मनाच्या कुपीतले या सदरातला हा माझा नववा लेख
स्पष्टीकरण-या सदरातला मुळ लेख कालच प्रसिद्ध झालेला होता ,मात्र आम्ही काही कारणामुळे हा लेख येथुन उडवत आहे.
आपणास तो लेख वाचावयाचा असल्यास आपण तो इथे वाचु शकता.
http://batmidar1.blogspot.com/2009/02/blog-post_25.html
तर दोस्तानो हा माझा नवीन लेख.
हा लेख लिहिण्यासाठी आम्ही जुना लेख उडवला अयचे कारण म्हणजे आम्ही स्वतवर घातलेले आठवड्याला एका लेखाचे बंधन बकी काहीही नाही.
तर आवडले तर सांगा आणि नाही आवडले तर फाट्यावर मारण्यास विसरु नका
आनंद
तर दोस्तानो, कालचीच गोष्ट , काल संध्याकाळी दैव योगाने मला एक शास्त्रज्ञ लेखकाना म्हणजेच मोहन आपटे याना भेटायची संधी मिळाली,जवळ जवळ अर्धा पावुण तास आम्ही दोघे तीघेच लोक होतो त्यामुळे मनसोक्त गप्पा मारायची संधी मिळाली.खरेतर ती संपुर्ण चर्चा खगोलशास्त्रावरच होती पण तो एक तास म्हणजे माझ्या जीवनातील काही सर्वोत्तम तासांपैकी एक असे म्हणावे लागेल. खरेच या माणसाबद्दल काय सांगावे.प्रचंड बुद्धीमत्ता ,अफाट वाचन आणि त्यामुळेच कलीयुगाची सुरवात ते आत्ताची सॉफ्टवेअर्स यापर्यंत झालेली चर्चा ,क्षणाक्षणाला बदलणारे विषय आणि प्रत्येक मुद्द्यावर त्यांचे तेवढेच अभ्यासपुर्ण भाष्य,वय ,अनुभव आणि पात्रता यांचा विचार न करता माझ्याशी मोकळेपणाने केलेली चर्चा.शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग ,त्यांचे विवेचन आणि त्या ६ प्रसंगात असणारी समान खगोलशास्त्रीय स्थिती हे सोप्या शब्दात समजावणे ,हे सांगताना विविध पुस्तकांचा ,व्यक्तींचा होणारा उल्लेख, प्रत्येकाचे कार्य ,मी (विनायक पाचलग)लोकसत्तातील लेख वाचतो म्हणल्यावर लिखाणावर चर्चा॑,मनाच्या कुपीतले या सदराबाबत सांगीतल्यावर नक्की पाहीन हे आश्वासन आणि आम्ही संगणक तत्पर असतो हे सांगीतल्यावर स्कायमॅप प्रो या उत्तम प्रणालीबद्दल त्यानी दीलेली माहिती आणि माझ्या एका न एका प्रश्नाला त्यानी दीलेले तेवढेच उत्तम उत्तर यामुळे तो १ तास कसा गेला ते कळलेच नाही आल्यावर ते काय काय बोलले ते शब्द आठवायचा२ तास केलेला प्रयत्न माझ्यासाठी हा संपुर्ण वेगळा अनुभव होता .बरोबर १.२५ वर्शापुर्वी त्यांचे शाळेतील व्याख्यान हुकले म्हणुन मी प्रचंद हीरमुसलेलो होतो आणि आज मात्र त्यांच्याशी एकटेच १ तास बोलत होतो .ज्यांच्या पुस्तकातुन आम्हाला पहिल्यांदा अवकाश म्हणजे काय ते समजले त्यानीच मला " मला उत्तर हवे आहे "या पुस्तकाची नवी प्रत स्वत दाखवली ,त्यानी दाखवलेला स्लाइड शो मी थोडाफार मिळवला होता पण आज तेच त्याबद्दल सांगत होते.खरच आनंद आनंद म्हणजे काय याची अनुभुती मला काल आली
पण जेव्हा मन शांत झाले तेव्हा डोक्यात काही वेगळेच यायला लागले पहिली गोष्ट आली ती म्हणजे की .अरे एवढा आनंद आपण मिळवला त्यासाठी आपणाला एक पैसाही खरच करावा लागला नाही हे आपले भाग्य म्हणायचे नाहीतर काय आणि इथेच संदीपचे बोल आठवले
"की खरीखरी सुखे राजा मिळती फुकट.........."
.खरेतर एखादी व्यक्ती ,तीचे विचार याबद्दल मत मतांतरे असतीलच की मी ज्याना मोठे मानतो त्यांच्याबद्दल इतरांची भिन्न मते असतीलही पण ज्याना आपण फक्त पाहण्याची इच्छा केली ती व्यक्ती आज प्रत्यक्ष भेटते तो माझ्याद्रुष्टीने नक्कीच अतीव आनंदाचा क्षण होता.असे अनेक विचार इथे मिपावर खरडाखरदी करताना डोक्यात भुंग्या सारखे येत होते
आणि इथेच डोक्यात विचार चक्र चालु झाले कीकी होय हाच खरा आनंद,जो आनंद मिळवण्यासाठी आपण आयुश्य घालवतो त्यातलाच हा काही हीस्सा .आपण जरी मोठे नसलो आपली जरी लायकी नसली तरी मोठ्या व्यक्तीना पाहणे ,त्यांची ओजस्वी वाणी ऐकणे (ऐकायला मिळणे.) त्यांचा प्रचंड अभ्यास ,प्रचंद यशानंतर जमीनी वर असणारे पाय पाहणे त्यातुन शिकणे हा मानसीक आनंदच नाही का!,खरेतर जगण्याचे प्रत्येकाचे ध्येय वेगळे असते पण माझ्याबाबत म्हणाल तर जीवनात आल्यावर हा असा आनंद मिळाला म्हणजे खरे जीवनाचे सार्थक झाले . मग आमचे आम्ही आनंद म्हण्जए काय याचा शोध मनात सुरु केला आणि तेव्हा लक्षात आले कीएखाद्या परिक्षेत यश मिळवणे हा खरा आनंद नाही. तो आनंद आहे पन तो सर्व समावेशक नाही ,तिथे राजकरण असते, भविश्याची चिंता असते.खरा आनंद असा की जीथे आपले चित्त तल्लीन होते आपण आपल्या चिंता विसरतो थोडक्यात आपल्या आत्म्याला समाधान लाभते.बेभान होवुन आपल्या फूट्बॉल संघाची मॅच पाहणे ,किंवा त्यात खेळताना गोल करणे हा खरा आनंद्,एखादा लेख लिहिल्यावर तो स्वतःलाच आवडणे हा खरा आनंद,एखादे लिखाण वाचुन जेव्हा ८० वर्शाची व्यक्ती घरी येते कोणतीही ओळख नसताना तिच्या शाळेतल्या आठवणी सांगते हा खरा आनंद ,एखाद्या शांत वेळी एकटेच कोणत्याही चिंतेशिवाय मंद गाणी ऐकणे आणि मनाचा शोध घेणे हा खरा आनंद्,सकाळी सकाळी लोकसत्तातले २ फुल एक हाफ वाचल्यावर मनापासुन हसणे हाच खरा आनंद ,कींवा एखादा मित्र जवळ जवळ १० वर्षानी आपणाला भेतल्यावर आपळ्याला ओळखतो आणि आपण गप्पंचा फड जमवतो तो खरा आनंद कींवा एखद्द्या दीवशी आपल्या आवडत्या हॉटेलात जावुन पाहिज ए ते पहिजे तेवढे खाणे हा खरा आनंद्,किंवा एखादे नाटक बिनधास्त पणे पाहणे हा खरा आनंद किंवा जेव्हा एखादी मैफल वा एखादा प्रसंग झाल्यावर आपले हात जेव्हा आपोआपच एकमेकावर पडतात तेव्हा वाजणार्या टाळया ,हा एक श्रोता म्हणुन आपल्याला मिळणारा सर्वोत्क्रुष्ट आनंद ,आणि आपण जरकलाकार वगैरे असु तर एक उत्तम कलाकृ ती केल्यावर जेव्हा स्वत;लाच समाधान वाटते तोच आपला खरा आनंद .शिवाजीराव सावंतसासारख्या लोकांचे भाशण बेभान होवुन ऐकणे हा एका श्रोत्याचा आनंद आणि महत्वाचे म्हणजे भावनेने जोडलेली माणसे जेव्हा हक्काने आपल्याला चांगल्या वा वाइट प्रसंगात बोलावतात तो सामान्य माणसाचा खरा आनंद ठेवण्याजोगा,जस जसा मी विचार करायला लागलो तस तसे मला अशा अनेक गोश्टी आठवत गेल्या की जेथे आपणाला खरा आनंद सापडतो आनंदाचे गाव म्हणजे काय ते समजते.
आणि महत्वाचे म्हणजे जेव्हा मी नीट विचार केला तेव्हा मला समजते की या आनंदासाठी आपणास ना पैशाची गरज असते ना सुख सम्रुद्धीची ,जरा रसीकता ठेवली आणि आपल्या शरीरातील इंद्रीयाना आणि या जगात विशेशतः मनाला जीवंत ठेवले की ह्या अनमोल ठेवी आपणाला सहज मिळत जातात्.आणि खरे सांगु की खरे जीवनाचे यश त्यातच आहे.कोणीतरी म्हटले आहे ना की कागदाला अहंकार लागला की त्याचे सर्टीफीक्ट होते ,यार क्या बोला है आणि म्हणुनच यश आपयश ही त्यानंतरची गोष्ट कारण अपयशानंतर यश मिळतेच व यश मिळवल्याक्ष्णी पुढे यश मिळेल का याची चिंता तयर होते .
आणखीन महत्वाचे म्हणजे हे क्षण (यशाचे)आपण स्वतः मिळवु शकतो पण असा आनंद आपण रोज मिळवु शकत नाही किंवा खुप प्रयत्न केला म्हणून मिळेलचे याची खात्री नाही
आर्या आंबेकरच गाणे आपण दर सोमवारी ऐकतो(ऐकायचो)पण जावु द्या सोडा वेगलेच फील देते ,लेख दर आठवड्याला येतात पण एखादाच मनाला भिडतो.पंडीतजींचा लागलेला स्वर काही दररोज ऐकायचे भाग्य मिळत नाही स्वताहुन काही नवीन दररोज सुचत नाही .जेव्हा दैव आणि इच्छा आणि प्रयत्न एकत्र येतात तेव्हा अवचीत काही चांगले मिळुन जाते आणि ती भट्टी जमते कारण प्रचारसभेला आणलेल्या माणसांसारखे ते उसने नसते ते उत्स्फुर्त असते ,ही उत्स्फुर्तता तो आनंद देवुन जाते कायमचा...
आणि हो या आनंदाला महत्व काहे कारण तो रोज रोज मिळत नाही.मिपावर रोज जाणारा दीवसही दररोजच वेगळ काही देतो नाही.आणि आपण रोज पाट्या टाकतोच की आणि मी देखील त्याच त्याच रुटीनमध्ये अभ्यास अभ्यास चालु ठेवतोच की .पण असे क्षण येतात आणि जगायला स्फुर्ती देतात, जगणे सोपे करतात म्हणुन त्या क्षणाना सलाम आणि ते घडवुन आणणार्या काळाला मनापासुन प्रणाम्.आणि मग आपण पामराने फक्त प्रत्येकाच्या आयुश्यात असे काही क्षण येवोत व त्याचे जीवन सफल होवो अशी प्रार्थना करायची
असो आता टाइपणे थांबवतो कारण आता आनंदाला थांबवतो कारण प्रथेप्रमाणे तो तुम्हाला सांगुन झाला आहेच आणि मलादेखील नेहमीच्या राम रगाड्याला लागले पाहिजे कारण पुन्हा एकदा ते आनंदाचे गाव कधी लागते त्याची वाट पहायची आहे ना असो शेवटी फक्त परवाच्या एका आनंदाच्या क्षणी गाडगीळांचे एक वाक्य ऐकले ते देतो
शब्द समजुन घ्या
शब्द उमजुन द्या
आणि कधीकधी योग्यवेली निशब्दालाही मान द्या
आणि म्हणूनच थांबतो
बाकी आम्ही काल आनंदी होतो आता तुम्ही व्हा आणि शक्य असल्यास तुमची आनंदाची व्याख्या ,अनुभव जरुर सांगा
असो
चुक भुल समजुन घ्यालच
विनायक
आणि हो
जागतीक मराठी दिनाच्या तुम्हा सर्वाना मनापासुन शुभेच्छा
प्रतिक्रिया
27 Feb 2009 - 10:06 pm | मनिष
विनायक, इथे शुद्धलेखनाचा बडेजाव्/ससेमिरा अजिबात नाही, मी पण ते फार मनावर घेत नाही. हवे तर, हवे तितके इंग्लिश शब्द बिनदिक्क्त वापरावे, पण 'मराठी दिन' असतो रे.....आपल्या माय-मराठीला इतकी दीन नका बनवू! निदान आजच्या दिवशीतरी, मराठी दिनाच्या शुभेच्छा देतांना तरी!!! :)
- मनिष
अवांतर - लेखाचा एकून गोषवारा पटला.
27 Feb 2009 - 10:32 pm | सखाराम_गटणे™
मस्त लेख. आजचा मराठी दिनाला काही तरी वाचल्याचा आंनद झाला.
>>चुक भुल समजुन घ्यालच
होय.
हा लेख लिहिण्यासाठी आम्ही जुना लेख उडवला अयचे कारण म्हणजे आम्ही स्वतवर घातलेले आठवड्याला एका लेखाचे बंधन बकी काहीही नाही.
तर आवडले तर सांगा आणि नाही आवडले तर फाट्यावर मारण्यास विसरु नका
खुल्ली ऑफर
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
27 Feb 2009 - 10:51 pm | चतुरंग
चांगले लिहिले आहेस. मोहन आपट्यांची भेट घडल्यानंतरच्या भारावलेल्या अवस्थेतले हे लिखाण वाटते आहे.
असंख्य विचारांच्या कल्लोळात शब्द घरंगळत सुटल्यासारखे वाटले.
बरोबर १.२५ वर्शापुर्वी त्यांचे शाळेतील व्याख्यान हुकले म्हणुन मी प्रचंद हीरमुसलेलो होतो
सव्वा वर्षांपूर्वी असे न लिहिता १.२५ असे लिहिलेले वाचून करमणूक झाली. कदाचित खगोलशास्त्रज्ञाला भेटल्याचा परिणाम असावा!;)
(आधी मी १.२५ प्रकाशवर्ष असं वाचलं! ;) (ह.घे.))
चतुरंग
27 Feb 2009 - 10:57 pm | सखाराम_गटणे™
>>(आधी मी १.२५ प्रकाशवर्ष असं वाचलं! Wink (ह.घे.))
चालायचेच जग जवळ येत चालले आहे.
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
28 Feb 2009 - 7:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
रंगाकाका, प्रकाशवर्ष हे अंतराचं एकक आहे. ;-)
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
28 Feb 2009 - 8:24 am | अवलिया
चांगले लिहिले आहेस. मोहन आपट्यांची भेट घडल्यानंतरच्या भारावलेल्या अवस्थेतले हे लिखाण वाटते आहे.
असंख्य विचारांच्या कल्लोळात शब्द घरंगळत सुटल्यासारखे वाटले.
+१ सहमत.
पु ले शु :)
अवांतर - विनायका तुला दिलेला सल्ला आचरणात आणत आहेस ना?
--अवलिया
28 Feb 2009 - 9:40 am | स्वानन्द
चांगली तयारीची बैठक दिसते भाऊ तुझी. एवढा मोठा लेख लिहिलास ते! मला अजून तरी असं एका बैठकीत लिहायला जमत नाही रे!!
>>परिक्षेत यश मिळवणे हा खरा आनंद नाही
हे काही पटलं नाही भाऊ. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन, त्यासाठी लागेल तेवढी मेहनत घेऊन जेव्हा आपण आपलं ध्येय गाठतो तेव्हा झालेला आनन्द कोणत्या शब्दात व्यक्त करता येऊ शकेल? तेव्हा हाही आनन्द तितकाच 'मनापासून' झालेला नाही का जितका नाटक बघताना, मित्रांशी गप्पा मारताना, किंवा आपली कला मनापासून सादर करताना होतो?
पुढच्या लेखासाठी शुभेच्छा!
अवांतर : Pesuit ofHappiness पाहिला आहेस का?
--स्वानन्द
28 Feb 2009 - 10:01 am | वेताळ
आर्या आंबेकरच गाणे आपण दर सोमवारी ऐकतो(ऐकायचो)पण जावु द्या सोडा वेगलेच फील देते ,
म्हनजे काय समजलो नाही. ;;)
नाना तुमचा सल्ला विनायकाला कोल्हापुरात उपयोगी नाही पडायचा. इथे ज्यादातर कॉलेज मध्ये मारामारी त्याच प्रकरणा वरुन होत असतात. तुमचा सल्ला मानला तर विनायकाला नवीन लेखनमाला सुरु करावी लागेल. "मनाच्या कुपीतले...माझे दवाखान्यातले दिवस" :D
वेताळ
28 Feb 2009 - 10:38 am | विनायक पाचलग
वेताळ बा लै भारी
त्यामुळे आइचान असले उद्योग करणे अवघड आहे हो आपल्या गावात
आमच्या दोघा तिघा दोस्तांचा अनुभव लय सोल्लेड आहे
खरे तर आम्हाला पेठेतले फुल प्रोटेक्शन आहे पण विशाची चव घ्यायची होउस कोणाला आहे
बाकी लेख त्या ट्रांस मधलाच आहे
आमचा ट्रांस त्यावेळी आदीतीताइना खरदीवर खरडी लिहुन व्यक्त झाला होताच
असो तुम्हाला आवडले हेच आम्चे समाधान
छानसे वाचलेले
विनायक पाचलग
3 Mar 2009 - 12:12 am | आंबोळी
सोडा वेगलेच फील देते
हे बाकी खरे गड्या... पाण्या बरोबर किंवा ऑन दी रॉक्सची मजा न्यारी पण सोडा वेगळेच फील देते....
बाय द वे. अकरावीत ... वयाच्या १६-१७ व्या वर्षी असल्या सवयी बर्या नव्हेत हो.
आंबोळी
3 Mar 2009 - 2:05 am | शरदिनी
लेकह मनापासून लिहिलेला आहे..आवड्ला
3 Mar 2009 - 10:35 pm | विनायक पाचलग
आमच्या लेखाला प्रतिक्रिया देणार्यांचे आभार
बाकी कधी कधी आम्हीदेखील मुद्दाम वाक्ये तोडून वाचतो
असो
सोडा वेगलेच फील देते
ही मिपाची शिकवण असे समजा
बाकी आम्ही सध्या अभ्यासात आणि www.marathikatta.tk यात बझी आहोत
छानसे वाचलेले
विनायक पाचलग
3 Mar 2009 - 10:52 pm | लिखाळ
लेख एकदम आनंदाच्या भरात लिहिलेला दिसतो :)
लेखातला जो मोठ्ठा परिच्छेद आहे, आनंद यात आहे..त्यात आहे.. तो मला फारसा गरजेचा वाटला नाही.. राग मानू नको..जे खरंच वाटले ते लिहितो.
लेख लिहून झाला की प्रकाशित करण्याआधी थोडावेळ जाउ दिला तर भावनांचा आवेग ओसरतो आणि मग शांतपणे वाचून पाहिला की टंकलेखनातल्या चुका, राहून गेलेली विरामचिन्हे, भावनांची पुनरावृत्ती यामध्ये सुधारणा करता येतात आणि लेख जास्त थेट, वाचनीय आणि परिणामकारक होतो असे मला वाटते.
पुलेशु
-- लिखाळ.
3 Mar 2009 - 11:54 pm | आंबोळी
जरा रसीकता ठेवली आणि आपल्या शरीरातील इंद्रीयाना आणि या जगात विशेशतः मनाला जीवंत ठेवले की ह्या अनमोल ठेवी आपणाला सहज मिळत जातात्.आणि खरे सांगु की खरे जीवनाचे यश त्यातच आहे.
अहो थोर महापुरुष, साधुसंत सांगून गेले की इंद्रीय सुखात अडकू नका मोक्ष हेच अंतिम धेय.... आणि तुम्ही हे काय सांगताय? रसिकता ठेवा, इंद्रीयाना जिवंत ठेवा.... आणि हे कशात तर मोहन आपटे ना भेटून आलात त्या भेटीच्या वर्णनात.....छ्या! आपटेना काय वाटेल?
बाकी हे तुमच्या पौगंडसुलभ वयाला साजेसेच आहे... असो.
पुलेशु.
आंबोळी
4 Mar 2009 - 1:50 pm | विसोबा खेचर
मनापासून लिहिलेला लेख अतिशय आवडला..
जियो..!
तात्या.
4 Mar 2009 - 2:04 pm | विसोबा खेचर
पाचलगसाहेब,
आपली वैयक्तिक प्रतिक्रिया काय ते माहीत नाही परंतु आपल्या या लेखाचं मिपावरच अत्यंत हीन व हिडीस दर्जाचं विडंबन यावं याबद्दल मिपाचा मालक या नात्याने मी वैयक्तिक रित्या आपली मनापासून क्षमा मागतो आहे.
आपण मिपावर लिहिणे सुरूच ठेवावे ही कळकळीची विनंती...
आपलाच,
तात्या.
4 Mar 2009 - 3:57 pm | महेश हतोळकर
आजून लिहीत रहा!