लेखक - अभिनय कुलकर्णी
सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि मग फार तर जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. पण समग्र सावरकर आपण समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय? हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते आणि त्यातले अनेक आपल्याला पटणारे आणि न पटणारेही होते. पण म्हणून ते समजून न घेता त्याकडे दुर्लक्षच बरेच झाले. सावरकरांना समजून घेण्यात आपण कमी पडलो आणि त्यांचं मोठेपण इतरांपर्यंत पोहचविण्यातही आपल्याला अपयश आलं.
राष्ट्रीय पातळीवर ज्यांचं नाव घ्यायला पाहिजे अशा व्यक्तिंमध्ये एकेकाळी महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती होत्या. त्यात निर्विवादपणे सावरकर होते. त्यावेळी त्यांचे महत्त्व तेवढे होतेही. पण पुढे त्यांची प्रतिमा आणखी मोठी होऊ नये यासाठीही प्रयत्न झाले किंवा केले गेले. देशात कॉंग्रेसचे राज्य असल्याने आणि सावरकर कॉंग्रेसविरोधी असल्यानेही सावरकरांसंदर्भात, त्यांच्या विचारांसंदर्भात फार काही झाले नाही. अगदी आत्ता आत्तापर्यंत सावरकर द्वेष संपलेला नाही. मणिशंकर अय्यर नावाचा एक कॉंग्रेसी उटपटांग मंत्री अंदमानमध्ये असलेल्या सावरकरांच्या काव्याच्या ओळी पुसायचे धाडस करतो, तरी सत्ताधारी कॉंग्रेस सदस्यांपैकी कोणीही हे चुकीचे केले म्हणून मान ताठ करून सांगत नाही. म्हणजे राज्यात सावरकर गुणगान करणारे कॉंग्रेसचे खासदार हायकमांडसमोर मान तुकवून पिचलेल्या कण्याचे दर्शन घडवतात.
थोडं मागे जायचे झाले तर गांधीहत्येला सावरकरांचा आशीर्वाद होता, म्हणूनही त्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचे प्रयत्न केले. स्वातंत्र्यासाठी झगडणार्या या स्वातंत्र्यसूर्याने स्वातंत्र्यासाठी शंभर वर्षाची शिक्षा झाली पण आपले उद्दिष्ट साध्य झाल्यानंतरही त्यांना कोठडी चुकली नाही. गांधी हत्येच्या निमित्ताने हेही घडले.
सावरकरांचे जहाल हिंदूत्ववादी विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही मानवत नाहीत. म्हणून संघाच्या व्यासपीठावर सावकरांच्या फोटोला सहसा स्थान नसते. मुळात सावकरांनीच हिंदू महासभा नावाचा वेगळाच पक्ष काढला होता. पुढे संघप्रणित जनसंघ हा राजकीय पक्ष स्थापन झाल्यानंतरही हिंदू महासभेचे स्थान कायम होते. सावरकरांची विज्ञाननिष्ठाही संघीयांना अडचणीत टाकणारी होती. 'गाय हा उपयुक्त पशू असून प्रसंग ओढवला तर गायीचे मांसभक्षण करायलाही हरकत नाही' असे सावरकरांचे 'प्रॅक्टिकल' विचार पुराणमतावादाला धरून चालणार्या संघाला परवडणारे नव्हते. त्यामुळेच संघाने सावरकरांना दूर ठेवूनच चालायला सुरवात केली.
समाजवाद्यांना सावरकरांचे हिंदूत्ववादी धोरणच मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी सावरकरांची तळी उचलून धरण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे समाजवाद्यांनी कायमच सावरकरांना दूरच ठेवले. त्यामुळे सावकर उपेक्षितच राहिले. कम्युनिस्टांनी तर सावरकरांवर टीकेची भूमिका स्वीकारणे पसंत केले. सुभाषचंद्र बोस व सावरकर हे कम्युनिस्टांच्या टिकेचे लक्ष्य होते. इतकेच नव्हे तर अंदमानच्या तुरूंगातून राजकीय आंदोलनात न पडण्याच्या अटींवर सावरकर बाहेर पडले ही सुद्धा कम्युनिस्टांसाठी टीकेची बाब ठरली. कम्युनिस्टांच्या मते सावरकरांनी ब्रिटिशांसमोर गुडघे टेकले. पण मुळात सावरकरांसारखा अतिशय महत्त्वाचा नेता तुरूंगात खितपत पडण्यापेक्षा बाहेर पडून काही तरी कार्य करत असले तर ते जास्त महत्त्वाचे आहे, हे समजण्याइतकी कम्युनिस्टांची बुद्धी कधी प्रगल्भ झालीच नाही. रत्नागिरीला अज्ञातवासात असतानाही सावरकरांनी राजकीय कार्य लपून छपून केलेच.
मुळात मोठ्या विजयासाठी थोडी माघार घ्यावीच लागते, हे शिवाजी महाराजांचे धोरण सावरकरांनी अतिशय मुत्सद्दीपणे राबविले. त्यामुळे सावरकरांच्या या निर्णयात चुक काय? तेच कळत नाही. कम्युनिस्टांपैकी कोणत्या नेत्याला शंभर वर्षे तुरूंगवास झाला? कोणी कोलू ओढणे, अतिशय विपरीत स्थितीतही जगण्याची लालसा जिवंत ठेवत ठामपणे जिवंत रहाणे हे कुणी सहन केले?
शिवाय सावरकरांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्यही याच काळात केले, हेही कम्युनिस्ट विसरतात. गांधींच्या अस्पशता निर्मुलन चळवळीचे गोडवे गायले जात असताना गांधी चार्तुवर्ण्यावर विश्वास ठेवणारे होते, याकडे दुर्लक्ष होते आणि 'जातीजातीतील मानवी जन्मजात जातिभेदाचा उच्छेद करावयाचा म्हणजे या जातीजातीतील मानवी उच्चनीच भावनेचा व तदअनुषंगिक विशिष्टाधिकारंचा तेवढा उच्छेद करायचा' असे मत मांडणारे सावरकर 'हिंदूत्वाचा' मुद्दा मांडतात म्हणून प्रतिगामीही ठरविले जातात.
दुसरीकडे सावरकरभक्तांनी नेहमीच गांधींवर टीका करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे झाले असे की गांधी मोठे होतेच, ते आणखी मोठे झाले. पण दुर्देवाने त्यामुळे सावरकर उगाचच छोटे ठरविले गेले. समाजातही कट्टर सावरकरभक्त व विरोधक असे दोन गटच तयार झाले. सावरकरभक्तांचा एक गट कायम वेगळाच राहिला. त्यांच्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टीही विकसित झाली. त्यामुळे राज्यकर्त्यांच्या पातळीवरही सावरकरांची उपेक्षाच झाली.
सावरकर हे इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ आणि विचारवंतही होते. १८५७ चा उठाव हा तोपर्यंत बंड ठरवला होता, पण सावरकरांनी हे बंड नव्हते स्वातंत्र्यसमर होते, हे ठासून सांगितले. स्वातंत्र्याची पहिली ज्वाला या घटनेनेच पेटवली, हेही त्यांनी बर्याच आधाराने सांगितले. त्यासाठी इतिहासही खोदून काढला. दुर्देवाने या उठावाची दीडशे वर्षे गेल्या वर्षी सरकारी पातळीवर झोकात साजरी झाली, पण हे वर्ष सावरकरांचे १२५ वे जयंती वर्ष असूनही सरकारी पातळीवर सारे काही थंड आहे. सावरकरांची उपेक्षा अजूनही संपलेली नाही, याचा हा पुरावा.
हा लेख "मराठी वेबदुनिया" वरील आहे. तिथे ह्यालेखा विशेष वाचक नसतील किंवा लेखाखालिल प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले गेले असाव. मिसळपाव चा वाचकवर्ग भरपुर आहे व प्रतिक्रिया सुद्धा मिळतात म्हणुन येथे प्रकाशित करत आहे व मिपाकरांच्या प्रश्नावरील प्रतिक्रिया वाचायच्या आहेत्. - ए.प्रशांत
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आणखीही भरपूर माहिती येथे उपलब्ध आहे.
सावरकर उपेक्षित रहाण्याची कारणे काय असावीत?
प्रतिक्रिया
28 Jan 2009 - 10:52 am | दशानन
वेब दुनियावरील लेख तुम्हीच लिहला आहे काय ?
नसेल तर अवघड आहे, बाकी लेख वाचून प्रतिकिया देतो !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!!
गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी
28 Jan 2009 - 11:22 am | ए. प्रशांत
मी लेखातच स्पष्ट सांगितले आहे.
माझ्या बद्दल अधिक माहिती हवी असेल तर इथे टिचकी द्या.
28 Jan 2009 - 11:58 am | नितिन थत्ते
सावरकरांना मी मानतो ते त्यांच्या सुधारणावादामुळे. त्यांच्या विज्ञाननिष्ठ निबंधांची पारायणे केली आहेत. त्यामुळे आजच्या रूढ अर्थाने त्यांना हिंदुत्ववादी म्हणता येणार नाही. आजचा रूढ अर्थ म्हणजे हिंदूंच्या सर्व परंपरा शिरसावंद्य मानून त्यांवर टीका सहन न करणे आणि इतर धर्मीयांचा द्वेष करणे हा झाला आहे. इतर धर्मीय मागास आहेत म्हणून आम्ही पण मागास रहायला हवे. आमच्यात सुधारणा करायला सांगू नका अशी धारणा झाली आहे. सध्या हिंदुत्ववादी आणि इतर धर्मांतील जातीय वादी यांचे नाते 'एकमेका सहाय्य करू...अवघे राहू मागास' असे झाले आहे. त्यामूळे आजच्या हिन्दुत्ववाद्यांनी सावरकर आमचे असे म्हणणे हाही एक मोठा विनोदच आहे.
गांधींना मी मानतो ते त्यांच्या अहिंसेच्या आग्रहामुळे. बाकी त्यांची ग्रामस्वराज्य, निसर्गोपचार वगैरे तत्त्वे अगोदरच सर्वांनी ...वर मारली आहेत त्याचे मला अजिबात दु:ख नाही.
तुम्हीच म्हटल्याप्रमाणे "दुसरीकडे सावरकरभक्तांनी नेहमीच गांधींवर टीका करण्याचा प्रयत्न केला." यातही त्या टीकेचे स्वरूप थट्टा करण्याच्या स्वरूपाचे होते, हीन लेखण्याच्या स्वरूपाचे होते. त्यात अपप्रचारचा ही भाग होता. उदा एका गालावर मारल्यावर...., चरखा चालवून स्वराज्य..... वगैरे. यामध्ये गांधींच्या विधानांना सन्दर्भरहित रीत्या उधृत करून त्यांची थट्टा केली जात असे. त्यामुळे गांधींना मानणारी (सावरकरांप्रमाणे प्रखर बुद्धिवादी नसलेली) जनता सावरकर व इतर हिंदुत्ववाद्यांपासून दूर गेली.
दुसरी गोष्ट म्हणजे सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा पुरस्कारच केला होता. त्यामुळे अखंड भारतवाद्यांनीही सावरकरांचे नाव घ्यायचे कारण नाही.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
28 Jan 2009 - 2:22 pm | थोर्लेबजिराव
ME yachyashi sahamat ahe ki gandina nako tevdhe mothe kelyamule swarkarana mannare lok kami zale.. !!
pan varil swarkar premi mirache "Dwirastriyawad" la swarkaracha pathimba hota..he chukiche ahe.. ani asya lokanmulch chukichya samjuti pasartat ..teva tyani krupaya aple manane spata karave athva mafi magavi... !!
28 Jan 2009 - 6:02 pm | दवबिन्दु
ME yachyashi sahamat ahe ki gandina nako tevdhe mothe kelyamule
गांधीजी लिहिने चुकलले आहे. तुमी जे लिहीले ते लोकान्ना आवडनार नाय.
28 Jan 2009 - 6:34 pm | विकास
या लेखावर वेळ मिळाल्यास अधिक प्रतिक्रीया नंतर देयचा प्रयत्न करेल मात्र खालील परीच्छेदासंदर्भात काही असलेली माहीती देण्याचा प्रयत्न करतो...
हे वरकरणी सत्य वाटले तरी लेखकाच्याही नकळत असेल पण दिशाभूल होणारे विधान आहे. सर्वप्रथम, सावरकरांचे जहाल हिंदूत्व म्हणताना त्याचा नकळत अर्थ "रॅडीकल" असा होतो. त्यांच्या विचारातील स्पष्टपणा दिसत असला तरी तो त्यांच्या विरोधकांनादेखील मान्य करता येत नाही म्हणून असे शब्द येतात. त्यामुळेच त्याला मुद्देसूद विरोध न करता त्यातून अर्थ काढत त्याला जहाल म्हणले गेले आहे.
सावरकरांची हिंदूत्वाची व्याख्या ही विशेषकरून भौगोलीक आणि इतिहासावर तयार केली गेली आहे तर संघ हीच व्याख्या प्रत्यक्षात वापरताना ही सांस्कृतीकतेवरपण (म्हणजे इतिहास-भूगोल आहेच) भार देतो. त्यात देखील काही चूक वाटत नाही. एक संस्था एक ध्येय ठरवून कार्य करते आणि ते ही कायद्याच्या चौकटीत तो पर्यंत ते योग्य आहे. ज्यांना आवडेल ते त्यात सहभागी होतील, आवडणार नाही ते दूर राहतील - अलीप्त अथवा विरोधक म्हणून. सावरकरांची दृष्टी (व्हिजन या अर्थी) आणि संघाची दृष्टी यात या अर्थी फरक नक्कीच आहे. मात्र संघाने त्यांच्यावर टिका केली आहे अथवा विरोध केला आहे असे कधीच झालेले नाही.
आता सावरकरांचा फोटो संघाच्या व्यासपिठावर नसतो असे म्हणणे याचा अर्थ संघात कसे काम होते (परत आवडो न आवडो) हे माहीत नसल्याचे लक्षण आहे. कारण संघात, संघ साजरे करत असलेले एक उत्सव सोडल्यास (जे सगळेच सांस्कृतिकतेशी, देवधर्माशी एकही नाही, जोडलेले असलेले आहेत), इतरत्र कधीच फोटो लावले जात नाहीत. आणि त्यावेळेस फक्त संघ संस्थापक/आद्य सरसंघचालक - डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक श्री. गुरुजी यांचेच फोटो असतात. मात्र संघाचे प्राथःस्मरण वाचलेत तर त्यात सावरकर आहेत (तसेच गांधीजीपण आहेत).
संघातील पुर्वीचे आणि आत्ताचे प्रचारक देखील बहुतांशी उच्चशिक्षित असतात. त्यामुळे विज्ञाननिष्ठा ही त्यांना म्हणजे संघ या संस्थेला अडचणीत टाकते वगैरे परत पटत नाही. अर्थात स्वयंसेवकाच्या व्यक्तीगत पातळीवर एखादा मुद्दा मान्य होईल अथवा नाही, पचेल अथवा पचणार नाही. यावर अधिक लिहीण्याचे टाळतो कारण मुद्दा वेगळाच स्पष्ट करावासा वाटतो. वरील वाक्यातून अर्थ काय निघतो? तर:, " गायीला उपयुक्त पशू म्हणले हीच काय ती सावरकरांची विज्ञाननिष्ठा आणि प्रसंगी गोमांस भक्षण करणे हेच काय ते प्रॅक्टीकल विचार!"
सावरकरांपेक्षा आणि संघापेक्षा त्यांचे वरील वाक्य हे संदर्भरहीत करून त्या दोहोंच्या विरोधकांनीच जास्त वापरले आहे. त्यांचा "गाय हा उपयुक्त पशू आहे" या संदर्भातील लेख वाचल्यास ते जास्त समजेल. तो अतिशय परखड लेख झोपलेल्या समाजाला जागे करायला लिहीलेला सावकर स्टाईलचा लेख आहे. त्यामुळे त्यातील ते वाक्य हे त्या एका संदर्भात वाचल्यास त्यांना काय म्हणायचे आहे ते कळते. गोमांस खा म्हणत बर्गरची पाककृती सांगणारा लेख नाही...
एकंदरीत सावरकरांच्या मृत्यूस ४०च्या वर वर्षे झाली तरी त्यांच्या विरोधकांना आजही त्यांच्या स्फटीकस्पष्ट (क्रिस्टल क्लीअर) विचारांची भिती वाटते कारण ते आमलात आणणे म्हणजे वास्तवीक सगळी जाती/धर्मावरील पोळ्या भाजणारी हीन राजकारणे बंद करावी लागतील. ते करण्याऐवजी त्यांनी असे काही विचार समाजमनात रुजवून ठेवले की इतर ते (विश्लेषण) बरोबर आहेत का नाही यावर आधी चर्चा करण्याऐवजी सावरकरांना, संघाला एकतर "डिफेन्ड" करत बसतो अथवा त्यांचे "आंधळे" विरोधक होतो. (आंधळे अशासाठी, कारण डोळस विरोधक असले तर त्यांच्याकडून पण काहीतरी चांगलेच आणि भरीव कार्य होईल...)
असो.
28 Jan 2009 - 7:09 pm | लिखाळ
हेडगेवार आणि गुरुजींच्यामध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा असते. या तीनच प्रतिमा उत्सवाच्या वेळी असतात. त्यात बदल नसतो.
-- लिखाळ.
28 Jan 2009 - 8:51 pm | सुचेल तसं
विकासराव,
आपला प्रतिसाद अतिशय आवडला!!!
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
28 Jan 2009 - 9:33 pm | विनायक पाचलग
प्रथमतः तुम्ही आमच्या दीवाबद्दल लिहिलेत आनंद वाटला
बाकी प्रतिक्रिया वेळ मिळाल्यावर
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले