सुखाचे हे सुख, श्रीहरी मुख - काव्यानुभव
प्रारंभः
मनुष्य हा सुखाच्या शोधात असतो असं म्हणतात. एखादं सुख कधी लाभतं, कधी लाभत नाही. एखादं सुख लाभल्यानंतर ते सुख वाटत नाही. एखादं वाटलं तरीही ते क्षणभंगुर निघतं. एखाद्या सुखाचं रुपांतर नंतर दुःखात होतं. सुखाच्या अनेक प्रकारांचे आपलेच अनंत रंग आहेत. कधी कधी परिस्थिती इतकी विषण्ण करणारी होते की शेवटी आपण स्वतःवरच हसतो. ते देखील एक वेगळ्याच प्रकारचं सुखच आहे. साधारणपणे आंबा म्हटलं की आपल्याला आनंद होतो आणि तो खावासा वाटतो. परंतु त्याच क्षणी बरेच आंबे नासके असतात, बेचव असतात, उतरलेले असतात, किडे लागलेले असतात, तसंच काहीसं सुखांचं देखील आहे.