माझी सफर... भाग १

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
25 Mar 2009 - 12:47 pm

ह्याच्या नंतरचे सर्व भाग -
 
माझी सफर... भाग १ माझी सफर - अयोध्या - कानपूर वारी --- भाग -२माझी सफर... हरिद्वार मध्ये - भाग ३ माझी सफर... दिल्ली सफर - भाग ४माझी सफर... मैहरोली ते करोलबाग - भाग ५माझी सफर... कार्य सिध्दी ... भाग - ६माझी सफर... नोकरीपर्व ... भाग - ७माझी सफर... पुन्हा प्रवास ... भाग - ८माझी सफर... निर्णय भाग - ९माझी सफर... माझा स्वयंपाक व विचार चक्र- १०माझी सफर... सत्व-परिक्षा.. भाग - ११माझी सफर.... मैत्री !!! --- भाग - १२मागील भाग भाग - १३मागील भाग....भाग -१४.माझी सफर........परतीचा प्रवास .... भाग-१५माझी सफर........ कोल्हापुर.. भाग-१६मागील भाग -१७मागील भाग - १८माझी सफर .....मनाली ट्रीप ... १९
माझी सफर ..... समाप्ती ... भाग-२०
***********************************************************

घर तर सोडलेच होते, काय करावे काय नको हेच कळत नव्हते, कसा बसा प्रावास करत मुंबई रेल्वे स्टेशन वर पोहचलो, व विचार करत एके जागी बसलो, काहीच कळत नव्हते तेव्हाच अचानक एक १४-१५ वर्षाचा मुलगा चाय चाय असे ओरडत माझ्या समोरुन गेला मी विचार केला अरे यार जगात काही ही काम करुन जगता येते आपण तर थोडेफार शिकलो देखील आहोत काही हरकत नाही करु काही ही काम करु पण घरी परत जायचे नाही हा ठाम निश्चय. हा विचार केल्या वर समोर जाण्यासाठी तयार रेल्वे पाहीली व त्यात जाऊन बसलो ना टिकीट ना टिकीटाची काळजी. ईकडे तीकडे पाहीले जी जागा मिळाली तेथे जाऊन बसलो जरनल चा डबा तो गर्दी खचाखच, रेल्वे सुटली कोठे जात आहे कोठे जाऊन थांबेल काहीच माहीत नाही, जसावेळ गेला तसे ईतरांच्या बोलण्यातून लक्षात आले की ही ट्रेन तर कलकत्ताला चाललेली आहे.
तीन दिवसाच्या थकलेल्या , उपाशी प्रवासानंतर हावडा स्टेशनवर गाडी थांबली... टिकीट कोणी विचारलेच नाही ह्या खुशीत बाहेर पडणार ईतक्यात टिकीट तपासणारा माझ्या समोर
तो . - "टिकीट दिखा"
मी . - " नाही आहे"
तो. - "क्या.. शहर में नया है क्या छोरे.. चल बडे बाबू के पास चल"
मी थोड्या फार गयावया केला माफी मागीतली पण तो बिचारा काय करणार त्याला कळायला हवे ना मी काय बोलतो आहे ते ? ना धड मराठी ना धड हिंदी... चित्रपट पाहून पाहून जेवढे हिंदी येत होते त्यावर त्याचे समाधान झाले नाही... बडे बाबू जवळ गेलो तर तो बिचारा रात्री होणा-या पार्टीची काळजी करत फोन वर बोलणी करत होतो, टिकीट तपासणा-याने माझ्या कडे बोट दाखवले व म्हणाला "टिकीट नही है इस के पास" बाबू ला काय झाले काय माहीत व त्या टिकीट तपासणा-याला बंगाली मध्ये काहीतरी सांगीतले व चक्क मला जाऊ दिले.. मी देवाचे आभार मानले व रेल्वे स्टेशन च्या बाहेर आलो, इकडे तीकडे पाहीले काहीच समजेना नवीन जागा, नवीन शहर, नवीन लोक, नवीन भाषा.. कोणाला विचारावे तर काय विचारावे हा देखील प्रश्न पडला होता, गेट मधून बाहेर आलो ईकडे तीकडे फिरत हुगली नदीच्या फुलावरुन {ब्रीजवरुन} जाताना लक्षात आले की अरे हा तर लोखंडाने तयार केलेला आहे {हाच तो जग प्रसिध्द हावडा ब्रिज}, तेथेच जरा बाजूला बाकड्यावर बसलो व वरुन खाली वाहणा-या पाण्याकडे तर कधी तेथून जाणा-या गाड्याकडे पाहत विचार करु लागलो आपण येथे आलोतर आहोत पण ना कोणी ओळखीचे ना जाणकार ना काही माहीती कसे करावे ? काय करावे ? तो समोरून एक संतांचा दल जाताना दिसला व मी नकळत त्याच्या पाठी मागे चालू लागलो माझ्या सारखे असंख्य लोक त्यांचा पाठीमागे चालले होते त्यात मी एकदम मिसळून गेलो कोणाला काहीच गरज नव्हती की मी कोण , येथे का व ह्या संताच्या मागे कुठे चललो आहे... त्यांना सोडा मलाच खबर नव्हती की मी कुथे चाललो आहे..

ती संतांची टोळी प्रवास करत कलकत्ताच्या बाबू घाटावर विसावली, तेथेच शेकडॊ मंडप लागले होते , असंख्य लोक, साधू महाराज ह्यांचा जमावडा लागलेला होता कोणी मोठमोठ्या आवाजात श्री श्री ह्यांचा विजय घोष करत होता तर कोणी आरती ... मी थोडा विचार केला तर ल़क्षात आले की हा तर एक जत्रेचा प्रकार दिसतो आहे मी इकडे तीकडे पाहत त्या जत्रेमध्ये घुसलो.... एक दोन फलक व बोर्ड लावले होते त्यातून असे लक्षात आले की ही सर्व मंडळी गंगासागर यात्रेसाठी येथे जमली आहेत व येथून गंगासागर -८०-९० किलोमीटर वर आहे तेव्हा हा त्यांचा पडाव आहे, साधू , सन्यांशी व महाराजांच्या तसेच भक्तांच्या जेवणाची सोय देखील अनेक मंडळांनी, संस्थेनी व मोठ मोठ्या कंपन्यानी केलेली होती.
फिरता - फिरता एकदमच एका मांडवाचे नाव वाचून थबकलो "विश्व हिंदू परिषद -कलकत्ता" अरे हे नाव तर कुठेतरी वाचलेले आहे... ह्म्म अरे कोल्हापूर ला नेहरु बागेत सकाळ सकाळी काही मंडळी येत नव्हती का फिरायला त्यातले जगताप काका परिषद वालेच ना... मी सरळ आत गेलो व समोर पांढ-या शुभ्र कपड्यामध्ये बसलेल्या वडिलधारी मानसाला नमस्कार केला व म्हणालो " बाबू जी थॊडा भुकां हूं कुछ काम मीलेगा ? काम के बाद खा ना देना " तो एकदम विचित्र नजरे ने माझ्याकडे पाहू लागला व किंचित सा हसतच बोलला " अरे बेटा, यहा तो सबको खाना बट रहा है जा तु भी खा ले , खाने के बाद मेरे पास आना"

जेवण झाले व मी त्यांच्या जवळ जाऊन आभार प्रकट केले, त्यांनी आपुलकी ने माझी माहीती विचारुन घेतली व एक फोन लावला थोड्यावेळा ने फोन ठेवत म्हणाले "कोई बात नही बेटा, ले फोन , पहले अपने घर फोन करो तथा घरवालोंको बता कि तु ठीक ठाक है तथा यहा विश्व हिंदू परिषद के कार्यालय मै रह रहा है".. मी त्यांना कसेबसे समजावले व म्हणालो जो पर्यंत काही बनत नाही तो पर्यंत घरी फोन नाही करणार. त्यांनी जास्त ओढावे न घेता तो विषय सोडुन दिला व म्हणाले " बेटा, तुम यही रहो हमारे साथ कुछ दिन यह गंगासागर यात्रा खत्म होणे के बाद तुम्हारी व्यवस्था कर देंगे कही ना कही.. मेरा नाम विजय दिवेदी है... तुम मुझे विजय जी कह सकते हो या फिर दिवेदी जी तुम्हारी मर्जी " व हसत आपले काम करु लागले.
तो दिवस होता ३ जानेवारी चा व १४ जानेवारी पर्यंत यात्रा संपणार होती तो पर्यंत मी मनपूर्वक दिवेदी जी सांगतील ते काम करु लागलो त्यांनी थोडे फार प्रयत्न करुन माझ्या साठी एका दुकानातून काही शर्ट व काही कपडे आणले व तेथेच एका बाजूला माडवात माझी राहण्याची व्यवस्था करुन दिली. जेवण देण्याचे व खास खास साधू महाराजांना आवश्य असे फलाहार देण्याचे काम मी पाहू लागलो, पण जे साधू संत माझ्या वाटणीला आले ते नागा साधू { हे प्रचंड कडक पध्दतीने व अवघड अशी तपस्या करतात व हे हिमालयातून फक्त गंगासागर यात्रेसाठी च शहरी वस्तीवर येतात} ह्यांना जास्त काही लागतच नव्हते काही केळी व सफरचंद दिले की माझे काम संपले, तर मग फावल्या वेळेत कुठे पाचजन्य मासीक वाच तर कूठे दिवेदीजीं ना विनंती करुन काही वर्तमानपत्रे वाच हे करु लागलो, माझी वाचण्याची आवड पाहून दिवेदी जी आपल्या ग्रंथ संग्रहातून काही पुस्तके माझ्या हाती दिली त्यातूनच मी विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख करुन घेतली व मला ही ह्यांच्या कार्यामध्ये ओढ वाटू लागली दिवेदी जी च्या जवळ मोकळा वेळ भेटला तर हूगली नदीच्या तीरावर बागेत फिरता फिरता ते मला असंख्य गोष्टी सांगत ज्यामध्ये हेगडेवार जी, सावकर जी व सध्याची देशाची गरज हे विषय प्रमुख असत, मी बोलता बोलता एक दिवस त्यांना एकल विधालया विषयी विचारले व त्यांनी मला त्यावर त्यांच्या कडे उपलब्ध असलेली पुस्तके व कात्रणे वाचण्यासाठी मला दिली.

दिवसामागून दिवस गेले व यात्रा संपली { १४ जानेवारी संक्रातीचा दिवस} गंगासागरच्या तिरावर मी दिवेदी जी जेव्हा शेवटी पोहचलो तेव्हा ते मला म्हणाले "राज बेटा, आज स्नान कर ना यहा, बहोत पुन्य मिलेगा, तुम्हारे सातो जन्म सफल हो जायेंगे, जो कुलपुरुष भगवान द्वार गये है उन्हे भी आज तु नहा कर मुक्ती कर देगा..... सात धाम बार बार गंगासागर जिवन मैं एक बार ... लोग यहा आने के लिये तरसते है मन्नते मांगते है लेकिन तुम भगवान की दया से अपने आप यहां आ गये हो...जा नहा ले " एक दम भारावलेल्या अवस्थेत मी गंगा नदी व सागर ह्यांचे मिलन संगमाला आपल्या डोळ्यात साठवून घेतले व गंगेचे पाणी डोक्यावर घेता ना एकदम स्वर्ग सुखाचा आनंद भेटला, ज्या नदी विषयी शालेय जिवनात, आजीच्या गोष्टीमध्ये, महाभारतामध्ये वाचले त्या नदीचे पाणी आज आपल्या भाग्यामध्ये देखील आहे हा विचार करुन सुखावलो पण पुढील काय माहीत होते की ह्याच नदीच्या सानिध्यात मला माझ्या जिवनातील अत्यंत महत्वाचे वर्ष काढायचे आहे... देवाची करणी कोल्हापूरातील एक गल्ली मधून देखील एकटा कधीच बाहेर न पडलेला मुलगा ईतक्या दुर देशाच्या दुस-या टोकाला येथे गंगासागर पर्यंत पोहचला. शक्यतो दिवेदी जी नी माझ्या मनातील विचार ओळखले व हळुच माझी पाठ थोपटत म्हणाले " बेटा, जिवन तो अभी शुरु होगा तुम्हारा.... चल परसो तुम्हे ... जहा जाना है वहा का नाम सुनते ही तुम्हारे शरीर पे रोंगटे खडे हो जांयेंगे .... पता है तुम्हे कहा जाना है ? तुम परसो की ट्रेन से "अयोध्या" जाओगें वहा तुम्हे श्री राजीव शर्मा मिलेंगे कार्यालय में ठीक है "

१८ जानेवारी ला मी दिवेदींजी च्या परवानगीने कलकत्ता च्या काली मंदीराचे दर्शन घेऊन आलो व संध्याकाळी त्यांचे आशिर्वाद घेऊन कानपुर ला जाणा-या गाडीमध्ये बसलो.... कोल्हापुर ते मुंबई ते कलकत्ता ते फैजाबाद हा माझा सफर .... पण ह्या सफरीने माझा जिवनाला एक वेगळाचा अर्थ प्राप्त करुन दिला. २० तारखेला फैजाबाद रेल्वे स्टेशन वर उतरलो व जवळच असलेल्या अयोध्या नगरी साठी वाटचाल करु लागलो... जेव्हा प्रथम पाय अयोध्येमध्ये ठेवला तेव्हाच दिवेदींचे वाक्य आठवले " शरीर पें रोंगटे खडे हो जायेंगें" व खरोखर अंगावर काटे उभे झाले होते... मी अयोध्या नगरीमध्ये पोहचलो...

क्रमश:

प्रवासदेशांतरसमाजजीवनमानप्रकटनविचारअनुभव

प्रतिक्रिया

दशानन's picture

25 Mar 2009 - 12:55 pm | दशानन

शक्यतो मी नष्ट केल्या मुळे अथवा काही अडचणी मुळे हा भाग मिळत नव्हता पण काही मित्रांनी वारंवार पाठी लागून हा भाग मागितला होता त्यामुळे शोधुन पुन्हा प्रकाशीत करत आहे तसेच ह्याच्या पुढील २-२० भागांचे दुवे पण ह्यातच दिले आहेत.

धन्यवाद.
असाच लोभ राहावा माझ्यावर तुमचा ही देवा चरणी प्रार्थना !

घाशीराम कोतवाल १.२'s picture

25 Mar 2009 - 1:42 pm | घाशीराम कोतवाल १.२

काहि भाग नाहि भेटत ९ १० उघडत नाहित
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

दशानन's picture

25 Mar 2009 - 1:54 pm | दशानन

योग्य ते बदल केले आहेत.
धन्यवाद.

सँडी's picture

25 Mar 2009 - 1:31 pm | सँडी

भारावुन टाकले. सगळे लेख आजच वाचणार...

धन्यवाद राजे!
असेच लिहीत रहा!
शुभेच्छा!

श्रावण मोडक's picture

25 Mar 2009 - 2:59 pm | श्रावण मोडक

राजे, धन्यवाद. कष्ट पडले असतील, क्षमस्व. पण आता सलग वाचता येतील.