अखेर मराठी वेबसाईटसाठी गुगल ऍडसेन्स सुरु

Primary tabs

onlinetushar's picture
onlinetushar in तंत्रजगत
5 Sep 2019 - 3:42 pm

google-adsense-for-marathi-languages

बहुप्रतीक्षित गुगल ऍडसेन्स आता मराठीसाठी देखील सुरु झाले आहे. मराठी डिजीटल प्रकाशक गेल्या अनेक वर्षांपासून गुगल ऍडसेन्स मराठी वेबसाईटसाठी सुरू होण्याची वाट पाहत होते.

सध्या गुगल, फेसबुक यासारख्या कंपन्यांनी स्थानिक भारतीय भाषांवर लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात पुण्यात सर्च कॉन्फरन्स झाली होती. त्यावेळीच लवकरच मराठी संकेतस्थळांची गुगल ऍडसेन्सची सुविधा देईल अशी चर्चा सुरु होती. भारतात याआधी हिंदी, बंगाली, तामिळ आणि तेलगू या स्थानिक भाषांसाठी गुगल ऍडसेन्स सुरु होते. आता यात मराठीची भर पडली आहे.

Google-adsense-logo

गुगल ऍडसेन्स म्हणजे काय?

२००३ साठी गुगलने ऍडसेन्स हि सुविधा सुरु केली होती. आपण जेव्हा एखाद्या वेबसाईटला भेट देतो तेव्हा त्यात आपल्याला काही जाहिराती दिसतात. या जाहिराती आपण पाहिल्यावर अथवा यावर क्लिक केल्यावर त्याचे पैसे त्या वेबसाईटच्या मालकाला मिळतात. अनेक ब्लॉगर यातूनच महिन्याला लाखों रुपये कमवतात.

गुगल ऍडसेन्स कसे सुरु करावे? त्यासाठी काय नियम अटी असतात याविषयावर लकवरच मी सविस्तर ब्लॉग लिहेल. गुगल ऍडसेन्स मराठीसाठी सुरु झाल्याने मराठी डिजीटल प्रकाशक, ब्लॉगर्स, न्यूजपोर्टल्स यांना एक हक्कच इन्कम सोर्स सुरू झालंय हे नक्की.

तंत्रज्ञानातील असेच अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करू शकता.

ब्लॉग : Online Tushar

प्रतिक्रिया

क्रुपया मुळ स्त्रोत द्याव

रविकिरण फडके's picture

5 Sep 2019 - 10:38 pm | रविकिरण फडके

त्याचे पैसे त्या वेबसाईटच्या मालकाला भेटत असतात
मी सविस्तर ब्लॉग लिहेल
तुम्हला मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करू शकता

जरा वाचून बघा की प्रकाशित करण्यापूर्वी! नाहीतर कुणाची तरी मदत घ्या.

शशिकांत ओक's picture

6 Sep 2019 - 10:08 am | शशिकांत ओक

पैसे भेटले, पेन भेटले वगैरे भेटणे क्रियापदाचा वापर करताना ते कसे चूकीचे आहे याची कल्पना नसल्याचे जाणवते. गेल्या काही वर्षांपासून वयाने मोठे, प्रतिष्ठित, विद्याविभूषित लोक सर्रास असा वापर करतात. तेंव्हा असा वापर योग्य आहे असे वाटून इतरही बिनदिक्कत वापरतात.
दोन सजीव एकमेकांना समोर येतात आणि मग शारीरिक स्पर्शाने जवळ येतात, किंवा नुसतेच समोरासमोर येऊन शब्दातून संपर्कात येतात ते एका अर्थी भेटणे होय. पण दोन्ही पैकी एक निर्जीव असेल तर पेन, पैसे किंवा वस्तू "मिळते", "सापडते", भेटत नाही! इसापनीती, पंचतंत्र कथांमधे कोल्हा करकोच्याला "भेटतो".
चिमण्या कावळ्यांना चारा "मिळतो" , मासा जाळ्यात "सापडतो".
वरील प्रत्येक ठिकाणी भेटणे क्रियापदाचा वापर केला जाणे अयोग्य आहे. म्हणून तारतम्याने भाषेतील बारकावे समजून वापरणे गरजेचे आहे.
टंकलेखनातील चुका दुरुस्तीसाठी मराठीत स्पेल चेकरची गरज आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट वगैरे मधून आजही मराठीत शुद्धलेखनाची सोय नाही असे दाखवते.
ओक नामक एकांनी पूर्वी अशी सोय करून ओपन सोर्सवर करून ठेवली होती. नंतर काय झाले ते कळले नाही.
ते मिपावर भेटले तर आनंदच होईल.

चौथा कोनाडा's picture

20 Sep 2019 - 3:16 pm | चौथा कोनाडा

+१११

परप्रांतिय मराठी त्यांच्या साठी सोपी करून घेतात, तेव्हा अस्ल्या शब्दांची घुसखोरी होते. आता या वाढत चाललेल्या घुसखोरीने परप्रांतिय किती वेगाने या मराठी भुमीत स्थानिक होतायत हे लक्षात येते ! ही नवमराठी मंडळी स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणवून घेतात.

अक्की's picture

17 Sep 2019 - 5:32 pm | अक्की

महत्वपुर्ण माहीती. पुढचे भाग लवकर येऊद्या.