खेळ दोन ओळींचा - ४

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
5 Mar 2009 - 3:26 pm

खेळ मागल्यावेळी सारखाच. फक्त यावेळेस दुसरी ओळ दिलेली आहे अन् पहिली जमवायची आहे!

.....
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत.
अट एकच, वर लिहिलेल्या ओळीशी निगडीत अशीच पहिली ओळ असायला हवी!

शुभेच्छा!!
मुमुक्षु

कवितामौजमजाप्रकटनआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

5 Mar 2009 - 3:35 pm | अवलिया

असुनी होकार, ओठात शब्द येत नाही
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

--अवलिया

नीधप's picture

5 Mar 2009 - 3:46 pm | नीधप

कुण्या अस्तुरीची काया उगी हरखून जाई
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

राघव's picture

5 Mar 2009 - 4:02 pm | राघव

वाहवा!!
खूपच छान :)
मुमुक्षु

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Mar 2009 - 4:19 pm | बिपिन कार्यकर्ते

ए१... सुंदर जमलीये ओळ...

बिपिन कार्यकर्ते

नीधप's picture

5 Mar 2009 - 4:21 pm | नीधप

ओहो.. धन्स मुमुक्षु,
धन्स बिका!

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मदनबाण's picture

5 Mar 2009 - 3:46 pm | मदनबाण

सुर कानी पडताच भान हरपुन जाई
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

मदनबाण.....

Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

विसोबा खेचर's picture

5 Mar 2009 - 3:47 pm | विसोबा खेचर

सुंदर धागा..

अभिनंदन मुमुक्षूराव!

तात्या.

राघव's picture

5 Mar 2009 - 4:07 pm | राघव

छान चाललंय!
एक प्रयत्न माझाही -

वेडावते मन, काया थरारून जाई..
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

तात्या, मन:पुर्वक धन्यवाद. :)

मुमुक्षु

दशानन's picture

5 Mar 2009 - 4:18 pm | दशानन

तुझ्या आठवणीने सुगंध बहरला अंगणामध्ये...
मनातील कुपी मध्ये बहरला ... गंध प्रेमाचा
अरे , कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

सहज's picture

5 Mar 2009 - 4:12 pm | सहज

राधा म्हणे पुरे आता, वेळ कसा जाई
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

अवलिया's picture

5 Mar 2009 - 4:23 pm | अवलिया

सहजरावांना वेळ घालवायची चिंता पडली?

--अवलिया

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Mar 2009 - 4:17 pm | बिपिन कार्यकर्ते

उत्तम धागा, मुमुक्षा.... जमतंय का बघतो.

बिपिन कार्यकर्ते

जयवी's picture

5 Mar 2009 - 4:27 pm | जयवी

तुझ्या श्याम रंगी कशी रंगले गं बाई
कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही

घाटावरचे भट's picture

5 Mar 2009 - 4:33 pm | घाटावरचे भट

सांजभूल राधिकेला, व्याकुळल्या गायी
कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही

-घा.भ.

राघव's picture

5 Mar 2009 - 4:35 pm | राघव

खूपच छान! :)

मुमुक्षु

नीधप's picture

5 Mar 2009 - 4:41 pm | नीधप
बिपिन कार्यकर्ते's picture

5 Mar 2009 - 7:39 pm | बिपिन कार्यकर्ते

सुंदर!!!!!!

बिपिन कार्यकर्ते

राघव's picture

5 Mar 2009 - 4:34 pm | राघव

अरे वा.. छान जमलंय..
येऊ देत अजुन! :)

माझा आणखी एक प्रयत्न -

जीवनाची रुक्ष वाट उमलत जाई..
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

मुमुक्षु

विसुनाना's picture

5 Mar 2009 - 4:43 pm | विसुनाना

गोपिकांच्या मनामध्ये येते काहीबाही
कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही

नीधप's picture

5 Mar 2009 - 4:43 pm | नीधप

मनी रूजे सूर, घुमे चांदणे या देही
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

झेल्या's picture

5 Mar 2009 - 4:46 pm | झेल्या

मोरपिसे सूर दिशा-दिशांत भरुन दाही
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

दशानन's picture

5 Mar 2009 - 4:50 pm | दशानन

मोकाट सुटला दाहि दिशेने वारा..
मन मारते उतुंग भारारी आकाशी..
बासरीच्या सुरां बरोबर.. दिशेने दाहि
कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

यशोधरा's picture

5 Mar 2009 - 4:50 pm | यशोधरा

मीही एक प्रयत्न करते..

नादावलेल्या जिवाला नुरे भान काही,
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

राघव's picture

5 Mar 2009 - 4:53 pm | राघव

मस्त..
हाच भाव आणण्यासाठी कधीचा मी प्रयत्न करत होतो.. पण नाही जमले!
मुमुक्षु

नीधप's picture

5 Mar 2009 - 4:57 pm | नीधप
यशोधरा's picture

5 Mar 2009 - 4:55 pm | यशोधरा

धन्यवाद मुमुक्षुजी..

अवलिया's picture

5 Mar 2009 - 4:57 pm | अवलिया

नादखुळी झाली राधा, नुरे भान काही
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

--अवलिया

राघव's picture

5 Mar 2009 - 4:59 pm | राघव

क्लास जमलंय!

मुमुक्षु

जयवी's picture

5 Mar 2009 - 5:16 pm | जयवी

क्या बात है !!

दशानन's picture

5 Mar 2009 - 4:58 pm | दशानन

तळमळतो जिव माझा सुरांमुळे
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

मिंटी's picture

5 Mar 2009 - 5:03 pm | मिंटी

माझाही एक प्रयत्न :

धडधडत्या उराला एक हुरहुर लावी
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

- अमृता अमित

दशानन's picture

5 Mar 2009 - 5:04 pm | दशानन

माझ्या मनात हीच भावना होती पण मला ती शब्दात पकडताच आली नाही त्यामुळे... कुठे दाहि दिशेचा वारा... तळमळ ह्या शब्दात भरकटत राहिलो =))

सुंदर मिंटे

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

सहज's picture

5 Mar 2009 - 5:06 pm | सहज

पेंद्या, राधा दोघांपैकी एकही कटत नाही
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !

यशोधरा's picture

5 Mar 2009 - 5:34 pm | यशोधरा

क्षणी कोण्या झाली राधा सुरांपायी वेडी
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

sanjubaba's picture

5 Mar 2009 - 5:35 pm | sanjubaba

भान सुटे,बंध तुटे मन तुझ्यात गुंतून राही......
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !

ओढ लावी, वेड लावी जीव तळमळत राही......
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !

जाउ कशी, राहू कशी घरी वाट सारे पाही......
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !

बेबन्द होई, बेधुंद होई सुचे न मज काही.......
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !

राघव's picture

5 Mar 2009 - 6:01 pm | राघव

छान..
जाउ कशी, राहू कशी घरी वाट सारे पाही...... ही ओळ सुंदर!
मुमुक्षु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Mar 2009 - 8:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जाउ कशी, राहू कशी घरी वाट सारे पाही......
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !

झेल्या's picture

5 Mar 2009 - 5:36 pm | झेल्या

सूर सृजन अंत जणू काल हा प्रवाही
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

घाटावरचे भट's picture

5 Mar 2009 - 5:54 pm | घाटावरचे भट

अवांतरः - कृष्ण बासरीवर काय वाजवत असेल?

१) बोल राधा बोल
२) काहीतरी मेज्जर क्लासिकल
३) पीलू, खमाजासारखं काहीतरी उपशास्त्रीय
४) की पुलंच्या 'आमची वटवट' मधला कृष्ण वाजवतो तसा सरकारी कानडा?

लिखाळ's picture

5 Mar 2009 - 9:55 pm | लिखाळ

>>अवांतरः - कृष्ण बासरीवर काय वाजवत असेल?<<
हिरो सिनेमातली जॅकी श्रॉफ वाजवतो ती धून !

-- लिखाळ.

चतुरंग's picture

5 Mar 2009 - 10:16 pm | चतुरंग

http://www.youtube.com/watch?v=4dQwkLgkEvw
(सावधगिरीची सूचना - ७.५२ पासून पुढे बघा आधीचा तद्दम हिंदी फिल्मी भाग बघितलात तर धून येईपर्यंत चिडचिड झालेली असेल! ;) )

चतुरंग

लिखाळ's picture

5 Mar 2009 - 10:23 pm | लिखाळ

हीच ती धून.. आहे की नाही भारी :)
-- लिखाळ.

दत्ता काळे's picture

5 Mar 2009 - 5:54 pm | दत्ता काळे

सूर फिरे अंतरात दिशा दाही दाही
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !

जुना बाळकराम

मन बावरे माझे आता आतुर होई
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !

दशानन's picture

5 Mar 2009 - 6:09 pm | दशानन

बासरीचा सुर.. निघतो माझ्या श्वासातून ही
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

घाटावरचे भट's picture

5 Mar 2009 - 6:15 pm | घाटावरचे भट

गात्र वेणु गात्र सूर अधरी तव राही
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही

-घा.भ.

राघव's picture

5 Mar 2009 - 6:28 pm | राघव

माझा आणखी एक प्रयत्न -

ओथंबिले गात्र, जीव कासावीस होई..
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

मुमुक्षु

दशानन's picture

5 Mar 2009 - 6:31 pm | दशानन

तुझ्या बासरीमुळे जडला छंद मला सुरांचा
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

उर्मिला००'s picture

5 Mar 2009 - 6:44 pm | उर्मिला००

:) सूर तो आर्ततेचा मज अंतरंगी न्हेई,
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

मराठमोळा's picture

5 Mar 2009 - 7:03 pm | मराठमोळा

हरपले भान बहरली काया मंत्रमुग्ध मन होई.
अरे कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

मुक्तसुनीत's picture

5 Mar 2009 - 7:11 pm | मुक्तसुनीत

घाटावरचे भट, नीधप , अवलिया , मुमुक्षु , यशोधरा , यांच्या ओळी (आणि सहजरावांचा वात्रटपणा !) झकास ! .... धागा फारच सुरेख !

सूहास's picture

5 Mar 2009 - 7:18 pm | सूहास (not verified)

" जस अ॑ग-अ॑ग पहिल्या सरीने मोहरून जाई"
"अरे कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही""

सुहास..

आता मी "अजुन"काय करू ?

प्राजु's picture

5 Mar 2009 - 8:08 pm | प्राजु

कदंबाची सळसळ माझ्या अंगी भिनून राही
कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही!!

गोकुळाचे भान सारे सूरात न्हाऊन जाई
कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही!!

कालिंदीचे संथ पाणी इथेच थांबून राही
कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही!!

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

राघव's picture

6 Mar 2009 - 11:12 am | राघव

कालिंदीचे संथ पाणी इथेच थांबून राही..
मस्त! मोहक सुरांसाठी जग थांबुन राहतंच! :)
मुमुक्षु

चतुरंग's picture

5 Mar 2009 - 8:17 pm | चतुरंग

नभातून इंद्रधनू धरेवर येई
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

चतुरंग

राघव's picture

6 Mar 2009 - 11:13 am | राघव

नभातून इंद्रधनू धरेवर येई
क्लास! :)
मुमुक्षु

क्रान्ति's picture

5 Mar 2009 - 8:49 pm | क्रान्ति

हिच्यावीण तुला दुजा छन्द कसा नाही?

कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

क्रान्ति

सूहास's picture

5 Mar 2009 - 8:59 pm | सूहास (not verified)

हिच्यावीण तुला दुजा छन्द कसा नाही?

कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

सुहास..

आता मी "अजुन"काय करू ?

नीधप's picture

5 Mar 2009 - 10:34 pm | नीधप

ततकारले पाउल, खाली उमलली भुई
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अवा: तत मधल्या दुसर्‍या त चा पाय मोडायचाय. कसा?

जृंभणश्वान's picture

5 Mar 2009 - 11:26 pm | जृंभणश्वान

वाजवू नकोस, झोपल्यात ना रे गाई,
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

कृष्ण एकदम प्रेमळ देव असल्याने त्याला अशी दटावणी चालेल अशी आशा आहे.

अनामिक's picture

5 Mar 2009 - 11:55 pm | अनामिक

वरच्या बहुतांशी सगळ्यांच्याच ओळी मस्तं जमल्या आहेत.
माझाही एक प्रयत्न...

हृदयातले सुर तुझ्या ओठातून वाही
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

अनामिक

लवंगी's picture

6 Mar 2009 - 6:12 am | लवंगी

वेणूनाद आर्त हाक दशदिशा प्रवाहि
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

स्वप्न-भास रात-दिस भान नुरले काही
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

सँडी's picture

6 Mar 2009 - 7:43 am | सँडी

वाजवू नकोस, झोपल्यात ना रे गाई,
कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!

:) छान!

तत मधल्या दुसर्‍या त चा पाय मोडायचाय. कसा?
तत् (tatt + Backspace )

मनीषा's picture

6 Mar 2009 - 7:49 am | मनीषा

कुजबुजती जन गोकुळी, रीत तीज उमगत नाही
घनश्याम कृष्णाची त्या, राधा अभिसारिका होई |
कशी सांग समजवू त्यांना प्रीतीची ही रीत आगळी
कालींदी तटी रंगल्या, रासरंगांची कहाणी |
नुरले आता माझे काही, चित्ती वसे मूर्त सावळी
यमुनाजळीच्या लाटांसंगे राधा होतसे बावरी |
उमलुनी येते आर्त काही भारलेल्या सुरांमधुनी
धुंद, मधुर त्या लयीमध्ये झुलते मोरपीस बाई |
हळू बोलती काकणे पैंजणांच्या संगे काही
कृष्णा, तुझ्या बासरीला रे बंध कसा नाही |

राघव's picture

6 Mar 2009 - 11:16 am | राघव

छान! मनातला भाव छान उतरलाय!
थोडे आणखी लयीत बसवून नवीन कविता म्हणून प्रकाशित करा की :)
मुमुक्षु

राघव's picture

6 Mar 2009 - 11:22 am | राघव

सगळयांनीच खूप छान लिहिलेत.
विशिष्ट ओळी मागे आपण त्या भावात क्षणमात्र गुंतल्याशिवाय दुसरी ओळ जमत नाही!
कविता अशीच मनापासून स्फुरत असते.. तिला लयीत बसवण्याचे तेवढे छोटे काम आपले!!
खेळात भाग घेतलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार :)
(खेळकर)मुमुक्षु