जनातलं, मनातलं
गीतारहस्य चिंतन-प्रकरण ७ कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार
गीतारहस्य-७
कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार
वेदांतींनी कणाद यांच्या परमाणु' सिद्धांताऐवजी कपिलाचार्यांचा सांख्य सिद्धांताला अद्वैत सिद्धांत न सोडिता बऱ्याच अंशी ग्राह्य धरले आहे.
HAL HF-24 मरूत
उद्या १७ जानेवारी, याच दिवशी म्हणजे १७ जानेवारी १९६१ रोजी पहिल्या स्वदेशी बनावटीच्या HAL HF-24 मरूत विमानाने यशस्वी उड्डाण केले होते.
याच प्रसंगाचे औचित्य साधून त्याची माहिती द्यायचा प्रयत्न .
सृष्टीआड दृष्टी
एक मुलाखत:
“नमस्कार जयंतराव. सुरुवातीलाच मला सांगावंसं वाटतं की आपण फार मोठे खगोलशास्त्रज्ञ आहात! ... आणि अकलेचे तारे तोडणं या शिवाय माझा आकाशाशी संबंध आलेला नाहीये. तसं पाहता, शाळा सोडल्यापासून, विज्ञान या विषयाचा मला राग येत नाही. विज्ञान-वादी असणं म्हणजे काय ते बहुधा कळतं; पण मी विज्ञान-संवादी नाही. त्यामुळे ही मुलाखत घेणं मला जरा अवघडच वाटतं आहे.” पु. लं. नी सुरुवात केली.
बाजाराचा कल : १६ जूनचा आठवडा
बाजाराचा कल : १६ जूनचा आठवडा
======================
मंडळी,
मागील आठवड्यात केलेले युयुत्सुनेटचे भाकीत बरोबर ठरले आहे. पण मी लावलेला अर्थ चुकला. त्यामुळे या खेपेस मी माझं डोकं चालवायचं नाही असं ठरवलं आहे. हा...हा...हा...
आपण अनपेक्षित परिस्थितीसाठी तयार आहोत का!
✪ Too much comfort ultimately leads to much discomfort
✪ तंत्रज्ञानावर अति अवलंबून असणे घातक
✪ कठिण परिस्थितीला सामोरं जाण्याबद्दल मुलांची तयारी होते का?
✪ समजा पाच दिवस इंटरनेट बंद पडलं तर आपण काय करू?
✪ पेट्रोल तर संपणार आहे. ते उद्या झालं तर?
✪ आपत्ती येणारच आहेत
✪ आणीबाणीमध्ये आपण स्वत:ला व इतरांना मदत कशी करू शकतो?
भारतीय संगीतातली साथसंगत आणि कांही अनोखे प्रयोग
भारतीय संगीत मैफ़िलीत प्रमुख कलाकाराबरोबर साथीचे कलाकार असतात हे आपल्याला ठाऊक आहे. जसे गायकाबरोबर तानपुरा, संवादिनी, व्हायोलीन, तबला इ.इ. सादरकर्त्या कलाकारांच्या एकमेकांना पूरक अशा केलेल्या साथसंगतीमुळे मैफ़िलीतील रसिकांना अनेक अपूर्व, अविस्मरणीय असे क्षण लाभतात. भारतीय संगीतातली साथसंगत हा या लेखातला पहिला मुद्दा.
"रुद्रावतारी" न्यायाधीश
मंडळी,
चर्चेसाठी एक रोचक विषय आहे. न्यायाधीशांना अक्कल शिकवणारे, अधिक्षेप करणारे वकील असंख्य असतात. पण वकीलांना सूतासारखे सरळ करणारे न्यायाधीश पण विरळाच...
मला न्यायालयीन कामकाजाच्या क्लिपा बघायचा छंद लागला आहे. त्यात हे एक न्यायाधीश महाशय सापडले. ते कायम अशा रूद्रावतारातच कोर्टरूममध्ये दिसतात.
अहमदाबाद क्रॅश - बोईंग ७८७ ड्रीमलायनर - भंगलेलं स्वप्न.
२४२ लोकांना घेऊन उड्डाण करणारे एअर इंडियाचे अहमदाबाद ते गॅटविक (लंडन) मार्गावर निघालेले बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान टेक ऑफ नंतर लगेचच शहरी वस्तीत कोसळले आहे. कोणतीही कारणमीमांसा होऊ शकायला थोडा वेळ लागेल. दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी हे उड्डाण झालं होतं.
इथे अपडेट करत राहता यावे म्हणून धागा.
कॅप्टन सुमित सब्रवाल कमांडर होते तर कॅप्टन क्लाइव्ह कुंदर हे को पायलट होते.
महाजनस्य संसर्गः
महाजनस्य संसर्गः
-राजीव उपाध्ये
पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाईम्स
पञ्चतंत्रात एक श्लोक आहे : महाजनस्य संसर्गः कस्य नोन्नतिकारकः। पद्मपत्रस्थितं तोयं धत्ते मुक्ताफलश्रियम्॥ ‘मोठ्या लोकांचा सहवास कुणाला प्रगतीकारक नसतो? कारण कमळाच्या पानावर पडलेले पाणी मोत्यांची शोभा धारण करते,’ हा याचा अर्थ.
साहित्य, ललिता आणि "समोरच्या फ्लॅट मधल्या dog feeder बाई"
साहित्य तेव्हा जॉब करत होता, आणि ललिता सध्या फ्री लान्सिंग. त्यांची मुलगी लेखना आता ५ वर्षांची झाली होती. सध्या ती एका शाळेत सिनियर के जी मध्ये होती. एका उच्चभ्रू सोसायटीतील स्वतःच्या फ्लॅट मध्ये ते राहत होते. त्यांच्या फ्लॅटच्या लॉबीच्या समोरचा फ्लॅट नुकताच विकला गेला होता. पण अजून कोणी तेथे राहायला आले नव्हते. त्या फ्लॅटच्या जुन्या मालकांचे आणि साहित्य ललिता यांचे चांगले संबंध होते.
Ee Sala Cup Namde अखेर सत्यात उतरले..
तुम्ही फक्त किडनी, लिव्हर आणि दिलच जिंकू शकता आयपीएल ट्रॉफी तुमच्या नशिबात नाही.. विराट कोहली आरसीबीसाठी पनौती आहे त्याच्यामुळे आरसीबी ट्रॉफी जिंकत नाहीये.. विराटने एकतर टीम बदलावी किंवा आयपीएल खेळणे सोडून द्यावे.. या आणि अशाच प्रकारे विराट, विराट फॅन्स आणि आरसीबीला ट्रोल केले गेले, मजाक उडवला गेला, सल्ले दिले गेले.
बाजाराचा कल : ९ जूनचा आठवडा
बाजाराचा कल : ९ जूनचा आठवडा
====================
मंडळी,
मागील आठवड्यात केलेले भाकीत बरोबर ठरले आहे. बाजाराने दमदार रिकव्हरी केली आहे. फक्त माझा मेणबत्तीच्या आकाराचा अंदाज चुकला.
आकृती -१ निफ्टीचा साप्ताहिक आलेख

पंचमयकोश
साधारणतः सर्वांकडे जी समस्या सुरू होते तिच समस्या आमच्याकडे सुरू झाली आहे.
"१०-१२ वर्षांतील मुलांचा चिडचिडेपणा"
मुलांच्या बाबतीत आपण खुप गोष्टी ठरवल्या असतात.पण मुलांचे किंचित बंड चिडचिड वाढलेली दिसते.त्यात नोकरी करणारी आई म्हणजे मुलांच्या वाढीमध्ये तारेवरची कसरत ,अनेक अपराधी भावनेने ग्रस्त व्हायला होते.वरती समाजाकडून उठणारे बोटं तो तर वेगळाच विषय..
सलाम वेंकी...उत्तम हिंदी चित्रपट
डिसेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला हा - काजोल, विशाल जेठवा यांच्यासह आमिर खान ची छोटी भूमिका असलेला चित्रपट अलीकडेच 'चॅनेल सर्फिंग' करताना दिसला. एवढ्या सशक्त अभिनेत्यांचा हा कोणता सिनेमा आपण पाहीला नाही, या विचाराने सर्फिंग थांबले.
गर्दी, चेंगराचेंगरी: कारणे, आकडेवारी आणि शास्त्रीय उपाय
प्रेर्ना चर्चा विजयोत्सवाला गालबोट - प्रा. डॉ. दिलीप बिरुटे
आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागले. अकरा जणांना आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं दुर्दैवी घटना.
रस्त्यावरील अपघात --चूक कोणाची?
नमस्कार मंडळी सध्या बरेच दिवस पुण्यातील (किंवा इतरत्रही) रस्त्यावरील अपघातांचा विषय चर्चेत आहे. एकुणातच अपघातांचे प्रमाण आणि चालकांची मग्रुरी किंवा बेपर्वाई वाढली आहे असा एक सार्वत्रिक निष्कर्ष त्यातून काढला जातो. बहुतेक वेळा अपघात झाला की चूक चालकाचीच असे समजून त्याला चोप दिला जातो. पोलीस केस होते वगैरे वगैरे. पण याची दुसरी बाजू कोणी बघतो का?
- ‹ previous
- 8 of 1009
- next ›

