मैत्री

सहा कोवळे पाय

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
21 Jul 2025 - 6:58 pm

नादमय सरसर
कोवळ्याशा वाटेवर
कोवळ्या सहा पायांची
चाल होई भरभर

एकामागे दुजा चाले
पुढचे न पाहताना
पुढच्याचे ध्यान नाही
पुढे पुढे चालताना

कधीतरी भांबावून
पुढचा जागी थिजतो
हरवल्या मागच्याला
चार दिशांत शोधतो

मागलाही नकळत
गेलेला पुढे जरासा
थबकून तोही टाके
पुढच्यासाठी उसासा

क्षणातच पुन्हा होई
नजरेत त्यांची भेट
हुश्श मनात करूनि
चालू पुढे त्यांची वाट

- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १५/०७/२०२५)

bhatakantiकविता माझीमाझी कवितामैत्रीशांतरसकवितामौजमजा

मैत्री असावी...

मन्या ऽ's picture
मन्या ऽ in जे न देखे रवी...
13 May 2020 - 12:13 am

मैत्री असावी...

मैत्री
मैत्री असावी
खळखळत्या वाहत्या
झऱ्यासारखी
रातराणीच्या सुगंधासारखी
आसमंतात दरवळणारी

मैत्री
मैत्री असावी
उनाड वाऱ्यासारखी
केसाची बट अलगद
झुलवणारी
मनसोक्त हसणारी
हसविणारी
संकटसमयी धावुन
येणारी

मैत्री
मैत्री असावी
पावसाच्या
पहिल्या सरीसारखी
सुखाच्या सरींनी
चिंब भिजवणारी

मैत्री
मैत्री असावी
पहाटेच्या समीरासारखी
गारवा देणारी

मुक्त कविताकवितामुक्तकमैत्रीमित्रदोस्ती