परवा संध्याकाळपासून इथे बर्फवृष्टी सुरु होती काल संध्याकाळी संपली! मिसळपावावरही अशीच धमाल हास्यवृष्टी घडवून आणण्यात कमालीचा उ(हु)च्च सहभाग असलेल्या सगळ्या बिनीच्या कलावंतांना ही आरती समर्पित! ;)
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा
आता पुन्हा लवकरी दे असाच मेवा ||धृ||
दे मला काव्य जरा उसने दे रे देवा
मिपाकरी डुबवतात करति तुझा हेवा ||१||
जनातली मनात 'ती', काय करु देवा?
वाचवा हो 'विप्र' मला 'खडू फळा' ठेवा ||२||
खिचडीचा भात जरा करिन म्हणे देवा
पाक वा नापाक कृती असेल तशी खावा ||३||
आवशीचा घो आता 'पुला'खालून केव्हा?
उह अन आह करी 'लिखाळा'चा पावा ||४||
दुर्बीटणे बाईंच्या हो 'पब'मधे जावा
बदकांचा क्वॉक जणु घुमतोया रावा ||५||
'तूच आहेस तो' कविता म्हणे वा वा
बोकडाला समजेना 'पिडा'चा कावा ||६||
टिंग्याचा टिंग टिंग कॉल देतो शेवा
स्टँड अप कॉमेडीचा शीन आवरावा ||७||
खारपाड्या दादूसला गुत्ता कुठे ठावा
दारुच्यारं फुग्यासंगं झोलं घेत जावा ||७||
'पोट' बरं नसल तर हवाबाण खावा
गप पडून रहा की रं अवलिया भावा ||८||
करीन तुझं गुणगान मनातल्या देवा
सादर असे 'रंग्या'ची विडंबनी सेवा ||९||
चतुरंग
प्रतिक्रिया
3 Mar 2009 - 10:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ही तर एका बॉलमधेच शेंचुरी झाली रंगराव!
एक लंबरपेक्षाही उ(हु)च्च .... शून्य लंबरचं विडंबन आहे हे!
=)) =)) =))
हवाबाण हर्डे आणि पोट बिघडण्याचा संबंध लै लै भारी. =)) =))
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
4 Mar 2009 - 12:24 am | संदीप चित्रे
काय रंग्या भौ ... सुटलाच आहेस एकदम :)
3 Mar 2009 - 10:01 pm | लिखाळ
विडंबन सेवा झटपट आणि फर्मास ..
आपल्या प्रतिभेची कमाल आहे. (आपलीही कमाल आहे.) :)
-- लिखाळ.
3 Mar 2009 - 10:02 pm | प्राजु
शॉल्लिट.............!
ठ्ठो ठ्ठो ठ्ठो!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Mar 2009 - 10:24 pm | टुकुल
हसुन हसुन मरायची वेळ आली आहे !!!
दुर्बीटणे बाईंच्या हो 'पब'मधे जावा
बदकांचा क्वॉक जणु घुमतोया रावा ||५||
जबरा !!! क्वॉक क्वॉक क्वॉक :D
'पोट' बरं नसल तर हवाबाण खावा
गप पडून रहा की रं अवलिया भावा ||८||
=)) =))
3 Mar 2009 - 10:09 pm | अवलिया
ठ्ठो ठ्ठो ठ्ठो!!!
=)) =))
झक्कास!!!!
अवांतर - हवाबाण नीट लक्षात ठेवले आहे. तेव्हा बाण वर्मी तर नव्हता लागला ना ? :?
--अवलिया
3 Mar 2009 - 10:09 pm | प्रमोद देव
रंगाखूश!!!!!!
3 Mar 2009 - 10:25 pm | ब्रिटिश टिंग्या
अदिती म्हणते तसं एक लंबरपेक्षाही उ(हु)च्च विडंबन आहे हे! :)
इनफॅक्ट, आंतरजालावरील वातावरण हसते-खेळते ठेवण्यासाठी साक्षात बाप्पा गणेशाला अवतार घ्यावा लागला ;)
3 Mar 2009 - 10:48 pm | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =))
शब्दात प्रतिक्रिया देणे शक्य नाही!!! शब्द बापुडे केवळ वारा अशी अवस्था आहे... (हवाबाण हर्डे आहेच... ;) )
बिपिन कार्यकर्ते
4 Mar 2009 - 8:31 am | शितल
=)) =)) =))
3 Mar 2009 - 10:54 pm | लंबूटांग
=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))
मेलो हसून हसून
3 Mar 2009 - 11:01 pm | शाल्मली
१ नंबर!!
कमाल आहे तुमची!!!
झकास!
--शाल्मली.
3 Mar 2009 - 11:26 pm | गणपा
रंगाशेठ केवळ अफलातुन...
गेले ३ दिवस मिपावर हास्याच्या एका वर एक सुनामी येउन आदळतायत.
--गण्या.
4 Mar 2009 - 12:28 am | विसोबा खेचर
रंगा, फक्कड कविता रे! :)
तात्या.
4 Mar 2009 - 10:11 am | सहज
हुच्च!!!
:-)
4 Mar 2009 - 10:15 am | अनिल हटेला
:-D
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
4 Mar 2009 - 10:35 am | झेल्या
सुपर डुपर बंपर... :)
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
4 Mar 2009 - 10:19 am | मिंटी
=)) =)) =)) =)) =))
आत्ता हापिसात आले आणि आल्या आल्या तुमचं विडंबन वाचलं.... जबराट..... खुप हसले.....आजचा दिवस चांगलाच जाणार...... :)
4 Mar 2009 - 10:36 am | मृगनयनी
मिन्टीशी सहमत!
जय (बाल) गणेश!
=)) =)) =)) =))
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
4 Mar 2009 - 10:33 am | वेताळ
झक्कास.....खुपच हसलो आज...लय झ्याक.....
वेताळ
4 Mar 2009 - 10:34 am | दशानन
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
4 Mar 2009 - 10:42 am | नरेश_
सही सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
4 Mar 2009 - 11:18 am | जागु
माझ्या खिचडी भाताला नावे ठेवतोस ?~X( आज तुला जेवायलाच मिळणार नाही जा. हु... :<
लय भारी विडंबन.
4 Mar 2009 - 11:24 am | विनायक प्रभू
आणि पोटाच्चे स्नायु जायबंदी.
कशाला वांदे करता हो रंगा शेठ.
4 Mar 2009 - 11:29 am | परिकथेतील राजकुमार
लैच बेक्कार शॉट ! मजा आला.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
4 Mar 2009 - 11:50 am | नीधप
लय भारी...
येक इनंती.. विडंबन करताना वरिज्नल ची लिंक देऊन ठेवा हो निदान कशावरून ही प्रतिभा ओसंडते ते तरी कळेल...
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
5 Mar 2009 - 6:24 pm | चतुरंग
(बडवे) चतुरंग
5 Mar 2009 - 8:19 pm | सूहास (not verified)
सुहास..
आता मी "अजुन"काय करू ?