मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर, यांना श्रध्दांजली - पुण्यतिथी ४

Trump's picture
Trump in जनातलं, मनातलं
25 May 2023 - 1:04 pm

तात्या १५ मे २०१९ रोजी वारले. साधारणतः २००७ मध्ये मिपाची स्थापना केली. आपल्या सारख्या अनोळखी लोकांना मन मोकळे करण्याचा आणि उत्तमोत्तम लेखनाचा आस्वाद घेण्याचा मार्गे उपलब्ध करुन दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.
त्यांच्या विषयी इतरांनी भरभरुन लिहिले आहे. मला त्यांना शेवटी भेटता आले नाही आणि कोणतीही मदत करता आली नाही यांची खंत वाटते.
(१५ तारखेला मिपा बंद असल्याने त्यात्यांना श्रध्दांजली वाहता आली नाही, म्हणुन आता वाहतो आहे.)

मटामधील श्रध्दांजली
https://maharashtratimes.com/maharashtra/thane/chandrashekhar-abhyankar-...

--
त्यांचे काही निवडक साहित्य येथे देत आहे, नवीन लोकांना ओळख होण्यास मदत होईल.

मिपावरील त्याचा आयडी: विसोबा खेचर - https://www.misalpav.com/user/6 आणि त्यांचे सर्व लेखन - https://www.misalpav.com/user/6

त्यांची लेखनवही (ब्लॉग)
http://tatya7.blogspot.com/

त्यांची चित्रवाहिनी
Tatya Abhyankar a.k.a Visoba Khechar -
- https://www.youtube.com/watch?v=YjiB-cKDLUA
- https://www.youtube.com/user/tatya7/videos
- https://www.nghenhachay.net/artist/UCHkQVSmnudzuIJVDT2fXOGA

---------------------------
इतर रसिकांनी, मित्र-मैत्रींणीनी व्यक्त केलेल्या भावना:

https://www.yinbuzz.com/tatya-abhyankar-i-did-everything-wrong-8879
http://anandghan.blogspot.com/2019/05/blog-post_17.html
https://anandghare.wordpress.com/2019/05/16/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5-...
https://anandghare.wordpress.com/2019/05/16/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5-...

हे ठिकाणधोरणमांडणीवावरप्रकटनसद्भावनाप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

25 May 2023 - 1:15 pm | प्रकाश घाटपांडे

नवीन लोकांसाठी हे फार महत्वाचे आहे. तात्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू अनेक आहेत. एका शब्दा वर्णन करायचे म्हणजे "अवलिया"

कुमार१'s picture

25 May 2023 - 1:19 pm | कुमार१

आदरांजली !

शशिकांत ओक's picture

25 May 2023 - 2:32 pm | शशिकांत ओक

मिपा ची सुरवात का आणि कशी झाली? तात्या अभ्यंकर यांनी काय म्हणून हे संस्थळ निर्माण केले? यावर प्रकाश टाकावा ही विनंती करतो.

चंद्रसूर्यकुमार's picture

25 May 2023 - 2:52 pm | चंद्रसूर्यकुमार

मिपा ची सुरवात का आणि कशी झाली? तात्या अभ्यंकर यांनी काय म्हणून हे संस्थळ निर्माण केले? यावर प्रकाश टाकावा ही विनंती करतो.

मायबोली हे मराठीतले सगळ्यात पहिले संकेतस्थळ. ते १९९६ मध्ये सुरू झाले. त्यानंतर काही वर्षांनी मनोगत हे संकेतस्थळ सुरू झाले. मिपावरील बरीच जुनी मंडळी सुरवातीला मनोगतवर बघितली होती. आता त्यापैकी बरेचसे मिपावरही सक्रीय नाहीत. मी मे-जून २००६ दरम्यान कधीतरी मनोगतचा सदस्य झालो. मनोगत जर २००६ मध्ये होते तसे चालू राहिले असते तर कदाचित मिपाची स्थापनाच झाली नसती. मी सदस्य झाल्यानंतर पहिले ७-८ महिने सगळे छान चालू असलेले तिथे बघितले. पण फेब्रुवारी २००७ च्या सुमारास मनोगतचे संस्थापक वेलणकर यांनी कोणत्याही प्रतिसादाला प्रशासकीय मंजुरी हे अनाकलनीय धोरण सुरू केले. म्हणजे एखाद्याला कोणत्याही लेखावर प्रतिसाद किंवा दुसर्‍या प्रतिसादाला उपप्रतिसाद द्यायचा असेल तर ते लिहायचे आणि प्रशासकांनी तो प्रतिसाद प्रसिध्द करायला परवानगी दिली तरच तो प्रसिध्द होणार. या प्रकारात सगळी मजाच आणि उत्स्फूर्तता गेली. प्रशासकीय परवानगी यायला १०-१२ तास लागायचे. अनेक वादविवाद तिथल्या तिथे प्रतिसाद आले तरच रंगतात. असे १०-१२ तास थांबून राहिले तर मजा नाही.

त्या धोरणाविरूध्द तात्यांनी एक लेख लिहिला होता. तात्यांच्या खास शैलीतील तो लेख होता. तो लेख कोणतेही कारण न देता नाकारला गेला. तो लेख नंतर तात्यांनी त्यांच्या ब्लॉगवर http://tatya7.blogspot.com/2007/02/blog-post_20.html वर प्रसिध्द केला. त्याच्या दुसर्‍या दिवशी तात्यांनी आपले मनोगतवरील खाते बंद करावे अशी विनंती केली. मनोगत संस्थापकांनी ती विनंती लगोलग मान्य केली आणि तात्यांचे खाते बंद करून टाकले.

त्यानंतर तात्यांनी इरेला पेटून मिसळपावची स्थापना केली. मधल्या काळात तात्या मनोगत सोडून उपक्रमवर लिहायचे. मिपावर बराच काळ सक्रीय असलेले अनेक सदस्य त्यावेळेस मनोगतवरून उपक्रमवर गेले होते. मी पण त्यातलाच एक होतो. मग मिपा सुरू झाल्यावर सगळे मिपावर आले.

मनोगत हे माझे पहिले प्रेम आहे असे तात्या नेहमी म्हणायचे. खरोखरच त्यावेळेस त्यांनी मनोगतवर तसेच प्रेम केले होते. माझ्या माहितीप्रमाणे मुंबई-ठाणे परिसरातील मनोगतचा पहिला कट्टा तात्यांनीच भरवला होता आणि त्यावेळेस सगळ्यांनी आमरस हादडला होता. त्या कट्ट्याचे फोटोही मनोगतवर टाकले होते. मनोगतवरील प्रशासकीय धोरणांमुळे (खरं तर प्रशासकीय चक्रमपणामुळे) त्या संकेतस्थळाची पूर्ण रया गेली. आता ते संकेतस्थळ रडतखडत चालू आहे. आठवड्यातून एखादा प्रतिसाद कधीतरी आला तर येतो.

असो. तात्यांना श्रध्दांजली.

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Aug 2023 - 8:20 pm | llपुण्याचे पेशवेll

सध्या मनोगतावर प्रशासकीय अनुमति प्रकरण चालू आहे का नाही?

मुळात आता काही दिवसांत मनोगत चालू आहे की नाही असा प्रश्न पडावा

चौथा कोनाडा's picture

13 Sep 2023 - 2:55 pm | चौथा कोनाडा

चालू असावं असं वाटतंय... कारण लेटेस्ट प्रकाशित झालेला लेख ( https://www.manogat.com/index.php/node/26842 )३० ऑगस्टचा दिसतो आहे !

सर्वसाक्षी's picture

25 May 2023 - 2:50 pm | सर्वसाक्षी

एक अफलातून व्यक्तिमत्त्व. आमची ओळख मनोगत वरची, पुढे मैत्री जमली. कट्टे झाले, ठाण्यात गाठीभेटी झाल्या. तात्यांनी स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करायचं ठरवलं आणि केली.
मिपा सुरू झाल्यानंतर मी काही काळपर्यंत दाखल झालो नव्हतो. एकदा तात्याचा फोन आला, म्हणाला काय ***** माणूस आहेस! माझा गाववाला असून सदस्य होतं नाहीस म्हणजे काय? मी म्हणालो की मनोगत वाले आयडी घेऊन इथे लोक दाखल झाले आहेत असं ऐकून आहे. ताबडतोब उत्तर: दिला तुला तुझा मनोगत आयडी. तात्या ने परवलीचा शब्द मेल केला. मी तेव्हा काही दिवस पुण्यात गेलो होतो, परत आल्यावर विसरून गेलो. दोन दिवसांनी संध्याकाळी परत तात्यांचा फोन. मी गाडी चालवत होतो. मी तात्याला म्हणालो की घरी जाताच मेल उघडतो, परवलीचा शब्द वाचतो आणि दाखल होतो. तात्या उलट ओरडला, लाव गाडी बाजूला आणि साईन खर; परवलीचा शब्द चंद्रशेखर!
तात्या म्हणजे धमाल माणूस. अचानक गालबोट लागलं आणि दिवस फिरले. घडू नये ते घडले. तात्या जायच्या दोनेक वर्षे आधी रामदास शेठचा फोन आला, म्हणाले आज तात्याचा वाढदिवस आहे. आम्ही तो दिवस साजरा करायचं ठरवलं. तात्या नको म्हणत होता पण आम्ही हट्टाला पेटलो. मी, रामदास, संतोष आणि तात्या.
ती अखेरची भेट.

तात्याशी प्रत्यक्षात कधीच भेट झाली नाहीच, मात्र तात्याचं ऋण आहेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2023 - 2:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्याशी भेट झाली नाही. गप्पा व्हायच्या.
मिपा मोठी देण आहे.

-दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी's picture

25 May 2023 - 6:25 pm | कर्नलतपस्वी

आदरांजली.

उमेदीची सर्व वर्षे महाराष्ट्रा बाहेर गेली. पुर्ण निवृत्तीनंतर पुन्हा एकदा मराठी ओढ लागली. शोधता शोधता मिपा सापडले.

सुरवातीपासूनचे साहित्य वाचण्यास सुरवात केली. वाटले इथे लवकर यायला पाहिजे होते.

तात्यांच्या लेखनातून व प्रतिसादांतून तात्यांचे व्यक्तीमत्व थोडेसे कळाले.
पुनश्च आदरांजली व धन्यवाद.

तात्याची प्रत्यक्ष भेट झाली होती. मोठा मजेत जगणारा माणूस होता.
खाण्याची ,गाण्याची आवड आणि ज्ञान दोन्हीही होते.

प्रकाश घाटपांडे's picture

25 May 2023 - 8:56 pm | प्रकाश घाटपांडे

आनंद घारे यांचा मिसळपाववरील पहिले वर्ष अतिशय वाचनीय आहे

चौथा कोनाडा's picture

25 May 2023 - 10:56 pm | चौथा कोनाडा

'रेड लाईट डायरीज'चं विश्व शब्दबद्ध करण्याची प्रेरणा देणारा माझा मित्र तात्या अभ्यंकर आज अनंताच्या प्रवासास निघून गेला...
त्याचं दिलखुलास मनमौजी बेभान जगणं कुठल्याही फंद्यात गुंतणं शक्य नव्हतं.

भीमसेन जोशी ते बाबूजी आणि फोरास रोड ते गंगूबाई हनगल असा त्याचा अस्ताव्यस्त कॅनव्हास होता.

त्यानं आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. आधी अनेकांनी त्याला फसवलं. नंतर त्यानं अनेकांना चकवलं. त्यातूनच त्याला अनेकांचं देणं झालं. त्यात तो झुरु लागला. आपल्याला झाल्याला ओझ्याची टोचणी त्याला लागून राहिली. त्यामुळेच मोरपीसाची लेखणी असूनही व्यसनांच्या आहारी गेला.

तात्याची वृद्ध आजारी आई हा त्याचा वीक पॉईंट होता. तो कट्टर बाळासाहेब ठाकरेप्रेमी शिवसैनिक होता.
अखेरच्या काळात त्याचा सेलफोन नॉट रिचेबल होता.
पानाफुलावर प्रेम करणारा तात्या रशियन टेनिस सम्राज्ञी मारिया शारापोवा हिचा भक्त होता. स्त्री सौंदर्यावर खुलून लिहिणारया तात्याच्या लिखाणात वासनेचा लवलेश नसे.

तो अस्सल गजलप्रेमी होता.
इथल्या अनेक बोरुबहाद्दर कारकुनी छाप व नित्यनेमाने बुंदी पाडणारया लेखकांहून तो कैकपटीने सरस होता. मात्र त्याचं चीज कधी झालं नाही. किंबहुना तो ही या बाबतीत बेफिकीर होता. तसा तर तो जिंदगीभर बेफिकीर होता. पण माणूस अस्सल बावनकशी जिंदादिल होता..

मधुबालेचा आजन्म अविवाहित चाहता होता.
पोस्टच्या अखेरीस त्याच्या नावाची दिलखुलास टॅगलाईन असे.
कुणाचीही टोपी उडवण्यात माहिर असलेला तात्या स्वतःचीच खिल्ली उडवण्यात एक्सपर्ट होता. बादशाहीतल्या जेवणाच्या त्याच्या पोस्ट्स त्याच्यातल्या खवय्याची जाणीव करून देण्यास पुरेशा होत्या.

त्याच्याशी जेंव्हा जेंव्हा भेटलो तेंव्हा तेंव्हा त्याचं ते पाठीवरून प्रेमानं हात फिरवणं खूप भारी वाटायचं. फटकळ स्वभावामुळे अस्सल जिंदगी लपवण्यासाठी मुखवट्याआड जगणं त्याला जमलं नाही. त्यामुळे त्याची वाताहत झाली.

त्याचं जाणं हूरहूर लावून गेलं.
ज्या सोशल मीडियानं त्याला नावलौकिक दिला त्यानंच बदनामीही दिली.
इनबॉक्समध्ये डोकावणारा, लिखाणावर प्रेम करणारा, चुकांची दुरुस्ती करणारा मित्र मी गमावलाय. काही महिन्यांपूर्वी त्याला देणी फेडण्यासाठी हवे असलेले पैसे द्यावेत असे वाटले होते. पण तितके तर माझ्याकडेही नव्हते.

मित्रा तुझी निकड भागवू शकलो नाही याचं आता शल्य वाटतं.
कोणत्या तोंडाने तुला श्रद्धांजली वाहू?

इथे फेसबुकवर तुला श्रद्धांजली वाहणारयांचा पूर येईल. तितक्याच लोकांनी तुला मदत केली असती तर तू वाचला असतास का? पुढे जाऊन तुझ्या सवयी तु बदलल्या असत्या का?

असे अनेक प्रश्न मागे ठेवून जाताना माझ्या मनाला अपराधीपणाची सल लावून तू निघून गेलास.

माझ्या गावाकडे येऊन आषाढातल्या पावसात भिजत, गाणी म्हणायचं तुझं स्वप्न इतक्या अकाली विरुन जाईल असं वाटलं नव्हतं..

निदान तुझा उर्वरित प्रवास तरी सुखाचा होवो..

- समीर गायकवाड.

*************
समीर बापू गायकवाड मनोगत देण्याचा मोह मला आवरता आला नाही.

स्व तात्या अभ्यंकर यांस भावपुर्ण श्रद्धांजली.

मदनबाण's picture

26 May 2023 - 8:26 am | मदनबाण

तात्या उर्फ विसोबा खेचर...
बंड करुन आणि त्यांच्याच शब्दात सगळ्यांना फाट्यावर मारुन स्व्तःच मराठी संकेतस्थळ उभारण्याचे स्वप्न पाहणारा आणि ते पूर्ण करणारा व्यक्ती. तात्या नसता तर मिपा देखील आज दिसलं नसतं.जालावर जी विलक्षण आणि वादग्रस्त मंडळी वावरुन गेली त्यापैकी तात्या एक...
अंमळ आणि फोकलीच्या हे त्यांचे सगळ्यात आवडते शब्द होते... रोज काहीतरी करुन लिहुन, मिपाला जिवंतपणा देण्याचे कार्य ते फार आवडीने करीत... त्यांच्याशी भरपुर गप्पा झाल्या आणि भेटी-गाठी देखील. त्यांच्या आयुष्याचा शेवटचा काळ आणि शेवट तसा व्हायला नको होता इतके मात्र मला मनापासुन वाटते.
तात्या अभ्यंकर यांस भावपुर्ण श्रद्धांजली _/\_

मदनबाण.....

सर्वसाक्षी's picture

26 May 2023 - 9:44 am | सर्वसाक्षी

एखादा चांगला लेख आला की तात्या आवर्जून लिहायचा " मिपाला श्रीमंत करणारा लेख"

कानडाऊ योगेशु's picture

26 May 2023 - 6:01 pm | कानडाऊ योगेशु

अजुन एक म्हणजे सुंदर ललनांचा फोटो टाकुन त्याखाली "ही आमची अमुक तमुक हिच्यावर आमचा फार जीव" असे लिहिणे ही ही तात्यांची एक खास सवय होती..

श्री तात्या अभ्यंकर यांच्यावरील श्री विजुभाऊ यांचा शोकलेख : https://www.misalpav.com/node/44556

तात्या अभ्यंकर यांना, भावपूर्ण आदरांजली....

आता, अजून आर्थिक फसवणूक नको....

सागरसाथी's picture

29 Jul 2023 - 7:29 pm | सागरसाथी

तात्या आणि त्यांच्या मित्रमंडळीला एकदाच भेटलो होते, फोनवरुन संपर्क होत होता, त्यांना आमच्या घरी राहायला यायचे होते ते राहूनच गेले.

केदार पाटणकर's picture

15 Sep 2023 - 1:22 pm | केदार पाटणकर

तात्यांचे लेखन वाचले आहे. वाचताक्षणी आवडले. लेखनातूनच त्यांचे पैलू समजले. त्यांना भेटता आले नाही, हे शल्य राहीलच.
तात्यांना मी आदरांजली वाहतो. एक अवलिया हेच नाव त्यांना अचूक आहे.