नेहमीप्रमाणे ग्रंथालयात फिरत होतो आणि सहज पुस्तकं चाळत होतो. दरवेळी २-४ मराठी पुस्तकं घरी येतात, पण पूर्ण फार कमी वेळा होतं.
यावेळी एक वेगळंच पुस्तक नजरेस पडलं – ‘कंट्या’ लेखक गणेश बर्गे.
कथाही तितकीच साधी, पण हृदयाला भिडणारी – एका गावात आजी-आजोबांसोबत राहणारा एक मुलगा, ज्याने कधीच आपल्या आईला पाहिलेला नाही आणि वडिलांनी कधीच सांभाळलेलं नाही.
सुरुवात होते आनंदी स्वभावाच्या ‘कंट्या’पासून. जसजशी कथा पुढे सरकते, तसतसं ‘कंट्या’चे रोजचे उद्योग, शाळेतील वावर, गावातील विक्षिप्त वागणं, आणि नंतर त्यात झालेला बदल आणि त्याचे कारण , हळूहळू तो गावाचा लाडका बनतो...
— हे सगळं खूपच भावतं.
आणि शेवटी — एक पूर्णपणे अनपेक्षित शेवट!
फक्त २०० पानांची ही ग्रामीण भाषेतील गोष्ट, एका बैठकीत वाचून पूर्ण केली!
‘कंट्या’ वाचायलाच हवं असं वाटणारं एक अनुभवसंपन्न पुस्तक!
कंट्या
लेखक गणेश बर्गे
New Era Publishing House
प्रतिक्रिया
30 Jun 2025 - 1:33 pm | अभ्या..
छान,
वाचायलाच पाहिजे
30 Jun 2025 - 10:16 pm | धर्मराजमुटके
कंट्या ?
मी बाबा भांड यांची "तंट्या" कादंबरी वाचलेली आहे. कंट्या पहिल्यांदाच ऐकतो आहे. अर्थात माझे मर्यादित वाचन हे देखील एक कारण असू शकेल. कोण जाणो उद्या मंट्या, फंट्या, झांट्या नावाच्या पण कादंबर्या यायच्या. असो. ओळख आवडली. (झांटे आडनाव बहुधा गोवा/ कोकणात ऐकले आहे.)