जनातलं, मनातलं
जल्लोष (निवडणूक निकाल स्पेशल)
निवडणूक मग ती विधानसभेची असो की लोकसभेची, मी खूप उत्सुक, उत्साही आणि अधीर होते. मतदानाचा दिनांक जाहीर होतो आणि तो माझ्या पक्का लक्षात राहतो.
ती तारीख जवळ येत चालली की माझा उतावीळपणा वाढत जातो.
बाजारगप्पा-भाग-२
तर मागील भागात आपण बघितलं की काही सार्वकालिक सत्ये आह्ते बाजाराविषयीची त्याच चर्चेला थोडं पुढे नेत पुढील महत्वाचे सत्य बघु या.
परत एकदा हिमालयाच्या कुशीत - १
प्रस्तावना :
१. सदर लेखन हे वैयक्तिक अनुभवांवर आधारीत असुन इथे कोणताही अभिनिवेषयुक्त प्रचार प्रसार करण्याचा उद्देश नाही.
मद्यपानाचे वैद्यकीय निदान
मद्यपान - एक बहुचर्चित आणि ज्वलंत विषय !!
समाजात विविध कारणांसाठी मद्यपान करणारी भरपूर माणसे आहेत. उत्सुकता, आवड, चैन, व्यसन आणि मानसिक असंतुलन अशा अनेकविध कारणांमुळे माणसे मद्यपान करतात. जोपर्यंत मद्यपि ही कृती त्यांच्या घरी शांततेत किंवा सार्वजनिक परवाना असलेल्या ठिकाणी स्वपरवान्यासह करीत असतात तोपर्यंत ते कायदेशीर ठरते.
श्रोडिंगरची मांजर, एनटॅन्गल्मेंट आणि भारतीय मतपेटी
क्वांटम फिजिक्समध्ये श्रोडिंगरची मांजर हा एक अतिशय प्रसिद्ध असा वैचारिक प्रयोग आहे. तुम्ही समजा एखाद्या मांजरीला एका बॉक्समध्ये बंद केले आणि त्यामध्ये जहाल विष यादृच्छिकपणे (randomly) सोडले जाईल अशी व्यवस्था केली तर बॉक्स उघडे पर्यंत ती मांजर जिवंत आहे की मृत हे कळणार नाही. म्हणजे जोपर्यंत आपण बॉक्स उघडत नाही आणि मांजरीचे निरीक्षण करत नाही तोपर्यंत मांजर एकाच वेळी मृत आणि जिवंत आहे.
भाकरीचे पीठ
कविल सकाळीच उपाशीपोटी शेतात मळणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते.
व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास शेताच्या बांधावरून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला.
तू फुलत रहा...
१०-१२ वर्षांपूर्वी एका प्रदर्शनातून आम्ही 'ॲडेनिअम 'चं एक झाड आणलं.छोटीशी बाल्कनी फुलांनी बहरून गेली आहे अशी स्वप्नं कायमच पडायची.पण बागकामासाठी लागणारं ज्ञान, त्यासाठी खर्च करावा लागणारा वेळ, इत्यादी इत्यादी गोष्टींच्या नावाने बोंबच होती. त्यामुळे फारशी काळजी घ्यावी लागणार नाही आणि बोन्साय.. (म्हणजे मुळातच मोठं झालेलं झाड .
निवडणूक, ऋषि सुनकांची
मंडळी पाश्चात्य देशीयांची दुसर्या देशांबद्दल सामान्य ज्ञान जुजबी असूनही भारता सारख्या असंख्य देशांच्या अंतर्गत राजकारणात यांची विद्यापीठे, प्रसार माध्यमे एन जी ओ, राजकारणी आणि त्यामागे असलेली शातीर मल्टीनॅशनल व्यावसायिक गणिते -आपले ठेवायचे झाकुन दुसर्याचे बघायचे वाकून- अशा स्वरूपात प्रचंड नाक खुपसत असतात. वसाहतवादाचा सुंभ जळाला तरी पिळ जात नाही.
तात्या ......... !
तात्या वारला !
चंद्रशेखर अभ्यंकर असं भारदस्त नाव धारण केलेला हा आडमाप माणूस - वयाने आणि आकाराने माझ्यापेक्षा बराच मोठा होता. मोठा असूनही त्याला कधी अहोजाहो केलं नाही. तो वारला हे भिडेखातर लिहितोय - तात्या मेला अस लिहिलं पाहिजे.
लोकं पूर्वकल्पीत धारणा ठेवून एकमेकांशी का वागतात?
“मागच्या वेळी तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा कधी पाहिलं होतं,त्याला भेटला होता आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व तुम्हाला जे वाटलं होतं तेच होतं का?
कदाचित कधीच नसावं.विचार करा, एका दिवसात तुम्हाला किती वेळा “अरे, तो अबोल आहे”, किंवा “ती इतकी छान नाही” किंवा “ते तिथे का असतील?” असे प्रश्न मनात उद्भवले
असतील.
कथा
कथा
या विषयावरची चर्चा
आपण लहानपणापासून गोष्टी ऐकत आलेलो असतो . पुढे आपली तीच आवड कथेकडे वळते . पण असं म्हणतात की कथा हा प्रकार मूळचा आपला नाही . तरीही आता तो भारतात चांगलाच रुजलाय . सदर चर्चा ही त्या संदर्भात आहे .
एका कोळीयाने,
त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे एका मोठ्या बालडीत कपडे धुण्यासाठी साधारण कोमट पाणी भरून साबूची पावडर टाकून दोन्ही हात पाण्यात बुडवून साबूचा फेस बाथरुम मध्ये तयार करीत होतो.
तेव्हड्यात मी एक काळा कोळी त्या साबूच्या फेसावर तरंगताना पाहिला. माझ्या बोटांनी मी फेसाच्या खाली असलेले माझे दोन्ही हात हळुवारपणे हलवून,त्या कोळ्याने आपली सुटका करून घेत पळून जावं या उद्देशाने प्रयत्न करीत होतो.
पाकिस्तान- १२
युद्धात शस्त्रापेक्षा शस्त्र कोण चालवत आहे हे महत्त्वाचे असते. जेव्हा पाकिस्तानी लष्कराने लाहोर आघाडीवर हल्ला करायला सुरुवात केली तेव्हा भारतीय लष्कराकडे कोणता पर्याय होता? त्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आले होते, तसेच रस्तेही बंद करण्यात आले होते. त्याचवेळी त्यांना अखनूर (काश्मीर) वाचल्याची बातमी मिळत होती.
रजिस्ट्रेशन
काल एका नातेवाईकाच्या इस्टेटीच्या प्रकरणावरून रजिस्ट्रेशनच्या कामासाठी जावे लागले. भावाच्या मुलाने मला गादीत घातले आणि म्हणाला चल. गेलो.
मी पुण्यात लहानाचा मोठा झालो. पण ह्या माझ्या पुण्याचे असे भाग आहेत कि ज्यांचे मी नावही ऐकले नव्हते. अशाच एका भागात आम्हीला जायचं होतं.
मी त्याला विचारलं, “बबन आपण कुठं चाललो आहोत?”
स्वतःची अणू अस्त्रं भारताने स्वतःच निर्माण केली.
“आपला भारत देश आता प्रगतीच्या
मार्गावर आहे. आणि भारताला प्रगती
करण्याच्या मार्गात आता कुणी ही खीळ घालू शकत नाही.”
हे मी प्रो.देसायांना चर्चेच्या दरम्यान
सांगत होतो.
आणि मी पूढे म्हणालो,
- ‹ previous
- 26 of 1009
- next ›
