लोकं पूर्वकल्पीत धारणा ठेवून एकमेकांशी का वागतात?

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
20 May 2024 - 11:51 am

“मागच्या वेळी तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा कधी पाहिलं होतं,त्याला भेटला होता आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व तुम्हाला जे वाटलं होतं तेच होतं का?

कदाचित कधीच नसावं.विचार करा, एका दिवसात तुम्हाला किती वेळा “अरे, तो अबोल आहे”, किंवा “ती इतकी छान नाही” किंवा “ते तिथे का असतील?” असे प्रश्न मनात उद्भवले
असतील.

आजकाल, लोक नेहमी असं गृहीत धरतात की त्यांना इतरांबद्दल सर्व गोष्टी माहित आहेत.
परंतु खरोखर, इतरांबद्दल, त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल, किंवा त्यांच्या भूतकाळाबद्दल, त्यांना अजिबात सुगावा नसतो.
मग भाऊसाहेब, लोकं पूर्वकल्पीत
धारणा ठेवून एकमेकांशी का वागतात?”
असा प्रश्न कालच्या भेटीत मी
प्रो. देसायांना विचारला

“मला असं वाटतं की,
आजकाल काही लोकांना त्यांच्या आयुष्यात दररोज जे भेटतात, त्यांच्या बद्दल ते एक पूर्वकल्पित धारणा बाळगून असतात.हे तुमचं
म्हणणं अगदी बरोबर आहे.
ही त्यांची धारणा चुकीची असते.
हे असं वागणं चुकीचं असतं.त्या भेटलेल्या माणसाला एकही प्रश्न विचारलेला नसतो.
आणि त्या भेटलेल्या माणसाला नंतर त्यांनी एखादा प्रश्न विचारल्यावर त्यांच्या लक्षात येतं की आपण अशी पूर्वकल्पित धारणा करून घेतो,ते चुकीचं असतं,मग मनात एक तर वाईट वाटतं किंवा आपणाकडून बेपर्वाई झाली आहे असं वाटतं.

जे पुढच्यावेळी,नव्याने भेटलेल्या
माणसाशी काळजी घेऊन वागतात,
त्यांनी त्यावेळी त्यांची पूर्वी झालेली चूक लक्षात ठेवून,त्यांच्याशी वागलं
पाहिजे.

आणि दुसरं म्हणजे ज्यांच्याशी पुर्वकल्पीत धारणा ठेवून वागलं
जातं,त्यांना ते वागणं पाहून आपलं
व्यक्तिमत्व कदाचित चुकीचं असेल का? ह्याचा संभ्रम होऊन ते सुद्धा आपलं व्यक्तिमत्व बदलण्याच्या नाहक प्रयत्नात जातात.

म्हणून प्रथम भेटीत भेटलेल्यांना
त्यांच्याशी आपल्यकडून वागलं जात असताना त्यांना कसं वाटेल हे लक्षात ठेऊन,त्यांच्याशी वागताना काळजी घेतली पाहिजे.”

प्रो. देसायांनी, थोडक्यात पण कुणालाही पटेल असं स्पष्टीकरण
दिलं हे निर्विवाद आहे.

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

नठ्यारा's picture

21 May 2024 - 9:12 pm | नठ्यारा

सामंतकाका,

प्रश्न गहन आहे. पण माझं उत्तर सोप्पंय. तुमचंच पहा ना. तुम्ही चुंबकद्रायूशास्त्रावर संशोधन केल्याचं लिहिलंय. पण नेमकं काय संशोधन केलंय ते लिहिलंच नाही. मी केव्हापासनं मागे लागलोय तुमच्या. शिवाय ते अण्वस्त्रांशी संबंधित आहे. म्हणजे ते भाभा अणुसंशोधनकेंद्रात व्हायला हवं. पण तुम्ही ते टाटा मूलभूत संशोधनकेंद्रात केलंत. एकतर तुम्ही थापेबाजी तरी करताय वा ते संशोधन अतिगुप्त असावे. नक्की काय भानगड आहे?

हां, तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असंय की तुमच्याशी पूर्वकल्पीत धारणा ठेवून वागायला मजा येते.

-नाठाळ नठ्या