जनातलं, मनातलं
लोकं पूर्वकल्पीत धारणा ठेवून एकमेकांशी का वागतात?
“मागच्या वेळी तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा कधी पाहिलं होतं,त्याला भेटला होता आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व तुम्हाला जे वाटलं होतं तेच होतं का?
कदाचित कधीच नसावं.विचार करा, एका दिवसात तुम्हाला किती वेळा “अरे, तो अबोल आहे”, किंवा “ती इतकी छान नाही” किंवा “ते तिथे का असतील?” असे प्रश्न मनात उद्भवले
असतील.
कथा
कथा
या विषयावरची चर्चा
आपण लहानपणापासून गोष्टी ऐकत आलेलो असतो . पुढे आपली तीच आवड कथेकडे वळते . पण असं म्हणतात की कथा हा प्रकार मूळचा आपला नाही . तरीही आता तो भारतात चांगलाच रुजलाय . सदर चर्चा ही त्या संदर्भात आहे .
एका कोळीयाने,
त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे एका मोठ्या बालडीत कपडे धुण्यासाठी साधारण कोमट पाणी भरून साबूची पावडर टाकून दोन्ही हात पाण्यात बुडवून साबूचा फेस बाथरुम मध्ये तयार करीत होतो.
तेव्हड्यात मी एक काळा कोळी त्या साबूच्या फेसावर तरंगताना पाहिला. माझ्या बोटांनी मी फेसाच्या खाली असलेले माझे दोन्ही हात हळुवारपणे हलवून,त्या कोळ्याने आपली सुटका करून घेत पळून जावं या उद्देशाने प्रयत्न करीत होतो.
पाकिस्तान- १२
युद्धात शस्त्रापेक्षा शस्त्र कोण चालवत आहे हे महत्त्वाचे असते. जेव्हा पाकिस्तानी लष्कराने लाहोर आघाडीवर हल्ला करायला सुरुवात केली तेव्हा भारतीय लष्कराकडे कोणता पर्याय होता? त्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आले होते, तसेच रस्तेही बंद करण्यात आले होते. त्याचवेळी त्यांना अखनूर (काश्मीर) वाचल्याची बातमी मिळत होती.
रजिस्ट्रेशन
काल एका नातेवाईकाच्या इस्टेटीच्या प्रकरणावरून रजिस्ट्रेशनच्या कामासाठी जावे लागले. भावाच्या मुलाने मला गादीत घातले आणि म्हणाला चल. गेलो.
मी पुण्यात लहानाचा मोठा झालो. पण ह्या माझ्या पुण्याचे असे भाग आहेत कि ज्यांचे मी नावही ऐकले नव्हते. अशाच एका भागात आम्हीला जायचं होतं.
मी त्याला विचारलं, “बबन आपण कुठं चाललो आहोत?”
स्वतःची अणू अस्त्रं भारताने स्वतःच निर्माण केली.
“आपला भारत देश आता प्रगतीच्या
मार्गावर आहे. आणि भारताला प्रगती
करण्याच्या मार्गात आता कुणी ही खीळ घालू शकत नाही.”
हे मी प्रो.देसायांना चर्चेच्या दरम्यान
सांगत होतो.
आणि मी पूढे म्हणालो,
कोपनहेगन-पॅरीस भटकंती-६
सकाळी नऊ वाजता उठलो चित्रगुप्त काकांनी सांगितल्याप्रमाणे पंधरा मिनिट चालत गेलो, मला T3 ट्रॅम पकडायची होती. तिथून तिकीट काढून ट्रॅम धरली आणि शेवटच्या स्टेशनला पोहोचलो तिथून दुसरी पकडायची होती. एक कृष्णवर्णीय फ्रेंच कर्मचार्याला मला या स्टेशनला जायचंय असा एका इंग्लिश येणाऱ्या मुलीच्या मदतीने सांगितलं.
ढगाळ वातावरण
शेतात रोज उन्हाळी वातावरण पाहून,कंटाळा आल्यासारखं होतं. आणि ढगाळ पावसाळी
वातावरणाची आठवण येत राहते. ढगाळ दिवसांत शेतावर काम करत असल्याची अनुभवून गेलेली आठवण,मी माझ्या वहीत एकदा कधी लिहून ठेवली होती ती वाचत होतो.
जाळं
जाळं
----------------------------------------
रात्र झाली होती .मस्त गार वारं सुटलं होतं. दिवसभराची लग्नाची चाललेली धामधूम हळूहळू मंदावत चालली होती.
पण ते लोकांचं . बन्सीकिशनच्या डोक्यातली गडबड मात्र हळूहळू वाढत चालली होती .
आनंदी न राहण्यात आणि मजा करण्यात काही अर्थ नाही
“एकटं मन वैरी असतं “ असं म्हणतात,पण आज माझ्या एकट्या मनात जे विचार सुचले, ते माझ्या मनाला पटणारे वाटले.ते असे,
“मला असं वाटतं की, आनंदी न राहता मजा करण्यात काही अर्थ नसतो. आनंदी लोक आशावादी असल्यामुळे उत्तम जीवन जगतात. माझं एक आवडतं म्हणणं आहे आनंदी लोक निरोगी असतात. मला असं वाटतं की, आनंदी राहिल्याने बरंच काही मार्गस्थ करता येतं.
निसर्गरम्य शांतता
माझ्या लहानपणी मी शेतात खूप काम करत असे. चोहीकडचा परिसर म्हणजे अर्थात निसर्ग असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही.
आता ह्या वयात त्या परिसरात अनुभवलेल्या गोष्टींची आठवण येऊन निसर्गाबद्दल थोडंफार लिहावं म्हणून केलेला हा प्रयत्न.
कबूतरावरचं असंही एक पुस्तक
नमस्कार. माझ्या मुलीचं पाचवीचं हिंदी पुस्तक वाचताना एका पुस्तकाची माहिती मिळाली. उत्सुकता वाटली म्हणून हे पुस्तक विकत घेतलं आणि लवकरच वाचूनही झालं. अमेरिकन बाल साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळालेलं आजवरचं एकमेव भारतीय लेखकाचं पुस्तक! धान गोपाल मुकर्जींनी लिहीलेलं 'गे-नेक: द स्टोरी ऑफ अ पिजन!' 'गे-नेक' पिजन म्हणजे रंगीत मानेचं कबूतर आणि हे पुस्तक म्हणजे ह्या कबुतराची कहाणी!
सोनचाफ्याचची फुलं आणि तो स्पर्श (भाग ३ )
सुम्याच्या लहानपणातल्या प्रेमासंबंधाच्या सतावणार्या त्या आठवणी
पाकिस्तानने भारतावर परमाणू अस्त्र वापरलं आणि भारताने आपलं—
मानवजात आणि भविष्यात होऊ घातलेली पृथ्वीची समस्या.
काल मी आणि प्रो. देसाई आम्ही दोघेच तळ्यावर भेटलो होतो.प्रो. पोंक्षे आणि श्री समर्थ दोघेही शहरात गेले होते.
अलीकडे जगात शेजारच्या शेजारच्या देशात छोट्या छोट्या युद्धाची धुम:चक्री चालू झाली आहे.दुसऱ्या दोन जवळच्या देशात बरेच दिवसांपासून युद्ध चालू आहे.
माझ्या वहितला एक उतारा,-मनोदशा (mood ).
माझ्या वहितला एक उतारा.---
मला आठवतं हा उतारा लिहायला त्या दिवशी मी का उद्युक्त झालो होतो. शेतावरची कामं त्या दिवशी मनासारखी होत नव्हती.बरेच कामगार एनंकेनं कारणाने गैरहजर होते.जरूर ती कामं होणार नव्हती. वैताग आला होता. दिवस कसातरी संपायला आला होता.घरी जायचं मूड नव्हतं.
आजही तसंच वाटत होतं.म्हणून माझ्या वहितला उतारा वाचत होतो.
प्रश्न एवढाच आहे की, तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती व्हायचं आहे?
मी श्री समर्थांना म्हणालो,
“बरेच वेळा माणसं एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती नसताना
एकदम निर्णयाला येतात.मग तो
त्यांचा निर्णय सकारात्मक असेल
किंवा नकारात्मक असू शकतो.
मी तुम्हाला हे असं का विचारतो
ह्याचं एक कारण झालं आहे.
परवा मला एका अनोळखी व्यक्तीचा
फोन आला होता.मी फक्त त्याला त्याने केलेल्या मुद्यावर हं हं एव्हढंच
वरवर लहान वाटणारे अनुभव.
आयुष्यातील वरवर लहान वाटणाऱ्या गोष्टी सर्वांसाठी इतक्या लहान नसतात. शेतात काम करताना माझ्या सभोवतालचं नैसर्गिक सौंदर्य आणि काही नकळत होणारी नैसर्गिक
परिवर्तनं लक्षपूर्वक पाहिल्याने मला हे कळू शकलं.
"जीवन पूर्णतः जगा" म्हणजे काय रे भाऊ?
मला वाटतं की बीचवर जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ रात्रीची आहे.
मला माझे पाय उबदार वाळूमध्ये रुतून ठेवण्यात मजा येते.भरतीच्या लाटेचं किनाऱ्यावर वेगाने येणारं पाणी पायावर घ्यायला मला मजा येते.
माझ्या सर्व समुद्रकिनाऱ्यावरील अनुभवांपैकी, सर्वात सुंदर आठवणी, तारांकित आकाशाखाली सूर्य मावळल्यानंतरच्या आहेत.
त्याच्या सारखा नशिबवान तोच.
लोकांनी अनेक शतके ह्या पृथ्वीवर पार केली आहेत आणि लोक बदलत आले आहेत.
असं करत असताना त्यांच्यामध्ये नवीन विश्वास जागृत होत गेला असावा.ते गरजेप्रमाणे नवीन तंत्रज्ञान निर्माण करीत गेले असावेत.
तेव्हा ते काय असावेत आणि आता काय आहेत याचा विचार केल्यावर जाणवतं की,बदल चांगला ही वाटतो आणि वाटत ही नाही.
- ‹ previous
- 25 of 1008
- next ›