माझं कोल्हापुर - भाग १

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
27 Mar 2009 - 2:33 pm

एन एच ४, शिरोळ- सांगली नाक्यावरुन दोन-तीन किलोमिटर दुरवर पंचगंगेच्या ब्रीज नंतर एक उजव्या बाजुला एक कट आहे, तेथेच कोप-यावर तावडे हॊटेल कधी काळी हे टपरी वजा हॊटेल एनएच ४ वरील एक प्रसिध्द जागा. तेथून वळण घेतल्यावर जरा पुढे गेले की आता कमान आहे जी सध्याच म्हणजे आठ-नऊ वर्ष झाली उभी करुन जी महापालिकेने उभारली आहे, लोकमत, पुढारी किंवा तस्म कुठलातरी वर्तमानपत्राची अथवा कंपनीची जाहिरात तुमचे स्वागत करेल, आजूबाजुला शेती व थोडे पुढे गेले तर कोल्हापुर जकात नाका व तुमचा प्रवेश करवीर नगरी, महालक्ष्मीचे निवास स्थान, पैहलवानांची नगरी, कलानगरी कोल्हापुरमध्ये प्रवेश.

सुरवात तर मी कुठून ही करु शकतो पण कोल्हापुर म्हणजे माझा घरं, तेव्हा कधी काळी कोल्हापुर मध्ये आम्ही राहत होतो शिवाजी पेठ मध्ये तेथून सुरवात ! दिपक आईस्क्रमि, जो शिवाजी पेठेच्या आसपास राहिला असेल त्याला हे नाव माहीत नाही असा विरळाच ! प्रकाश रणदिवे, कोकाट्यांची गल्ली, कोल्हापुर हा पत्ता व त्याच्या शेजारी एका खोली मध्ये आमचं घरं ! एका कोप-यात स्टोव्ह व स्वयंपाकाचे सामान, एका कोप-यात तिजोरी व तिजोरीवर हंथरुन पाघंरुन. बसायला चटई व एका बाजूला अक्काचा पाळणा, कधी मी त्या पाळण्यात मी देखील झुललो असेन, आज ही तो पाळणा घरात आहे, आता त्यात माझा सर्वात लहान भाचा झुलतो आहे. बाबा एका कपड्याच्या दुकानात कामाला जात, आई सांगते जेव्हा अक्का जन्मली होती तेव्हा बाबांचा पगार चाळिस रुपये होता, मला विचित्र वाटायचे चाळीस रुपयात कसे काय त्यांनी घर चालवले असेल.

कधी काळी पडद्यावर चित्रपट पाहीला होता तो प्रथम येथेच शिवाजी पेठेत, गणपतीला अथवा दिवाळीला सर्व जण वर्गणी काढून पडदा चित्रपट लावत, दोन खांब व त्याच्या मध्ये भला मोठा पडदा. पब्लिकला दोन्ही बाजूला बसायची सोय. एका बाजूला प्रोजेक्ट्रर. व संध्याकाळी ७.३० नंतर अंधार पडू लागल्यावर चित्रपटाला सुरवात, मिथूनचे डान्स डान्स, जी-९ व तस्म चित्रपट मी येथे पाहीले. ह्याच शिवाजी पेठेच्या जवळ मंगळवार पेठेत आमची नुतन मराठि विद्यालय शाळा, तेव्हा ती बालवाडी ते सातवी पर्यंत होती, शक्यतो आज ही सातवी पर्यंतच आहे, त्याच्या समोर नुतन मराठी हायस्कुल, पण आमची शाळा म्हणजे विद्यालय. एका जुनाट वाड्यामध्ये असलेली शाळा, खासबाग मैदानाच्या एकदम पाठीला बाजूला.

रस्त्यावरुन पाहीले तर एकाद्या वाड्यासारखीच दिसणारी शाळा, चार बाय चार फुटाचा एक बोर्ड मेन रोड वर शाळेचा. थोडे आत गेले की कमानी जवळच एक जुना शोभे यात्रेचा भला मोठा रथ जो काम करत नव्हता शक्यतो, अथवा मी त्याला कधी मिरवणुकीमध्ये पाहिला नाही त्यामुळे मला वाटते की तो कार्यरत नसावा, भला मोठा लाकडी दरवाजा जसा गढ / किल्यावर असतो तसा त्यातून आत गेले कि डाव्या बाजूला हेडमास्तरांचे ऑफिस व तेथेच स्टाफरुम. उजव्या बाजुला, पाचवी, सहावी व सातवीचे वर्ग व त्यांच्या तुकड्या, दोन मंजली बिल्डींग वजा वाड्यामध्येच, तेथून जरा पुढे गेले की पुन्हा एक गेट व त्या गेट नंतर छोटेखानी पटांगण (अगदीच छोटे असे कुणाच्या तरी घराबाहेरील अंगण असावे) हीच आमची मधल्या सुट्टीतील हक्काची जागा, येथे एक मोठी ओसरी वजा हॉल लाकडी खांब असलेला व त्या हॉलच्या वरती भुत आहे अशी वावडी त्यामुळे कधीच गेलो नाही, पण नंतर नंतर कळाले जेव्हा मी सातवी मध्ये आलो तेव्हा की ते शाळेचे गोडाऊन व स्टोअर रुम होती. त्या पटागंणामध्ये एक पाण्याची टाकी. येथेच आमची सकाळची प्रार्थना व शाळेचे विविध कार्यक्रम होतं.

तेथून जरा पुढे गेले की एका दरवाज्यातून आत गेल्यावर वाडाच्या मागच्या बाजूला नवीनच बांधलेली पत्राचा शेड असलेली शाळा बालवाडी ते पाचवीच्या मुला मुलींची. आता सर्व॑ काही शिक्षकांची नावे आठवत नाहीत, काही आठवतात, देसाई सर, पाटिल सर, जाधव मॅडम, निकम मॅडम.. असेच दोन चार.

आमच्या घरापासून शाळा जास्त लांब नव्हती असेल दोन-तीन किलोमिटर वर, आधी आधी आई सोडायला येत असे, नंतर आम्ही जवळ पासची मुले-मुली मिळूनच जाऊ लागलो, सगळेच गल्या-दोन गल्या सोडून राहत असतं, आमच्या मधील मोठी मुले दादागिरी करत आम्हाला शाळेत पोहचवत व परत घेउन येत. माझ्या आई कडे माझा लहानपणाचा फोटो आहे, त्यात मला पाहिल्यावर तर मलाच जाम हसू येतं, पाठीला दप्तर, काखेत पाणी पिण्याची छोटीशी बाटली.. त्या बाटलीला गळ्यात अडकवण्यासाठी पट्टा होता... तिला काही तरि म्हणत आता आठवत नाही आहे, पांढरा हाफ बाजूचा शर्ट व खाकी चड्डी व चड्डीवर लाल रंगाचा हुकवाला बेल्ट. तेल डोक्याला चापून लावलेले, कपाळावर गंध व डोळ्यात काजळ, कधी कधी मला विश्वास बसत नाही की तो माझाच फोटो आहे ह्यावर.

त्यावेळी आमच्या दप्तरामध्ये एक लाकडी पाटी, चार-पाच चुन्याच्या पेन्सिली व काही रंग बिरंगी खडू, एक अंकलिपीचे पुस्तक व जेवणाचा स्टिलचा छोटासा डब्बा. वही, पेन असली थेरं आम्ही पाचवीत आल्यावर चालू झाली. पहिली ते पाचवी पर्यतंची मुले / मुली खालीच बसत चटई वर समोर एक लाकडी फळा व त्याच्या बाजूला एका पट्टी वर बाईची छडी व फळा फुसायचा कपडा.. कधी कधी डस्टर. अ ब क ड येथेच गिरवलं व बे एके बे पण येथेच शिकलो, शिकण्यात तरबेज होतो पण उनाड खुप त्यामुळे शिक्षणाकडे लक्ष कमी व दंग्यात जास्त, तरी ही मी पहिली ते पाचवी पर्यंत सलग पहिला व दुसरा नंबर घेत असे शाळेत.

शाळेत दंगा खुप केला, कधी कुणाला मार, कधी मुलींची वेणी ओढ, कधी कुणी पाटी वर लिहलेले फुस, कुणाला चिमटा काढ, कुणाचा डब्बा पळव, दप्तर बाहेर फेकुन दे तर कधी वर्गाचा दरवाजा बाहेरुन बंद कर... असेल अनेक धंदे मी शाळेत असताना केले होते, दर दोन आठवड्यानंतर मला आईला शाळेत घेऊन यावे लागते कारण माझी कंप्लेट. पण तरी मॅडमचा / सरांचा माझ्या खुप जिव कारण मी हुशार. मला कधी कधी रावळगाम चे चॉकलेट तर कधी डब्यातून आणलेली पोळी कुणी ना कुणी देतच असे.

पहिली ते पाचवी ही पाच वर्ष भुरकन संपली, व आम्ही मोठे झालो कमीत कमी मॅडम तर आम्हाला हेच म्हणायच्या, दंगा करु नका आता तुम्ही मोठी मुलं झाला आहात तुम्ही पाचवी आहात. जेव्हा पाचवीत आलो तेव्हा मला आठवतं, महाद्वार रोड वरुन मी आई, बाबा व अक्का जाऊन माझी पुस्तके, वह्या व पेन घेऊन आलो होतो, व घरात बसून बाबांनी संध्याकाळी त्या सर्व पुस्तकांच्यावर , वह्यांच्यावर वर्तमानपत्रांचे कवर घातले होते व पेन ने प्रत्येक पुस्तक / वही च्या पानावर जय जिनेन्द्र व ओम लिहले होते. किती तरी दिवस मी ती पुस्तकांना व वह्यांना अक्कालाच काय पण बाबांना पण हात लावू देत नसे, सदा सर्वदा दप्तर माझ्या जवळच असे.

मधल्या सुट्टीत गोट्या खेळने अथवा विटी दांडू, हा रोजचाच कार्यक्रम. गोट्या खेळताना दंगा जास्त होत असे, अंगठा जमीनीवर टेकवून मधल्या बोटाने समोरची गोटी उडवली की एकदम गलका होत असे, व मग कुठले तरी सर, मॅडम आम्हाला तंबी देत व आम्ही गप्प रे गप्प रे चा परत गलका करु, मग कोणी तरी पाठीवर दणका दिल्याशिवाय तोंडे बंदच होतं नसे. विटी दांडू खेळताना कधी कुणाला लागली तर कुणाच्या डोळ्याला लागली असं झालं की मग जे जे खेळत होते त्यांना पायाचे अंगठे धरुन शाळा सुटू पर्यंत उभे राहण्याची शिक्षा मिळत असे, मोठी मुले, व्हालीबॉल, फुटबॉल बाहेर रोड वर खेळत व आम्हा लहान मुलांना शाळेच्या आवारातच खेळण्याची परवानगी होती, मुली आपल्या कंचाकैऊडी अथवा लंगडी असले काहीतरी विचित्र खेळत व आमच्या पैकी कोणी तरी मग जी लंगडी घालत असे तिला धक्का देऊन येत असे.

क्रमशः

राहती जागाजीवनमानमौजमजाप्रकटनविचारअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

सोनम's picture

27 Mar 2009 - 2:46 pm | सोनम

राजे तु लेख छान लिहिला आहे.तुझ्या गावाचे दर्शन घडले ह्या लेखातून.

गोट्या खेळताना दंगा जास्त होत असे, अंगठा जमीनीवर टेकवून मधल्या बोटाने समोरची गोटी उडवली की एकदम गलका होत असे
मी ही लहानपणी गोट्या खेळत असे.खूप छान खेळ आहे नाही गोट्या खेळणे. :) :) :)

विनायक पाचलग's picture

27 Mar 2009 - 2:48 pm | विनायक पाचलग

ठिक
लेख जमलाय
अवांतर्-तु काहीही लेही क्रॉस चेक करायला मी इथे बसलोच आहे पेठेतलाच एक पैलवान

स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......

विनायक पाचलग

दशानन's picture

27 Mar 2009 - 2:51 pm | दशानन

>> तु काहीही लेही क्रॉस चेक करायला मी इथे बसलोच आहे पेठेतलाच एक पैलवान

पचंगंगेचे पाणी एवढं पातळ कधी पासून झालं :?

विनायक पाचलग's picture

27 Mar 2009 - 2:55 pm | विनायक पाचलग

तु दिल्लीला गेल्यापासुन
आणि हो
नुसते लिहु नको एकदा ये गावात

स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......

विनायक पाचलग

दशानन's picture

27 Mar 2009 - 3:10 pm | दशानन

ह्म्म !

जरुर.

कुंदन's picture

27 Mar 2009 - 2:54 pm | कुंदन

पैलवान आधी आपला स्वतः चा प्रतिसाद क्रॉस चेक करा ना....

कुंदन's picture

27 Mar 2009 - 2:50 pm | कुंदन

येउ देत अजुन तुझे तालमीतले प्रताप....

निखिल देशपांडे's picture

27 Mar 2009 - 3:18 pm | निखिल देशपांडे

पुढचा भाग लव्कर येउ देत रे.... हा भाग छान जमलाय....

सहज's picture

27 Mar 2009 - 3:49 pm | सहज

राजे पहीला भाग आवडला. छान लिहले आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Mar 2009 - 4:39 pm | परिकथेतील राजकुमार

राजे उत्तमच जमलाय लेख. मध्ये कोल्हापुरला एक वर्ष काढल्याने तुमचा लेख वाचताना तो तो वर्णन केलेला भाग आत्ताच्या नविन रुपात डोळ्यासमोर येत होता.
राजे फक्त ते क्रमशःचे पिल्लु सोडा आता, चार पाच धागे तुमचे असेच क्रमशःचा बिल्ला लावुन अडगळीत पडलेत, ते जरा बाहेर काढा. आधि जुने संपवा आणी मग नविन चालु करा, नाहितर आम्ही रोज तुम्हाला दारुच्या बाटलीचा आणी सिगारेटच्या पाकिटाचा फोटो पाठवुन निषेध व्यक्त करु.

पुणेरी काडी पहिलवान
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

प्राची's picture

27 Mar 2009 - 5:30 pm | प्राची

राजे,
छान लेख जमलाय. =D>
पुढचा भाग लवकर येऊ दे.

अमोल खरे's picture

27 Mar 2009 - 10:23 pm | अमोल खरे

>>>चार पाच धागे तुमचे असेच क्रमशःचा बिल्ला लावुन अडगळीत पडलेत, ते जरा बाहेर काढा.

हिमालय पार्ट-३ पासुन पेंडींग आहेत बरं...........तुमच्या पंख्यांची स्मरणशक्ती बरयापैकी आहे हे लक्षात ठेवा........;)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

28 Mar 2009 - 11:10 am | घाशीराम कोतवाल १.२

हिमालय पार्ट-३ पासुन पेंडींग आहेत बरं...........तुमच्या पंख्यांची स्मरणशक्ती बरयापैकी आहे हे लक्षात ठेवा........

अमोल खरेंशी सहमत राजे अहो कधी पासुन वाट बघतोय पन तुम्ही आम्हाला का तर्सवताय

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

क्रान्ति's picture

27 Mar 2009 - 7:32 pm | क्रान्ति

सहमत. छान लेख आहे.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्राजु's picture

27 Mar 2009 - 7:37 pm | प्राजु

अहो..पाडव्याला रडवताय काय कोल्हापूरच्या आठवणींनी!!!
शिवाजी पेठ... हम्म!!!
चांगलंच चालू आहे. राजे, खासबागेत मिसळ खाल्ली नाहीत का आई-बाबांपासून चोरून कधी?? शाळा जवळच होती ना..
न्यू कॉलेजला असताना आम्ही बहुतेक दर दोन दिवसाआड खाल्ली आहे मिसळ... :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दशानन's picture

28 Mar 2009 - 10:24 am | दशानन

>>>न्यू कॉलेजला असताना आम्ही बहुतेक

न्यू कॉलेज च्या कट्टावर हमखास पडून असू मी आणी मंगेश ;)

कोल्हापुरचा असून खासबागेत तील मिसळ व राजाभाऊची भेळ खाल्ली नाही असा जिवच विरळा, त्याला कोल्हापुरात राहण्याचा मग हक्कच नाही =))

योगी९००'s picture

27 Mar 2009 - 11:09 pm | योगी९००

राजे,

कोल्हापुरच्या फडतरे, चोरघे मिसळी ची आठवण आली. लहानपणी बेलबागेत रहायचो. बर्‍याचदा टाईमपास करायला जयप्रभा स्टूडियोत जायचो.
ते सर्व दिवस आठवले.

पेठेत पण कधीकधी जायचो. पण तेथे गुंड लोकं राहतात असे सारखे वाटायचे. आमच्या ग्रुपमधला एक शाळकरी कायम पेठेतून पोरे आणून मारीन असे धमकवायचा. (ते पण दुसरी/तिसरीत असताना). यामुळेच हा समज झाला होता. तुमचा लेख वाचून आता खात्रीच झाली.

खादाडमाऊ

दशानन's picture

28 Mar 2009 - 2:35 pm | दशानन

काय राव !

पेठे गुंड.. नाय बॉ शोधून पण नाय सापडणार ;)

* पुर्ण महाराष्ट्रात कुठे ही गेले की कोल्हापुरचा आहे हे फक्त बोली वरुन समजतात.... ;)

मदनबाण's picture

28 Mar 2009 - 1:33 am | मदनबाण

चोरगेंच्या मिसळीची आठवण आली...:)

मदनबाण.....

जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
जालावरुन सभार...

विनायक पाचलग's picture

28 Mar 2009 - 4:10 pm | विनायक पाचलग

माझ्या घरी या
खायला घालतो
चोरगे काका शेजारीच राह्तात आमच्या

स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......

विनायक पाचलग