मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

व्हाईट नॉईज काय आहे भाऊ? रात्रपाळी आणि झोप यासाठी उपयोगी.

Primary tabs

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in तंत्रजगत
26 Jun 2019 - 4:16 am

मित्रांनो,

आपणापैकी बरेच जण नाईट शिप्ट करत असतील. नाईट शिप्टमुळे दिवसा आपल्याला झोपणे क्रमपाप्त, आवश्यक आहे. परंतु घरातील व्यक्ती, आजूबाजूचे लोकं हे सुद्धा आपल्याबरोबर नाईट शिप्ट करतात का? तर नाही.

जेव्हा जेव्हा आपण नाईट शिप्ट करुन आल्यानंतर दिवसा झोपतो त्या वेळी घरातील व्यक्ती, लहान मुले, आजूबाजूच्या घरी राहणारे व्यक्ती, कुटूंब हे त्यांचे दिवसाचे दिनक्रम व्यतीत करत असतात. जेव्हा आपण झोपतो, तेव्हा आपल्या आजूबाजूला इतर सारे आवाज येत असतात. कुणी टिव्ही पाहत असतो, वाहने जात असतात, लहान मुले खेळत असतात इत्यादीमुळे आपली झोप विस्कळीत होत असते. अशावेळी हा व्हाईट नॉईज आपल्या कामी येतो.

काय आहे व्हाईट नॉईज?
व्हाईट नॉईज हा असा कमी वारंवारतेचा (लो फ्रिक्वेन्सी) आवाज असतो जो इतर आवाजांना रोखतो (शिल्ड) करतो. तुम्ही हा लेख किंवा ईमेल वाचण्याआधीही तुमच्या घरात व्हाईट नॉईज वापरतच होते. पण त्यालाच व्हाईट नॉईज म्हणतात हे तुम्हाला कदाचित माहीत नसावे. घरातील पंख्याचा आवाज हा व्हाईट नॉईजचे उदाहरण आहे. कमी वारंवारतेचा हमींग साऊंड (लो फ्रिक्वेन्सी) जो सतत येत असतो तो व्हाईट नॉईज असतो.

व्हाईट नॉईजचा उपयोग कसा करायचा?
या फाईल्स जास्त मोठ्या असल्याने ईमेलमध्ये न देता इंटरनेटवर शेअर केल्या आहेत. या लिंकमधील झीप फाईलमध्ये व्हाईट नॉईजच्या फाईल्स आहेत. या फाईल्स डाऊनलोड करून एक्ट्राक्ट करा आणि तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा. जेव्हा तुम्हाला झोपायचे आहे तेव्हा या फाईल्सपैकी कोणतीही एक ऑडीओ फाईल प्ले करा. तुमच्या कानांना सोसवेल इतपत मोबाईलचा आवाज वाढवा. सुरूवातीला एक दोन दिवस थोडेसे वेगळे वाटेल पण नंतर हळूहळू याची सवय होईल. यातील कोणत्याही आवाजाच्या फाईल्स साधारण दहा मिनीटे प्ले होतात. मोबाईलच्या ऑडीओ प्लेअरमध्ये केवळ एकच आवाज सतत प्ले (कन्टिन्यू प्ले) मोडमध्ये प्ले करा. या ऑडीओ फाईल्समध्ये अनेक आवाजांच्या फाईल्स आहेत, जसे - मुळचा व्हाईट नॉईज, फॅनचा आवाज, मोटर, पाऊस इत्यादी. व्यक्तीश: मला तरी 01WhiteNoise.mp3 या फाईलचा आवाज सुट झालेला आहे. व्यक्तीपरत्वे आवड निराळी असू शकते.

लक्षात ठेवा:
व्हाईट नॉईज तुम्ही तुमच्या खाजगी कामासाठी वापरत आहात. घरातील इतर कुणी व्यक्ती तुमच्यासोबत झोपत असतील तर कदाचीत त्यांना हा आवाज आवडणारदेखील नाही. त्यांनी या आवाजाबद्दल नावड दाखवली तर त्यांच्या इच्छेचा सन्मान करा आणि हा आवाज तात्पुरता बंद करा हि नम्र विनंती.

आणखी एक, या आवाजाच्याही खुप आहारी जावू नका. अति तेथे माती हि म्हण लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला झोप घेणे अति आवश्यक आहे तेव्हा किंवा लाईट गेल्यावर पंखे बंद झाले तर या आवाजाचा उपयोग करा.

आपल्याला या माहितीचा कितपत उपयोग झाला ते आवर्जून कळवा.

आपला,
पाषाणभेद

प्रतिक्रिया

तसेच टिनिट्स नामक व्याधिवरही याचा उपयोग केला जातो फक्त जाहिरात अथवा तुनळीवर पाहून न्हवे तर यातील व्यावसायिक तज्ञांकडून तपासणी करूनच मग या व्याधींनीवारणासाठी याचा उपयोग करावा. अन्यथा डोकेदुखी वाढेल.

जालिम लोशन's picture

30 Jun 2019 - 2:36 pm | जालिम लोशन

दुवा दिसत नाही.

मला विविध प्रयोग करायची सवय असल्याने मी स्वतःवर केलेल्या binaural beats theta आणि Delta व्हेव्ह्जच्या प्रयोगातुन मिळालेला अनुभव चांगला आहे. याचा जास्तीत जास्त १५ ते २० मिनीटेच उपयोग करावा. व्हाईट नॉइस्,पिंक नॉइस, ब्राउन नॉइस पेक्षा सुद्धा binaural beats हे कानाला त्रास न देणारे आणि मेंदुला शांतता देउन झोप येण्यास मदत करण्यास उत्तम मदत करतात. मला विथ आउट मुझिक म्हणेच प्युअर टोन binaural beats आवडतात, अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी असते.
गुगल प्ले स्टोअरवर याची अ‍ॅप्स उपलब्ध आहेत आणि याची सेटिंग्स मी आधी मिपावरच्या कुठल्यातरी धाग्यात दिली आहेत असे स्मरते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaah

पाषाणभेद's picture

30 Jun 2019 - 11:31 pm | पाषाणभेद

कृपया अधिक माहिती अन आधीच्या धाग्याचा दुवा द्यावा.
ॲप्सची नावेही दिली तर मदत होईल.

मदनबाण's picture

7 Jul 2019 - 11:43 am | मदनबाण

वरील सर्व व्हिडियो हे ब्रेनव्हेह या विषयास धरुन आहेत. ब्रेनवेव्ह्ज वर सातत्याने संशोधन सुरु असुन यावर काही डिव्हायसेस सुद्धा बाजारात आलेले आहेत.
मी स्वतःयावर बराच वेळ खर्च केला असुन साउंडचा वापर करुने ब्रेन स्टेट अल्टर कशी करता येइल यावर बराच काळ शोध सुरु होता. सातत्याने वेगवेगळी गाणी ऐकुन मी माझा मूड उत्तम ठेवण्यास शिकलो,अर्थात संगीत तुमच्यावर परिणाम करते हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. माझा शोध मला brain waves entrainment पर्यंत घेउन आला. मग binaural beats आणि isochronic tones च्या बद्धल मला समजले ! तूनळीवर यावर असंख्य व्हिडियो उपलब्ध आहे आणि जालावर देखील प्रचंड माहिती उपलब्ध आहे.
मी वापरत असलेली मोबाइल अ‍ॅप्स खाली देत आहे :-
Brain Waves - Binaural Beats [ हे अ‍ॅप मी सगळ्यात जास्त वापरतो आणि याच्या अनेक सेटींग्स मी माझ्या आवडीनुसार बनवलेल्या आहेत. याचे सध्या बीटा व्हर्जन माझ्या वापरात आहे. ]
Binaural Beats Generator [ हे मी अधुन मधुन वापरतो,अर्थात मला हव्या असलेल्या फ्रिक्वेन्सीच्या टोनसाठी ]

SINE Isochronic Entrainer [ हे मी Isochronic टोन्ससाठी वापरतो. ]

Gnaural for Android [ हे फक्त मी यातील एकाच सेटिंग्ससाठी वापरतो. ]
मिपावर आधीकुठे तरी सेटिंग्स दिली होती तो धागा काही आता सापडत नाही !

जाता जाता :- फ्युचर इज ब्रेन कंट्रोल ?

पाखरांना त्यांचा क्यूट पागलपणा अजुन हुच्च पातळीवर दाखवण्यासाठी : -

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #Breathless #ShankarMahadevan #VeenaSrivani

माझी झोप लहानसहान आवाज मूळे मोडत नाही .झोप आली की बाजूला कोलाहल जरी असला तरी मी झोपतो.

माझी झोप लहानसहान आवाज मूळे मोडत नाही .झोप आली की बाजूला कोलाहल जरी असला तरी मी झोपतो.
उत्तम आहे !
ब्रेनव्हेव् एप्सचा उपयोग हा फक्त झोप आणण्या पुरता मर्यादित नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #Breathless #ShankarMahadevan #VeenaSrivani

धन्यवाद ... चांगल्या फाईल्स आहेत लिंकमधल्या .. 0301WhiteNoisePopu.mp3 हा ऑडिओ विशेष आवडला .

जालिम लोशन's picture

16 Jul 2019 - 5:50 pm | जालिम लोशन

उदा: शास्रीय संगीत, आकाशवाणीवरील जुन्या गाण्यांचा कार्येक्रम.

जालिम लोशन's picture

16 Jul 2019 - 5:50 pm | जालिम लोशन

उदा: शास्रीय संगीत, आकाशवाणीवरील जुन्या गाण्यांचा कार्येक्रम.

जालिम लोशन's picture

16 Jul 2019 - 5:50 pm | जालिम लोशन

उदा: शास्रीय संगीत, आकाशवाणीवरील जुन्या गाण्यांचा कार्येक्रम.

जालिम लोशन's picture

16 Jul 2019 - 5:50 pm | जालिम लोशन

उदा: शास्रीय संगीत, आकाशवाणीवरील जुन्या गाण्यांचा कार्येक्रम.

जालिम लोशन's picture

16 Jul 2019 - 5:50 pm | जालिम लोशन

उदा: शास्रीय संगीत, आकाशवाणीवरील जुन्या गाण्यांचा कार्येक्रम.

जालिम लोशन's picture

16 Jul 2019 - 5:50 pm | जालिम लोशन

उदा: शास्रीय संगीत, आकाशवाणीवरील जुन्या गाण्यांचा कार्येक्रम.

दीपक११७७'s picture

21 Jul 2019 - 11:11 am | दीपक११७७

या सोबत योग निद्रा हे app सुद्धा try करु शकता, body relaxing साठी खुप चांगली वाटली

आपलं मन हळूहळू त्या सूचना न स्वीकारायला शिकते, त्यामुळे हा प्रकार आठवड्यातून जास्ती जास्त एकदा यशस्वी होतो असा अनुभव आहे.