बालसाहित्य

" चिऊ चिऊ चिडकी - " (बालगीत)

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
25 Jul 2013 - 10:56 am

बाळ दिसला
हळूच हसला
"ये ये" म्हणाला
खाऊ घे म्हणाला -

चिऊ चिऊ चिडकी
बंद खिडकी
चोच आपट
काचेवर टकटक -

बाळाने उघडली
चिऊ चिऊ आली
लाडूचा खाऊ
चोचीने घेऊ -

बाळाने मुठीत
लाडू लपवला
बाळ हळूच
खुदकन हसला -

चिऊ चिऊ चिडली
खाऊसाठी रडली
खिडकी बाहेर
"चिऊचिऊ" ओरडली !
.

बालसाहित्यबालगीतमौजमजा

बाळूचे स्वप्न - (बाल कविता)

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
8 Jul 2013 - 9:08 pm

सशाने धरले सिँहाचे कान
गरगर फिरवून मोडली मान ।

शेळीने घेतला लांडग्याचा चावा
लांडगा ओरडला-धावा धावा ।

मुंगीची ऐकून डरकाळी कानात
हत्ती घाबरून पळाला रानात ।

कासवाने लावली हरणाशी शर्यत
हरीण दमले धापा टाकत ।

उंदराने बोक्याच्या पकडून मिशा
काढायला लावल्या दहा उठाबशा ।

बाळूने मोजले दोन सात चार
स्वप्नात बाळू मोजून बेजार !

'

बालसाहित्यबालगीत

मि.पा. येते.... आणिक जाते

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
15 Jun 2013 - 11:24 pm

ढिशुम क्लेमर ;) --- गेल्या काही दिवसात,मि.पा.चे जे "झाले'',ते स्पॅम अ‍ॅटॅक मुळे झाले,पण प्रस्तुत जिल्बी ही,आंम्हाला मि.पा... आले..आले...अश्या बातम्या लागल्यावर..मि.पा.वर येता येता,जे काही "झाले"..त्यामुळे आलेली आहे,ती तितक्या'च मजेनी चाखावी,ही णम्र विणंती...! :p

(ही जिल्बी,आंम्ही मठ्ठा पीत,मा.आगोबास समर्पित करीत आहोत! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-pillow-fight-games-smiley-emoticon.gif )

कॉकटेल रेसिपीबालसाहित्यहास्यबालगीतविडंबनशुद्धलेखनजीवनमानऔषधोपचारफलज्योतिषमौजमजा