वहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
26 Feb 2009 - 8:44 am

वहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां

दम ले ले घड़ी भर ये छैंया पाएगा कहां

बीत गये दिन, प्‍यार के पल छिन

सपना बनी वो रातें

भूल गये वो, तू भी भुला दे

प्‍यार की वो मुलाक़ातें

सब दूर अंधेरा, मुसाफिर जाएगा कहां ।।

कोई भी तेरी राह ना देखे, नैन बिछाए ना कोई

दर्द से तेरे कोई ना तड़पा, आंख किसी की ना रोई

कहे किसको तू मेरा, मुसाफिर जाएगा कहां ।।

कहते हैं ज्ञानी, दुनिया है फ़ानी

पानी में लिखी कहानी

है सबकी देखी, है सबकी जानी

हाथ किसी के ना आई,

कुछ तेरा ना मेरा, मुसाफिर जायेगा कहां ।।

दम ले ले घड़ी भर ये छैंया पायेगा कहां ।।

गाईड मधिल एक माझं आवड्तं गाणं मी एकत आपल्या संगणकावर खेळत होतो...
आज तीला जाऊन काही वर्षे झाली... व आजच अनिल ने वळण.. ही कथा लिहली... ! ह्या दर्द पेक्षा अजून काय मोठा दर्द हवा जिवनामध्ये... हा डोक्यात विचार चालू होताच तोच काही तरी डोक्यात आलं व लिहायला बसलो.. नाय घाबरु नका प्रेमभंगावर नाही लिहतो आहे ;) पण प्रेमावर जरुर लिहतो आहे... सांगावं लागत आहे हो... मी जरी संगणक / नेटवर्कींग / शेयर मार्केट बद्दल जरी लिहले तरी लोकांना वाटतं की त्यात पण प्रेमभंगावरची कथा असू शकेल =)) पण आज तुम्हाला पिडायचा प्लान नाही आहे.. आज माफ केला....;) काही प्रश्न पडले मनाला त्यांचे उत्तर शोधत शोधत मनामध्ये काही विचार उमलले तेच लिहतो आहे.. !

अनेक कवी / लेखक / कथा / चित्रपट आम्हाला जवानीच्या उंभरठ्यापासून हेच सांगून गेले की प्रेम फक्त एकदाचं होतं.. ! पहिलं प्रेम ते प्रेम बाकी.. ? हा प्रश्न डोक्यात आला व मी जरा गोंधळलो.. माझे पहीले प्रेम काय होतं ? त्याकाळी मला कोण तरी दुसरीच आवडत होती... ते माझं प्रेम होतं.. पण प्रेमाचं वय नव्हत.. त्यावेळी मी शाळेत होतो ;) .. त्यानंतर ही प्रेम झालं.. त्यावेळी मी दहावी मध्ये होते... ;) तीन एक आठवडे प्रेमप्रकरण चालवलं.. पण मी शाळा सोडली व तीने मला... त्यानंतर ची सर्व कहानी मिपावर आहेच... ! मग हे काय सगळे माझे मुखवटे होते ? नाही यार.. बॉस ! प्रेम लाईफ मध्ये एकदाचं होतं असे नाही.... प्रेम एक अशी भावना आहे की... ज्यामध्ये तुम्ही कुणावर प्रेम करता आहात.. हे जरुरी नाही पण कोण तुमच्यावर जिवापाड प्रेम करत आहे.. कोण तुम्हाला ह्दयाच्या एका कोप-यातून साद देत आहे.... हे समजणे जरुरी आहे.. !

कोणी तरी हळूवार पणे तुमच्या जिवनामध्ये प्रवेश करतो... तुमच्या आवडी निवडी.. तुमचं जगणं.. हसणं .. रडणे.. बिझी असने... रागावणॆ... दुर जाणे.. जवळ येणे.. तुमचा विचित्र स्वभाव... स्वत:च संभाळणे... दुख: मध्ये पण हसणे... कळत नकळत स्वत:ला हरवणं... हे कोणी तरी पाहत असतं ! कोणी तरी चुकुन का होईना तुमच्या कडू आठवणी व तुमच्या मध्ये आलेली / आलेला असतो / असते ... त्यावेळी काय करावं हेच आपल्याला कळत नाही व आपण नकळत त्या प्रेमापासून दुर जाण्याचा प्रयत्न करतो... मग त्यासाठी आपण खुप बचकानी कारणे देतो.. मी असा आहे ..ती अशी आहे... मी एवढा शिकलेला आहे.. ती एवढी शिकलेली आहे.. मी ह्या लेव्हलला आहे ती त्या लेव्हलला आहे.. मी असा आहे ती अशी आहे... तीच्या बरोबर स्वत:लाच कळत नकळत कंपेयर करतो व आपण त्या नात्यापासून दुर जाण्याचा प्रयत्न करतो.. स्वत:ला एका कोषामध्ये गुरफटून घेण्याचा प्रयत्न करतो... व अचानक आपण एक स्वत:ला कुठल्यातरी गोष्टी मध्ये रमवून घेण्याचा प्रयत्न करु लागतो... सुखाचे पल असेच स्वत: आपल्या जवळ आले असताना आपण पळून जाण्याचा प्रयत्न करतो.. व त्या मागे आपल्याकडे कारणे देखील सशक्त असतात.. असं आपल्याला वाटतं.. पण खरं तर ती कारणे एकदम पोकळ असतात हे आपल्या मनाला पण माहीत असतंच !

आपण आपल्या मनाला जुन्या गोष्टी मध्येच रमण्याचा प्रयत्न करतो... आपण स्वत:च आपल्या जुन्या जखमा रोज ओरबडून काढतो... जर ते जमले नाही तर.. कुठतरी कुठल्यातरी गोष्टीचा संदर्भ आपल्या दुख:शी लावतो.. व जे जवळ आहेत ते थोडेफार किमती अश्रु जो आपल्या जवळच नाही त्याच्यासाठी व्यर्थ करतो.. ते जमले नाही तर मग कुठे... व्यसनामध्ये.. स्वत:ला परत गुरफटून घेतो व म्हणतो... माझं दुख: कुणाला कळणार.... अरे मुर्खा ! कोण तरी जवळ येत आहे हे सोडून शतकामागे झालेल्या प्रेमप्रकरणावर रडत बसलास तर कोण येईल तुझ्या जवळ... हे माझं मत.. पण मी पण चुकतोच.. ना.. बरोबर आहे.. दर्द खुप मोठी गोष्ट असते.. सहन करणे व लपवणे तर खुप मोठ्या गोष्टी... भले भले... बरबाद ह्या दर्द मुळे... ! पण ह्या दर्द वर कोण तरी फुंकर घालायला तयार असले तर ? तरी ही त्रासच ? का तर..मागचे जिवन कधी तरी पुढे येईल.. अरे यार.. जर मागचे जिवन तु आपल्या खांद्यावर बाळगण्याची हिंमत ठेवतो तर.. त्याला / तीला सांगायला काय हरकत आहे... जर खरंच ती / तो तुला सर्व गुण - अवगुण माहीत असताना तुझ्या वर प्रेम करत आहे तर काय अडचण सत्य बोलायला ? समजा तीने / त्याने जर तुमचे दुख: दर्द समजुन घेतला तर ? अरे यार... बहार येईल जिंदगी मध्ये... जे हरवलेले सुख आहे...ते खरचं पदरात येईल... जन्नत दिसेल प्रेमामध्ये ! कोणीतरी हक्काचे असेल आपल्या जवळ.. ! व समजा तीने / त्याने तुमचे सत्य स्विकारलेच नाही तर... अरे बॊस... ना दुनियासे दारु खतम हुई ना.. दोस्त... ;) चालूच आहे ना जिने .. ! पण जरा पॉझीटिव्ह विचार करायला काय हरकत आहे ?

माझे जरा नशीब कमजोर होतं.. अथवा... प्रेम नावाचा हिस्सा माझ्या नशिबी नव्हताच.. असे अनेक जण डायलॉग मारतात... अरे प्रेम रोज तुमच्या ह्दयाला टकटक करुन जातं .. पण त्याला तुम्ही प्रतिसाद कुठे देत आहात... म्हणे नशीबात नव्हतं... ! माय फुट... अरे ज्या जगात कुत्र्या माजंरावर जिवापाड प्रेम करणारे आहेत... तेथे एका बोलत्या.. चालत्या.... ह्याचं हदय धडकतं .. ज्याला प्रेम भावना म्हणजे काय कळतं... अश्या मनुष्याशी कोणी प्रेम करणारेच नाही ह्या जगात असं कसं होईल यार... ! कोणी तरी आहे यार.. समजुन घेण्याची बात आहे... जर हे समजल तर मग काय.... गालावर मोरपंखांचा स्पर्श होणे म्हणजे काय हे काही क्षणात समजेल.. पण येथे एक अट आहे...खुप कमी वेळा असं होतं की ती प्रेमाबद्द्ल स्वत: बोलते.. बॉस हे तुला स्वत:ला ओळखावे लागेल... नाही तर गाडी कधीच रस्तावर येणार नाही... ! हिंमत तर करावी लागते.. त्याने / तीने केली तर क्या बात !

मला ही माहीत आहे ह्या सगळ्या लिहण्या-बोलण्याच्या गोष्टी.. पण मित्रा जर तुला कोण तरी भेटलेच...तर.. तु काय करणार त्यावेळी ? मागे मी एका गोष्टीत गटस बद्द्ल लिहले होते.. ही खुप कामाची गोष्ट आहे बॉस ज्याच्याकडे गटस आहेत ना.. ती व्यक्ती कधीच मरत नाही... मी लिहून देतो हवं तर.. भरोसा ठेवा...! अरे जराशी हिंमत... जगण्यातील मजा कळेल यार.. ! शोधा शोधा.... जवळ पास कोणीतरी असेल जो तुमच्यावर जिवापाड प्रेम करत असेल.... ! जेव्हा हे प्रेम मिळेल ना तुम्हाला बॉस ... तु खुषीने पागल होशील हे नक्कीच.. अरे प्रेमाची नशा तुला माहीत असेलच.... जरी माहीत नसली तरी... कोणी तुझ्यावर प्रेम करतं... ही भावनाच अनमोल आहे यार... ! जगणं खुप सोपं आहे.. मित्रा.. अरे आरामात जगता येतं फक्त मुखवटे चढवं बस्स..पण प्रेमात मुखवटे नाही चालत बॉस ... ! चुकुन मुखवटा घालून प्रेम केलंस ना.... तोंडावर पडशील... जेथे प्रेम आहे तेथे सत्य देखील असावेच लागते नाही तर... लफडा.. त्याला प्रेम नाही म्हणत मग... त्याला धोका म्हणतात...! सत्याला जवळ ठेव .... कधी तरी... जिवनाच्या कुठल्यातरी मार्गावर कोणी ना कोणी एक गुलाबाचं फुलं तुझ्यासाठी खास घेऊन उभे असेल... जेव्हा ती व्यक्ती तुला भेटेल तेव्हा शक्यतो तुझ्या कडे काही नसेल देण्यासाठी.... पण जी व्यक्ती तुला देण्यासाठी काही घेऊन येत आहे त्यासाठी तुझे बोलच अनमोल असतील.. प्रेमाचं असंच असत यार... जे घेण्यावर नाही... देण्यावर भरोसा ठेवतं !!!! चिल्ड !! बी कुल !..... जरा मागील रात्र सोड... नवीन पहाट होत आहे.... नवीन सुर्य उगवत आहे.. स्वप्न व सत्य ह्यातील फरक कळण्याचा वेळ आला आहे.... जागा हो बॉस जागा हो !

***********
क्रमश: नका समजू..जो पर्यंत जगत आहे तो पर्यंत प्रेमाचा कधीच द एंन्ड होणार नाही.... पण कधीतरी असाच वेळ मिळाला व काही डोक्यात घोळत असेल त्यावेळी पुढील पार्ट जरुर लिहीन.... :)

***********
हसण्यासाठी कारण शोधत बसू नका... बस हसा.. हसा.. मनसोक्त हसा... जगण्याचे चारच पल असतात आपल्या जवळ... बाकीचे जगणे आपण कोणा ना कोणासाठी तरी जगत असतो... पण ते चार पल असे जगा की जगाला याद राहिले पाहीजे.. हां यार तो होता... खुप मजेशीर, हसमुख व जिंदादिल ! मुडदे मला मित्र म्हणून आवडत नाहीत बॉस !!!

प्रेमकाव्यजीवनमानप्रकटनविचारमतसल्लाअनुभव

प्रतिक्रिया

सहज's picture

26 Feb 2009 - 9:33 am | सहज

आता सरळ नाव नोंदवा वधुवर सुचक मंडळात. वाजु देत तुमचा बँड.

:-)

अनिल हटेला's picture

26 Feb 2009 - 9:42 am | अनिल हटेला

>>आता सरळ नाव नोंदवा वधुवर सुचक मंडळात.

+१ सहमत !!

>>>वाजु देत तुमचा बँड.

+२ डब्बल सहमत !!!! ;-)

(बँडवाला)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

दशानन's picture

26 Feb 2009 - 10:26 am | दशानन

तुझा आधी बेंड वाजव अनिल =))

अरे राहू द्या गरिबाला असंच आनंदात का उगाच फाशीवर चढवत आहात... ;)

पिवळा डांबिस's picture

26 Feb 2009 - 10:34 am | पिवळा डांबिस

अनिलभाऊ,
अगदी खरं बोललांत!!!!!!
"नांदायला, नांदायला, नांदायला.....
मला बाई जायाचं नांदायला!!!!!!"
तिच्यायला, ह्या राजेला आता हळद लावायलाच हवी....
:)

दिल्लीचं कार्ट's picture

26 Feb 2009 - 10:38 am | दिल्लीचं कार्ट

पण हळद पिवळी नको पिडाकाका. डॉन्या वगेरे लगेच पिवळा राजे म्हणायचे :)

दिल्लीचा डांबीस
पिडाकाकांची ढेरी कुण्या मच्छाराने भरण्याइतकी कोती नाही.

पिवळा डांबिस's picture

26 Feb 2009 - 11:56 am | पिवळा डांबिस

डॉन्या वगेरे लगेच पिवळा राजे म्हणायचे
जर या जैनाच्या कार्ट्याचे दोनाचे चार हात होणार असतील ना, तर आम्ही आमचा आयडी पण उतरवून ठेऊ.....

दोस्ती भी क्या चीज होती है...
जो रूह को भी जला लेती है....

(कोणाच्याही कोंबड्याने का होईना, आरवल्याशी कारण......)
:)

शिवापा's picture

26 Feb 2009 - 1:06 pm | शिवापा

लिखानात आलेल्या विचारांसारखे कोणि बोलले तर वधुवर सुचक मंडळात नाव नोंदवण्याचाच सल्ला का मिळतो माहित नाहि. ह्या असल्या वेदनांवर लग्न हाच पर्याय असतो का?

सहज's picture

26 Feb 2009 - 1:34 pm | सहज

नाही हो शिवापा, जुन्या दुखण्यावर डॉक्टर नाही का उपचारात बदल करुन पहातात, तसे मी राजेंना वेदनेत बदल करायला सुचवतोय. दुसरी वेदना कदाचित जास्त आवडेल किंवा जुनी वेदना सुसह्य वाटू लागेल. काहीतरी फायदा असतोच लग्नात.

शिवापा's picture

26 Feb 2009 - 2:08 pm | शिवापा

पटलं पटलं. मि पण शादी.कॉम लॉगिन केले लोगिनाच्या विचारासाठी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Feb 2009 - 9:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>आता सरळ नाव नोंदवा वधुवर सुचक मंडळात. वाजु देत तुमचा बँड.

खरंय रे सहजा..

हे पोर्ग त्या प्रेमाच्या (कोण ही प्रेमा ) भानगडीतून बाहेर यायला तयारच नाही. तिच्या त्या आठवणी, तिचे ते आस्सं , तिचे ते तस्सं.... मुसाफिरा घे आता विश्रांती. :)

दशानन's picture

27 Feb 2009 - 8:31 am | दशानन

:W

असं असं !

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

छोटा डॉन's picture

26 Feb 2009 - 9:36 am | छोटा डॉन

काय लिहतोस बे राज्या, एकदम क्लास ..!!!
अगदी हळुवार आणि नाजुक, झकासच ...

बाकी सहजरावांचा सल्ला मनावर घे बॉ ;)

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

मृगनयनी's picture

26 Feb 2009 - 9:46 am | मृगनयनी

राजे.... एक प्रश्न तुम्हाला पडला होता.....
आणि त्याचं उत्तरही तुम्हालाच सापडलंय....

:)

बिछडनेवाले तो तुम्हारी यादों मे हमेशा बसे है....
लेकिन मिलने वालों को भी तो तुम्हाराही इन्तजार है !

-
मृगनयनी.
:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

यशोधरा's picture

26 Feb 2009 - 9:40 am | यशोधरा

:)

प्रकाश घाटपांडे's picture

26 Feb 2009 - 10:31 am | प्रकाश घाटपांडे

हसण्यासाठी कारण शोधत बसू नका... बस हसा.. हसा.. मनसोक्त हसा... जगण्याचे चारच पल असतात आपल्या जवळ... बाकीचे जगणे आपण कोणा ना कोणासाठी तरी जगत असतो... पण ते चार पल असे जगा की जगाला याद राहिले पाहीजे..

कभी खुद पे कभी हालात पे हसना आया|
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

दिल्लीचं कार्ट's picture

26 Feb 2009 - 10:33 am | दिल्लीचं कार्ट

:)

दिल्लिचा डांबीस
पिडाकाकांची ढेरी कुण्या मच्छाराने भरण्याइतकी कोती नाही.

दशानन's picture

26 Feb 2009 - 10:39 am | दशानन

कारं तुझा बोळा अडकला आहे काय अजून... मागच्या वेळी निघाला नाय व्यवस्थीत :?

भाग्यश्री's picture

26 Feb 2009 - 10:38 am | भाग्यश्री

सही लिहीलेत राजे!!

http://bhagyashreee.blogspot.com/

परिकथेतील राजकुमार's picture

26 Feb 2009 - 11:49 am | परिकथेतील राजकुमार

राजे तुम्ही हे असले पण काय लिहु शकता असे वाटले न्हवते बॉ आम्हाला. छान लिहिले आहेत एकदम. ह्या सगळ्या बरोबरच ' मै जिंदगीका साथ निभाता चला गया..' हे सुद्धा विसरु नका म्हणजे झाले.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

विनायक प्रभू's picture

26 Feb 2009 - 12:52 pm | विनायक प्रभू

मास्तरला भेटा राजे

दशानन's picture

26 Feb 2009 - 1:45 pm | दशानन

जसा हुकुम... कधी येऊ :?

अवलिया's picture

26 Feb 2009 - 1:44 pm | अवलिया

छान लिवलय रे राज्जा !!!!
लै भारी....
बाकी प्रेमाला एकनिष्ठतेचा शाप नको हेच खरे रे... बाकी काय... तु सुज्ञ आहेसच :)

--अवलिया

दशानन's picture

26 Feb 2009 - 1:51 pm | दशानन

इकडं आड व तीकडं विहीर... :(

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

अवलिया's picture

26 Feb 2009 - 1:55 pm | अवलिया

जिथे पाणी असेल तिथे शेंदावे

--अवलिया

शंकरराव's picture

26 Feb 2009 - 3:42 pm | शंकरराव

राजे लै भारी..

क्रमश: नका समजू..जो पर्यंत जगत आहे तो पर्यंत प्रेमाचा कधीच द एंन्ड होणार नाही.... पण कधीतरी असाच वेळ मिळाला व काही डोक्यात घोळत असेल त्यावेळी पुढील पार्ट जरुर लिहीन....

वाचायला आवडेल ..., जरा जालिय प्रेम प्रकरणांवर ही लेख येउद्यात.

शंकरराव
एखाद्याचे देवत्व मान्य करणे हे स्वतःच्या चूका दिसण्या ईतके अवघड काम आहे, चूका दिसल्या की स्वतःला त्रास होतो.
त्यात अजून स्वतःचे "पिल्लू" सोडून पळणे ही तर अजूनच मजेशीर गोष्ट. असो ;-)

मॅन्ड्रेक's picture

26 Feb 2009 - 5:32 pm | मॅन्ड्रेक

गाइड मधे एका प्रसंगात देवसाब
वेटर विचारतो
- क्या बात है सर ? आज आप अकेले पी रहे है
देवसाहेब-
- बाते करने के लिये इतना तरस रहां हुँ, सोचा थोडी पिकर अपने आपसे कुछ कहुँ, !
जिंदगी भी एक नशा है दोस्त , जब चढ्ती है तो पुछो मत क्या असर होता है, और जब उतरता है ..........
.. नंतर फक्त ग्लास मधे दारु ओतण्याचा आवाज .

शितल's picture

26 Feb 2009 - 6:53 pm | शितल

राजे,
एकदम खुल्लम खुल्ला लिहिले आहे. :)
चला राजेंनी प्रेमभंगावर लिहिले नाही हे काय कमी आहे.. ;)

प्राजु's picture

27 Feb 2009 - 1:33 am | प्राजु

छान लिहिलं आहे.
पण आता खरंच, तुम्ही बोहल्यावर चढायची तयारी कराच.
आणि खरंतर, प्रेम या विषयात तुमची पी एच डी आहे.. तेव्हा कठीण वाटू नये तुम्हाला ते. :) लागा तयारीला. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दशानन's picture

27 Feb 2009 - 12:10 pm | दशानन

माझ्या सर्व काळजीवाहू मित्रांचे आभार... !

ज्यांनी वाचले ज्यांना कळाले ज्यांनी प्रतिसाद दिला त्यांचे पण व ज्यांनी वाचले ज्यांना कळाले नाही ज्यांनी प्रतिसाद दिला नाहि त्यांचे ही आभार :D