कवितांचे मंचीय (नृत्य - नाट्यात्मक) अविष्कार :

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
29 May 2009 - 6:07 pm

हे कवितांचे मंचीय अविष्कार करायची फ़ॆशन कधीपासून आलीय बुवा?
पावसाच्या कविता, निसर्गाच्या कविता, झाडांच्या कविता...

वैताग साला..
(आधीच सुमार निसर्गकविता माझ्या डोक्यात जातात.. त्यात सूर्य, चंद्र,पाऊस,आभाळ असे शक्य तितके हावभाव करत गिटारच्या झिन्गझिन्ग झिन्गझिन्ग ठेक्यावर कोणी कविता उभं राहून गायला लागलं तर काय होईल?... आमच्या प्राथमिक शाळेत एक बाई कायम अशा प्रकारच्या कविता घेऊन नृत्य बसवायच्या...
हिरवे हिरवे गार गालिचे( हिरव्या फ़्रॊकमधल्या दहा मुली या विन्गेतून त्या विन्गेत पळाल्या ) हरित तृणांच्या ( पाच बोटं एकत्र करून आकाशाकडे दाखवत उघडमीट करणारी चार पोरं .. ही म्हणे गवताची ऎक्शन) मखमालीचे ( हात आडवे करून पंजे वरतीखालती)...तिसरीतही हे नृत्य माझ्या डोक्यात जात असे)....

जगात संदीप खरे अजिबात न आवडणारे पुष्कळ आहेत हे माहित आहे.. मी त्यातला नाही हेही आग्रहाने नमूद करतो... ( आयुष्यावर बोलू काही आणि नामंजूर मधली काही गाणी मला आवडली होती ... आयुष्यावर.. चा कार्यक्रमही छान होतो असे माझे मत)

जालावर कोल्हापुरी दादांकडून दुवा मिळाला आणि " केव्हातरी वेड्यागत .." या कवितेचा लाडालाडा मंचीय अविष्कार पाहून स्वत:चा अगदी वैतागसम्राट झाला....
http://www.youtube.com/watch?v=YG15gntAfB4
अर्थात बहुसंख्य लोकांना हा कार्यक्रम आवडतो असे दिसते..( पहा कोदांचा दुवा)

आता हे गाणं बोलगाणी वगैरे काय म्हणतात त्या पद्धतीचे आहे... तोंडाला कॊर्डलेस माईक लावून कवी आणि दोन अभिनेत्री ही कविता सादर करतात...
या दोघी अभिनेत्री चांगल्याच आहेत..
पण प्रत्येक ओळीनंतर करायला काही नसल्याने विचित्र पद्धतीने पायाने ठेका देत किंवा डोलत राहायचे... मध्येच ठराविक दाद द्यायची.. आहाहा, किंवा येस...किंवा वावा... आणि गिटारच्या पुढच्या तुकड्याची वाट पाहत डोलत तरी बसायचे किंवा शून्यात नजर लावून बसायचे... ( भावसमाधी बरं ही बेमट्या)
काय विचित्र प्रकार...
ती शेवटची विंगेत धावायची ऎक्शन तर अहाहा...

त्यात कवी मध्येच जिन्यावर जाणार, या दिव्यात उभा राहणार, या गोलात उभा राहणार.. हळूच तिच्या खांद्याला स्पर्श करणार मग ती दचकणार... मग तो शाहरुख खानसारखं तिच्याकडे बघणार..
मग गंभीर होऊन पुढची ओळ म्हणणार...
फ़ार कृत्रिम आणि खोटंखोटं वाटतं... किंवा शाळकरी ...

कॊलेजच्या हॊस्टेलात त्या कळातल्या लोकप्रिय चारोळ्या घेऊन त्यांचा (रूममध्येच कंपूतल्या कंपूत द्व्यर्थी वगैरे ) मंचीय अविष्कार करण्यात धमाल येत असे त्याची या निमित्ताने आठवण आली.

संदीप खरे जेव्हा छान भारतीय बैठकीवर बसून कविता गातात तेव्हा फ़ॊर्मात आल्यासारखे वाटतात, कम्फ़र्टेबल एकदम.. अगदी स्वत:च्या एरियात असल्यासारखे... पण इथे एक अवघडलेपण आहे असे वाटते... "चल, रॊकस्टारची ऎक्टिंग कर बघू" अशी कोणी सक्ती केल्यासारखे वाटते...

वेड लागलंय या गाण्यावर कुठल्याशा विडियोमध्ये खरे आणि कुलकर्णी काळे कपडे घालून अचाट नाचताना दिसतात... तेव्हा "का? का?" असं विचारावंसं वाटलं... तेच हा कवितांचा मंचीय अविष्कार पाहताना झालं...
जालावर ही कविता पाहिल्यानंतर तरी हा कार्यक्रम बघू नये असंच वाटतंय..
कोणी हा कार्यक्रम पाहिलाय का?

कलानृत्यसंगीतसंस्कृतीनाट्यप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

29 May 2009 - 6:23 pm | परिकथेतील राजकुमार

=)) =))
मास्तर माझ्यामते त्या कार्यक्रमाचे नाव 'कधीतरी वेड्यागत' असे आहे.
आणी हो कार्यक्रमाच्या शिर्षकातच कार्यक्रम काय आहे ह्याची हिंट दिलेली असताना तुम्ही ती क्लिप बघायचे धाडसच कसे केलेत ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मराठमोळा's picture

29 May 2009 - 6:39 pm | मराठमोळा

मास्तर,
निरिक्षण एकदम चांगलं आहे तुमचं.

त्यात कवी मध्येच जिन्यावर जाणार, या दिव्यात उभा राहणार, या गोलात उभा राहणार.. हळूच तिच्या खांद्याला स्पर्श करणार मग ती दचकणार... मग तो शाहरुख खानसारखं तिच्याकडे बघणार..
=)) =)) =)) =))

पण आजकाल सगळं ऑनडिमांड झालेलं आहे. "लोकांना आवडतय ना.. मग चालु द्या" अशी वृत्ती आहे.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

अवलिया's picture

29 May 2009 - 6:45 pm | अवलिया

वा! मस्त मास्तर !!

=))

--अवलिया

मुक्तसुनीत's picture

29 May 2009 - 7:48 pm | मुक्तसुनीत

काहीतरी नवे करण्याचा प्रयत्न दिसतो. जी झलक पाहिली त्यात फार मजा आली नाही. काव्यपंक्ती , त्यातल्या कल्पना घासून गुळगुळीत झाल्यासारख्या वाटल्या. आणि मूळ शब्दांचा पाया भुसभुशीत असल्याने , रंगमंचीय आविष्कार ओढून ताणून चंद्रबळ आणल्यागत. पण एकूणात हा प्रकार लोकप्रिय आहे असे दिसते.

असो.

अवांतर : मिपाला चिरपरिचित असलेल्या एका माणसाची खऊट कॉमेंट वाचली का ;-) :

ह्या कार्यक्रमाचे नाव दोन बायका फजिती ऐका असे आहे का?

=)) =)) =))

पण एकूणात हा प्रकार लोकप्रिय आहे असे दिसते.

हे बाकी खरे

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

मुक्तसुनीत's picture

29 May 2009 - 10:56 pm | मुक्तसुनीत

"अजून एक" यांची अजून एक जहबर्‍या कमेंट :
खरे आणि कुलकर्णी यांच्या कार्यक्रमाला आमच्यात "पुरुषांची मंगळागौर" म्हणतात !

=)) =)) =)) =))

क्रान्ति's picture

29 May 2009 - 10:34 pm | क्रान्ति

हिरवे हिरवे गार गालिचे( हिरव्या फ़्रॊकमधल्या दहा मुली या विन्गेतून त्या विन्गेत पळाल्या ) हरित तृणांच्या ( पाच बोटं एकत्र करून आकाशाकडे दाखवत उघडमीट करणारी चार पोरं .. ही म्हणे गवताची ऎक्शन) मखमालीचे ( हात आडवे करून पंजे वरतीखालती)...तिसरीतही हे नृत्य माझ्या डोक्यात जात असे)....

मुन्सिपाल्टीची शाळा आठवली. अजूनही असं काहीसं दिसलं की त्यावेळचे ते "बिगरी डान्स" आठवतात!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

चित्रा's picture

30 May 2009 - 12:45 am | चित्रा

वेगळा प्रकार. थोडे नाटकी वाटते.

खरे तर हा प्रयोग थेटरामध्ये जाऊन बघायला चांगले वाटत असेल, पण दोन बायका का ते कळले नाही! कविता अजून नीट ऐकली पाहिजे, दोन स्वभाव आहेत का वगैरे त्यासाठी.

चतुरंग's picture

30 May 2009 - 1:32 am | चतुरंग

खरं तर उत्तम (कविता + वाचनाला) बाकी कशाची आवश्यकता भासू नये!
प्रत्येकच गोष्टीचा रंगमंचीय आविष्कार पात्ररुपात चांगला दिसेल असे नाही कारण कवितेत शब्दांकडे लक्ष जाणे जास्त महत्त्वाचे आहे/असायला हवे. त्यात अभिनयाला फारसा वाव नाही. ऐकणार्‍यांना त्यांना भासणार्‍या प्रतिमा दिसू द्यायला ह्या आविष्कारात काहीच जागा नाही.
अतिरेकी प्रदर्शनाची हौस इतकेच मला जाणवले बाकी काही नाही. संदीप खरेच्या काही कविता मला अतिशय आवडलेल्या आहेत पण इथे कवितेचे शब्दही तेचतेच गुळगुळीत वाटले.
(खुद के साथ बातां : रंगा, ही क्लिप बघणं म्हणजेच तू वेड्यासारखं वागलासच ना? मग झालं तर! ;) )

चतुरंग

योगी९००'s picture

30 May 2009 - 2:38 am | योगी९००

हिरवे हिरवे गार गालिचे( हिरव्या फ़्रॊकमधल्या दहा मुली या विन्गेतून त्या विन्गेत पळाल्या ) हरित तृणांच्या ( पाच बोटं एकत्र करून आकाशाकडे दाखवत उघडमीट करणारी चार पोरं .. ही म्हणे गवताची ऎक्शन) मखमालीचे ( हात आडवे करून पंजे वरतीखालती)...तिसरीतही हे नृत्य माझ्या डोक्यात जात असे)....

हा हा हा...मलाही अशी नृत्ये डोक्यात जायची. मी एकदा दात विचकून हसल्याने आमच्या बाईंनी मुद्दाम मला नाचात घेतले होते. जाम तंतरली होती.

बाकी खरे आणि कुलकर्णी हल्ली माझ्या डोक्यातच जातात.

खादाडमाऊ

बिपिन कार्यकर्ते's picture

30 May 2009 - 2:40 am | बिपिन कार्यकर्ते

नाही आवडला हा प्रकार!!! खूपच कृत्रिम वाटले. त्यात परत त्यातली एक अभिनेत्री पार डोक्यात जाते, त्यामुळे तर अजूनच नाही.

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

30 May 2009 - 4:06 am | विसोबा खेचर

मास्तर,

'कधितरी वेड्यागत वागायला हवे' चा दुवा पाहिला..

माझं व्यक्तिगत मत -

सर्चसाधारणपणे बोलायचे झाल्यास कवितेच्या नाट्याविष्काराबाबत आपल्या,

आमच्या प्राथमिक शाळेत एक बाई कायम अशा प्रकारच्या कविता घेऊन नृत्य बसवायच्या...
हिरवे हिरवे गार गालिचे( हिरव्या फ़्रॊकमधल्या दहा मुली या विन्गेतून त्या विन्गेत पळाल्या )

या निरिक्षणाशी सहमत, त्यामुळे काव्याचा प्रत्येकच नाट्याविष्कार मला आवडतो/आवडेल असे नाही.

परंतु आपण दिलेल्या 'कधितरी वेड्यागत वागायला हवे' या दुव्यातला नाट्याविष्कार मला व्यक्तिश: आवडून गेला. मी काही नाट्यतज्ञ नाही परंतु त्यातल्या सांगितिक बाजूविषयी बोलायचे झाल्यास कवितेची साधी सोपी चाल आणि ओघवती लय, मध्येच पॉजमुळे येणारी थोडी आड लय मला अतिशय आवडली. आणि मुख्य म्हणजे त्या तिघांनीही ही लय खूप छान जपली आहे असे मी म्हणेन..!

दुव्याबद्दल धन्यवाद. कार्यक्रम आवडला. जियो..!

आपला,
(रसिक) तात्या.

अंगद's picture

30 May 2009 - 10:43 pm | अंगद

असेच म्हणतो.
त्या प्रयत्नाची टर उडविण्याचा प्रयत्न आवडला नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 May 2009 - 11:13 pm | बिपिन कार्यकर्ते

भडकमकर मास्तरांनी जे लिहिले आहे, ते मला तरी टर उडवल्यासारखे वाटले नाही. कार्यक्रम बघून जे वाटले ते सरळपणे मांडले आहे. अतिशय स्पष्ट लिहिले आहे पण टर नाही वाटत.

बिपिन कार्यकर्ते

अंगद's picture

31 May 2009 - 10:12 am | अंगद

असु शकते. मला ते तितकेच टर उडवल्यासारखे वाटले हेही खरे. तुमच्या इतकाच मलाही मतप्रदर्शनाचा हक्क आहे हेही खरे.
असो, तुमच्या प्रतिप्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

भडकमकर मास्तर's picture

31 May 2009 - 9:59 am | भडकमकर मास्तर

काहींना लय आवडणार
काहींना कविता वाचायला आवडणार..
काहींना बसलेल्या सन्दीपच्या कविता आवडणार...
काहींना अभिनेत्या सन्दीपच्या कविता आवडणार.....
काहींना दोन्ही अभिनेत्री आवडणार..
काहींना नाचणारी अभिनेत्री आवडणार..
काहींना गाणारी अभिनेत्री आवडणार...
काहींना टोटल सन्दीपच डोक्यात जाणार..

चालायचंच...

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

टारझन's picture

31 May 2009 - 1:22 pm | टारझन

आणि काहींना सगळाच्या सगळा संदिप आवडणारा डोक्यात जाणार
=)) =)) =))

जियो मास्तर जियो ... आपल्याला हा कार्यक्रम आवडला

शरदिनी's picture

30 May 2009 - 8:56 am | शरदिनी

तरल भावना समजून घेणम्ही आवश्यक आहे...
नुसतंच प्रॅक्टिकल तरी किती काळ जगायचं?
मी तरी या कवितेला आणि सादरीकरणाच्या प्रयत्नाला दाद देते

विनायक पाचलग's picture

30 May 2009 - 4:28 pm | विनायक पाचलग

प्रथमतः आपण मी दिलेल्या धाग्यावर एवढी साधक बाधक चर्चा करवुन आणलीत त्याबद्दल आभार.
आता मुळ मुद्द्याकडे येवु.
हा कार्यक्रम म्हणजे नेणीवेची अक्षरे होय्.आता त्याचे नाव कधीतरी वेड्यागत असे झालेले आहे.
पण रंगमंचीय अविष्कार मला आवडला.
कारणे-

१. निदान मी स्वतःतरी कवितांना नाटयरुपात मांडणारा हा पहिलाच कार्यक्रम पाहिला ,त्यापुर्वी मी पाहिलेले कवितेचे कार्यक्रम हे बैठ्या स्वरुपाचे होते. हे असे कार्यक्रम मला आणि माझ्या बर्‍याचश्या मित्राना डोक्यात जायचे.पण या कार्यक्रमामुळे नेहमीच्या कवितावाचनाच्या कार्यक्रमाला जी मरगळ येते ती मरगळ येत नाही. यामुळे कवीला जे काही सांगायचे आहे ते त्याला प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचवता येते.कवितावाचन करताना मी माझ्या स्वानुभवावरुन सांगु शकतो की पहिल्या १-२ रांगांशिवाय कोणीही ऐकत नाही.( हा अनुभव कवितावाचक आणि रसिक अशा दोन्ही बाजुतुन घेतलेला आहे)पण इथे तसे होत नाही हे या कार्यक्रमाचे यश नाही काय.

२.विशेष म्हणजे नाटक आणि कवितावाचन या दोन्ही प्रकाराना सध्या बरे दिवस नाहीत ,प्रायोगीक नाटके राहु द्यातच पण व्यावसायीक नाटकानादेखील निदान कोल्हापुरात तरी कोण येत नाही,आणि कवितावाचनाबद्दल म्हणाल तर गेल्या २ वर्षात मी तशा एकाही कार्यक्रमाची जाहीरातदेखील पाहिलेली नाही.अशावेळी जर एकावेळी च संदीप खरेसारखा प्रसिद्ध कवी( त्याचा प्रतिभेबद्दल वाद असेल पण तो प्रसिद्द आहे यात शंका नाही) आणि मधुरा वेलणकर सारख्या उत्तम अभिनेत्रीचा अभिनय या गोष्टी एकत्र पहायला मिळत असतील तर हे चांगलेच नाही का?

३. साधारणतः महाजालावर या कार्यक्रमातील तीन कविता उपलब्ध आहेत आणि दुर्दैवाने त्या तिन्ही कविताना प्रत्यक्ष कार्यक्रमात फार महत्वाचे स्थान नाही ,याहुन चांगल्या कविता या कार्यक्रमात आहेत्.त्या कवितात मध्येच उगाचच पॉज आणि रंगमंचावर उगाचच सर्व जण असे काही नाही ,उलट त्या मोठ्या प्रमाणावर अपील होतात ,आणि कधीतरी वेड्यागत ही कार्यक्रमाची शेवटची कविता असल्याने त्यावेळी तिन्ही कलाकारानी एकत्र यायची गरज होती आणि त्यामुळेच तेथे पॉज वगिअरे काहीब्बाही आहे पण बेसिकमध्येच घोळ,मैत्रीण सारख्या कवितातुन या कार्यक्रमाचा दर्जा दिसुन येतो.
या कार्यक्रमाची आणखीन एक जमेची बाजु म्हणजे नेपथ्य ,त्याबाबत मी माझ्या लेखात सविस्तर बोललो आहेच,पण साध्या साध्या नाटकांपेक्षा कितितरीपट सरस नेपथ्य हा कार्यक्रम देतो.

४.आता दोषाबाबत बघायचे झाल्यास एका नटीची ओव्हरऍक्टींग ,आणि अध्येमध्ये त्रास देणारा माइक या दोन प्रमुख गोष्टी दिसतात .याशिवाय क्वचीत कार्यक्रमाने पकडलेला वेग कमी झाल्याचे जाणवते पण ही शक्यत अफार कमी आहे.आणि महत्वाची गोष्ट मह्णजे ती अभिनेत्री या कार्यक्रमातुन जावुन तेथे दुसरी अभिनेत्री आलेली आहे.व ध्वनीयोजनेत सुद्धा बरीच प्रगती झालेली आहे
एकुणात मला हा कार्यक्रम एक स्वतंत्र कार्यक्रम म्हणून ,इतर काव्यवाचन कार्यक्रमाशी तुलना करता,इतर नाटकाशी तुलना करता अशा तिन्ही वेळी सरस वाटला .बाकी प्रत्येकाचे आपाआपले मत असु शकते व त्याचा मी आदर करतो.
आपला
विनायक

अवांतर- एकुण आपल्या लेखावरुन आपल्याला हा कार्यक्रम न आवडल्याचे जानवते मग माझ्या लेखाला आपण दिलेली ही प्रतिक्रिया काय सुचीत करते

दुवे
प्रेषक भडकमकर मास्तर ( गुरू, 03/19/2009 - 01:02) .
दुवे पाहिले ...
धन्यवाद...
कार्यक्रम छान आहे...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

का मला प्रोत्सहन म्हणून हा प्रतिक्रियांचा खटाटोप????

स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......

विनायक पाचलग

भडकमकर मास्तर's picture

30 May 2009 - 5:16 pm | भडकमकर मास्तर

बाकी प्रत्येकाचे आपाआपले मत असु शकते व त्याचा मी आदर करतो.

हेच म्हणतो...
अवांतर : आपली मते खूपच जुळतात म्हणायची...
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

पर्नल नेने मराठे's picture

30 May 2009 - 4:42 pm | पर्नल नेने मराठे

मला तर वेलणकरचे कानातले आवड्ले ;;)
चुचु

धनंजय's picture

30 May 2009 - 5:39 pm | धनंजय

कल्पना आवडली. कवीने शब्दोच्चार केल्यामुळे कुठल्या शब्दावर जोर दिला आहे, त्यातून काही अधिक काही बोध झाला. एका अभिनेत्रीचे शब्दांवरील वजन दुसरीपेक्षा सरस वाटले (विनायक पाचलग यांच्याशी अशी काही खरड चर्चा मी केल्याचे आठवते.)

दिग्दर्शन वेगळे होऊ शकते, याबाबत भडकमकर मास्तरांचे मुद्दे विचारार्ह आहेत.

पण कविता अभिनयासह सादरच करू नये, समर्थ कवितांना त्याची गरज नसते, वगैरे काही मूलभूत तत्त्वे आहेत, याबाबत मी असहमत आहे.

या कलाकाराला रसिकांसाठी 'असा' अनुभव द्यायचा आहे, त्या कलाकाराला 'तसा'. रसिकापर्यंत कुठलातरी सौंदर्यानुभव उत्कटपणे पोचवला तर सादरीकरणाचे यश आहे, नाही पोचवला तर सादरीकरण अयशस्वी आहे.

प्राजु's picture

30 May 2009 - 11:39 pm | प्राजु

पण कविता अभिनयासह सादरच करू नये, समर्थ कवितांना त्याची गरज नसते, वगैरे काही मूलभूत तत्त्वे आहेत, याबाबत मी असहमत आहे.

+१
काल प्रमोद काकांशी बोलणं झालं तेव्हा "ठेवणीतले आवाज" चा पॅरा मी वाचून दाखवताना, काका म्हणाले त्यातले आवज काढून दाखव म्हणजे तू ज्या भावनेने लेख लिहिला आहेस तो इतरांपर्यंत पोचण्यासाठी त्याच भावनेने वाचणं जास्त परिणामकारक ठरेल. आणि खरंच जेव्हा मी तसं वाचलं तेव्हा मला स्वतःला जसा आवाज अभिप्रेत होता तोच आवज तिथे ऐकणार्‍यांपर्यंत पोचल्यामुळे तो ते समजू शकले आणि आनंदही घेऊन शकले.
हेच या व्हीडीओ बाबतही बोलता येईल. राधे रंग तुझा काय किंवा कधीतरी वेड्यागत काय.. त्यांना जे सांगायचं असेल ते तुमच्यापर्यंत पोचणं महत्वाचं. कधी तरी वेड्यागत मध्ये काही ठीकाणी थोडे उदासीन शब्द आणि त्याप्रमाणे अभिनय..चांगला वाटला आहे. हा प्रयोग खरंतर मला स्वतःला आवडला. विचारच करायचा झाला तर जालिंदर जलालाबादींसाठी स्पेशल इफेक्ट्स दिलेले फोटो लावून जो परिणाम साधला तो कदाचीत नुसत्या लेखनाने नसता साधला.
कविता ऐकणं आणि समजून घेणं यासाठी असे प्रयोग करणं म्हणजे मूर्खपणा .. असं मला तरी अजिबात नाही वाटत. तुम्हाला ते आवडलं नाही म्हणून संदीप आणि सलिल सुमार आहेत असं नाही. कदाचीत ती कविता समजून घेण्यासाठी तुम्हीच कमी पडलात असाही अर्थ होऊ शकतो.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

31 May 2009 - 9:01 am | भडकमकर मास्तर

कविता ऐकणं आणि समजून घेणं यासाठी असे प्रयोग करणं म्हणजे मूर्खपणा .. असं मला तरी अजिबात नाही वाटत.
मूर्खपणा नाही वाटत... वेगळा प्रयोग करताहेत असं वाटतं...पण वेगळा प्रयोग केल्यावर तो आवडावा की न आवडावा याचं स्वातंत्र्य हवं असं वाटतं...

आता या फितीबद्दल बोलायचं तर मला ही कविता ठीकठाक वाटली पण सादरीकरण अत्यंत सुमार वाटलं...
( म्हणजे नाटक लिहिलेले अत्यंत आवडते आणि त्याचा सुमार पर्फॉर्मन्स पाहिला की काय वाटते ते...आता अशा परिस्थितीत मी लेखकाला सुमार म्हणत नाहीये हे लक्षात घ्या..)

तुम्हाला ते आवडलं नाही म्हणून संदीप आणि सलिल सुमार आहेत असं नाही.
मला ही ध्वनिचित्रफीत आवडली नाही हे खरं आहे... पण सन्दीप सलील सुमार आहेत असं मी अजिबात म्हणणार नाही., कुठे म्हटलेलं नाही...( मला स्वतःला सन्दीपचा आयुष्यावर बोलू काही . हा कार्यक्रम आवडलेला आहे आणि तो दोन तीन वेळा तिकीट काढून पाहिलेला आहे.. पण बसून कविता गाणार्‍या सन्दीपचा कार्यक्रम मला आवडतो म्हणून अभिनेत्या सन्दीपच्या कविता मला आवडल्या पाहिजेत असे कुठे आहे? )

शिवाय सन्दीपच्या आ.बो.का च्या व्हिडीओची मी तर नुसती झलकच पाहिली...पूर्ण पहायची हिंमत नाही झाली.....सन्दीपच्या अभिनयगुणांविषयी मी माझी मतं राखून ठेवलेली आहेत...
( नुसत्या शन्केनेही त्याची फ्यान लोकं जाम उखडतात असा वैयक्तिक अनुभव आहे)

कदाचीत ती कविता समजून घेण्यासाठी तुम्हीच कमी पडलात असाही अर्थ होऊ शकतो.
कविता लिहिलेली सरळ वाचली असती तर मला कळालीच असती.. अजूनही त्यात न कळण्यासारखं काय आहे ते मला कळलेलं नाही असं आपण म्हणू.. ठीक आहे. इतकीही ती दुर्बोध नाही, उलट मुसु म्हणतात तशी ती नेहमीच्याच कल्पनांची वाटली....

ते असो, पण त्याचं नाटक म्हणून सादरीकरण काही मला आवडलेलं नाही आणि ते बालिश शळकरी वाटलं एवढं आणि एवढंच म्हणतो... असे प्रयोग पुन्हा कोणीही करू नयेत असे मात्र माझे म्हणणे नाही पण ते बालिश हो ऊ नयेत असे मात्र म्हणायचे आहे...

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

अंगद's picture

31 May 2009 - 10:16 am | अंगद

नाही मास्तर. तुमचा लेख लिहितांनाचा अभिनिवेश लेख वाचुनच कळतो, त्यामानाने प्रतिक्रियांवरची उत्तरे संयत आहेत.
धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2009 - 6:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तर, काव्यवाचनाच्या वेळेस कवी जसा हातवारे करुन कविता वाचायचा, आता त्याला अभिनयासहीत कविता येत असेल तर त्याला करीयर आहे असे वाटायला लागले आहे. बाकी कथा काव्य आपल्याकडे होतेच, त्याचे हे आधुनिक रुप.... नाही का ?

-दिलीप बिरुटे

मेघना भुस्कुटे's picture

30 May 2009 - 10:06 pm | मेघना भुस्कुटे

मला अजूनही संदीपच्या काही कविता आवडतात.
पण मी संदीप आणि सलीलच्या 'आयुष्यावर...' या आल्बममधल्या गाण्यांचा व्हिडिओ पाहिला होता. सोबत एक संदीपप्रेमी मित्र आणि एक बर्‍यापैकी तटस्थ मैत्रीण होती. त्याबद्दल अद्याप कुणाला सांगायची हिंमत नव्हती. पण आता मास्तरांच्या अनुभवानंतर ते साहस करतेच.
'मी मोर्चा नेला नाही' या गाण्यावर संदीप स्वत: एखादा खडूस शेंगदाणा असल्याचा अभिनय करत होता. पिंका टाकणे, मांड्या खाजवणे, नाक शिंकरणे, खाकरणे... अशी त्यांच्यामते मध्यमवर्गीय वृत्तीची चेष्टा वगैरे त्यात होती. एवढा सगळा अभिनय करून शिवाय तो ते गाणं मधे मधे गातही होता.
'आयुष्यावर बोलू काही' या गाण्यात संदीप आणि सलील बाईकवर बसून कुठेसे वार्‍यावर - नदीवर वगैरे गेले आणि हे गाणं एकमेकांशी संवाद साधल्यासारखे हातवारे करत म्हणत राहिले. मधेच काहीतरी वेगळं म्हणून सलील आपला चष्मा काढून हातात घ्यायचा आणि परत तो स्टायलिशपणे वगैरे लावायचा. हीच ऍक्शन लागोपाठ तीनदा.
या दोन गाण्यांनंतर माझे पेशन्स संपले. त्या सगळ्या प्रकाराबद्दल कुणालाही काही सांगायला तर मला जमलं नाहीच. पण माझा आणि माझ्या मित्राचा काळाठिक्कर पडलेला चेहरा आणि मैत्रिणीच्या चेहर्‍यावरची 'हा? संदीप खरे?' ही कमेण्ट नीट लक्षात राहिली. आज कन्फेशन करून टाकलं, आता मोकळं मोकळं वाटतंय. :)

गणा मास्तर's picture

30 May 2009 - 10:37 pm | गणा मास्तर

संदीपच्या कविता फारच आवडतात तरीही मलाही हा प्रयोग फारसा आवडला नाही.
शब्दाकडुन लक्ष अभिनयाकडे खेचले जाते, त्यामुळे कवितेच्या अर्थाला न्याय देता येत नाही.
मधुरा वेलणकरचा अभिनय फार सुमार आणि अमृता सुभाषचा फार भडक वाटला. संदीप अधे मधे गोंधळल्यासारखा वाटला.
'राधे रंग तुझा गोरा'ह्या गाण्यात तर अगदी भडकममास्तर म्हणतात त्याप्रमाणे नाच केला आहे.विशेषतः ०:४९ ला 'इथे तुझ्या डोळा पाणी' या ओळीवरचा अभिनय बघताना अगदी वैताग येतो.
हे भलते अवघड असते ही माझी आवडती कविता, तरी मला हा व्हिडिओबिलकुल आवडला नव्हता.
अर्थात प्रत्येकाची मते वेगवेगळी असु शकतात.
आपला
संदीपचा पंखा
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

भडकमकर मास्तर's picture

31 May 2009 - 9:34 am | भडकमकर मास्तर

संदीप अधे मधे गोंधळल्यासारखा वाटला.
'राधे रंग तुझा गोरा'ह्या गाण्यात तर अगदी भडकममास्तर म्हणतात त्याप्रमाणे नाच केला आहे.विशेषतः ०:४९ ला 'इथे तुझ्या डोळा पाणी' या ओळीवरचा अभिनय बघताना अगदी वैताग येतो.

खास ते ०.४९ साठी हा व्हिडिओ पाहिला.... अहाहा... यात अमृता गाते फार छान असे वाटले पण तो बाजूला अभिनय पाहून हसून हसून पुरेवाट झाली....
डोळ्यांत पाणीचा अभिनय बघाच...

पण नोंद घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे त्याच वेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट ऐकू येतो.. कदाचित प्रेक्षागृहात लोकांना त्याच वेळी ते फार आवडत असेल....

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

भाग्यश्री's picture

1 Jun 2009 - 11:28 pm | भाग्यश्री

भलते अवघडचा व्हीडीओ फार बेकार! :( किती सुंदर गाणं/कविता आहे ती.. असं कशाला करायला जातात ही लोकं.. सलिल कुलकर्णीचा जो काय अभिनय आहे तो मेजर डोक्यात गेला..

मास्तर.. वरच्या लिंकमधला वेड्यागत प्रकार जरा बालिश वाटला.. पण हा प्रकार कदाचित लाईव्ह पाहील्यावर आवडेलही असे वाटले..

www.bhagyashree.co.cc

लिखाळ's picture

31 May 2009 - 10:01 pm | लिखाळ

मास्तर, काही मतांशी सहमत आहे.
वरच्या एका प्रतिसादात 'पुरुषांची मंगळागौर' असे लिहिले आहे ते पण लै भारी.

मराठीमध्ये वेगळा प्रयोग आहे. सध्या तरुणांच्या मना रुंजी घालतील अशी अनेकानेक गाणे खरे-कुलकर्णी तयार करत आहेत याबद्दल त्यांचे कौतुक वाटते.
काही काही गाण्यातल्या काही कल्पना छान आहेत.

मला स्वतःला 'जगायचे कसे', 'जीवन म्हणजे अस्सेच असते ! ह्म्म !', 'जग हे असेच असणार' इत्यादी विचार-शिकवणी देणारी गाणी कविता कमीच आकर्षीत करतात. अनेकदा त्यातल्या अनेकानेक कल्पना शब्दरचनेमुळे बर्‍या वाटल्या तरी त्या सार्वत्रिक अनुभव आहे असे दामटून सांगीतले जाते आणि तसे ते खरेच असते का? असा प्रश्न मला पडतो. पण त्या कवितांवर डोलणार्‍या अनेकांना तो पडतही नसावा.

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

परिकथेतील राजकुमार's picture

1 Jun 2009 - 11:39 am | परिकथेतील राजकुमार

कविता करणार्‍यानी कविता कराव्यात, संगीत देणार्‍यानी संगीत द्यावे, गाणार्‍याने गावे, कलाकराने अभिनय करावा.... सगळे मीच करणार म्हणले की माणसाचा एक तर देव आनंद होतो नाहीतर हिमेश रेशमीया.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

टिउ's picture

1 Jun 2009 - 10:27 pm | टिउ

हाहाहा! जबरा कमेंट...

टिउ's picture

1 Jun 2009 - 11:12 pm | टिउ

नसतेस घरी तु जेव्हा...हा अजुन एक असाच भयानक व्हिडिओ...अक्ख्या गाण्यात एकदाही चेहर्‍यावरचे भाव बदलले नाहियेत (सलीलच्या...आमच्या चेहर्‍यावरचे भाव क्षणोक्षणी बदलत होते)...अभिषेक बच्चनला तोड अभिनय आहे. वास्तविक इतकं छान गाणं आहे पण वाट लावलीये व्हिडिओ बनवुन.
३:०५ ला तर गाणं ऐकण्याचीही गरज नाही. बघुनच रडु येतं...

स्वस्तात बनवतो जेव्हा,
हा व्हिडिओ टुकार बनतो,
लोकांना तरीही आवडे,
अभिनय (जरी) फाटका होतो...

भडकमकर मास्तर's picture

1 Jun 2009 - 11:47 pm | भडकमकर मास्तर

३ ०५ साठी खास हा व्हिडिओ पाहिला.. धन्यवाद
एकाच वेळी ( ऑडिओ मस्त व्हिडिओ महाभयानक )संमिश्र भावना मनात येणे म्हणजे काय ते कळाले
____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jun 2009 - 11:52 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत... मी पण बघितला व्हिडिओ. मान गये... प्रेक्षकाना रडवणारा अभिनय... ;)

बिपिन कार्यकर्ते

भाग्यश्री's picture

2 Jun 2009 - 4:32 am | भाग्यश्री

:| :| भयाण..
खिडकीशी थबकून वारा... या ओळीला पडदा जोरात हलताना पाहून मजा वाटली! :)

www.bhagyashree.co.cc

परिकथेतील राजकुमार's picture

2 Jun 2009 - 1:56 pm | परिकथेतील राजकुमार

जबरदस्त अभिनयाविष्कार !!
ठरल, आपण सलीलला घेउन 'किलवर राजा' काढणार.

परा सुरकर
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य