जनातलं, मनातलं
राडा
राडा
______
स्टेशनबाहेर पडलो. डोळे अर्धवट झोपेतच होते. आकाशातला प्रकाश डोळ्यावर पडला तसे आणखी आखूड झाले. अंदाजानेच गर्दीसोबत पावले टाकत चालू लागलो. अन ईतक्यात, डोळे उघडावेसे वाटणारा आवाज कानावर पडू लागला. सकाळी सकाळीच छानपैकी भांडण चालू झाले होते.
चारचाकीत घुसलेला उंदीर.
जिम कॉर्बेट नी केनिथ अँडरसन यांच्या वाघ, बिबळ्या शिकारीच्या कथा वाचताना सहज आठवले की आपण शिकार तर नाही, पण एका उपद्रवी उंदराला पकडले होते. उंदीर पकडण्यात कसला आलाय शूरपणा? पण हा उंदीर सतत चार दिवस चारचाकीत धुमाकूळ घालत होता. माणसे आणि वायर याने सोडल्या नव्हत्या. त्याला पकडणे सोपे नव्हते.
हिंदी सक्तीबद्दल
सध्याच्या हिंदी सक्तीच्या वाजत गाजत असलेल्या विषयावर आपले दोन आणे टाकण्याचा मोह मला आवरला नाही.
माझे सर्व शिक्षण मी महाराष्ट्रात पूर्ण केले. पहिली ते सातवी मराठी माध्यम आणि आठवीनंतर सेमी-इंग्लिश. आम्हाला हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा पाचवीपासुन होत्या. हिंदी भाषा हा विषय म्हणुन मी फक्त पाचवी ते सातवी शिकलो. आठवी ते दहावी त्याची जागा संस्कृतने घेतली.
एक मिशन असेही.
त्याने प्रियाला कडेवर घेतले. क्वारंटाईन मध्ये जाण्यापूर्वी त्याने एकदा प्रियाला जवळ घेतले.
“बाबा, परत केव्हा येणार?”
“प्रिया, जाणाऱ्याला केव्हा येणार असं नाही विचारायचं”. कौमुदी म्हणजे प्रियाची आई आणि राबर्टोची पत्नी. हो ती अगदी मराठी होती.
“बरं प्रिया, सांग तुला काय आणू?”
“मी मागितलं तर आणाल? तर मग चाँदवा, मुठभर चांदणे घेऊन या. गिव मी माय मूनशाईन.”
“डन!.”
किडकी प्रजा - सायकोपथी

सायकोपथी हा गुंतागुंतीच्या समाजघातक वर्तनाला कारणीभूत ठरणार्या व्यक्तीमत्वातील बिघाडांचा समूह मानला जातो. अशा बिघडलेल्या व्यक्तीमत्त्वाच्या लोकांना सायकोपॅथ अशी संज्ञा आहे. अशा व्यक्तींची ठळक वैशिष्ट्ये अशी असतात-
कॉर्बेटचं मृगजळ
गेल्या मे आम्ही उत्तराखंडला जाऊन आलो तिथे आम्ही नैनीताल आणि जवळपासच्या वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. शेवटचा दिवस आम्ही जिम कॉर्बेट अभयारण्यसाठी राखून ठेवला होता.
पूर्वतयारी
कंट्या - मराठी कादंबरी अभिप्राय
नेहमीप्रमाणे ग्रंथालयात फिरत होतो आणि सहज पुस्तकं चाळत होतो. दरवेळी २-४ मराठी पुस्तकं घरी येतात, पण पूर्ण फार कमी वेळा होतं.
यावेळी एक वेगळंच पुस्तक नजरेस पडलं – ‘कंट्या’ लेखक गणेश बर्गे.
कथाही तितकीच साधी, पण हृदयाला भिडणारी – एका गावात आजी-आजोबांसोबत राहणारा एक मुलगा, ज्याने कधीच आपल्या आईला पाहिलेला नाही आणि वडिलांनी कधीच सांभाळलेलं नाही.
जागतिक योग दिवशी ऋषभ पंतचं प्रात्यक्षिक!
✪ ऋषभ पंतची कोलांट उडी (कार्टव्हील)
✪ आधीच्या बॉलला काहीही होवो, पुढचा बॉल नवा
✪ Uncluttered mind, हसरा चेहरा आणि जिद्द
✪ प्रत्येक क्षणी वर्तमानात असणं "ध्यानाचं" प्रात्यक्षिक
✪ शेकडो वेळेस उड्या मारण्याची क्षमता
✪ संयम, सातत्य, संकल्प शिकवणारा खेळ
✪ रंग हो अकेले तो इन्द्रधनुष बनता ही नही!
✪ ठरवलेल्या प्रकारे तासन् तास खेळण्याचं कौशल्य
( ए आय,चाटगपट,जेमीनीबाबा,कृबू,)
डिस्क्लेमर-: सदर लेख केवळ मनोरंजनार्थ आहे. वेळ भरपूर,रिकामा मेंदू,स्वतःशी वाचाळ पंचाळशी करताना प्रसवलेल्या विचारातून प्रसूत झालेला आहे.याचा मृत अथवा जीवीत व्यक्तीशी,स्थळाशी,कल्पनां यांच्याशी काही एक संबंध नाही. तसे भासल्यास निव्वळ योगायोग समजावा.कृबुला विचारून बघू नये,विचारल्यास मिळालेल्या उत्तराचे उत्तर दायित्व प्रश्न कर्त्यावर असेल.आमच्या लेखी ए आय म्हंजे,
आकाशात तार्याचा स्फोट- ल्युपस तारकासमूहामध्ये सुपरनोव्हा
स्फोटामुळे 50 लाख पट तेजस्वी झालेला तारा डोळ्यांनी दिसू शकेल
साहित्य, ललिता आणि पुरचुंडीभर राख !
साहित्य असाच एका रविवारी फेसबुकवर चाळवाचाळव करत असताना त्याला त्या ३.५ बीएचके फ्लॅटची जाहिरात दिसली. एका बंगल्याच्या पुनर्विकासानंतर सहकारनगर सारख्या सभ्य आणि सुसंस्कृत भागात असलेला फ्लॅट "निदान बघून तरी येऊ" असे म्हणून तो, ललिता आणि लेखना तो फ्लॅट बघायला गेले.
चकाचक इमारत,
२ कार पार्किंग्स.. आणि तेही अगदी लांब लचक कार सहज आत बाहेर येऊ जाऊ शकेल अशा..
मूक चित्रपट
गेल्या काही दिवसात चार मूक चित्रपट बघितले.
१ A Trip To The Moon.
2 The Last Laugh
3 The Cabinet of Dr. Caligari (1920)
4 Metropolis
प्रत्येक सिनेमा साठी स्वतंत्रपाने लिहावे लागेल.
घनदाट, घनगर्भ अंधार दाटून येतो
कधीतरी मनात आतून अंधार दाटून येतो
तो इतका दाट असतो की डोळ्यात बोट घातले तरी काही म्हणता काहीच दिसत नाही
मग आस लागते त्या किरणांची जी या घनगर्भ अंधाराला दूर सारून शांत, शीतल असा प्रकाश शिंपडून जातील.
21 जून योग दिवस : उद्यानातिल स्वास्थ्य साधक
(हा लेख लिहण्यापूर्वी उद्यानात सकाळी पाच ते आठच्या दरम्यान अनेक स्वास्थ्य साधकांशी वार्तालाप केला आहे.)
अरे महिरावणा
(सुधारित आवृत्ती)
अरे महिरावणा । विडंबन घाणा
वैफल्याच्या खुणा। पुसून टाक
विनोदी लेख। पाद(ड)ण्या आधी
दहा हजाराचा तू । सराव कर
अडाण्यांच्या बाजारी । फायदा भारी
आत्म्याची "उत्क्रांती" । सुलभ होई
फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका
म्हणतो युयुत्सु। मिसळपावी
अरे महिरावणा । किती चिडशील?
पडलास कैसा । डोक्यावर!
कथा एका पीएचडीची...
कथा एका पीएचडीची...
पूर्वप्रसिद्धी- https://aisiakshare.com/node/1747
http://www.loksatta.com/sampadkiya-news/ph-d-very-easy-20848/
म्हातारा न इतूका....
आज सकाळ पासून नव्हे रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. एका मागोमाग एक अशी पाऊस गीते कानात हजेरी लावत आहेत. आज तुकोबाराय यांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे.
संगीत देवबाभळी : एक हृदयस्पर्शी नाटक
काल संभाजीनगरातील संत एकनाथ रंगमंदिरात 'संगीत देवबाभळी' नाटकाचा प्रयोग होता. नाट्यगृह संपूर्ण भरलेलं. अनेकांना वेळेवर तिकीट मिळेल या अपेक्षेनेआलेल्या अनेक रसिकांचा हिरमोड झालेला दिसला. गर्दी तुडुंब. २०१८ पासून यानाटकाचे प्रयोग होत आहेत. जवळ जवळ सहाशेच्या आसपासचा हा प्रयोग होता.
<एक मजेशीर आणि हृद्य आठवण >
माझं बालपण हे साधं होतं – म्हणजे फक्त शेजारी माझं नाव ऐकून मुलांना शाळेत घ्यायचे. मी रडायचो, तेव्हा पावसाळा यायचा. आणि मी हसायचो, तेव्हा उन्हाळा कमी व्हायचा.
पण आज मी सांगणार आहे ती मजेशीर, ती हृद्य आठवण – जीने माझ्या आयुष्यात मला एकदा पुन्हा स्वतःची महानता (म्हणजे रोजचंच) अनुभवायला दिली.
- ‹ previous
- 7 of 1009
- next ›
