एका कोळीयाने,

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
19 May 2024 - 11:16 am

त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे एका मोठ्या बालडीत कपडे धुण्यासाठी साधारण कोमट पाणी भरून साबूची पावडर टाकून दोन्ही हात पाण्यात बुडवून साबूचा फेस बाथरुम मध्ये तयार करीत होतो.

तेव्हड्यात मी एक काळा कोळी त्या साबूच्या फेसावर तरंगताना पाहिला. माझ्या बोटांनी मी फेसाच्या खाली असलेले माझे दोन्ही हात हळुवारपणे हलवून,त्या कोळ्याने आपली सुटका करून घेत पळून जावं या उद्देशाने प्रयत्न करीत होतो.

खवळलेल्या समुद्रात खेळ खेळणाऱ्या एखाद्या खेळाडूचं दृश्य माझ्या नजरेतून निसटलं.
वरखाली होणारा साबणाचा फेस जणू ती एक लाट आहे अशी कल्पना माझ्या मनात आली.
मी माझ्या बोटाच्या टोकावरील बुडबुडा त्या दयनीय प्राण्याला सुटका करून घेण्यासाठी सोपं व्हावं म्हणून फोडण्याची पराकाष्ठा करीत होतो.

आणि त्याचा जगण्याचा प्रयत्न विफल होऊ नये म्हणून मी फेसाचा काही भाग बालडीच्या कडेवरून फुंकर मारून अक्षरशः जमीनीवर ढकलत होतो.
मी बसून पाहत होतो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की,त्याचा एक पाय फेसाच्या पृष्ठभागावरील ताण तोडून बाहेर येण्याच्या प्रयत्नात होता. ज्यामुळे त्याचं नाजूक अंग
एकत्रपणे पूढे सरकणार होतं.तो स्वतःला सावरत होता आणि दुसरा पाय ताणून स्वतःला सावरत होता..
वाकलेला पाय ओढत असलेला हा गडद ठिपका जमिनीवर पडतानाचे ते दृश्य होतं. आणि तिथून तो निसटतो. बाथरुमच्या पांढऱ्याशुभ्र जमीनीवरून तो काळा ठिपका भिंतीवर चढून
खिडकीतून कुठेतरी अडगळीत नाहिसा झाला .
निसर्गाचा नियम, माझ्या मनात
विचार म्हणून,पटकन आला.
“ माझ्या अस्तित्वासाठी तुला जगणं अपरिहार्य आहे. “
असंच जणू निसर्ग त्याला सांगत असल्याने तो कोळी जीव घेऊन पळत होता.
साबणाच्या पाण्याच्या वापर करून मी एका किड्याल्या वाचवल्याचा मला आनंद झाला.
एका छोट्या प्राण्याला जिवंत ठेवण्याची शक्ती आणि संधी मिळाल्याचा मला आनंद झाला.

तो कोळी घराच्या एका लहान, खडबडीत जागेत एखाद्या छिद्रात बसलेला असावा.
असं मी माझं मन चित्रित केलं.
तो एक जाळं तयार करील आणि पून्हा एक नवं जाळं तयार करून माशांची शिकार करील.
नंतर तो एका आठवड्यात मरेल आणि पुढच्या महिन्यात जेव्हा मी माझी खोली स्वच्छ करेन तेव्हा त्याचा धुळीच्या ढिगात सामावेश होऊन तो कचऱ्याच्या पेटीत फेकला जाईल.

इतर कोणालाही तोअस्तित्वात होता हे कधीच कळणार नाही आणि कदाचित कुणी म्हणेल की तो अस्तित्वात असता तरी त्यांना काही फरक पडला नसता.
पण माझ्या दृष्टीने एक विचार माझ्या मनात येतो की,कदाचित तो अस्तित्वात असावा म्हणून माझ्याकडून त्याला जगू देण्याचा निर्णय घेतला गेला असावा.
असाच एखादा प्राणी पून्हा सापडल्यास एक पर्याय आहे: त्याला एकतर चिरडून टाकायचा प्रयत्न व्हावा की, न टाकायचा प्रयत्न व्हावा?
मला असं वाटतं की, अशावेळी ही आपली परीक्षा होत असावी.

एक विचारी माणूस म्हणून प्रत्येकाला ते किती महत्त्वाचे आहे की नाही हे ठरवण्याची वेळ असावी.
जर आपण चिरडून टाकायचं ठरवलं तर मग काय? कचऱ्याच्या डब्यात फेकलेल्या कघऱ्यात आणखी एक काळा डाग असलेला कचरा होईल.
पण जर आपण त्या कोळ्याला वाचवलं तर जग बदलण्याची ती पहिली पायरी होईल.हा उदात्त विचार,विचारी माणसाच्या मनात येऊन माणसाला एकमेकांवर प्रेम करायला प्रवृत्त करील.

संस्कृतीप्रकटन