बाजूला का लावतात? आणि त्याला वापरलेला गोंड हा खाद्यपदार्थ दर्जाचा असतो का?

चौकस२१२'s picture

3 Oct 2019 - 5:20 pm | चौकस२१२

पूर्ण फ्लश आणि अर्धा फ्लश असे पण उत्पादन मिळविते त्यामुळे पाण्याची बचत होते

अभ्यासक्रम आहे? कृपया मार्गदर्शन करावे!

चौकस२१२'s picture

30 Sep 2019 - 6:00 pm | चौकस२१२

डिझाईन म्हणजे ज्याला प्रॉडक्ट किंवा इंडस्ट्रियल डिझाईन म्हणतात असे गृहीत धरतो कारण याशिवाय ग्राफिक डिझाईन तसेच इंटिरियर डिझाईन हि सुद्धा संलग्न क्षेत्रे आहेत
साधारण पणे इंडस्ट्रियल डिझाईन केलेला पदवीधर खूप वेगवेगळ्या प्रॉडक्ट war काम करतो, वैद्यकीय उपकरणे, वाहने, फर्निचर , स्वयंपाकघरातल्या वस्तू इत्यादी गोष्टीत दिसतो
याशिवाय खेळणी किंवा पॅकेजिंग , ब्रॅण्डिंग इत्यादी
- सरळ म्हणजे १२ वि नंतर बॅचलर ऑफ इंडस्ट्रिअल डिझाईन करत येते
- किंवा जर उपलब्ध असल्यास बॅचलर ऑफ प्रॉडक्ट डिझाईन इंजिनीरिंग ( ज्यात मेकॅनिकल इंजिनीरिंग + इंडस्ट्रियल डिझाईन याचे मिश्रण असते )
- बॅचलर ऑफ मेकॅनिकल इंजिनीरिंग किंवा बॅचलर ऑफ आर्किटेक्चर करून मग मास्टर ऑफ इंडस्ट्रिअल डिझाईन करत येते आई आई ती मुंबई
- एन आई डि अहमदाबाद येथे हि डिप्लोमा आहे, ( पण त्याला डिप्लोमा का म्हणतात हे अजून कळले नाही .. )
- उद्योगाच्या संशोधन विभागात बॅचलर ऑफ मेकॅनिकल इंजिनीरिंग करून पण डिझाईन क्षेत्रात काम करता येते
आंतरजालावर विविध देशातील इंडस्ट्रियल डिझाईन संस्था किंवा समूह यावर जास्त माहिती मिळेल
काही दुवे
https://designawards.core77.com/
https://www.red-dot.org/search/
https://www.design.org.au/designindustry/design-disciplines
http://www.swinburne.edu.au/science-engineering-technology/schools-depar...

जालिम लोशन's picture

1 Oct 2019 - 11:32 am | जालिम लोशन

ऊपयुक्त माहिती.

चौकस२१२'s picture

30 Sep 2019 - 6:10 pm | चौकस२१२

पदवी करायची असेल तर ती पदवी यूजीसी मान्य पाडवाई आहे ना ते बघा उगा डीम्ड युनिव्हर्सिटी पेक्षा किंवा त्यपेशीक्षय म्हणजे " ४ खोलीत काढलेल्या "इंटीटीटूट " मधून नको
तसेच मेकँनिकल इंजिनीरिंग करीत असताना drawing आणि प्रोडक्शन प्रोसेस कडे जास्त लक्ष द्या , यासच ३डी खालील सॉफवारे मध्ये शिक्षण घ्या
https://solidedge.siemens.com/en/
https://www.solidworks.com/
https://www.autodesk.com/products/alias-प्रॉडक्ट्स
Rhinoceros

चौकस२१२'s picture

30 Sep 2019 - 6:11 pm | चौकस२१२

मुद्राराक्षसाच्या विनोदाबद्दल क्षमा

तुम्ही किंवा तुमच्यासारख्या लोकांकडून पाच दहा डिजाइन्स कारखाना मालक घेत असतील पण शेवटी स्वस्त आणि दिखाऊ प्रॉडक्टच निवडून मार्केटात ढकलत असतील.

चौकस२१२'s picture

1 Oct 2019 - 2:53 pm | चौकस२१२

कंजूस बाबा परत तुम्हाला नक्की काय म्हण्यायचंय कळत नाहीये... थोडा कडवट पण वाटतोय...चांगल्या कंपन्या डिझाईन वर खर्च करतात , एकतर अंतर्गत किंवा बाहेरील तज्ज्ञ लोकांकडून.. करून दिलेले डिझाईन हे त्यांचं मालकीचे असते मग पुढे ते बाजारात आणतात किंवा नाही हा त्यांचा प्रश्न असतो...
साधं उद्धरण घ्या ,, फुचुरा प्रेशर कुकर ज्यांनी निर्माण केला आणि प्रसिद्ध झाला ,,,

चौकस२१२'s picture

1 Oct 2019 - 3:39 pm | चौकस२१२

कंजूस भाऊ अहो...कामचलाऊ ते कामचलाऊ राहते
सगळे तसे करीत असते तर ... खालील उत्पादने प्रसिद्ध झाली असती का?
-गोदरेज ची काही कुलपे
- पाफ किंवा tefal यांचे स्वयंपाकघरातील साधने
- बॉश , ऑडी बेंझ सारखे जर्मन ब्रँड
- कोकलेअर सारखी कानाची यंत्रे
इंजिनीरिंग आणि डिझाईन चा मुख्य हेतू हा असतो कि निर्माण झरेलाल प्रश्न सोडवून माणसाचे आयुष्य सोपे करणे ,
इंग्रजीत फॉर्म आणि फंक्शन याचा ( आणि किंमत) जो उत्तम मेल घालतो ते उत्पादन यशस्वी होते
हे करीत असताना अनेक मुद्दे लक्षात जिवे लागतात
दोन उदाहरण
१) एका भारतीय मराठी दाम्पत्याने सिंगापोर मध्ये पोळी बनवण्याचाया यंत्राचा नवीन नमुना निर्माण केला कि ज्यात कणिक तेल २ भागात टाकले कि पोळी तयार ...
हे बाजारात आणे पर्यंत बरीच वर्षे लागली... ते येई पर्यंत लोकांचा विश्वास उडू लागला .. कि हे काय फ्रॉड आहे कि काय ! पण ते तसे नवहते.. त्यांचं या मार्केटिंग चाय पद्धतीत काही तरी चुकले पण शेवटी लोकांना हे यंत्र खरंच मिळाले

चांगले: संपूर्ण पोळी / फुलका बनवणारे सोपे यंत्र
फारसे चांगले नसलेले : जड , किंमत साधारण ५० हजार रुपये त्यामुळे भारतीय बाजारपेठेत साहजिक फार कमी मागणी ( अर्थात त्यांची नजर हि इतर देशातील भारतीय असावेत

म्हणजे इनोवेटिव ( नावीन्यपूर्ण ) उत्पादन पण ते पूर्ण यशस्वी होईल का हि एक शंकाच आहे ..

https://rotimatic.com/order/

२) झटपट पुरण
मित्राने नवीन खाद्यपदार्थ बाजारात आणलं आहे
http://puranquick.com/

प्रॉडक्ट डिझाईन हे फक्त उपकरणाचे असते असे नाही

खुलासा : हि फक्त माहिती आहे यात माझा काहीही आर्थिक फायदा करण्याचा हेतू नाही

चौथा कोनाडा's picture

3 Oct 2019 - 4:20 pm | चौथा कोनाडा

१) एका भारतीय मराठी दाम्पत्याने सिंगापोर मध्ये पोळी बनवण्याचाया यंत्राचा नवीन नमुना निर्माण केला कि ज्यात कणिक तेल २ भागात टाकले कि पोळी तयार ...

+१ एक नंबर इन्नोव्हेशन आहे, आज ना उद्या हे विकले जाईलच.
यंत्र महाग आहे, जवळपासच्या कुणी विकत घेतल्याच दिसत नाही.
माझ्याकडे मी नक्की घेईन.

या यंत्राचं नाव रोटीमॅटीक असं आहे, या बद्दल लोकसत्ता चतुरंगमध्ये हा सुंदर लेख आहे:
वाचाच.

रोजच न चुकता चपात्या करणं, जिकिरीचं व कंटाळवाणं होऊ शकतं, हे जाणून सिंगापूरस्थित मराठी तरुणीनं शोधलं ‘रोटीमॅटिक’ हे पूर्णत: स्वयंचलित यंत्र.

https://www.loksatta.com/chaturang-news/magic-of-rotimatic-1064589//lite/

चौथा कोनाडा's picture

30 Sep 2019 - 9:04 pm | चौथा कोनाडा

चौकस२१२साहेब, खुप छान माहिती आहे. उपयुक्त धागा आहे.


मार्गदर्शन/ माहिती पाहिजे असल्यास संपर्क साधावा

माहिती तर आजकाल आंजावर आणि त्या त्या अभ्यासक्रमाच्या माहिती पत्रकात असते.
आपण या पेक्षा वेगळी काही माहिती देता का ? आपण याचा व्यावसायिक सेवाआकार घेता का ? इन्टर्नशिप साठी मदत करता का ?

आपले अनुभव वाचायला खुप आवडेल.
(मी देखिल माझा एक अनुभव यथाअवकाश इथे देईन असं म्हणतोय)

चौकस२१२'s picture

1 Oct 2019 - 3:09 pm | चौकस२१२

माझा हेतू साधा आहे कि या व्यसायासंबंधी जमेल तशी माहिती दयावी ... जरा अनवट आहे म्हणून , मेकॅनिकल इंजिनीरिंग आणि आर्किटेक्ट वैगरे बरेच असतात ...त्यातील बरीच माहिती तुमची तुम्ही शोधू शकता हे जरी खरे असले तरी काही जणांना कल्पना नसते... म्हणून एका साधा प्रयत्न याचा अर्थ मी काही शिष्यवृत्ती देऊ शकतो असे नाही...
"व्यासायिक सेवा आकार" कशाचा? १) डिझाईन कामाचा कि २) पुढील शिक्षणाबद्दल बद्दल च्या मार्गदर्शनाचा ?
१= हो अर्थात २ = नाही अर्थात कोणत्या देशातील पुढील संध्या किंवा शिक्षण यावर अवलंबून आहे मी किती मार्गदर्शन करू शकतो ते

उदाहरण देतो, एकदा , एका दंतवैद्य कडे गेलो उशीर झाला म्हणून त्यांनी माझी माफी मागितली... त्या म्हणाल्या अहो जरा घरी मुलगा आणि पती यांच्यात वाद चालला होता तो सोडवून यायला वेळ लागलं.. प्रकार असा कि मुलगा इनिंग्जरिंग चाय दुसरया वर्षाला वडील इंजिनेर म्हणून तो हि गेला पण त्याला आवडत नवहते.. त्याचा कल आर्ट ( ग्राफिक वैगरे) कडे पण तसे इंजिनीरिंग ला ( विनाअनुदान ) प्रवेश मिळण्याएवढी शास्त्र गणिताची आवड... खोलीत त्याने केलेली काही चित्र आणि कॅलिग्राफी होती मला पटकन सुचले मी त्यांना सुचवले अहो तुम्ही इंडस्ट्रियल डिजाईना ला जाण्याचा विचार केलात का? त्या म्हणाल्या म्हणजे काय.. मी म्हणलं तुम्ही या तुम्ही रोज वापरात असलेल्या उपकरणांकडे पहा, या डेंटल खुर्ची कडे पहा आणि विचार करा कि हे सर्व कोण बनवता असेल आणि कसे डिझाईन केले गेले असेल? आरे हो कि .. हि बघ हि दात उपटायची पकड,, काम इतका सोप्पं होत , मी म्हणलं होता ना.. कारण त्यामागे चांगले डिझाईन आहे, तेव्हा त्यांच्या लक्षात आले...
असो ... तेव्हा

स्वधर्म's picture

1 Oct 2019 - 12:00 pm | स्वधर्म

चौकस, प्रॉडक्ट डिझाइनवर धागा काढल्याबद्दल धन्यवाद. मी पण शिक्षणाने प्रॉडक्ट डिझाइनर अाहे. जमेल तशी या माहितीत भर घालेन. वरच्या लिंक्समध्ये अाणखी भर:
http://www.idc.iitb.ac.in/
http://nid.edu/
या भारतातल्या अग्रगण्य डिझाइनच्या शिक्षण संस्था अाहेत.

चौथा कोनाडा's picture

1 Oct 2019 - 12:41 pm | चौथा कोनाडा


मी पण प्रॉडक्ट डिझाइनर आहे. जमेल तशी या माहितीत भर घालेन


+१
हे मस्तच होइल. या विषयावर मिपावर वेगळा विभाग करायला हरकत नाही.

चौकस२१२'s picture

1 Oct 2019 - 3:19 pm | चौकस२१२

वाह मस्त.. नक्की भर घाला... (अर्थात हे इतरांना कंटाळवाणे वाटत नसेल तर) . थोडा खुलासा, मी मुळात मेकॅनिकल बाजूचा आहे पण नेहमी प्रॉडक्ट डेव्हलोपमेंट मध्ये काम केल्यामुळे या क्षेत्रात आहे आणि यात आवड आहे तुम्ही कदाचित "शुद्ध प्रॉडक्ट / इंडस्ट्रियल डिझाइनर "असाल.. तर अजून बारकावे सांगू शकाल ! माझा कल जर जास्त "डिझाईन पासून उत्पादन पर्यंत कसे" या कडे आहे

भारतातील एकूण उत्पादन क्षेत्र आणि फक्त बजाज / लॅम्ब्रेटा पासून आजची असंख्य उत्पादने हि वाढ निश्चितच या क्षेत्राला उर्जितावस्थेते कडे घेऊन गेली असणार तुलनेने आज पाश्चिमात्य देशात उत्पादन घटत आहे ( होंडा आता थायलंड मध्ये गाड्या बनवते )
मेक इन इंडिया हे उत्तम पद्धतीने राबविले ( बाबूगिरी ना करिता) तर देशाला फायदाच होणार आहे

उत्तम विषयावरचा लेख. धन्यवाद.

चौकस२१२'s picture

1 Oct 2019 - 3:44 pm | चौकस२१२

बघा हे क्षेत्र किती किती गंमतशीर आह येते एक दिवस तुम्ही कमोड डिझाईन करीत असाल तर दुसऱ्या दिवशी "मामा" ला बूड टेकण्यासाठीची काठी
http://www.idc.iitb.ac.in/chakku/multi-use_innovation_studio2.html

तुम्ही सर्व उत्तरे छान दिलीत. कडवटपणा करून मला काय फायदा. तो नाहीच. मी काही उदाहरणं चर्चेसाठी दिली.
धागा पुढे चालू द्या.
-----------
एक जोक सगळ्यांनाच माहीत असेल.
बजाजने नवीन विमान बाजारात आणले त्याचा उदघाटन संमारंभ. ते पहिलं विमान काही स्टार्ट होईना. मग चीफ मिक्यानिक येतो. एका बाजूस ज्याक लावून ते तिरके करतो, सरळ करतो,मग विमानाचे एंजिन स्टार्ट होते.
-------
हे विनोदाने घ्याल ना?

चौकस२१२'s picture

4 Oct 2019 - 8:37 am | चौकस२१२

आहो महशय "तुम्ही किंवा तुमच्यासारख्या लोकांकडून पाच दहा डिजाइन्स कारखाना मालक घेत असतील पण शेवटी स्वस्त आणि दिखाऊ प्रॉडक्टच निवडून मार्केटात ढकलत असतील." यच अर्थ कय होतो ? उगच एखद्य व्यसयबद्दल चुकिचि ग्रुहित करुन लिहु नये , असे पैसे कशल कोन वय घल्वेल ? पाच दहा डिजाइन्स करयल पैसे लआग्तत

कंजूस's picture

4 Oct 2019 - 9:27 am | कंजूस

भारतीय मार्केट किंमतीवर चालतं. चाइनिज प्रॉडक्ट कमी किंमतीत खूप फीचरवाले मार्केटमध्ये ओतले जात आहेत. त्यामुळे कारखानदार किंमतीवरच लक्ष ठेवणार हे मत बनवण्याला वाव आहे.

चौकस२१२'s picture

13 Oct 2019 - 4:07 pm | चौकस२१२

कंजूस ...हो आपले निरीक्षण बरोबर आहे भारतीय मार्केट बद्दल परंतु त्याचा अर्थ असा होत नाही कि सगळी कडे टाकाऊ मालच असतो .. आणि दुसरे असे कि हा जो टाकाऊ माळ बाजारात आणणारा उत्पादक असतो तो उगाचच "तुमचं सारखया डिझाइनर कडून ५-१० डिझाइन करून घेतो .. " या उद्योगात पडत नाही कशाला पैसे घालवेल ?
म्हणून मी आपल्या विधानातील फोल पण दाखवून देत होतो ,,
मागणी पुरवठा प्रमाणे अनेक उत्पादने असतात
उदाहरण:
१) हॉटेल व्यसायातील लागणाऱ्या भांड्यत्यांचे उत्पादन करण्यात भारत पुढे आहे हे खरे आहे परंतु त्यात सुद्धा भारत तैवान आणि यूरोप मधील उत्पादने यांनी जणू काही त्यातील मार्केट वाटून घेतलेले आहे , त्यामुळे भारतीय उत्पादन एका दर्जा पर्यंत असते आणि त्याची बदनामी होते.. त्याला जसा उत्पादक कारणीभूत तास ग्राहक ( येथे हॉटेल मालक चालक) हि कारणीभूत कारण रो ठराविक प्रकारच्या मला साठी ठराविक प्रकारची किंमत देतो
अर्थात हे चित्र काळाप्रमाणे बदलते,, पूर्वी नाही का कोरियन गाड्या फालतू समजल्या जायच्या,, एवढेच काय जपानी मालाला पण हीं मानले जायचे
२) चीन मधील माल निकृष्टच असतो" हे बरोबर आणि चुकीचे दोनही आहे, अनेक उत्पादक अप्लाय दर्जाला साजेल असे उत्पादन चीन मधून सुद्धा काढते पण फक्त एकाच प्रकारचे अनुभव ( भारतातातील चीनची कचकडं माल) असेल एखाद्याला तर एकांगी विधान केलेले बरोबर होते का?
या बाबी हे सर्व थोड्या का होईना अधिकाराने मांडू शकतो कारण कानाच्या यंत्र पासून ते सेप्टिक टॅंक पर्यंत उत्पादनमागे काय चालते हे पहिले आहे म्हणून बाकी काही नाही

चौकटराजा's picture

8 Oct 2019 - 9:23 am | चौकटराजा

डिझाईन ही एक प्रक्रिया आहे. तीत काही अगदी मूलभूत तत्वे आहेत . संख्या ,दर्जा व किंमत हे त्याचे मूळ निकष नव्हेत तर , कुणासाठी , कशासाठी व कसे ते त्याचे मूळ प्रष्ण असतात .
उदा भारत देशात किचन ओट्याची उंची ही सर्वसाधारण भारतीय महिलेच्या उंचीच्या प्रमाणात असणार . यात किंमत दर्जा यांचा संबंध येत नाही. कार्य , बांधणी ,व सौंदर्य असे त्याचे आणखी काही महत्वाचे अंग आहेत. उदा आपले शरीर घ्या . त्यात कार्य म्हणजे सर्वात महत्वाचे रक्ताभिसरण हे आहे सबब निसर्गाने रकवाहिन्यामध्ये त्रीस्तरीय भिंती , नीलेत झडपा , वाहिन्यांचे स्थितिस्थापकत्व ,हुदयातील झडपा व तेथील इलेक्ट्रिकल रिदम याला महत्व दिलेले दिसते . दुसरा क्र निसर्गाने हाडांचा लावलेला दिसतो .कारण अभिसरणाबरोबरच हालचाली करण्यासाठी हाडाचे उत्तम डिझाईन करण्याची देखील गरज आहे. तिसरी त्वचा .संरक्षण व सौंदर्य यासाठी .

वरील तत्व सर्व ऐहिक वस्तू बाबत लागू होते. उदा चपला . चपलेत वरचे पट्ट्या चे सौंदर्य गौण आहे . प्रथमी महत्व सोल ला दुसरे सोलाची पट्टायशी असलेली सांगड गाड व सर्वात शेवटी पट्या वरची मखमल वगरे. कारण जमिनीतील उष्णता , काटे यापायासून पायाचे संरक्षण हे सर्वात महत्वाचे कार्य चपलेचे असते.

चौथा कोनाडा's picture

9 Oct 2019 - 5:31 pm | चौथा कोनाडा

चौराजी, शरीराचे उदाहरण खुपच समर्पक आहे. आवडले.

चौकस२१२'s picture

13 Oct 2019 - 3:55 pm | चौकस२१२

कुणासाठी , कशासाठी व कसे ते त्याचे मूळ प्रष्ण असतात . हे खरे , बरोबर पण त्यातूनच संख्या ,दर्जा व किंमत या गोष्टींचा विचार आणि परिणाम "डिझाईन ब्रिफ " वर होतो नाही का? कदाचित मी "शुद्ध डिझाइनर नसून इंजिनेर असल्यामुळे कदाचित पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल
इंजिनेररी आणि इंडस्ट्रियल डेसिग्नेर मधील हा गोड वाद नेहमीचाच आहे, इंजिनेर डिझाइनर ना "Arti farti " संबोधतात आणि डिझाइनर इंजिनेर लोकांनां " कंटाळवाणेकिचकट " समजतात
खरे हे असते कि उत्तम उत्पादन बाजारात येण्यासाठी दोन्हींची जरुरी असते असो

शालेय वर्गातली मुलगी एक गाडी कंपनीची अधिकारी, त्यांचीच कार आहे/होती. अपंग असल्याने काही सुधारणा करून द्याल का डिजाईन डिपार्टमेंटला विचारले. (कॉस्ट वगैरे काढून) नकार दिला. पण बाहेरच्या एका पार्टीने काम करूनही दिले.
डिजाइनर आणि मालक यांच्या सहकाराशिवाय काही होत नाही.
रेल्वेत आरओचे पाणी देणारी मशिनं आली आणि पाच रुपयांत बऱ्यापैकी चांगले एक लिटर पाणी मिळू लागले. त्याअगोदर 'झीरो बी' कंपनी जाहिरात म्हणून हे पाणी देत होती एखाद्या स्टेशनवर.
चांगलं डिजाइन मार्केटात उतरवायची इच्छाही हवी.

चौकस२१२'s picture

14 Oct 2019 - 11:27 am | चौकस२१२

माफ करा कंजूस पण आपण १-२ गोष्टींची गफलत/ सरमिसळ करीत अहहत असे मला वाटते, "कामचलाऊ सामान बाजारात आणणारे उद्योग जगभर असतात "हि टीका मला मान्य आहे, परंतु त्यातून पुढे आपण जे उदाहरण आणि विधाने केली आहेत आणि त्यातून डिझाइनर आणि मालक मिळून काही तरी भयंकर करतात असेजरा एकांगी लिहिले आहेत असे वाटते.
१) "...अपंग असल्याने काही सुधारणा करून द्याल का डिजाईन डिपार्टमेंटला विचारले. .. " यात मी असे गृहीत धरतो कि एखाद्या माध्यम किंवा मोठा गाडी उत्पादन उडोयोगात हे घडले असावे,,,, प्रथम हे आपण का लक्षात घेत नाही कि जरी आपल्या नोकराला त्याच्या अवघड समयी मदत मालकाने करावी हे मानवतेच्या आधारे योग्य असले तरी असा पायंडा पडायचा का , डेझीने डिपार्टमेंट चा वेळ एका माणसासाठी खर्ची घालायचा का? हा एक वेगळाच निर्णय आहे , त्यामुळे सरसकट DEZINER आणि मालक राक्षस कसे बनतात?
२) "चांगलं डिजाइन मार्केटात उतरवायची इच्छाही हवी". हो बरोबर सहमत ,, पण परत तेच शेवटी हे उद्योग आहेत नफ्यासाठी चे... हे हि लक्षात घेतले पाहिजे, आणि बरेच दा डिझानर हा नोकर असतो...
३) ग्राहकाने परत परत घेत राहावे म्हणून काही उद्योग काही बघ लवकर निकामी होवोत आशय प्रकारचे उत्पादन डिझीने करतात का? तर हो काही जन तसे करीत हि असतील आणि ते वाईटच
असो मला वाटत मी येथेच थांबतो , आपण एकाच खराट्याने अवघा उद्योग रंगवू नका एवढीच विनंती

सुई पासून जम्बो जेट पर्यंत मानवाने शोध लावून आणि त्याचे उत्पादन केले त्यात काहीतरी चांगला हेतू असेलच कि
(माझ्यातील स्वार्थी माणूस मात्र परत विचार करतोय कि कंजूस म्हणतात त्याप्रमाणे ( मूळ विधान) जर मालक लोक आमच्यासारख्यांकडून ५-१० रचना करून घेत असतील तर बरेच कि आम्ही भरपूर कमावू,,,,,

कंजूस's picture

14 Oct 2019 - 5:17 pm | कंजूस

मी पण इथेच थांबतो. विषय निघाला , चर्चा केली.

चौकटराजा's picture

14 Oct 2019 - 10:51 pm | चौकटराजा

डिझाईन व मार्केट चा काहीही सम्बध नाही. जसे प्रयोगशाळा व इन्डस्ट्रीचा . डिझाईन ही एक प्रक्रिया आहे ,तिचे काम नैसर्गिक स्रोताचे रूपान्तर उपयुक्त वस्तूत करणे आहे. जसे माती ही नैसर्गिक स्वरूपात रोपासाठी थंडावा देण्याचे काम करते. पण त्या मधून बनणारा माठ हा मानवी जीवनात उपयुक्त वस्तू म्हणून येतो . मातीचा गणपती माणसाची भावनिक भूक भागवतो. वरील दोन्ही गोष्टी स्वतः साठी घरी करता येतात पण तिथे मार्केटचा सम्बन्ध येत नाही पण मी तयार केलेला माठ व शेजार्याने तयार केलेला माठ यात फरक पडू शकतो कारण त्याचे कुट्म्ब १० माणसांचे असेल तर माझे ३ माणसान्चे. याला डिझाईन ची प्रक्रिया म्हणायचे !

चौकस२१२'s picture

15 Oct 2019 - 6:07 am | चौकस२१२

डिझाईन आणि मार्केट चा काहीही संबंध नाही"??? हे कसे काय चौकटराजा?
हा हे खरे केव्हा असू शकेल जेवहा कोणी डिझाईन फक्त आपलय स्वान्तसुखाय करतो तेव्हा, जसे चित्रकार ( pure आर्ट ) आपल्याला पाहिजे ते निर्माण करू शकतो " बाजारपेठ" घेवो किंवा नाही [परंतु "कमर्शिअल आर्टीतस्त" ला बाजारपेठेचा विचार करावाच लागतो
जरी डिझाईन हि प्रक्रिया असली तरी त्याला आजू बाजूचे भान ठेवावे लागते... आणि त्यानुसार बदल करावे लागतात ,
मार्केट नुसार डेझीने ब्रीएफ बदलावे लागते , उत्पादनाची प्रक्रिया बदलते , किंमत , दर्जा सर्व,,,
आपण कादाचित " शोधात्मक " इन्व्हेंशन प्रक्रिये बद्दल म्हणताय का? तर ती खूप नैसरगिक आहे हे मान्य पण मग त्याचे रूपांतर मग व्यासायिकतेते होते असा माझा तरी अनुभव आहे आणि त्यावेळेला हे सर्व विचारता घायवेचं लागते .
म्हणूनच आजकाल उद्योगांना शुद्ध डिझाईन + इंजिनीरिंग याचे शिक्षण असलेली मानस पाहिजे असतात ...
फक्त स्वतःच्या हौशी साठी काही तरी शोध लावणे बनवणे वेगळे आणि उद्योग साठी
कुणासाठी , कशासाठी व कसे हे म्हणजेच नाही का मार्केट! आणि ते करताना संख्या ,दर्जा व किंमत या गोष्टींचा विचार करावाच लागतो या शिया त्यात उत्पादन तंत्र चे अनेक मुद्दे पण येतात ( ३ डि प्रिनिटिंग कि extrusion इत्यादी पण तो एक वेगळा विषय होतो)
चौथा कोनाडा आणि स्वधर्म हे शुद्ध इंडिस्ट्रीअल डिझाईन मधले आहेत त्यांनी जरूर यात लिहावे ....

चौकटराजा's picture

15 Oct 2019 - 2:06 pm | चौकटराजा

पूर्वी माणूस जेंव्हा अतिशय प्राथमिक अवस्थेत रहात होता तिथे मार्केट नव्हते .इकॉनॉमी ही माणसाच्या बरोबरीनेच जन्माला आली असल्याने होती पण तीही अगदी बाल्यावस्थेत . त्या ही अवस्थेत डिझाईन ही कला अस्थित्वात होती. याचे पुरावे आ़ज तुम्हाला आदीवासी जीवनात आढळून येतील. डिझाईन ही संकल्पना आजच्या काळात आर अ‍ॅन्ड डी , उत्पादन , व शेवटी येते विक्रिव्यवस्था, उत्पादन गरज संशोधन हा विभाग जरी विक्रिविभाग पहत असला तरी तो खर्या अर्थाने डिझाईन चा म्हन्जे आर अन्ड डी चा भाग असतो. डिझाईन ही सन्कल्पना समजून घ्यायची असेल तर टॉम हॅन्क्स चा " कास्ट अवे " हा चित्रपट जरूर पहा !

चौकस२१२'s picture

16 Oct 2019 - 4:24 am | चौकस२१२

चौकट राजा मी आपले लिखाण परत वाचले , आपला या क्षेत्रातील अभ्यास दिसतो आहे, पण " डिझाईन आणि मार्केट चा काहीही संबंध नाही"?" हे कसे हे काही कळले नाही व्यापारातील उदाहरण द्याल?
मला तरी असे वाटते कि आपण दोन वेगळ्या परंतु नाळ जोडलेल्या गोष्टींबद्दल बोलत आहोत
आपण बोलत आहात ते शोध ( इन्व्हेंशन ) बद्दल आणि मी बोलत आहे ते रचना आणि निर्मिती या बद्दल
१) मातीचा उपयौग भांडे बनवण्यासाठी हे झाले शोधाचे उदाहरण
२) भांडे कसे असावे आणि कश्या प्रकारे बनवत येईल हे झाले रचना आणि निर्मिती चे उदाहरण
३) शोध जरी झाला तरी त्यात रचना असतेच...
४) निर्मिती केवळ शोधकासाठी असले तर मार्केट तो / ती स्वतः, जर बाजारासाठी असेल तर मग सगळ्याचाच विचार करावाच लागेल
बाजाराचा संबंध असतो याच एक उदाहरण
एका शोधकाने ( इन्व्हेंटर) आम्हाला दरवाज्याची हॅन्डल प्लास्टिक मध्ये बनवावे आणि ते दरवाज्यवर कसे सोप्या पद्धतीने बसवता येईल याचे पेटटण्ट असलेली रचना दाखवली
साधारण पणे धातू च्या हॅन्डल ची रचना आपण बघितली तर अशी असत एकी गोल आकाराची तबकडी/ कास्टिंग कि ज्याच्यात स्प्रिंग असते ते दरवाज्यवर बसवले असते आणि हॅण्डल त्याच्या मधून आलेले असते कि जे गोल फिरते ४५ अंशातून आणि आतला लॅच फिरतो म्हणजे हि तबकडी / कास्टिंग आणि हॅन्डल वेगळे असते तबकडी स्थिर आणि हॅण्डल अर्थात फिरणारे
याने अशी रचना केली होती कि तबकडी तशीच असली तरी हॅन्डल चा पुढचा भाग हा पूर्ण तबकडी वॉर स्नॅप फिट अश्या पद्धतीने बसेल आणि असे दिसेल कि जणू तबकडी आणि हॅन्डल हे एकसंध आहे .. आणि त्यामुळे एकसंध अशी कितीतरी डिजाईन हि कल्पना आमच्या लोकांना आवडली आणि आम्ही ती कल्पना विकत घेतली,, पुढे त्याचा विकास चालू झाला परंतु शेवटी हा प्रोजेक्ट बंद करावा लागला कारण मुख्य हे कि बाजार विपणन ( मार्केटिंग आणि सेल्स ) च्या लोकांचे म्हणणे असे पडले कि दरवाज्याचे कुलूप आणि त्याचे हॅण्डल हे धातूंचेच असावे, जनमानस ( मार्केट) ला प्लास्टिक चे हॅन्डल आवडणार नाही कारण "धातू म्हणजे सुरक्षित अँड प्लास्टिक म्हणजे कमी सुरक्षा" ...
थोडकयात काय या शोधकाने शोध तर लावला आणि तो लावताना रचना आणि निर्मिती चा सुद्धा विचार केला होता नाही असे नाही ( त्याने मॉडेल्स बनवली होती तो काम करणारी होती नुसती चित्रे नव्हती) परंतु सर्वांगीण विचार केल्यावर या शोधाचा बाजारासाठी तास काही उपयोग झाला नाही ..

पूर्वी एका भारतातील जर्मन व्यद्यकीय उपकरणे बनवणाऱ्या उद्योगात काम करीत असताना जर्मनीतील तयार रचना या भारतीय बाजारासाठी बदलून घायवया लागत
करणे अर्थात, कोणासाठी, किती, कसे ( उत्पादन प्रक्रिया सोपी) किंमत ,,, याचा विचार "करावाच " लागला
असो ..

चौकस२१२'s picture

16 Oct 2019 - 6:20 am | चौकस२१२

https://www.core77.com येथील उत्पादने बघा आणि आपण त्यावर असे म्हणू शकतो का कि " डिझाईन आणि मार्केट चा काहीही संबंध नाही"?
काही उत्पादने म्हणजे नुसती कल्पना आहे काही उत्पादने पूर्ण विकसित झाली आहेत
कल्पनेचे, बीजाचे रूपांतर उत्पादनात करायचे असेल तर चोफेर विचार हा आलाच
कल्पना/ शोध हा कोणीही कसाही लावू शकतो हे मनीस पण त्याचे व्यासायिक रूपांतर करायला मात्र एक व्यासायिक साचा लागतो आणि हे सर्वच क्षेत्रात नाही का?
अगदी खाण्याचं क्षेत्रात घ्या , खाण्याची फुले असतात हा "शोध" कोणी तरी लावला .. ठीक पण ती उगवयाची कशी त्याचे रूपांतर ( पेयात) आवश्यक आहे का? इत्यादी गोष्टींचा पुढे विचार आलाच
एखादा चित्रकार सुद्धा एखादी इमारतीचा ढोबळ आकार निर्माण करू शकतो पण त्याला स्थापत्य शास्त्राचे नियम / अनुभव हे लावावे लागतात ..त्या कल्पनेला अरकिटेक्ट , स्थापत्य तंत्राचं चाळणीतून जावेच लागते

चौकटराजा's picture

16 Oct 2019 - 9:09 am | चौकटराजा

आता एक प्रायव्हेट शिक्रेट सांगतो . आर्किटेक्स्चर ची तीन वर्शे झाल्यावर मी तो कोर्स सोडून दिला. तो पर्यन्त डिझाईन या विशयाची काही मुलतत्वे यान्चा परिचय झाला. त्यानंतर मी सरकारी नोकरी करत पुणे विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी बाहेरून परीक्षा देइइन घेतली. सबब माझा परिचय विपणन या विषयाशीही झाला. त्यानन्तर बजाज आटो च्या विक्री विभागात २२ वर्ष नोकरी केली . सबब विक्री विभागातील प्रत्यक्श विक्रीचे प्रयत्न व प्रॉडक्ट सर्वे व मार्केट सर्व्हे हे सारखे नाहीत हे कळून आले. लोकांची गरज , लोकांची ठेवण , हवामान , आरामाची कल्पना , सौदर्य या सर्व बाबी प्रॉडक्ट सर्वे मधे येतात व अर्थविकासाचा दर, रोजगाराची शक्यता, म्हणे क्रयशक्ती ,सरकारचे कर धोरण ई बाबी मार्केट सर्व्हे मधे येतात हे कळून आले. आता समजा टू व्हीलरला इन्डेकेटर लावले तर किमत वाढते म्हणून तो लावायचाच नाही असे करून चालणार नाही कारण ती कायदेशीर सक्तीची बाब आहे. पण वजन व किमत करण्यासाठी धातू ऐवजी पॅनल फायबरचे केले तरी चालतील त्याला कोणताही कायदेशीर अडसर नाही. असा मार्केट व सरकारचा दाब डिझाइन वर पडतो .

चौकटराजा's picture

16 Oct 2019 - 9:19 am | चौकटराजा

व असा दाब मूळ डिझाईनच्या नैसर्गिक प्रक्रियेत फार प्रभाव पाडू शकत नाही ! थोडाफार नक्कीच पाडतो . सबब कोणत्याही कंपनीत मारकेटिंग विभाग शोध व विकास या विभागाला मागे टाकायचा प्रयन्त करतो हे बरे नाही. उत्तम डिझाईन हे माऊथ पब्लिसिटीने उशीरा का होईना खपते पण क्रयशक्तीचाच फक्त अभ्यास केला तर प्लास्टिकचे पार्ट वापरलेली उत्पादने चार वर्षात आपला निरोप घेतात हे आता दिसतच आहे !

चौकटराजा's picture

16 Oct 2019 - 9:40 am | चौकटराजा

जी गोळी थेट आतड्यात जावी अशी अपेक्शा आहे ती एक तर कोटेड असते किंवा कप्सुल असे का ? यात मग बाजारातील ट्रेंड चा कुठे संबंध येतो ? म्हणून नमनालाच म्हणालो " सर्वात कार्य महत्वाचे " मग मजबूती मग सौंदर्य , मग भावना, प्रेसटीज , क्रयशक्ती ई ई ई .