Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by राघव on गुरुवार, 03/05/2009 - 15:26

Submitted by अवलिया on गुरुवार, 03/05/2009 - 15:35

Permalink

असुनी

असुनी होकार, ओठात शब्द येत नाही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on गुरुवार, 03/05/2009 - 15:46

Permalink

कुण्या

कुण्या अस्तुरीची काया उगी हरखून जाई कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on गुरुवार, 03/05/2009 - 16:02

In reply to कुण्या by नीधप

Permalink

वाहवा!! खूप

वाहवा!! खूपच छान :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 03/05/2009 - 16:19

In reply to कुण्या by नीधप

Permalink

ए१

ए१... सुंदर जमलीये ओळ... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on गुरुवार, 03/05/2009 - 16:21

In reply to ए१ by बिपिन कार्यकर्ते

Permalink

ओहो.. धन्स

ओहो.. धन्स मुमुक्षु, धन्स बिका! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 03/05/2009 - 15:46

Permalink

सुर कानी

सुर कानी पडताच भान हरपुन जाई कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 03/05/2009 - 15:47

Permalink

सुंदर

सुंदर धागा.. अभिनंदन मुमुक्षूराव! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on गुरुवार, 03/05/2009 - 16:07

Permalink

छान

छान चाललंय! एक प्रयत्न माझाही - वेडावते मन, काया थरारून जाई.. कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! तात्या, मन:पुर्वक धन्यवाद. :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on गुरुवार, 03/05/2009 - 16:18

Permalink

तुझ्या

तुझ्या आठवणीने सुगंध बहरला अंगणामध्ये... मनातील कुपी मध्ये बहरला ... गंध प्रेमाचा अरे , कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 03/05/2009 - 16:12

Permalink

अवघड आहे :-(

राधा म्हणे पुरे आता, वेळ कसा जाई कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 03/05/2009 - 16:23

In reply to अवघड आहे :-( by सहज

Permalink

सहजरावांन

सहजरावांना वेळ घालवायची चिंता पडली? --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 03/05/2009 - 16:17

Permalink

उत्तम

उत्तम धागा, मुमुक्षा.... जमतंय का बघतो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on गुरुवार, 03/05/2009 - 16:27

Permalink

माझाही कृष्ण !!

तुझ्या श्याम रंगी कशी रंगले गं बाई कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on गुरुवार, 03/05/2009 - 16:33

Permalink

सांजभूल

सांजभूल राधिकेला, व्याकुळल्या गायी कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही -घा.भ.
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on गुरुवार, 03/05/2009 - 16:35

In reply to सांजभूल by घाटावरचे भट

Permalink

वाह!

खूपच छान! :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on गुरुवार, 03/05/2009 - 16:41

In reply to सांजभूल by घाटावरचे भट

Permalink

वा... -

वा... - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 03/05/2009 - 19:39

In reply to सांजभूल by घाटावरचे भट

Permalink

सुंदर!!!!!! बि

सुंदर!!!!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on गुरुवार, 03/05/2009 - 16:34

Permalink

अरे वा.. छान

अरे वा.. छान जमलंय.. येऊ देत अजुन! :) माझा आणखी एक प्रयत्न - जीवनाची रुक्ष वाट उमलत जाई.. कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! मुमुक्षु
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on गुरुवार, 03/05/2009 - 16:43

Permalink

काहीबाही

गोपिकांच्या मनामध्ये येते काहीबाही कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on गुरुवार, 03/05/2009 - 16:43

Permalink

मनी रूजे

मनी रूजे सूर, घुमे चांदणे या देही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by झेल्या on गुरुवार, 03/05/2009 - 16:46

Permalink

मोरपिसे

मोरपिसे सूर दिशा-दिशांत भरुन दाही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on गुरुवार, 03/05/2009 - 16:50

Permalink

मोकाट

मोकाट सुटला दाहि दिशेने वारा.. मन मारते उतुंग भारारी आकाशी.. बासरीच्या सुरां बरोबर.. दिशेने दाहि कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 03/05/2009 - 16:50

Permalink

मीही एक

मीही एक प्रयत्न करते.. नादावलेल्या जिवाला नुरे भान काही, कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on गुरुवार, 03/05/2009 - 16:53

In reply to मीही एक by यशोधरा

Permalink

सुंदर!

मस्त.. हाच भाव आणण्यासाठी कधीचा मी प्रयत्न करत होतो.. पण नाही जमले! मुमुक्षु
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on गुरुवार, 03/05/2009 - 16:57

In reply to मीही एक by यशोधरा

Permalink

वा!! -

वा!! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 03/05/2009 - 16:55

Permalink

धन्यवाद

धन्यवाद मुमुक्षुजी..
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 03/05/2009 - 16:57

Permalink

नादखुळी

नादखुळी झाली राधा, नुरे भान काही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on गुरुवार, 03/05/2009 - 16:59

In reply to नादखुळी by अवलिया

Permalink

मस्त!

क्लास जमलंय! मुमुक्षु
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on गुरुवार, 03/05/2009 - 17:16

In reply to नादखुळी by अवलिया

Permalink

क्या बात

क्या बात है !!
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on गुरुवार, 03/05/2009 - 16:58

Permalink

तळमळतो जिव

तळमळतो जिव माझा सुरांमुळे कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

Submitted by मिंटी on गुरुवार, 03/05/2009 - 17:03

Permalink

माझाही एक

माझाही एक प्रयत्न : धडधडत्या उराला एक हुरहुर लावी कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! - अमृता अमित
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on गुरुवार, 03/05/2009 - 17:04

In reply to माझाही एक by मिंटी

Permalink

+१

माझ्या मनात हीच भावना होती पण मला ती शब्दात पकडताच आली नाही त्यामुळे... कुठे दाहि दिशेचा वारा... तळमळ ह्या शब्दात भरकटत राहिलो =)) सुंदर मिंटे ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 03/05/2009 - 17:06

Permalink

दुहेरी प्रभाव - गोची

पेंद्या, राधा दोघांपैकी एकही कटत नाही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 03/05/2009 - 17:34

Permalink

क्षणी

क्षणी कोण्या झाली राधा सुरांपायी वेडी कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by sanjubaba on गुरुवार, 03/05/2009 - 17:35

Permalink

माझाही एक प्रयत्न :

भान सुटे,बंध तुटे मन तुझ्यात गुंतून राही...... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही ! ओढ लावी, वेड लावी जीव तळमळत राही...... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही ! जाउ कशी, राहू कशी घरी वाट सारे पाही...... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही ! बेबन्द होई, बेधुंद होई सुचे न मज काही....... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on गुरुवार, 03/05/2009 - 18:01

In reply to माझाही एक प्रयत्न : by sanjubaba

Permalink

छान.. जाउ

छान.. जाउ कशी, राहू कशी घरी वाट सारे पाही...... ही ओळ सुंदर! मुमुक्षु
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 03/05/2009 - 20:56

In reply to माझाही एक प्रयत्न : by sanjubaba

Permalink

किती सुंदर !!!

जाउ कशी, राहू कशी घरी वाट सारे पाही...... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !
  • Log in or register to post comments

Submitted by झेल्या on गुरुवार, 03/05/2009 - 17:36

Permalink

अजून एक प्रयत्नः

सूर सृजन अंत जणू काल हा प्रवाही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही ! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on गुरुवार, 03/05/2009 - 17:54

Permalink

अवांतर

अवांतरः - कृष्ण बासरीवर काय वाजवत असेल? १) बोल राधा बोल २) काहीतरी मेज्जर क्लासिकल ३) पीलू, खमाजासारखं काहीतरी उपशास्त्रीय ४) की पुलंच्या 'आमची वटवट' मधला कृष्ण वाजवतो तसा सरकारी कानडा?
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on गुरुवार, 03/05/2009 - 21:55

In reply to अवांतर by घाटावरचे भट

Permalink

>>अवांतरः -

>>अवांतरः - कृष्ण बासरीवर काय वाजवत असेल?<< हिरो सिनेमातली जॅकी श्रॉफ वाजवतो ती धून ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 03/05/2009 - 22:16

In reply to >>अवांतरः - by लिखाळ

Permalink

ही धून म्हणताहेत लिखाळ!

http://www.youtube.com/watch?v=4dQwkLgkEvw (सावधगिरीची सूचना - ७.५२ पासून पुढे बघा आधीचा तद्दम हिंदी फिल्मी भाग बघितलात तर धून येईपर्यंत चिडचिड झालेली असेल! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on गुरुवार, 03/05/2009 - 22:23

In reply to ही धून म्हणताहेत लिखाळ! by चतुरंग

Permalink

हीच ती धून..

हीच ती धून.. आहे की नाही भारी :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता काळे on गुरुवार, 03/05/2009 - 17:54

Permalink

माझाही एक प्रयत्न.

सूर फिरे अंतरात दिशा दाही दाही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही ! जुना बाळकराम
  • Log in or register to post comments

Submitted by सँडी on गुरुवार, 03/05/2009 - 18:07

Permalink

पहिल्यांदाच प्रयत्न करतोय....चु.भु.दे.घे.

मन बावरे माझे आता आतुर होई कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on गुरुवार, 03/05/2009 - 18:09

Permalink

बासरीचा

बासरीचा सुर.. निघतो माझ्या श्वासातून ही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on गुरुवार, 03/05/2009 - 18:15

Permalink

गात्र वेणु

गात्र वेणु गात्र सूर अधरी तव राही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही -घा.भ.
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on गुरुवार, 03/05/2009 - 18:28

Permalink

छान रंगलाय खेळ!

माझा आणखी एक प्रयत्न - ओथंबिले गात्र, जीव कासावीस होई.. कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! मुमुक्षु
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on गुरुवार, 03/05/2009 - 18:31

In reply to छान रंगलाय खेळ! by राघव

Permalink

तुझ्या

तुझ्या बासरीमुळे जडला छंद मला सुरांचा कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

Submitted by उर्मिला०० on गुरुवार, 03/05/2009 - 18:44

Permalink

सूर तो

:) सूर तो आर्ततेचा मज अंतरंगी न्हेई, कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on गुरुवार, 03/05/2009 - 19:03

Permalink

हरपले

हरपले भान बहरली काया मंत्रमुग्ध मन होई. अरे कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »
  • Log in or register to post comments
  • 10302 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com