उत्तर -२

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
12 Jun 2024 - 10:58 am

उत्तर -२
फ्रेड्रिक ब्राऊन ह्यांनी "Answer” कथा १९५४ साली लिहिली. त्यानंतर म्हणजे १९५६ साली असिमोव ह्यांनी “The Last Question” ही कथा लिहिली. दोन्ही कथा सुपर सुपर संगणकाच्या थीम वर आधारित आहेत. फ्रेड्रिक ब्राऊनची कथा केवळ २६० शब्दात संपते तर असिमोवची कथा जवळजवळ सात पाने व्यापते. ही कथा मानवाच्या अब्जावधी वर्षाच्या कालावधीत घडते.
असिमोवने लिहिलेली कथा थोडक्यात अशी आहे. ह्या कथेत एंट्रॉपी ह्या गूढ गहन विषयावर प्रश्न विचारले आहेत. आता एंट्रॉपीची संकल्पना समजण्याइतपत माझी कुवत नसल्याने मी एंट्रॉपीला देवासमान मानून माझ्या समजुती प्रमाणे कथा लिहिली आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून शक्तिशाली संगणक बनवण्यात येतो. देवा विषयी तेव्हा पर्यंत झालेले संशोधन, निरनिराळे तात्विक विचार, मतमतांतरे इत्यादी माहिती संगणकाला पुरवली जाते. आणि प्रश्न विचारला जातो, “देव अस्तित्वात आहे का?”
संगणक थोडा वेळ विचार करून उत्तर देतो, “पुरवलेली माहिती पुरेशी नसल्यामुळे उत्तर देता येत नाही.”
युगानुयुगे लोटतात, नवीन तंत्रज्ञान वापरून नवीन महासंगणक बनवण्यात येतात. आणि प्रश्न विचारला जातो, “देव अस्तित्वात आहे का?”
संगणक थोडा वेळ विचार करून उत्तर देतो, “पुरवलेली माहिती पुरेशी नसल्यामुळे उत्तर देता येत नाही.”
असे युगानुयुगे चालत रहाते.
शेवटी संगणकाला जेव्हा ह्या प्रश्नाचे उत्तर मिळते तेव्हा थोSSSडा उशीर झालेला असतो. विश्वातील जीवसृष्टी नष्ट झालेली असते, तारे विझत चाललेले असतात. विश्वाचा अंतिम क्षण जवळ येत आहे. ज्यांनी त्या महासंगणकाची निर्मिती केली आणि तो प्रश्न विचारला होता ते आता काळाच्या पडद्याआड गेले होते.
महासंगणक हिरमुसला. म्हणाला, “लेट देअर बी लाईट.”
अँड देअर वॉज लाईट!
आता ह्या दोन कथांवरून मला जो बोध झाला तो असा-
--मानवाने जरी सर्व विश्व पादाक्रांत केले तरी "देव अस्तित्वात आहे का?" हा प्रश्न अनुत्तरीत राहणार आहे.
--देव ही संकल्पना मानवनिर्मित आहे. कारण शेवटी देवपद प्राप्त झालेले अतिमहासंगणक मानवानेच निर्माण केले होते.
अर्थात हा विषय २५० शब्दात झटकून टाकण्याजोगा खचितच नाहीये.
(समाप्त)

कथा

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

12 Jun 2024 - 12:40 pm | सौंदाळा

ह्म्म
भविष्यात शिरुन विज्ञानकथा, कारणे/परीणाम वगैरे लिहिणे म्हणजे कल्पनाशक्ती भारीच.

भागो's picture

17 Jun 2024 - 7:45 pm | भागो

सौंदाळा
आभार.

चौथा कोनाडा's picture

23 Jun 2024 - 7:03 pm | चौथा कोनाडा

अतिशय रोचक.
छान लिहिले आहे.

.

.

.
(सध्या कृबुचित्रांचा नाद लागलेला असल्याने काहीही आले की टाक कृबुत असे चालले आहे.मूळ इंगरेजी कथा वाचली पण नाही)